झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.
जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.
अँकर - गायक - जावेद अली.
ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.
लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.
२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.
३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.
४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.
५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.
६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा.
७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.
८. शहनाझ अख्तर.
९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.
१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.
११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.
पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की
दगाबाझ रे.. शहनाझच गातोय.
दगाबाझ रे.. शहनाझच गातोय. अॅड मध्ये एकलं तेव्हा काही खास नाही वाटलं. थोड थंड पद्धतीन गातोय असे वाटले.
दगाबाज रे विश्वजीत्/झेन ला
दगाबाज रे विश्वजीत्/झेन ला जास्तं शोभलं असतं .
या वेळी सलमान स्पेशल आणि साजिद वाजिद स्पेशल ही आहे बहुदा.
जसराज ने ही साजिद वाजिद च वीर मधलं 'ताली मार ' गायलय म्हणे, खूप फेमस नसलं तरी चांगलय ते गाणं, दंगा एकदम :).
शहनाझ गाण्यांना झोपाळू बनवतो
शहनाझ गाण्यांना झोपाळू बनवतो :फिदी:, जसराज " ताली मार" चं सोनं करेल. सोनू आणि सुखविंदरने फार सुंदर गायलंय.
आज व्होटिंग टॉपर बर्यपैकी
आज व्होटिंग टॉपर बर्यपैकी सरपाइझिंग आहे .. एलिमिनेशन नॉट सो फेअर..
कोण झालं एलिमिनेट?
कोण झालं एलिमिनेट?
विपु बघ मो.
विपु बघ मो.
विश्चजीत पुन्हा बॉटम मधे
विश्चजीत पुन्हा बॉटम मधे :(.
मला काल पियानो चं जास्तच अतिक्रमण झाल्या सारखं वाटलं काही गाण्यां मधे.
विश्वजीत च्या 'आन मिलो सजना' च तर सगळं रसायन च बिघडलं नको तिथे पियानो वाजताना ,.. अगदी दुधात मीठाचा खडा पडल्या सारखा वाटत होता मधेच पियानो त्या गाण्यात :(.
अर्थात मला काही क्लासिकल चं एवढं ज्ञान नाही पण कानाला तरी नको वाटला पियानो त्या गाण्यात.
काल मला रेणु नागर, चक्क पुन्हा एकदा अर्श्प्रीत आणि नेहेमी प्रमाएन अमान ची गाणी अवडली.
जसराज चं पण नाही आवडलं 'मेरा साया' आणि 'तू न अजाने आस पास है खुदा' काँबो फारसं !
सल्लु सर्दाळलेला होता
सल्लु सर्दाळलेला होता त्यामुळे खास दबंग स्टाईल मजा नाही आली.
महंमद आमान ... याद पियाकि आए
महंमद आमान ... याद पियाकि आए !!! व्हॉट अ ट्रिट !
इतर सगळेच फिके पडले अमान पुढे तरीही रेणु आवडली , जॅझिम पण .
सल्लु आज डाउन दिसला .
हिमांशु कोण? तो वाईल्ड कार्ड
हिमांशु कोण? तो वाईल्ड कार्ड द्वारे एन्ट्री घेतलेलाच ना?
हो, तोच हिमांशु, मस्तं गायचा
हो, तोच हिमांशु, मस्तं गायचा !
अमान नेहमीच जबरी गातो. जाझिम,
अमान नेहमीच जबरी गातो. जाझिम, जसराज पण मस्त.
सलमान शिंकत वगैरे होता, मोठ्ठ्या टिशु ला नाक पुसताना पण दिसत होता!एडिट का नाही केले ते
माझ्या दृष्टी ने म. अमान 'याद
माझ्या दृष्टी ने म. अमान 'याद पियाकी आये' तितकासा चांगला गायला नाही. हेमंत रागाची नंतरची मांडणी छान पण ठुमरी गाताना थोडासा वाट चुकल्यासारखा वाटला.
