सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महंमद अमान जो तराणा गायला तो कल्याण रागातला. पतियाला घराण्याचे थोर शास्त्रीय गायक उ.बडे फतेह अली खान यानी प्रसिद्ध केलेला. तूनळीवर सापडेल. त्याची सरगम मात्र शाम्-चौरसी घरण्याच्या उ.सलामत अली खान साहेबांसारखी आहे.

जाझिम गेला या शुक्रवारी.
या आठवड्यात गेस्ट होते पण प्रमोट करायला आलेले अ‍ॅक्टर्स होते (अर्जुन-चित्रांगदा) , कोणी गेस्ट 'जजेस' नव्हते या आठवड्यात !
मागच्या आठवड्यात सुफी थीम ला 'प्रासुन जोशी' होता आणि अजय अतुल त्याच्या आदल्या दिवशी.

अर्जुन रामपाल व चित्रांगदा सिन्ग प्रमोशनला आले होते तरी त्यांचे प्रतिसाद 'डीफ' आणि 'डंब' नव्हते. तांत्रिक नसले तरी मोजके आणि उचित होते

नाही, काल आणि आज नविन भाग नाही आहेत. आज झी सिने अ‍ॅवॉर्ड्स चालू आहेत. शाहरूख खानला इंटरनॅशनल आयकॉन मेल अ‍ॅवोर्ड दिलेलं बघितलं आत्ताच.

२७ जानेला फायनल. अमान, जसराज, विश्वजीत आणि शहनाझ. तसं बघायला गेलं तर हे चौघंही त्यांच्या कॅटेगरीमधे विनर आहेतच. त्यामुळे फायनल एक फॉर्मॅलिटी आहे नुसती. जॅझिम बाहेर गेला असला तरी लवकरच गझलगायकीमधे नाव मिळवू शकेल असा विश्वास आहे.

सर्वात जास्त कौतुक मोहम्मद अमानचं. प्रत्येक एपिसोडमधे फक्त आणि फक्त क्लासिकल गाणं गाऊन तो फायनलला पोचलाय. प्रोग्राममधे गाण्यासाठी त्याला जेवढा वेळ मिळतो त्यामधे त्याला जास्तीतजास्त प्रेक्षकांना व्होट्ससाठी खेचायचं असतं. यासाठी त्याला तानबाजी माफ. तानेव्यतिरीक्त तो अजूनही जास्त गाऊ शकतो याचा विश्वास तमाम जजेसनी व्यक्त केलेला आहे. आणि तसा तो अजून फक्त २० वर्षाचा आहे. खूप पुढे जाईल या शुभेच्छा. Happy "रीअ‍ॅलिटी शोमधे उडती आणि नविनच गाणी चालतात" असा एक फंडा तमात आयडॉल अथवा तत्सम प्रोग्राम्समधे बघायला मिळतो. त्या सूत्राला छेद देणारा हा एकमेव गायक निघाला. झीचे कौतुक यासाठी की टीआरपीसाठी त्यांनीदेखील त्याच्याकडून कधी इतर गाण्यांची जबरदस्ती केली नाही. (आयडॉलच्या सीझनमधला एक राजस्थानी लोकगीते गाणारा गायक इथे मला तुलनेसाठी आठवतोय!! त्या गायकाला नंतर नंतर ऐकवत नव्हतं.)

जसराज गायक जितका आहे त्याहून शंभर टक्के जास्त परफॉर्मर आहे. त्यामुळे यंदाच्या येत्या काही वर्षात कॉलेज फेस्टमधे, लाईव्ह शोजमधे त्याला खूप चान्स आहे. त्याचा ऑलरेडी रॉक बँड आहेच, त्यामुळे त्याचेही भविष्य उज्वल आहे.

विश्वजीत आणि शहनाझ पार्श्वगायनामधे पुढे जातील असा अंदाज.

खरंच वाईट वाटतंय कार्यक्रम संपणार म्हणून.

ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांमधे अजिबात वेड्यासारखी चढाओढ नव्हती. एकमेकांना सगळे आनंदाने आणि मनापासून पाठिंबा देत होते, कौतुक करत होते. शिवाय चारही मेंटॉर्स सुद्धा हा माझा , तो तुझा असं न करता निखळ संगीताचा आनंद लुटत होते. त्यामुळे सगळ्या स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढत होता.

कोण जिंकेल असं वाटतंय ?

शेवटच्या चार जणांमधे २ मराठी गायक........खूप छान वाटतंय Happy

अरे या वेळी फिनाले लाइव्ह नाहीये, झाली आहे ऑलरेडी..टाइम्स मधे विनर डिक्लेअर केलाय
स्पॉयलर अ‍ॅलर्ट : निकाल आहे या लिंक मधे

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tv/The-winner-of-Sa-Re-...

रिझल्ट व्काइट एक्स्पेक्टेड !

.

आजचा फिनालेच्या आधीचा म्हणजे स्टुडीओ मधला शेवटचा एपिसोड मस्तं झाला , ते अ‍ॅफ्रो ड्रमर्स काय वाजवत होते !
परफॉर्मर ऑफ द वीक विश्वजीत टोटली डिजर्विंग !
त्याची आणि अमन ची डुएट कव्वाली वॉज ट्रिट !!

