सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वजीत ने गेल्या दोन भागात सिद्ध केलं, हल्लो , मी पण जिंकण्याच्या रेस मधे आहे Happy मस्त पर्फॉर्मन्सेस दोन्ही.
मला पद्मनाभ आवडत नव्हता फारसा. शहनाझ सुरेखच गायला काल. पण त्याने थोडा अजून कॉन्फिडन्स वाढवायला हवा किंवा जास्त अग्रेसिव्ह व्हायला हवं असं मला वाटतं. माधुरीचा आवाज चांगला असला तरी जसराज किंवा इतर सध्याच्या स्पर्धकांसारख्या गाण्यात व्हेरिएशन्स, अ‍ॅडिशन्स वगैरे तिच्या क्षमतेपलिकडे आहे. या स्टेज ला ती आउट झाली तर आश्चर्य वाटू नये. पण अर्थात आता पब्लिक वोटिंग सुरु होणार म्हणजे काय वाट्टेल ते रिझल्ट्स लागू शकतात!
वाइल्ड कार्ड मध्ये कोण परत येणार ? मला महंमद अमान आला तर आवडेल पण काय सांगावं चॅनल ची काय गणितं आहेत!
माझा अंदाज की चॅनल नक्की एक तरी मुलगी परत आणणार - एकही धड नसली तरी. शिवाय बहुधा पद्मनाभ ला पण आणतील असे वाटते. अजून एक कोण?

यस्स, मला विश्वजीत सॉल्लिड आवडला गेले २ भाग.. जसराज पेक्षा जास्त.
शहनाझ... hmm..समहाउ चांगला गात असला तरी माझा फेवरेट नाही,पण पब्लिक सपोर्ट जोरदार आहे बहुदा त्याला.
पादुकानन्द,
२ मराठी मुलं टॉप ३ मधे यायची शक्यता फार म्हणजे फारच कमी वाटतेय, पब्लिक व्होटिंग म्हणाजे एक तरी नॉर्थ इस्ट-कोलकाता स्पर्धक असणारच , या पूर्वी एक वैशाली माडेचा अपवाद वगळता पब्लिक व्होटिंग ने फार कमी महाराष्ट्राचे स्पर्धक जिंकलेत !
पब्लिक व्होटिंग नी गणितं एकदम बदलु शकतात.
जजेस जिला बॉटम ३ मधे आणत होते ती माधुरी डे अचानक पुढे जाउ शकते.
वाइल्ड कार्ड राउंड आहे कि विसरले हे लोक ??
मला अमान आणि कुणाल पंडित आलेले आवडतील पण झी च्या मार्केटिंग टिम च्या दृष्टिने जे कोण फायद्याचे तेच येतील बहुदा.. ती अर्श्प्रीत येण्याची जाम शक्यता वाटतेय मला:(.
वाइल्ड कार्ड विनर नक्कीच राहुल राम च्या टिम मधे जाणार !

बाप रे भीषण बातमी, उ ट्युब वर एका प्रोमो मधे वाइल्ड कारड साठी पर्फॉर्म करताना ती पहिल्या फेरीतच बाद झालेली बार्बी डॉल दिसली Uhoh

ओके यु ट्युब च्या लिन्क वर महंमद अमान , अर्शप्रीत आणि एक नवाच कुणीतरी हिमांशु म्हणून हे ३ आले असे दिसते.

मला उलट जिवात जीव आला, ती बार्बी डॉल आली नाही म्हणून! तिच्यापेक्षा ही परवडली. आणि अमान आला ते एक उत्तम झालं.

हो, अमान आला ते बेष्ट !!
अता बघु फॉर अ चेन्ज, झी सोनु निगम च्या काळतली डिग्निट परत आणत क्लासिकल सिंगर ला विजेता बनवते का :).

अमान उच्च अ‍ॅज ऑलवेज !
हिमांशु पण छान गायला , अता २ गझल गझल गायकां पैकी एक होणार मग एलिमिनेट !
अर्श्प्रीत नसती आली तरी चालल असत .

