सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बा प रे विश्वजीत ने लल्लाटी भंडार काय गायले. तौकिफ कुरेशी चे तालाचे प्रयोग अचम्बित करणारे होते. हा झाकीर हुसेनचा भाऊ आणि अल्लारखांचा मुलगा.. अर्शप्रीतच्या गाण्याने तिला पुनहा स्पर्धेत दावेदार बनवले आहे. मला ती आवडत नसूनही तिचे यावेल्चे कोइ आनेको है बाबा रे खूपच आवडले. ३० मार्क्स घेतले तिने. रेणू हल्ली निराशा करू लागली आहे. तिने रेशमाची गाणी गायली पाहिजेत.

कालचा एपिसोड मस्त झाला. तौफिक कुरेशीजी कमाल !! अमान च्या गाण्याला हे काय करतील असा मला प्रश्न पडला होता पण काय सही वाजवले कुरेशींनी, अन त्या गाण्याला सूटही झाले!!
रेणूची चूक माझ्या लक्षात आली नव्हती खरं तर. विश्वजीतने छान म्हटले लल्ल्लटी भंडार.. पण त्या गाण्याला ओरिजिनल गाण्यातला टिपिकल लोकगीत टाइप तारस्वरातला आवाजच जास्त छान वाटतो.

तौकिफ कुरेशी अ‍ॅन्ड मुंबई स्टँप..कमाल धमाल बेमिसाल!!!!
विशव्जीत च्या बबातीत मैत्रेयीला अनुमोदन.. अजय चा 'मिट्टि कि खुशबु' वाला आवाज डोक्यात भिनलाय, त्यापुढे विश्वजीत चं गायन कितीही छान गायला तरी उच्चार थोडे शुध्द तूपातले वाटले :).
मलाही अर्श्प्रीत चक्क आवडली, यावेळी हिमांशुनेही आपले पोटेन्शिअल दाखवले..काय सुदिंग व्हॉइस आहे त्याचा.. मजा आगया, आज झेन ही चक्क आव्डला !
पण अ‍ॅज ऑल्वेज मोहंमद अमान द बेस्ट!
शंर मकहादेवन-तौकिफ चा प्रफॉर्मन्स अशक्य सुरेख.. व्हॉट अ ट्रिट !

पादुकानन्द आणि दिपांजलीच्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन.

तौफिक कुरेशी - काय अशक्य माणुस आहे. केवढा क्रिएटीव. काय वाटेल त्या वस्तु वापरुन एवढं सुंदर संगीत दिलं त्या गाण्यांना. या वयात केवढा दमसांस आहे. तोंडाने एवढं म्युझिक म्हणजे काही सेकंदात फेंफें होइल. Happy शेवटचा परफॉर्मन्स पण अंगावर रोमांच आणणारा होता. संपुर्ण एपिसोडच महान होता.

बॉम्बे स्टॅम्पची संपुर्ण टीमच अ‍ॅमेझिंग ! मी एक सेकंदही मिस केला नाही हा एपिसोड. रिपीटही पाहिला.

जसराजचं गाणं यावेळी विशेष नाही आवडलं.

जसराजचं गाणं यावेळी विशेष नाही आवडलं.
<<
मला पण नाही आवडलं.
काझं गट फिलिंग सांगतय कि शंकर च्या टिम मधून अर्श्प्रीतच पुढे जाईल, जसराज ला अता थोssssड लो प्रोफाइल ठेवायला लागलेत.
रेणु पण फार काही खास नाही वाटते गेले २-३ एपिसोड पासून.
तसेही सुरवाती पासून ज्या स्पर्धकांना हाइप करतात ते नाहीच जिंकत !

>>>>तौफिक कुरेशी - काय अशक्य माणुस आहे. केवढा क्रिएटीव. काय वाटेल त्या वस्तु वापरुन एवढं सुंदर संगीत दिलं त्या गाण्यांना. या वयात केवढा दमसांस आहे. तोंडाने एवढं म्युझिक म्हणजे काही सेकंदात फेंफें होइल. शेवटचा परफॉर्मन्स पण अंगावर रोमांच आणणारा होता. संपुर्ण एपिसोडच महान होता.

