सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या इपिसोडला विशाल आणि रेखा भारद्वाज, जावेद अली ,व जजेस सगळी जाणकार मंडळी होती त्याने चांगला रंग भरला . 'मटरू'चे प्रमोशन होते तरी थिल्लरपणा झाला नाही. सगळे खूपच क्लास गायले . अमानने आणखी एक शिखर सर केले.महादेवनच्या म्हणण्यानुसार तसल्या ताना उ.राशीदखानानन्तर तोच घेऊ शकतो. अमानने कधीही निराश केलेले नाही....

जसराजचे गाणे गेल्या काही भागात सामान्य होत चालले आहे.
विश्वजीत आता पब्लिक वोटचा विचार ़करून गाणी निवडतोय.

शेहनाझ, जसप्रीत यांचा ग्राफ अजूनही छान !

आता रेनू, अर्शप्रीत आणि मग जसराज बाहेर ़ जाऊन, शेहनाझ, जसप्रीत, अमान, विश्वजीत राहतील असा अंदाज आहे.

आजचा एपिसोड म्हणजे ट्रीट होती, पुन्हा एकदा सिलेक्टेड परफॉर्मन्सेस बघतेय, त्यानंतर पुन्हा पोस्ट टाकेन Happy

अजुन एक श्रवणीय भाग झाला. सर्व जोडया सुंदर गायल्या.
मला आवडलेले performance ह्या प्रमाणे
१. जसराज
२. विश्वजीत
३. अमान.

जॅझिम सोबत जो होता तो यश डोक्यात गेलेला वाटला.

जसराज बद्दल सर्वांना अनुमोदन. सामान्य वाटु लागलाय गेल्या तीनही आठवड्यात.

रेणुच्या आवाजाचा मला केव्हाच कंटाळा आलाय. तोच पहाडी सुर लावुन सुरु करते प्रत्येक गाणे. दरवेळी एकच गाणे, एकाच सुरात, एकाच पध्धतीत म्हणते असे वाटते. २ वेगळ्या गाण्यात मला फरकच सापडत नाही.

माधुरी गेली बरोबर होते. अर्ह्श्प्रीत पण जाऊ दे आता. वाईट वाटले ह्यावेळी मुली कमी पडल्या.

शहनाझ ची मधे १-२ आवडली नाहीत (अगदी बाहेर जाईल असे वाटले केवळ आधीच्या गाण्याच्या पुण्याईमुळे वाचला) पण पोर फार गुणी आहे. त्याची बाकी सर्व आवडली.
मागे इथेच कोणीतरी लिहिले होते, 'शहनाझ ला गाणे कळलेले आहे', ते मला फार आवडले होते व पटले पण आहे. भले अतीउत्तम नसेल गात पण राहुल म्हणाले होते एकदा, 'त्याच्यामुळे गाण्याचा अर्थ आपल्याला कळतो' ते पण एकदम पटले आहे.

काल सलमान अली व स्निती आले होते ते फार आवडले. सलमान अली खुप आवडला होता तेव्हा.

सलमान खान मंद वाटला. अजिबात उत्साह नव्हता त्याला असे वाटले. रेखा भारद्वाज ने 'ससुराल गेंदा' वा कमीने च 'रात के ढाई बजे' म्हणायला लावायला पाहिजे होतं.

अमान बद्दल तर बोलायची गरजच नाही हल्ली.

रेणुच्या आवाजाचा मला केव्हाच कंटाळा आलाय. तोच पहाडी सुर लावुन सुरु करते प्रत्येक गाणे. दरवेळी एकच गाणे, एकाच सुरात, एकाच पध्धतीत म्हणते असे वाटते. २ वेगळ्या गाण्यात मला फरकच सापडत नाही.>>> +१. मला तिचा आवाज अतिकर्क्श वाटतो आणि ती आवाजाला सूट होणार नाहीत अशीच गाणी का निवडते कुणास ठाऊक?

अर्ह्श्प्रीत पण जाऊ दे आता.>> गेली ती या एलिमिनेशनला. पुढच्याला बहुतेक रेणू जाईल.