मी हा कार्यक्रम पाहात नाही, पण काल सर्फिंग करताना पं.विश्वमोहन भट्ट दिसले. एका स्पर्धकाबद्दलचे त्यांचे वक्तव्य "भारतीय शास्त्रीय संगीताला भविष्यातील एक मोठे नाव मिळाले आहे. तानसेनला गाताना ऐकलेलं कोणी नाही, पण तो जवळजवळ असाच गात असेल!"

अमानला ह्या स्टेजवरून लोकांपुढे आणले ही गोष्ट चांगली आहे. पण एकंदरीत उत्तम क्लासिकल गाणारे पण बाकी प्रकार न गाऊ शकणार्‍यांसाठी हे स्टेज फ्रस्टेस्टींग आहे. सध्याचे परिक्षक (शंकर, परवीन सुलताना, पं जसराज, हरीहरन ) हे सगळेच जण क्लासिकलवाल्यांची मेहनत व विचारसरणी जाणतात म्हणून ह्या पर्वात क्लासिकल बंदिश वगैरे गाता आली व त्याचे कौतुकही झाले. मला स्वतःला तर कायम जाणवते की अमानबद्दल शंकरला फार फार ममत्व आहे पण तो इथे टिकणार नाहीये हेही त्याला माहितीये म्हणून तो मनातल्या मनात खंतावतो..मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो त्याचे कौतुक करतोच करतो....

भरत,
पं विश्वमोहन हे अमान बद्दलच बोलले .
अमान हा उत्तम क्लासिकल गायक असून ज्युनिअर लोकांच्या गर्दीत एलिमिनेट झाला होता , काल वाइल्ड कार्ड मधून परत आला.

धन्यवाद दीपांजली. रिपीट टेलिकास्ट बघण्याचा प्रयत्न करेन.
काल कुणाल पंडितचे गाणेही थोडे पाहता आले.
हे स्पर्धक शास्त्रीय गातात म्हणजे नुसतीच तानबाजी करतात, आमचा गळा किती फिरतो ते दाखवतात की त्यांना सुरातला ठहरावही दाखवता येतो? हे बघायला मला आवडेल.
(सूरक्षेत्रमधला यशराज यासाठीच अधिक आवडतो.)

'झी'ने शास्त्रीय संगीतावर आधारित रिअलिटी शो सुरू करायचे मनावर घ्यायला हवे.
कोणे एके काळी दूरदर्शनवर संगीताचे राष्ट्रीय कार्यक्रम व्हायचे.

आज त्या पं. विश्वमोहननी सांगितलं की अमानला शास्त्रीय संगीताचं बाळकडूच मिळालंय. त्याचे आजोबा, वडील सगळे कलाकार. अन तोही अगदी लहान वयापासून शिकतोय आणि कमाल गातोय. छान झाले तो परत आला. एक दोन भाग तरी टिकला तरी अजून गाणी ऐकायला मिळतील निदान Happy हिमांशु छन गायला. पण मला वाटते तो एरव्ही गझल नाही गात, आजच गझल निवडली होती बहुधा.

मला उलट जिवात जीव आला, ती बार्बी डॉल आली नाही म्हणून! >> मैत्रेयी हात मिलाओ..
ती बार्बी ऑडिशनच्या वेळीच माझ्या टाळक्यात गेली होती. Angry

बार्बी भयानक होती ती !
मृण्मयी का नाही आली Uhoh

असो अता गृप्स पडलेत त्यातले स्पर्धक पाहता मला टॉप ३ ची इक्वेशन्स जाम बदललेली असतील असं वाटतय !

विश्वजीत चे टॉप ३ मधले चान्सेस आहेत कारण राहुल राम चा तो कन्व्हिन्सिंग स्पर्धक आहे, दुसरा हिमांशु अजुन नवा आहे , सो पब्लिक व्होट्स चा फायदा विश्वजीत ला होईल असं वाटतय.
शंकर महादेवन टिम कडून कोण येतय टॉप ३ मधे, हे इंटरेस्टिंग असणारे..झालय काय कि जॅझिम-अर्शप्रीत-माधुरी-जसराज हे ४ लोक शंकर कडे !
यातला जसराज जरी अत्ता सर्वात ब्राइट असला तरी महाराश्ट्रातला स्पर्धक किती व्होट्स घेणार या विषयी शंका आहे, शिवाय विश्वजीत ऑलरेडी असणारच आहे एक महाराष्ट्राचा टॉप ३ मधे, अशा वेळी जसराज चे चान्सेस कमी होउ शकतात टॉप ३ मधे यायचे !