बॉम्बे स्टॅम्पची संपुर्ण टीमच अ‍ॅमेझिंग ! मी एक सेकंदही मिस केला नाही हा एपिसोड. रिपीटही पाहिला.

जसराजचं गाणं यावेळी विशेष नाही आवड>>>><<

+१

तो झैन ने कुठे ऑडिशन्स दिली? ह्यावेळी फक्त भारतातच ऑडिशन्स होती ना? अजुन टिकवलाय त्याला?

अजुन म्हणजे काय उलट अताच खरा झेन मह्त्वाचा चॅनल ला !
पाकिस्तान, मिड्ल इस्ट सगळीकडची व्होट्स नको का यायला :).

जसराज काल आवडला नाही. झैन चांगला गायला. इन जनरल नॉट बॅड अ‍ॅट ऑल, मला आवडतात त्याची बरीच गाणी. हाइप नसली तरी त्याच्या स्टाइल ची गाणी चांगली गातो.
तौफिक कुरेशीना बोलावून झीने प्रेक्षकांना ट्रीटच दिली काल- परवा. मज्जा आली. काही अपवाद वगळता यावेळचे सारेगम फार सही चालू आहे एकूण.

तौफिक कुरेशीना बोलावून झीने प्रेक्षकांना ट्रीटच दिली काल >>> अगदी अगदी. हिंदी सारेगमप म्हणुनच आवडतं मला. शाहरुख खानला बोलावण्याचं झीचं पाप मी माफ करुन टाकलं आहे ते त्यांनी बोलावलेल्या इतर दिग्गजांमुळे. पं. विश्वमोहन भट, जसराजजी, परवीन सुल्ताना यांसारख्या महान लोकांना बोलावुन त्यांनी सगळ्या स्पर्धकांचं जगणंच सार्थकी लावलं. इतरवेळेस कुठे त्यांना या लोकांचं मार्गदर्शन लाभतं?

तौफिक कुरेशीना बोलावून झीने प्रेक्षकांना ट्रीटच दिली काल << अनुमोदन. सारेगमपमधे क्लासिकल लोकांना कायम आमंत्रण असतं. तौफिक कुरेशी ग्रेट आहे यात वाद नाही. त्यांच्या अंगामधेच ताल आहे. मुंबई स्टँप्स पण सही होतं.

मला विश्वजीतचं गाणं आवडलं पण अमान आणि अर्शप्रीत बेस्ट होते. जसराज उत्तम गाऊ शकतो पण त्याला दरवेळेला प्रयोगच करायचे असतात.

अर्शप्रीत टोटल सरप्राईझ गायली काल आधीच्या सगळ्या भागांपेक्षा..

जसराज थोडा ढेपाळला काल.. कदाचित जास्त प्रयोग करण्यामध्ये. प्रेक्षकांकडूनच मार्क्स कमी मिळाले..

विश्वजीत मस्त गायला.. पण त्याच्या आवाजात गानं तितकं सूट झालं नाही...

जॅजिमची गझल फारशी आवडली नाही.. कदाचित मूळ गाणं फार ऐकायलाच परिणाम असू शकेल..

अमान जबरीच... तो जबरी ताना घेतो.. पण सुरु करताना डायरेक्ट मध्य लयीतच का सुरु करतोय ते कळत नाहीये.. तसं बघितलं तर प्रत्येकाला साधारण ५ मिनिटं मिळतात.. त्यात व्यवस्थित एखादा राग सादर करायला पाहिजे खरं तर

कालचा भाग सगळ्यांसाठी पेशल होता.. त्यातही अमान साठी तर होताच होता.. स्वतः तौफिकभाई साथीला म्हणजे तर..

काल एकूणच जजेस कडून सगळ्यांना गुण बरोबर दिले गेले असही वाटलं...

