Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नाही आवडलं.
मला नाही आवडलं.
250 GMS LONEE KADHAVALE TAR
250 GMS LONEE KADHAVALE TAR KITEE GMS TUP HOTE?
मला पण सामंतांचे नाही आवडत (
मला पण सामंतांचे नाही आवडत ( दुकानाजवळ येतो तो वासही नाही आवडत. )
अजूनही खेड्यात, क्वचित गावरान तूप विकायला येते ( पण ते खात्रीच्या माणसाकडूनच घ्यावे ) त्याची चव तर अप्रतिम अशीच असते. हात धुतल्यावर पण हात ओशट राहतात आणि हाताचा वास जात नाही !
विकतचे लोणी की घरचे
विकतचे लोणी की घरचे ?
दुधाच्या लोण्याचा (रोज साय ढकलून) हिशोब सांगू?
३६/- भावाच्या दुधाचे दीड लीटरच्या हिशेबाने आठवड्याला २५० ग्रॅम ते ३०० ग्रॅम तूप होते.
विकतचे लोणी!
विकतचे लोणी!
१०० ते १५० ग्रॅम होईल असे
१०० ते १५० ग्रॅम होईल असे वाटतेय. म्हणजे साधारण अर्धे. पण बेरी जास्त निघाली, तर प्रमाण आणखी घटेल.
दूधा/तुपा/लोण्यासाठी तिकडे
दूधा/तुपा/लोण्यासाठी तिकडे जा बघू
धन्यवाद!
धन्यवाद!
माझ्याकडे (दोन माणसे फक्त)
माझ्याकडे (दोन माणसे फक्त) रोज अर्धा लिटरच्या वर दूध लागत नाही.

१-२ दिवसांआड दह्यासाठी म्हणून मी १ लिटर घेते.
साय जेमतेम येते गायीचे दूध असल्याने आणि ती जेमतेम दोन चमचे साय धन्यांच्या पोटात जाते.
नी माझ्या कडे पण असेच चित्र
नी माझ्या कडे पण असेच चित्र आहे त्यामुळे तुपाचा मोठा प्रश्न सतावतो
250 GMS LONEE KADHAVALE TAR
250 GMS LONEE KADHAVALE TAR KITEE GMS TUP HOTE? >> वत्सला, घरी चितळ्यांच्या म्हशीच्या दुधाची साय्-दही-लोणी-तुप या प्रक्रियेत प्रचंड बेरी निघते. मात्र ABC च्या गायीच्या लोण्याचं तुप जवळ जवळ लोण्याएवढंच निघतं. अर्धा किलो लोण्यातुन जेमतेम १-२ चमचे बेरी निघते. म्हशीचं कधी ट्राय केलं नाही. हा फरक लोणी प्रक्रियेचा आहे कि गायी-म्हशीच्या लोण्याचा कोणास ठावुक.
नोट - ABC फार्म माझ्या बाबांचं, नवर्याचं नाही. मला कमिशनही मिळत नाही. पण तरीही मी सगळीकडे प्रमोट करत असते. तिथलं दही, दुध, लोणी, पनीर, लस्सी सगळं जाम आवडतं.
पुण्यातल्या प्रमाणेच गोव्यामधे पण ABC फार्म प्रसिद्ध आहे.
अगं मुली ते एबीसी लोणी
अगं मुली ते एबीसी लोणी पार्ल्यात मिळायला लागलं की मी पण वापरीन गं.
गाईच्या दु.चे तु. अवघड आहे.
गाईच्या दु.चे तु. अवघड आहे. सायच खाणे इष्ट आहे. तूप एकदा कढवून बघ वत्सला म्हणजे पुढे अंदाज यील. मी विकतचे तूप फक्त पुपो, गुलाबजाम इ. साठी आणते. बाकी रोज खाईन तर घरचे रवाळ नाही तर वरून घ्यायला वरचे नकवाटात्ते. हे तिकडे कसे हलवावे?
मनीमाउ तु कुठे राहते अन तुप
मनीमाउ तु कुठे राहते
अन तुप कधी विकत आणते
पुढच्या वेळी आणशील तर माझ्या साठी पण घेउन ये
anaghatai, mee unsalted
anaghatai, mee unsalted butter che loNee kadhavate. paN nakkee kitee tup hote te mojun baghitale nahee! tup kadhaVaNe khup veLkhau kaam asalyane ithe miLaNaryaa 'amul' tupavar samadhan manave yaa nirNyavar aale aahe paN tyaat cost effective koNate aahe he baghat hote.
gharee kadhavalelya loNyachya tupala paryaay nahee chaveesathee/rawaLapaNasathee!