सध्या माझे फेवरेट विश्वजीत आणि शहनाझ. जसराजने विचार्रपूर्वक गाणी निवडायला हवीत आणि प्रयोग वगैरे जास्त न करतागाण्यावर मेहनत घ्यायला हवी, असं वाटतय. त्याचं टशनमे गाणं अगदीच सामान्य दर्जाचं झालं होतं.

रविवारी अमान-फरीद आणि विश्वजीत-स्निती काय सु रे ख गायले.. मज आगया !
जसराज खरच अति सामान्य गातोय .. खरं तर तोच एलिमिनेट झाला पाहिजे अता.
या आठवड्यात गेस्ट जज 'अजय-अतुल' आहेत.......... कान्ट वेट !!!!!

सुनिधी,
<< मागे इथेच कोणीतरी लिहिले होते, 'शहनाझ ला गाणे कळलेले आहे', ते मला फार आवडले होते व पटले पण आहे. भले अतीउत्तम नसेल गात पण राहुल म्हणाले होते एकदा, 'त्याच्यामुळे गाण्याचा अर्थ आपल्याला कळतो' ते पण एकदम पटले आहे.
>>

मी असे म्ह्टले नव्हते, मी म्हटले होते, त्याला गाणे 'सापडले' आहे Happy
गातात सर्व जण, पण 'ये हृदयीचे ते हृदयी घातले' असे गाणे फार कमी वेळा ऐकू येते. शहनाज चे असे गाणे आहे! पब्लिक वोटींग ने तो बाहेर जाईलही पण खाली मी पहिल्या दिवशी म्हटल्याप्रमाणे माझ्या दृष्टी ने स्पर्धा संपली.

http://www.maayboli.com/node/38720?page=2

एक मात्र उघडपणे कबूल करायला हवे की यावेळचे सारेगामापा सर्वांत सुख देणारे आहे.

सुलु, जोरदार 'हो'.

नंदिनी, अर्श्प्रीत बाहेर गेली ते विसरलेच होते प्रतिसाद लिहिताना.

विश्वजीत-स्निती चे मस्तच झाले होते दीपांजली. फरीद मात्र नव्हता आवडला.

'अजय अतुल ' एपिसोड मधे जसराज किंवा विशु नी मराठी गायलं असतं तर मज्जा आली असती !!!
'खेळ मांडला' घ्यायला हवं होतं !
जसराज चं सिंघम आणि डरकाळ्या मला मुळीच नाही आवडलं.
विशु चांगला गायला पण वादकांचा आवाज लाउड त्या मानाने त्याचा नाजुक येत होता आवाज.. साँग सिलेक्शन अजुन चांगलं हवं होतं !
जॅझिम ओके, अमान उच्च नेहेमी प्रमाणे !
रेण्उ नागर च्या 'अप्सरा आली' मधे मराठी उच्चारांना सुधारणेला पुष्कळ वाव होता पण तिच्या आवाजाला ते गाणं फार सुट झालं.. इन फॅक्ट मला नेहेमी बेला शेंडेचा नाजुक पातळ आवाज त्या नटरंग च्या लावण्यांना अजिबात सुट वाटत नाही.. आज रेणुला गाताना ऐकून असाच आवाज हवा तिथे वाटलं :).
पण काय राव 'अप्सरा आली' कोरस शुध्द तूपातल्या उच्चारात गाउन पार फुगा फोडला विशु आणि जसराज नी :(.
त्या गाण्याचा खास ग्रामीण थाटाचा कोरस गाण्याचा आत्मा आहे.. तोच फॅक्टर मिसिंग होता जसराज आणि विश्वजीत च्या आवाजात.. शिवाय मराठी असून, हे गाणं इतकं पॉप्युलर असून पाठ नव्ह्तं, खाली बघून (वाचून) म्हणत होते हे खटकलं :(.
असो, विश्वजीत ला पुन्हा एकदा व्होट टॉपर पाहून फार आनंद झाला शिवाय मोहंमद अमान सुध्दा प्युअर क्लासिकल गात असून अजुन तरी त्याला सेफ ठेवलाय हे पण चांगलं झालं...टोटली डिझर्विंग !