अरे या वेळी फिनाले लाइव्ह नाहीये, झाली आहे ऑलरेडी..>> हो.काल की परवाच शूटिंग झालं. झी मराठीवर प्रेक्षक म्हणून यायचे असल्यास संपर्क साधा अशी पट्टी फिरताना पाहिली. विनर कोण याचा अंदाज आलेलाच आहे. पण तरी पूर्ण प्रोग्रामचं पॅकेज यंदा अफलातून होतं. अजिबात ड्रामेबाजी नव्हती आणि रडारड तर अगदीच कमी. त्यामुळे परफॉर्मन्स हाच एक महत्त्वाचा मुद्दा राहिला. यंदा व्होट अपील पण भीक मागितल्यासारखं केलं नव्हतं आणी प्रांतवाद पण जास्त नव्हता अन्यथा "मेरे मराठी भाईबहनोंको मेरी रीक्वेस्ट मुझे ज्यादासेज्यादा व्होट करे" वगैरे ऐकून टाळकं सटकायचं.

जजेसमधे साजिद वाजिद सुरूवातीला अगदीच छपरी वाटत होते. नंतर नंतर ते पण अगदी चांगले वाटायला लागले. शंकर महादेव अ‍ॅज युज्वल बेस्ट मेंटॉर. राहुलराम अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं मत सांगायचा. बॉलीवूड स्टार्स पण जेवढ्यास तेवढेच होते. उगाच त्यांचा ओव्हरडोस केला नाही. उलट यंदा क्लासिकलमधले दिग्गज गेस्ट जज म्हणून जास्त दिसले. एकंदरीत चांगला प्रोग्राम. आता याच स्लॉटमधे नच बलिये बघावं लागणार म्हणून जास्तच दु:ख Sad

हो , दाखवली फिनाले!
१.जसराज
२. शहनाझ
३. विश्वजीत
४. अमान

मला हे नंबर उलट क्रमाने लागलेले आवडले असते Proud

डीजे तू टाईम्सची लिंक दिली होतीस ती मी वाचली आणि नंतर नवर्‍याबरोबर कोण जिंकणार म्हणून हजार रूची पैज लावली Lol

जसराजचं आदल्या दिवशीच्या एपिसोडमधे दिल्ली दिल्ली गाणं मस्त झालं होतं. त्या ड्रम कॅफेचा मस्त वापर करून घेतला त्याने. कजरारेमधलं एक कडवं पण त्याने सही वापरलं होतं.

दिपांजली अनुमोदन,
पण शहनाज पेक्षा जसराज जर्रा बर्रा गातो..

पण अमान थेट चौथ्या क्रमांकावर आलेला पाहून माझा प्रचंड हिरमोड झाला काल. Sad

खरं तर ती वोट्स = फक्त लोकप्रियता एवढेच होती. बाकी त्या चारी जणांची एकमेकाशी तुलना करणे पण बरोबर नाही. ते चौघे विजेते च आहेत आपापल्या जॉनर मधे.
फिनाले बोरिंग होती. तो गुरमित अन त्याहून जास्त ती अर्चना झी वर प्रत्येक शो मधे बघून भयंकर इरिटेट होते Sad
आणि तो योयो कोण ?? कसला टुकार होता, अन या स्पर्धेच्या पात्रताफेरी च्या लायनीत पण उभे रहायची लायकी वाटाली नाही त्याची!! कशाला बोलावले पर्फॉर्म करायला काय माहित.
अन आता सारेगम लिटल चँप्स असेल असे मला वाटले होते पण ड्रामेबाझ म्हणून अ‍ॅक्टिंग टॅलेन्ट शो येत आहे!अत्यन्त आगाऊ लहान मुले बघायला मिळणार असे माझे फर्स्ट इम्प्रेशन झाले! Uhoh

जसराज जिंकला त्यामुळे खूप आनंद झाला. तो नक्की मोठा कंपोझर होणार !!

विश्वजीत दुसरा आला असता तर खूपच आवडलं असतं Wink

अमान चौथा आला हे मला तरी आवडलं. खरं तर त्याची कोणाशी स्पर्धा करण्यात अर्थच नव्हता. तो क्लास अपार्ट आहे. पण सारेगमप च्या मंचावर जसराज नक्कीच विनर होता.

जॅझीम आणि हे चार हे सगळेच आपापल्या जौनर मधे बेस्ट होते.

फिनाले मला पण अजिबातच आवडला नाही. तो गुरमीत तर डोक्यात जातो अगदी !!

राहुल राम ची अनुपस्थिती मात्र जाणवली.

बाकी त्या चारी जणांची एकमेकाशी तुलना करणे पण बरोबर नाही. ते चौघे विजेते च आहेत आपापल्या जॉनर मधे. >> ह्याला अनुमोदन मैत्रेयी.
मी पण आधीच लिंक वाचली होती कारण कोणीही आले तरी आनंदच झाला असता. ह्यावेळी पहिल्यांदा असे झाले की अंतीम फेरीतला कोणीही विजेता आलेला मला चालणार होते.
आता पहायची वाट पुढचे सारेगम सुरु होइपर्यंत. अरेरे!

http://online3.esakal.com/esakal/20130128/5702868796784813010.htm

झी टीवी आणि त्या मोबाइल कंपन्या एवढे कमवतात सगळ्या स्पर्धकांवर आणि विजेत्याला फक्त एक हिरो होण्डा बाईक? इतके उघड उघड एक्स्प्लोयटेशन इतर कुठे होत नसेल..

बाकी मोहम्मद अम्मान एक नवीन तारा मिळाला, जो अजून १० वर्षानी पण शास्त्रीय सन्गीतात चमकत असेल असे नक्की वाटते. इतिहास पाहता बाकीच्यान्चे अवघड दिसते.. अजून ६ महिन्यानी च्यानेलवाले नवीन मुले, मुली आणतील फसवायला.. प्रेक्षक तर आहेतच.. Happy

Pages