यस्टर इयर्स एपिसोड मधे
यस्टर इयर्स एपिसोड मधे म्हणावी तितकी मजा नाही आली.
शहनाझ - अमान- माधुरी चांगले गायले.
'आके सीधी लगी' ओरिजनल गाणं मुळातच मला आवडत नाही , विश्चजीत न दुसर गाणं घेतलेल आवडल असत!
जसराजचे सूर सतत लागत नव्हते
जसराजचे सूर सतत लागत नव्हते काल. वाजीद बोललासुदधा कि सूरांकडे लक्ष द्यायला हवे आहे. परवा ज्याप्रमाणे महेश भट्ट सूऱक्षेत्रमध्ये बोलला होता कि गाणं आणी गाण्याची अॅक्टींग करणं ह्यात खूप फरक आहे. मला तरी अर्शप्रीत, जसराज, ई. मंड्ळी तशीच वाटतात.
गेहना अगदी बरोबर. गाण्यातली
गेहना अगदी बरोबर. गाण्यातली तृटी अभिनयात (नखरे?) भरून काढतात का?
मला पण काल जसराज अतिसामान्य-
मला पण काल जसराज अतिसामान्य- ऑर्केस्ट्रा सिंगर सारखा वाटला. अर्शप्रीत पण सेम. रेणू, शहनाझ, अमान हे आवडले. माधुरीचं एलिमिनेशन योग्यच.
अर्शप्रीत गेल्ली असती तरी
अर्शप्रीत गेल्ली असती तरी चालले असते.
माधुरीचे क्या जानू सजन . .. इतकं बकवास गायली. पहिल्या 'क्या' ला च बेकार वाटले.
हे गाणम खूपच फेव असल्याने असेल पन ते कोणी असे गायले की लगेच जाणवते.
ह्या गाण्यात उदासी, जरासे हॉटींग टच आहे. पण तो काहीही पकडला नाही खास.( भर अंधार्या रात्री पावसात एकटे असताना उदासी फीलिंग येइल असे...)
जसराजचा आवाज खास नक्कीच नाही पण उगाच रीमिक्स वा वेस्ट्रन च्या आवरणात झाकला जातो. पण कधी कधी उघडं पडते त्याचे आवाजाचे पितळ.
विश्वजीत पण ठिक ठाक होता... बोर होता एकुणात कार्यक्रम. टीवी लावून इतर कामं केली ते बरं.
जसराज चा ग्राफ जरा खाली
जसराज चा ग्राफ जरा खाली चाल्लाय सध्या !
ह्म्म्म...... जसराज......
ह्म्म्म...... जसराज...... थोडा संभलो !!
विश्वजीत काल झकास गायला आणि पर्फॉर्मर ऑफ द डे जिंकला...... !!
शहनाज पण जबरी होता
शहेनाझची उगाच क्रेझ निर्माण
शहेनाझची उगाच क्रेझ निर्माण केली आहे / झाली आहे असं मला वाटतं. मला पर्सनली तो एवढा आवडत नाही.
मला पण काल जसराज अतिसामान्य- ऑर्केस्ट्रा सिंगर सारखा वाटला. >>>> मी जसराजची फॅन असुनही मला हल्ली तो पुर्वीएवढा अपिल होत नाही.
यस्टर इयर्स एपिसोड मधे म्हणावी तितकी मजा नाही आली. >>> हो. मला पण.
सगळे जज्ज जसे बोलले तसं,
सगळे जज्ज जसे बोलले तसं, जसराज चा आवाज छान नाही लागला पण त्याचा प्रयोग चांगला होता.
माझ्यामते त्याच्या कालच्या प्रयोगाबद्दल थोडं विस्तार करून सांगायला हवं होतं, म्हणजे ऐकणार्यांना अजून जास्ती आनंद मिळाला असता. सेव्हन्-एट सेव्हन-एट काय सुरू होतं?