वत्सला, मी पण असेच तूप कढवतो.
वत्सला, मी पण असेच तूप कढवतो. यात अगदी अर्ध्याच प्रमाणात निघते. मी प्रेशरकूकरच्या भांड्यात कढवतो, कारण ते भांडे जाड असते. त्यात सहसा बघावे लागत नाही. वासावरुन कळते. गॅस मात्र अगदी मंद ठेवायचा.
nimmech miLate tup? varun
nimmech miLate tup?
varun gas jaLaa!
yaapudhe laDu type padarth karaNyasathee Amul tup vaparave zala!
अग, अजून एक टीप देतेच..
अग, अजून एक टीप देतेच..
सकाळी रसोई करत असताना वर दि. नी लिहीले आहेच् तसच एकीकडे तांब्याबुडाच्या भांड्यात मंदाग्नीवर ठेव. १/२ तासापेक्षा जास्त लागणार नाही वेळ . भाजीपोळी होईतो तूप पण होईल.
वत्सला, बेसन भाजायला मी थेट
वत्सला, बेसन भाजायला मी थेट अनसॉल्टेड बटरच वापरतो, बेसन भाजेपर्यंत तूपही कढते. थेट साजूक तूपात भाजले, तर बेसन भाजेपर्यंत, तूप जळायला लागते.
अगं मुली ते एबीसी लोणी
अगं मुली ते एबीसी लोणी पार्ल्यात मिळायला लागलं की मी पण वापरीन गं. >>> पण तु येतेस कि पुण्यात.
अर्थात ते कॅम्प & कोरेगाव पार्कमधे आहे त्यामुळे तुझ्या सोयीचं नाहीच.
anaghaa, karun
anaghaa,
karun baghate!
dineshadaa, tyaatalaa bereeche kase karate mAg?
beree night nahee kaa? butter pataL zale kee lagech besaN takayache kaa?
गाईच्या दु.चे तु. अवघड आहे.
गाईच्या दु.चे तु. अवघड आहे. >>अवघड नाहीये. मी दिवसाला दीड लिटर दुधाच्या सायीचे दही वगैरे करून पंधरा दिवसातून एकदा अर्धा ते पाऊण किलो तूप सहज बनवत होते.
इथे चेन्नईमधेच सॉलिड प्रॉब्लेम आहे.
नाही येत बेरी. उलट बेसनाला
नाही येत बेरी. उलट बेसनाला छान चव येते. थोड्या बेसनावर प्रयोग केला, तर खात्री पटेल. असे भाजलेले बेसन, नेहमीपेक्षा लवकर आळते, त्यामूळे लाडूही वहात नाहीत.
५० नविन पोस्टी पाहून मला
५० नविन पोस्टी पाहून मला वाटले की जनता फराळाचं करायला लागली पण इथे काय परत तोच जिव्हाळ्याचा विषय चालू आहे
तयार क्रीम आणुन त्याला
तयार क्रीम आणुन त्याला नेहमीसारखे आंबट दह्याचे विरजण लावायचे .फ्रीज बाहेर ताटली ने झाकुन ठेवायचे.६ ते ७ तासानंतर चमच्याने किंवा रवीने थोडेसे घुसळले व माठ/फ्रीज चे थंड पाणी घातले कि लोणी निघते.हे लोणी कढवले कि बेरी कमी निघते व घरच्या चवीचे रवाळ तूप तयार होते.
अनसॉल्टेड बटर आणुन कढवले तरी छान रवाळ तूप तयार होते.[हे बटर ,क्रीम पासुन बनवतात त्यामुळे बटर व सायीचे दही विरजुन जे आंबटसर चवीचे लोणी तयार होते त्याच्या चवीत आणि पर्यायाने तूपाच्या चवीत ही फरक पडतो.]
अगं पुण्यात तसं तर बाबा नेहमी
अगं पुण्यात तसं तर बाबा नेहमी फडक्यांचं की साने डेअरीचं लोणी आणतातच की.
