आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं माहेरचं आडनाव कोंडे-देशमुख. वर लिहिल्याप्रमाणे 'देशमुख' हि पदवी होती. कोंडे आडनाव मात्र कोंढे-कोंडे झालं असं ऐकलंय. कात्रज घाट ओलांडल्यावर जे खेड शिवापूर लागत ते आमचं गाव.
सासरचं आडनाव 'जोशी'. त्याबद्दल तर काहीच माहित नाही. मूळचे हे लोक (कोळसरे) कोकणातले ह्याशिवाय.
माझ्या आजीचं (आईची आई) आडनाव चव्हाण-पाटील. आडनाव चव्हाण आणि पाटील हि पदवी. ते मूळचे बेळगावचे.

सावंत / सामंत / सामंथा (बंगाली) हे सारखेच. हे पुर्वीचे जमिनदार होते. त्यांच्या आडनावापुढे त्यांच्या प्रांताचे नाव लागायचे बहूदा.

सावंत / सामंत / सामंथा (बंगाली) हे सारखेच. <<<
नाही नाही.
सामंत आणि सामंथा सारखेच.
सावंत त्यापैकी नाहीयेत.

आमचे शिंदे आडनाव बहुतेक राजस्थानातील सिसोदिया वरुन आलेय. गायकवाड चा अर्थ माझ्या मित्रांच्या वडलांनी, गाईंना कवाडबंद करुन त्यांचे पालन / रक्षण करणारे, असा सांगितला होता.

गोव्यात अनेक आडनावे मूळ गावाशी संबंधित ( पेडणेकर, म्हापसेकर, वाळींबकर, वेर्णेकर, लोटलीकर ) असतात. कधीकधी तर जोड आडनावे असतात ( परब मयेकर, नाईक अमोणकर )

सामंत आणि सावंत यात काय फरक आहे? जरा बघ ना. मी घरी गेलो की सावंतवाडी घराण्याचा इतिहास हे पुस्तक बघीन. त्यात दिलय बहुदा.

दा...

गावांच्या नावाशी आणि व्यवसायाशी जी नावे संबंधीत आहेत ती चटकन समजतात. पण इतर बरीच समजतच नाहीत.

गायकवाड चा अर्थ माझ्या मित्रांच्या वडलांनी, गाईंना कवाडबंद करुन त्यांचे पालन / रक्षण करणारे, असा सांगितला होता.<<<<< हो हो मी पण हेच ऐकलंय

पाठक - वेदपठण करणारे, धार्मिक वाचन करणारे पाठक
हे आडनाव महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश मधे आढळते.
याचेच जरा विस्तारित रूप वेदपाठक असेही आहे.

सामंत आणि सावंत यात काय फरक आहे? <<<
सध्याच्या संदर्भाने म्हणलास तर जात, व्यवसाय, खाण्यापिण्याच्या पद्धती, रितीरिवाज कुठेच साम्य नाहीये.

लिमये : याचा आगा पिछा काहीच् माहीत नाही, कुठली पदवी ,उपाधी , हुद्दा, व्यवसाय असं काहीच असावं असही वाटत नाही.
[ अवांतर : मी नवर्‍याला 'तुम्ही मुळचे चिनी असं म्हणते "ली म ये " कसं चिनी माणसाच नावं वाटतं ना]
आवडेश Proud

दक्षे, नाईक हे पद.
मूळ गटापेक्षा वरचढ पणा दाखवणारी आडनावे, सरनाईक, सरदेशपांडे !

पटवर्धन म्हणजे राजपट वाढवणारे हे नक्की. संगीत पटवर्धन असे एक नाटक होते. तारीणी नववसनधारीणी हे नाट्यपद त्यातले.

( आडनावांची गंमत सांगणारे, हलकंफुलकं असे एक मस्त नाटक होते. स्व. रसिका ओक त्यात ७ भुमिका करायची. )

हो राज्याचाच पट. ( अटकेपार झेंडा अशा अर्थी )
नी, ते नाटक बघितले नाही.. पण त्या पदात, "तळमळे अवघी प्रजा, उत्सवी मग्न राजा" अशा ओळी आहेत. त्यामुळे संदर्भ जरा वेगळा वाटतोय.

त्या हलकंफुलकं नाटकात तर बर्‍याच गमंती आहेत. मराठ्यात ९२ कुळी आणि ९६ कुळी असले भेद आहेत, त्यावर पण भाष्य आहे.

हो.

'आडनाव' या शब्दाची व्युत्पत्ती माहीत आहे काय?

ओके, वा तूम्हालाही.. आता ठिकै ना !

एखादे नवीन आडनाव सुरु केल्याचे उदाहरण ऐकलेय का ?

४ पिढ्यांपुर्वी आडनावाचा अपभ्रंश झाल्याचे लक्षात आल्यावर माझ्या मावशीच्या कुटुंबाने आडनाव बदलले.

Pages