साजिद वाजिद टिम कडे रेणु-शहनाझ-अमान-झेन !
यातला शहनाझ येणार असं वाटतय टॉप ३ मधे.

दिसतीलच अता पब्लिक व्होटिंग रिझल्ट्स.

मयेकर, मला शास्त्रीय संगीतातलं फारसं काही कळत नाही. पण सारेगामापामधे अमान जेव्हा जेव्हा शास्त्रीय गाणं गातो तेव्हा ते ऐकत रहावंसं वाटतं; त्याचा आवाज आणि रियाझ दोन्ही उत्तम आहेत.

काल अर्शप्रीत काय गायली? तिचे गाणे हुकले. बार्बी गात असताना पं. भट्टांच्या कपाळावरच्या आठ्या लपत नव्हत्या. ही बार्बी याआधी कुठल्या रीअ‍ॅलिटीशोमधे होती का? (बहुतेक लहान मुलांच्या) मला तिचा चेहरा बघितल्यासारखा वाटतोय.

आता पब्लिक व्होटिंग चालू करणार का? (का करणार?)

कालचा एपिसोड मिसला. पण एकुणात कार्यक्रम मस्त चालू आहे. कालपर्यंतचे माझे फेवरिट्स : जॅझिम, विश्वजीत आणि जसराज. आत वरच्या कमेंट्स ऐकून वाटतय की अमन चं गाणं ऐकायला हवं.

विश्वजीत आणि जसराज च्या गायकीचं कौतुक वाटतंय आणि त्यांचा खूप अभिमान वाटतोय. त्यांना विशेष ऑल द बेस्ट ! Happy

लिटल चँप्स मधे? तेव्हा वेगळं नाव होतं का ? आठवत नाही तिला पाहिल्;याचं. तिची आई मुलीला टिव्ही वर प्रमोट करायला डेस्परेट आया असतात तशी वाटत होती ऑडिशन ला !!
टॉप ३ बद्दल - चॅनल मुद्दाम एक तरी मुलगी ठेवतील का टॉप ३ मधे ? तसे असले तर रेणू पण येऊ शकते ३ मधे.

मयेकर, मला शास्त्रीय संगीतातलं फारसं काही कळत नाही. पण सारेगामापामधे अमान जेव्हा जेव्हा शास्त्रीय गाणं गातो तेव्हा ते ऐकत रहावंसं वाटतं; त्याचा आवाज आणि रियाझ दोन्ही उत्तम आहेत.

काल अर्शप्रीत काय गायली?
<< नंदिनीला अनुमोदन :).

अर्शप्रीत कुठलं तरी नुसरत फतेह अली खान चं गाणं गायली , नथिंग टु स्पेशल पण ६ मधून ३ घ्यायचे म्हणून लागला नंबर तिचा.
मला पण बार्बी लिट्ल चॅम्प मधे आठवत नाहीये पण ऑडिशन ला ती स्वतःच म्हणाली हे की रोहनप्रीत-रोहित राउत हे तिघेही लिट्ल चॅम्प्स चे म्हणून !

पहा आला की नाही अमान परत? Happy ..
बार्बी .. अरे बापरे!!! तिने जे काही केले ते गाणे होते?
मलापण मृण्मयी आलेली आवडली असती.

शहनाज.. आवारा .... आहाहाहा!!!!

अंतीम ३ मधे एकही मुलगी नसेल असे वाटतय. मुले फार सरस आहेत मुलींपेक्षा ह्याखेपेस. रेणु पण खास नाही हल्ली.

वि/ज/श/अ हे सर्व अंतिम फेरीत जावेत अशी इच्छा.

आता तो कुरेशी काहीतरी मस्त प्रयोग करणार आहे म्हणे सर्व स्पर्धकांना घेऊन. त्यामुळे मला भयंकर उत्सुकता लागलीये की आता कशा प्रकारे सादर केली जाईल स्पर्धा.

Pages