सा रे ग म प २०१२

Submitted by संपदा on 22 October, 2012 - 03:06

झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.

जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.

अँकर - गायक - जावेद अली.

ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.

लक्षात राहिलेले काही खास आवाज :-
१. विश्वजीत बोरवणकर - मराठी सारेगमपचा विजेता. उत्तम क्लासिकल बेस असणारा गायक.

२. जसराज जोशी - संगीतात विविध प्रयोग करून गाणे रंजक बनवणारा गायक. त्याचा स्वतःचा शून्य नांवाचा बँड आहे. अवधूत गुप्तेच्या " खुपते तिथे गुप्ते " मधून प्रेक्षकांना माहित झाला आहे.

३. रेणू नागर - अलवर , राजस्थानहून आलेली आणि " पॉकेट रॉकेट" नामकरण झालेली गायिका. ऑडिशनमधील हिची गायकी ऐकण्यासारखी आहे.

४. अर्शप्रीत - कालच्या एपिसोडमध्ये " जुगनी जी" हे गाणे सादर केल्याने लक्षात राहिलेली गायिका.

५. माधुरी डे - कालच्या एपिसोडमध्ये " हाय रामा ये क्या हुआ " गाऊन जजेसची वाहवा मिळवणारी गायिका.

६. कुणाल पंडित - लहान वयात ( वय १८ वर्षे ) अतिशय उत्तम तयारीने गाणारा गायक. I belong to musical family अशी स्वत:ची ओळख त्याने करून दिली होती. माझ्यामते तो बहुतेक जतिन ललित ह्यांच्या नातलगांपैकी असावा. Happy

७. जसप्रीत शर्मा ऊर्फ जॅझिम - ह्या पर्वातला गझ़ल गायक.

८. शहनाझ अख्तर.

९. मोहम्मद अमन- कालच्या एपिसोडमधला ह्याचा परफॉरमन्स ऐकण्यासारखा होता.

१०. झैन अली - लाहोरहून आलेला गायक.

११. पारुल मिश्रा - काल " झल्ला वल्ला " छान गायली.

पर्वाच्या सुरुवातीलाच ह्या सर्व गायक गायिकांनी इतके दमदार पर्फॉर्मन्सेस दिले आहेत की येत्या एपिसोड्समध्ये एकसे बढकर एक गाणी ऐकायला मिळणार हे नक्की Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॉप १० राहिल्यावर वाइल्ड कार्ड एंट्रीज आणतील कदाचित !
पब्लिक व्होटिंग नाहीये का यावेळी ? नुसताच स्टुडिओ ऑडियन्स पोल ?

स्टुडियो ऑडियन्सबद्दल मला शंका यायला लागली आहे आता. जजेसनी विशेष कौतुक न केलेला कुणाल पंडित १००% मतं घेवुन गेला. या उलट कितीतरी चांगली गाणी ( उदा. महंमद अमान अप्रतिम गायला पण ८३ किंवा ८६% मिळाले).

परवीन सुलतानानं गायलेल्या ओळी............कातिल !!

विश्वजीत, जसराज आवडतातच. मराठी असल्यामुळे त्यांची गाणी ऐकण्याची जास्त उत्सुकता असते. सचिन तेंडूलकर बॅटिंग करतांना जसं टेन्शन असतं ना ...... तसंच काहीसं असतं ह्या दोघांची गाणी ऐकतांना. त्यांची गाणी चांगलीच व्हायला हवीत अशी अपेक्षा असते आणि सध्यातरी ही अपेक्षा दोघेही अगदी आवर्जून पूर्ण करताहेत.

मलाही विश्वजीतचं गाणं खूप आवडलं.
जसराज कन्व्हिंसिंगली गायला/ गातो. मात्र त्याचं रुपडं आकर्षक नाही!
मुली खूप खास वाटल्या नाहीत अजून तरी Sad

पौर्णिमा, कुणालला सुद्धा मिळाले ना १००%. मी दोन्ही दिवस पुर्ण कार्यक्रम पाहु शकले नाही, त्यामुळे जसराजचा परफॉर्मन्स पाहिलाच नाही.

जसराजला उगाच"ओव्हरकाँफिडंट" म्हणणं हे अतिशय चूक आहे...
इतर स्पर्धकांच्या मानाने त्याला भरपूर लाईव्ह परफॉर्म करण्याचा अनुभव आहे त्यामुळे त्याच्या प्रस्तुतिकरणात ती सफाई किंवा तो आत्मविश्वास दिसतो....... म्हणून लगेच त्याला ओव्हर्काँफिडंट म्हणणं जरा घाईच होतेय असं वाटतेय......