मला शहनाझ उलट हल्ली चांगला
मला शहनाझ उलट हल्ली चांगला वाटतो, एकदम कन्सिस्टन्ट. काल पण आवडले त्याचे गाणे.
विश्वजीत एकदम खल्लास गायला रुत आ गयी रे!! अन त्यावर बोलताना शंकर चे या चिमण्यांनो... दोन ओळीच पण किती सुंदर गायला! बाकी जसराज पुन्हा सामान्य वाटला काल पण.
शनिवारचं विश्वजीतचं गाणं
शनिवारचं विश्वजीतचं गाणं तितकसं आवडलं नाही...
शंकर महादेवनचं श्रीनिवास
शंकर महादेवनचं श्रीनिवास खळ्यांवरचं प्रेम नेहमीच दिसून येतं. त्याने " या चिमण्यांनो" कसलं ईझीली गाऊन दाखवलं . तसंच त्याने जसराजच्या " कैसी है ये रूत के जिसमें" गाण्यानंतर सांगितलेली आठवण ऐकून सुद्धा मस्त वाटलं. "दस" सिनेमातील गाण्यात थोडा फेरबदल करून त्याने "दिल चाहता है" मधलं हे गाणं कसं बनवलं हे सांगितलं आणि लगेच गाऊन सुद्धा दाखवलं.
काल विश्वजीत जसराजच्या एक्स्परिमेंट करण्याच्या स्टाईलने " रुत आ गयी रे" गायला असं वाटलं :), पण अतिशय उच्च गायला.
काल रेनूनागर बिल्कुल आवडली
काल रेनूनागर बिल्कुल आवडली नाही. मुळात ते इतकं हळूवार गाणं तिच्या आवाजाला सूट होण्यासारखं नव्हतंच, मधे मधे तर तिचा आवाज अगदी कर्कश वाटला.
रेणु नागर तशीपण मला
रेणु नागर तशीपण मला अॅमॅच्युअर सिंगर वाटते. काहिवेळा ठिकठाक, काहिवेळा अगदी ऐकवत नाहि. तसंच आता जाड्या हस्कि आवाजांचा ओव्हर डोस झाला आहे. म्हणुनच माधुरी डे आवडायची. लतादिदिंची अवघड गाणी घेउन निदान ७० ते ८०% तरी न्याय द्यायची. आवाजाचा पोतसुद्दा चांगला होता तिचा.
रविवारी मला सगळ्यांमध्ये जाझीम आवडला. का करु सजनी फारच सुंदर गायला. शेहनाझचं गाणंपण खुप सूदींग होतं.
मलाही रविवारी फक्त जाझिम आणि
मलाही रविवारी फक्त जाझिम आणि चक्क शहनाझ आवडले.
विश्वजीत टु बी व्हेरी ऑनेस्ट गाताना ब्रिदिंग कंट्रोल मधे कमी पडला , धाप लागल्या सारखी वाटत होती ' रुत आगयी रे' गाताना
जसराज ने वाट लावली ' कैसेर है ये रुत' ची ..जजेस नी का १० मार्क्स दिले.. का ही ही !!
मला हा भाग आवडला, त्या दोन
मला हा भाग आवडला, त्या दोन ओळी शंकर महादेवन काय गायल्या. सूर समजावून पण मस्त सांगितले.
१३:१७ 'या चिमण्यांनो..' आहे
अफाट वाटले.
http://www.youtube.com/watch?v=XmYuv2bBiTw
>>>>विश्वजीत टु बी व्हेरी
>>>>विश्वजीत टु बी व्हेरी ऑनेस्ट गाताना ब्रिदिंग कंट्रोल मधे कमी पडला , धाप लागल्या सारखी वाटत होती ' रुत आगयी रे' गाताना <<<<< अगदी अगदी......थोडा ओवररेटेडच आहे नाहीतरी तो आणी जसराज सुद्धा. बरेच वेळा बेसुरे होतात दोघेहि आणी तशी फार छान व्हॉईस क्वालिटीपण नाहि आहे दोघांचीहि.
Pages