पुढच्या आठवड्या पासून एलिमिनेशन्स चालू झाली की बघायचं कोण कोण तग धरतंय ते..

कुरेशी आणि गेंग ने कम्माल केली. सर्वांना अनुमोदन.

मला शहनाजचे गाणे ऐकल्यावर खुप भिती वाटली की तो बाहेर जाणार पण काल कोणाला काढले नाही ते बरे झाले नाहीतर त्याची खैर नव्हती.

भारतात ऑडिशन्स नसतील द्याव्या लागत त्यांना, एखादी पोझिशन रिझर्व्ड असते इंटरनॅशनल स्पर्धकां साठी, तिथूनच कोणी तरी सिलेक्ट करून पाठवलं असेल, तसेही त्याची योग्यता होतीच फिट होण्याची आहेत त्या १२ शॉर्ट लिस्टेड मधे.
माझा काही तो खास फेवरेट नाही जसा मुस्सर्रत अब्बास होता , पण त्याच्या जॉनर मधे चांगलाय.

मला शहनाजचे गाणे ऐकल्यावर खुप भिती वाटली की तो बाहेर जाणार पण काल कोणाला काढले नाही ते बरे झाले नाहीतर त्याची खैर नव्हती.

<<< सुनिधी,
अता इथुन पुढे पब्लिक व्होटिंग वर आहेत रिझल्ट्स, नेक्स्ट वीक होईल कोणीतरी एलिमिनेट.

धन्सं नवीन लिंकसाठी.
१ तारखेचा भाग पाहिला..कुरेशींनी कमाल केलीय...अमान ़क्लास गायला आणखी एक गायक आता विसरले त्याने ते एक नेहमी काँपिटिशनसाठी गायले जाते त्यातलं न निवडता वेगळं शांत गाणं छान गायलं

माधुरी डे मला वाटतं जाईल. १ च्या परफॉर्मन्स प्रमाणे.

संपदा, त्यादिवशी झी रिश्ते अ‍ॅवॉर्डस नावाचा महाभयानक बोर प्रोग्राम होता. त्यामुळे एपिसोड झालाच नाही.

टॉप टेन मध्ये चक्क नॉर्थ इस्टचा एकही स्पर्धक नाहिये... पंजाब मधून बरेच जण आहेत.. त्यांच्या त्यांच्यातच मतं विभागणी होत राहणार कोणी तरी दोन जण उरे पर्यंत.. महाराष्ट्रातली मतं जसराज आणि विश्वजीत मधे विभागली जाणार.

Ravivari hota ki episode. ushira suru zala. shanivari 5 gani ani mag ravivari uraleli gani zali. Shankar mahadevan ani Kuresheeji yanchi jugalbandi tar mahaaaan!

मैत्रेयी, ती जुगलबंदी शनिवारी होती ना? Uhoh रविवारी ८ वाजता तो रिश्ते अ‍ॅवॉर्ड लागला तो चांगला अकरापरर्यंत चालू होता. त्यानंतर झाला का एपिसोड? मग मी पाहिला नाही.

मैत्रेयी, ती जुगलबंदी शनिवारीच होती. शनिवारचा एपिसोड मला वाटतं २.३० तासाचा होता. (घड्याळाकडे लक्षच गेलं नाही एवढी सुपर्ब ट्रीट होती. Happy ) रविवारी नसल्यामुळे कदाचित शनिवारी जास्त वेळ दिला असेल.

oh mag amachya ithe 2 separate bhag kele hote. 1 Saturday la regular ani dusara Sunday la, jo late suru zala hota.

महंमद अमान म हा न आहे.
मागच्या दोन्हीही एपिसोडमधली त्याची गाणी केवळ अशक्य!

आजचा एपिसोड केवळ अ फ ला तू न!!! एकदा बघून समाधान न झाल्याने पुन्हा बघतेय, मगच आणखी काही लिहू शकेन Happy

मस्त होता आजचा एपिसोड.
विश्वजित बॉटम थ्री मधे Sad ....कोण गेले ते सांगत नाही

Pages