विशाल-शेखरमधल्या विशालचं उदाहरण घ्या. त्याच्या लाईव्ह पर्फॉर्मन्समध्ये पण स्टेजवर अक्षरशः बागडत असतो..... त्याचं नाव झालयं आणि जसराजचं व्हायचंय इतकाच काय तो फरक.....
त्यामुळे प्लीज डोंट जंप टू कनक्लूजन्स लोक्स.. Happy

why these people weep when they r eliminated? they dont deserve to participate in competition and they donot understand the sirit of competition.

Nobody talks about Padmanabh from Asam. he is long race felow. S. mahadevan said, Aman will be among top 10 classical singers of India in 10 years. I toataly agree with. He is not born for competition business. It is good that he is bieing exposed to public which will benefit him to get his recognition ....

शहनाझ अख्तर - या मुलाला 'गाणे' सापडले आहे असे माझे माझ्या अल्पमती नुसार 'reading' आहे. ज्या पद्धतीने तो गाणे 'मांडतो', लयकारी करीत, झोके घेत तालाशी खेळत गात जातो ते ऐकून हा मुलगा खूप नाव कमावेल आणि आपल्याला आनंद देईल असे वाटते आहे. सुरेश वाडकर जसे गातात तशी त्याची गायकी आहे. त्याने सुरेश जींकडून मार्गदर्शन घेतले तर या मुलाचे आणि आपले खूप कल्याण होईल असे वाटते.

जसराज जोशी - हा गुणी मुलगा आहे. त्याचा आवाज ग्रेट नाही पण गायकी सुंदर आहे. हीच गोष्ट मला विश्वजीत बद्दल वाटते.

महंमद अमान - राग 'गागवन्ति' ( not sure) फार सुंदर गायला. अजूनही ऐकले तर अंगावर शहारा येतोय. तरूण पणींच्या पं. जसराजांची आठवण झाले. खरोखरीच "सा रे म ध नि सा, सा ध म ग म रे नि सा" फार छान गायला.

स्पर्धा सुरु झाल्या-झाल्या मी खालील विजेते मनाशी ठरवले होते आणि लिहून टाकले होते. त्यात बदल करून महंमद अमान ला घ्यावे की काय इतका सुंदर गायला.

<<<<< माझ्या दृष्टीने स्पर्धा संपली.
विजेते
१. शेहनाज अख्तर
२. विश्वजीत बोरवणकर
३. रेणू नागर

उत्तेजनार्थ
१. जसराज जोशी
२. अर्शप्रीत
३. कुणाल पंडित्/जाझ्म
>>>>>

ह्यावेळेस पण योग्य स्पर्धकच बाहेर पडले. मृण्मयी बद्दल वाईट वाटले पण इलाज नव्हताच.
जसराज, विश्वजीत, अमान ने तोड दिया!
रेणुरॉकेट पण उत्तम
जुगनी थोडी निष्प्रभ वाटली
शहनाज पुन्हा आवडला.
झेन मागच्या वेळेसजास्त आवडला होता.

बाकी गायक ठीक्ठाक होते.

शंकर व वाजीद चे मनापासुन दाद देणे खुप आवडले.
साजीद ने जसराज ला रेकॉर्डिंग ला बोलावले त्यावर वाजीदचे उत्तर आवडले.

परवीन सुलताना बद्दल बोलायची गरजच नाही .... देवी आहे.

तुम्हाला कोणाला फक्त त्या आठवड्यात तरी मृण्मयी अ‍ॅशप्रीत पेक्षा उजवी नाही वाटली का ?
व्हॉइस क्वॉलिटी पण चांगली आहे तिची , सध्याच्या स्पर्धक मुलीं मधे प्ले बॅक क्वालिटी वाली ती एकटीच होती.

मृण्मयीची व्हॉईस क्वॉलिटी चांगली आहे यात वाद नाही पण तिच्या आवाजाला फार मर्यादा आहेत असं मला वाटलं. शिवाय एकदा दोनदा तर ती आवाज चोरून आणि भेदरल्यासारखी गायली असंही वाटलं मला.

Nobody talks about 'Jajim-The gazalsinger'? He will be leading gazal singer in future.He sung 'Ranjish hi sahi'fantasticaly in last episode.

I think singers specilized in special genre will not be final winner.(However ecxcellent they may be in that perticular genre ) eg. Jajim (gazal), Aman (classical), Renu (folk). A versatile singer who can handle all types will be the winner.

Who can be it?