दीप्स, अप्सरा आली बद्दल बरेचसे अनुमोदन . बेला शेन्डेचं ते मूळ गाणंच इतकं ढिसाळ आहे बस. सुलोचना चव्हाण, उषा मंगेशकर, आशाबाइ,अगदी उर्मिला धनगर अशाच आवाजाचं काम होतं तिथं. गाणं आणि चित्रीकरणही फसलय त्यात . माया खुटेगावकरच्या नखाची सर देखील नाही खानविलकरला. असो. पण रेणू नागरने क्वचित वगळता बरेचसे चांगले गायले. नॉन महाराष्ट्रियन वाटलीच नाही आणि सूटही झाले तिच्या आवाजाला. रेणूने रेश्माची गाणी गायला पाहिजे होती. अपेक्षेप्रमाणे रेणू एलिमिनेट झाली पण तिने निरोपही ग्रेसफुली घेतला १८ वर्षाच्या मानाने फारच मॅच्युअर्ड वाटली.
जॅजिमला केवळ ओकेवर भागवून नाही चालणार यावेळची त्याची 'सरकती जाये ...' आउट स्टंडिंगच होते...
शहनाजनेही कमाल केली. आता जसराजच्या उणीवा स्पष्ट होऊ लागल्या आहेत.
आता मात्र एलिमिनेशन मध्ये आपल्यालाही जबरदस्त निराशेला तोंड द्यावेलागणार कारण टॉपला एकच माणसाला जागा असते या नियामाप्रमाणे कोणावरही कुर्‍हाड कोसळू शकते. एसम एसवर आधारित असल्याने व पब्लिकला शास्त्रीय ओढा कमी असल्याने अमानवरही तसे होऊ शकेल Sad

अमान जबरीच यावेळीही.
अमान लवकरच सवाई गंधर्वमध्ये दिसणार असे वाटू लागले आहे. कारण संगीत महोत्सवाची निमंत्रणे त्याला येऊ लागलीत असे महादेवनने सांगितले अहे.

अजय-अतुल आले तेव्हा खूप अभिमान वाटला त्यांचा. त्यांची कंपोझिशन्स खरं तर सरेगमप च्या म्युझिशियन्स ना वाजवायला नीट जमलीच नाहीत. काय गाणी आहेत त्यांची एकसे एक.

सुरवातीचं शंकर महादेवन आणि अजय-अतुल ने गायलेलं "गणनायकाय " एकदम मस्त !!

शहनाझ, अमान, जॅझिम, रेणू ... आवडले.

जसराज चं गाणं मधे मधे चक्क बेसूर वाटलं.

विश्वजीतचं गाणं पण अजून चांगलं झालं असतं. दीप्स म्हणाली त्याप्रमाणे मलाही वाटलं की तो मराठी गाणं म्हणेल.

हो, विश्वजीतने मराठी गाणं घ्यायला हवं होतं.

जॅझिम ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट!!!!

रेणूचं मागच्या वेळेचं गाणं इतकं बेकार झालं होतं की तिला ती एलिमिनेट होणार याची खात्री आहे असं वाटलं. पण तरी जाताना रडारड केली नाही. इमोशनल अत्याचार नाहीत ते एक बरं... Happy

mala Renu avadali. pan yogya elimination.
Vishwajeet ne Natarang kinva Jogawa che gaNe ka nahi ghetale ekhade Sad far ch predictable ganycha choice.
Jasaraj needs to go out now !!gele 3 weeks mala ajibaat appeal zali nahit tyachi gani Sad
Jazim ani Amaan doghe ya competition chya palikade ahet kevapasun ch!!

जसराज हा ओवररेटेड आहेच मूळी(अगदी पहिल्या पोस्टमध्येच लिहिले आहे त्याप्रमाणेच)
उगाच ते किंचाळणं एकवत सुद्धा नाही. सिंघमचे गाणं तसे मीही गाईन हा विश्वास दिला त्याने मला. Proud

अप्सराचे कोरस बंडल... रेणु ठिक गायली.

शहनाझ बरा गायला.... सैया... इतके खास नाही.

जाझिम चांगला गायला. बाकी ओके होते.

आज सूफी स्पेशल आहे आणि जावेद अली 'अर्जिया सारी; परफॉर्म करणार आहे :).
शहनाझ 'कुन फायाकुन'.
छोटा अझमत पण येणारे आज :).