कधी कधी मी ते लोणी आणून पुण्यातच कढवून घेऊन मग बाटली भरून घेऊन जाते मुंबईला
घरी कढवलेल्या तुपाची चव
घरी कढवलेल्या तुपाची चव कोणत्याही ब्रॅन्डला नाही.<<
व दिनेशदांचे "तयार तूप कढवले की जरा घरच्यासारखी चव येते"
थोडी बायो-केमेस्ट्री पाजळतो
दूध हे इमल्शन आहे. ऑईल इन वॉटर टाईपचे. केसीन नावाचा प्रोटीन त्यात इमल्सिफाईंग एजंट म्हणून काम करतो. ( पाण्यात फॅटचे सूक्ष्म थेंब तरंगण्यासाठी त्यांना केसीनचे आवरण तयार होते मग ते तरंगते. इमल्सिफाईड फॅट पांढरे दिसते. 'नकली' दूध : तेल व शांपू/लिक्विड सोप + पाणी वापरून बनवताना हेच तत्व वापरतात. शांपू ऐवजी बाभळीचा (खाण्याचा) डिंक पावडर वापरतील तर ते नकली दूध अपायकारक होणार नाही किमान. असो.) विरजण लावताना आपण त्यात लॅक्टोबॅसिलस निओफार्मान्स नावाचे बॅक्टेरिया घालतो. हे बॅक्टेरियाज ते केसिन खाऊन टाकतात व त्यातील फॅट वेगळे / मोकळे होते.
बाजारातील नुसते बटर किंवा तूप आणलेत, तर ते दूध सेंट्रीफ्यूज करून त्यातील 'फॅट' काढून मग ते 'कढवून' बनवलेले असते. त्यातील फॅटला न विरजलेल्या केसीनचे आवरण तसेच रहाते. त्यामुळे चव बदलते.
'बेरी' हे त्या केसीनचे ब्याक्टेरियांनी तोडमोड केलेले व नंतर उष्णतेची प्रक्रिया झाल्यानंतरचे रूप असते.
वर दिलेली क्रीमला विरजण लावण्याची आयडिया बरोबर आहे. आपण सायीला विरजण लावतो, ते 'एसेन्शियली' क्रीम लाच विरजण लावण्यासारखे असते.
दुसर्यांदा तयार तूप कढवताना, त्यातील प्रोटीनची उष्णतेमुळे तोडमोड जास्त होते. (डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. अंडी उकडल्यास त्यातील प्रोटीन 'डीनेचर' होते. तसे) केसीनची तोडमोड झाली की साजुक तुपाची चव येते.
अनसॉल्टेड बटरमध्येच बेसनाचे
अनसॉल्टेड बटरमध्येच बेसनाचे लाडू करण्याची युक्ती मस्त आहे. बेरी आलीच तरी ती बेसनात मिसळली जाऊन सुरेख चव येईल लाडवांना. पण मी हल्ली मायक्रोवेव्हमध्ये लाडू करते. त्यात बेसन बरेच लवकर भाजले जाते. अशा वेळी लोण्यात पाण्याचा अंश राहिला तर लाडू खराब होतील नाहीतर हा प्रयोग खरंच करुन बघावासा वाटत होता
नीधप ,तुझी पोस्ट वाचुन मला
नीधप ,तुझी पोस्ट वाचुन मला मी घरगुती पद्धतीने अमुल बटर बनवित असे त्याची आठवण झाली..त्या अमुल बटरची कृति--सान्यांच्या डेअरीतुन अर्धा किलो क्रीम आणायचे.गाईच्या दूधापासुन क्रीम बनवले आहे म्हणुन पिवळा रंग आहे असे साने डेअरीवाले म्हणायचे..एक सपाट चमचा मीठ व एक सपाट चमचा आंबट दही [विरजण ]या क्रीम मधे टाकायचे व चमच्याने ढवळुन पातेल्यावर झाकण ठेवायचे.६ ते ७ तासानी हे क्रीम चमच्याने एकाच दिशेने ढवळायचे ..त्यात फ्रीज चे थंडगार पाणी घालायचे व पुन्हा ढवळायचे.्ए वर आलेले लोणी दुसर्या भांड्यात काढुन घ्यायचे..त्यात पाण्याचा अंश नसावा.उरलेले पिवळसर ताकसदृश पाणी फेकुन द्यावे कारण ते मीठामुळे खारट झालेले असते..आता हे लोणी एखाद्या चपट्या स्टील च्या लहान डब्यात काढुन चमच्याच्या पाठीकडल्या भागाने किंवा सुरीने छान एकसारखे सपाट करुन घ्यायचे व हा डबा फ्रीज मधे तासभर सेट करायला ठेवायचा ..असे हे घरगुती पद्धतीचे अमुल बटर--तस्साच रंग व तशाच चवीचे [स्वस्त] तयार होते.
काय सांगतेस? हे करून बघितलं
काय सांगतेस?
हे करून बघितलं पाहिजे.
Pages