पादुकानन्द,
जॅझिम चांगलच गातो !
विनर प्रेडीक्ट करणे अत्ता इतक्या लवकर अवघडे , पण जसराज- शेहेनाझ -रेणु-कुणाल टॉप ४ असतील असा माझा अंदाज !
कुणाल नसेल तर विश्वजीत !
जसराज तर हवाच नाही तर शंकर महादेवन ची प्रतिज्ञा कि मी हा टॉप३ मधे नसेल तर नाव बदलीन ़कि संगीत सोडून गावी शेती करीन ' चे काय होइल Happy ?

शंकर महादेवन ची प्रतिज्ञा कि मी हा टॉप३ मधे नसेल तर नाव बदलीन
Is the match fixed?

Shri. I will love to write in Marathi. but I dont hv confidence. I feel that ppl will laugh at me.

इतर स्पर्धकांच्या मानाने त्याला भरपूर लाईव्ह परफॉर्म करण्याचा अनुभव आहे त्यामुळे त्याच्या प्रस्तुतिकरणात ती सफाई किंवा तो आत्मविश्वास दिसतो....... >>> भुंग्याला जसराजच्या बाबतीत अगदी अनुमोदन. जसराज ओव्हरकॉन्फिडंट नाही. खुप कम्फरटेबल & कॉन्फिडंट असतो तो स्टेजवर.

Jasaraj ha talented ahe pan overacting karato tyamule vaaiT mat hote.

मृण्मयीची व्हॉईस क्वॉलिटी चांगली आहे यात वाद नाही पण तिच्या आवाजाला फार मर्यादा आहेत असं मला वाटलं. शिवाय एकदा दोनदा तर ती आवाज चोरून आणि भेदरल्यासारखी गायली असंही वाटलं मला.>
अनुमोदन. मला पण ती आवडायची. चांगला आवाज आहे तिचा. पण कशाच्या तरी दडपणाखाली असल्यासारखी गाते.

मृण्मयीचा आवाज चांगला होता, पण इतर सगळ्या दिग्गज स्पर्धकांच्या मानाने एक-दोन लेव्हल खाली आहे ती. अर्शप्रीत अन तिची तुलना करता मला वाटते तिचा कॉन्फिडन्स कमी पडला आणि परवीन सुलतानाने खरोखर जर निर्णय केला असेल तर त्या दिवशी हमे तुमसे प्यार ... या गाण्याची निवड तिला महागात पडली कदाचित !
जसराज टॉप ३ मधे असणार असे वाटते. मला पद्मनाभ ची स्टाइल एवढी आवडत नाही, फार काही युनिक वाटला नाही, पण आसाम फॅक्टर आहेच. मुलींमधे फक्त रेणूच टॉप ५ पर्यन्त टिकून राहील असे दिसतंय!
यापुढची एलिमिनेशन्स माझ्या मते अर्शप्रीत, माधुरी अन झैन अली....

परवीन सुलतानाने खरोखर जर निर्णय केला असेल तर त्या दिवशी हमे तुमसे प्यार ... या गाण्याची निवड तिला महागात पडली कदाचित !>>> +१

Jasraj sang the song from "Taal'' .. mere paas hai in outstanding manner. I first time felt that he is contendent for finalist position...
Kunal Pandit's voice is very soothing.

Rahul Ram said choice of song is very important. I believe if song is not selected as per nature of voice , then u r bound to loose marks.

Like Bhimsen sings Qawwali...

काल/परवाच्या एपिसोडमधली थोडी गाणी ऐकली.
विश्वजीतचं 'पिया तू अब रुठा रे...' अशक्य झालं!!!
महंमद अमान खरंच ह्या स्पर्धेच्या वर आहे, पण त्याला स्टेज मिळालं ह्या कार्यक्रमामुळे.
जसराजचा आवाज ठिक आणि मस्तच्या मध्ये हेलकावे घेत असतो, पण प्रेझेंटेशन मध्ये मात्र नंबर एक आहे तो!!
कुणाल पंडीतचं गाणं वाईट नव्हतं पण १००% लोकांना आवडलं हे जरा अती होतं.
अजून सगळी गाणी ऐकली नाही आहेत त्यामुळे काही चांगली मिस झाली असतील.
बाकी राहुल रामचं 'अरे रुक जा रे बंदे' क्लास!!! कोणाला तो OBL सारखा नाही वाटत? Proud फक्त OBL चा चेहेरा उभट आणि नाक सरळ होतं Proud

फयनल जसरज अणि विश्व्जित बोर्वनकरमध्ये होइल का?
अमनला बहुध एखदे स्पेशल अवर्ड देतिल...

Pages