जसराज !!!!
यस्स , दॅट्स सुफी सिंगिंग , तो जुनुन , 'स्व' ला विसरून इश्वरा शी संवाद साधणारी गायकी, जसराज ला एकट्याला तो अ‍ॅटिट्युड जमला , अगग्दी जावेद अलीच्या गाण्यातही नाही आला तो भक्तिभाव !
विशव्जीत चा रॉक अ‍ॅटिट्युड पण आवडला :).

सूफीत सगळ्यांची गाणी चांगली झाली. शहनाज चे कुन फाया कुन गायले चांगले पण आवज सूट वाटला नाही सूफीला आणि स्लो वाटले....

या धाग्यामुळे मी सारेगमप पाहायला लागलो Happy
रिपीट टेलिकास्ट पाहत असल्याने एक आठवडा मागे आहे.
ज्या भागात आधीच्या सीझनमधले स्पर्धक आताच्या स्पर्धकांना सपोर्ट(?) करायला आले होते, त्याबद्दल. अमानच्या बरोबरीने शास्त्रीय संगीत गाणारा जो होता तो मला उजवा वाटला. अमान नुसतीच तानबाजी आणि गलेबाजी करतो. त्या दुसर्‍याच्या गाण्यात विचार, थोडी मॅच्युरिटी जाणवली. नीट सांगायचं तर डॉ कनक रेळेंनी हिंदी चित्रपटातील तथाकथित शास्त्रीय नृत्य म्हणजे भरमसाठ गिरक्या असे सांगितले होते तसे काहीसे.
जॅझिमच्या मखमली, आवाजाची , गाण्याची किंमत त्याला सपोर्ट करायला आलेल्या गझल्-प्रिन्सचे गाणे ऐकून जास्तच कळली.
जसराजबद्दल सगळ्यांशी सहमत. आवाजात तो कमी पडतोय. मेबी ही कॅन बिकम अ गुड कम्पोजर.

अमान नुसतीच तानबाजी आणि गलेबाजी करतो. त्या दुसर्‍याच्या गाण्यात विचार, थोडी मॅच्युरिटी जाणवली. नीट सांगायचं तर डॉ कनक रेळेंनी हिंदी चित्रपटातील तथाकथित शास्त्रीय नृत्य म्हणजे भरमसाठ गिरक्या असे सांगितले होते तसे काहीसे.
>>>
हे मात्र पटले नाही. मला शास्त्रीय संगीतात कळत नाही.पण आलेल्या प्रत्येक दिग्गजाने त्याला आश्चर्यपूर्वक अ‍ॅप्रिशिएट केले आहे.तसेच शंकरच्या मते येत्या १० वर्षात तो भारतातला लीडिंग क्लासिकल सिंगर होणार आहे. ही मंडळी उगाच प्रोस्ताहन देणार्‍यातली नाहीत. कारण त्यानी कम अस्सलला चांगले म्हटले तर त्याला विनाकारण प्रतिष्ठा मिळेल याची कल्पना त्याना आहे. विश्वमोहन भट, जसराजनीही त्याला नावाजले आहे....

आज जॅझिम आउट झाला , आपेक्षित होतं पण वाइट वाटल :(.
टॉपर कोण कळल नाही पण चक्क टॉप २ दोघं महाराष्ट्राचे !
आज नेहेमी प्रमाणे जॅझिम आणि अमान छान गायले , जस्सु आणि विशु नी ऑर्केस्ट्रॉ छाप गाणी गायली.

अर्र जॅझिम गेला का? Sad
अमान जे करतोय त्याबाबतीत बेस्टच आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे नुसत्याच ताना का? वन डायमेन्शनल नाही का होणार? अर्थात तो अजून खूप लहान आहे, त्यामुळे पुढे बाकीची अंगेही आत्मसात करेल. एका कार्यक्रमात त्याने गायिलेल्या बंदिशीत विरहाचे भाव दर्शवणारे शब्द होते. विरहात द्रुत लयीतल्या ताना मला तरी विसंगत वाटल्या.

शास्त्रीय संगीत ही स्वरप्रधान गायकी आहे की शब्दप्रधान ? शास्त्रीय संगीतात शब्दांचा केवळ सांगाडाच असतो असे माझे मत...

Pages