फूड प्रोसेसर / मिक्सर / ग्राइंडर / चॉपर कोणता घ्यावा

Submitted by शूम्पी on 29 May, 2012 - 10:20

HBFPGoodOld.jpg
मी गेले १० वर्ष हॅमिल्टन बीच चा वरच्या फोटोतल्यासारखा फूड प्रोसेसर वापरत होते. तो किती मस्त होता ते मला तो स्वर्गवासी झाल्यावर समजले. तो मी साधारण $३० च्या आसपास घेतला होता. आठवड्यातून ३-४ वेळा वापरत होते. कणिक भिजवणे , भाज्या चिरणे, दाण्याचे कूट करणे, लसणाची कोरडी चटणी फिरवणे, (आई आली की) पुरण फिरवणे अशा नाना प्रकारच्या कामांसाठी. वापरायला तो अत्यंत सोपा आणि कमी कटकटीचा आणि सुटसुटीत होता. एकच ८ कप आकाराचं भांडं, एकच झाकण, १ चॉपिंग ब्लेड(त्यानेच कणिक पण छान मळली जायची), आणि एकच स्लायसिंग/श्रेडिंग ब्लेड, सर्व गोष्टी डिश वॉशर मध्ये बिंधास्त टाकता यायच्या.
खरतर, तो फूड प्रोसेसर नीट चालू होता (म्हणजे बटण, मोटर वगैरे) फक्त त्याच्या ब्लेडला खाली असणारी प्लॅस्टिक ची चकती तुटली होती तर मी लगेच तो रिसायकल मध्ये टाकला. मी त्यांच्या वेबसाइट वरून नुस्तं ब्लेड मागवायला हवं होतं असो. आता अक्कल येवून काही फायदा नाही. घाईघाईने आधी काय ते उरकायचं आणि मग सवडीने पश्चात्ताप करायचा...
सध्या माझी फूड प्रोसेसर क्वेस्ट सुरू आहे.
आखुड शिंगी वगैरे वगैरे हवा आहे. वापरायला सोप्पा, कमी कटकटीचा
गेल्या ८ दिवसात २ वेगळे फु प्रो आणून एकदा वापरून परत केले आहेत.
त्यातला एक होता हॅमिल्टन चा नविन मॉडेल आणि दुसरा होता किचन एड चा ९ कपांचा मॉडेल. त्यांची कहाणी प्रतिसादात लिहिते.
.
.
.
शेवटी पहिल्या पानावर अगोने रेकमेंड केलेला हा फु प्रो मी घेतला आणि मी माझ्या खरेदीवर फार खुष आहे!
HBFoodPro500Wt.jpg

रोजची पोळ्याची कणिक ह्यातच मळते. डिशवॉशरला टॉप रॅकमध्ये धुवायला टाकते. नो कटकट फु प्रो आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या विकांताला हॅमिल्टन बीच वापरून चिकन बनवले.. पण वाटण म्हणावे तेव्हढे छान नाही वाटले गेले>>> हेच तर ना, त्यात तु जर पाणी वाढवलं असतस ना तर स्मुथ वाटलं जातं पण पाणी मस्ट आहे.

डॅफोडिल्स, तसाच माझ्याकडे हॅमिल्टनचा ब्लेंडर आहे, त्यात स्मुदी, कोल्ड कॉफी , मिल्कशेक छान होतात. त्यात च मी ईडली, पेसरट्टुच वाटण ही वाट्लं आहे. पालक, पुदीना वगैरेच्या प्युरीही छान होतात. Happy

रचु, गो फोर मॅजीक बुलेट.
माझा मॅ. बु. मी गेले ५ वर्ष वापरतीय. एकदम ग्रेट . दिवसातुन ४-५ वेळा तरी वापर होतोच. कणीक मळणे आणि भाज्या कापणे याशिवाय जवळजवळ सगळंच त्यानी करते. मिल्कशेक, चट्ण्या, स्मूदी, दाण्याचं कूट, इतर कसली कोरडी कूटं, इडली-दोसा पीठ, ताक सगळं. शिवाय ४-५ वेगवेगळे जार , २ ग्राईंडींग बेस, त्या जार साठी झाकणं असं सगळं ३० डॉलरमधे येतं. कॉस्टको मधे.

मला एक ग्राइंडर/ मिक्सर प्रकारचे यंत्र हवे आहे. डोशाचे, धिरड्याचे वगैरे पीठ बनवण्यासाठी. वर वाचून हॅमिल्टन बीचचा शोध घेतला. पण इथल्या ऑनलाइन दुकानात आढळला नाही. इंग्लंडात काही दुसर्‍या नावाने विकतात का? काही माहिती?

दुसरा काय पर्याय? अ‍ॅमझॉनच्या यूकेतल्या दुकानात ग्राइंडर शोधले तर कॉफी ग्राइंडर आणि तत्सम उपकरणे येता. ब्लेंडर शोधले तर स्मूदी बनवण्याची उपकरणे येतात. नक्की कसे शोधावे त्याबद्दलही मदत हवी आहे. Happy

मला induction cook top घ्यायचा आहे. कुठला चांगला आहे? pls. मला सांगाल क?

डोशाचे, धिरड्याचे वगैरे पीठ बनवण्यासाठी. >> वेट ग्राईंडर का घेत नाहीस? साऊथ इडियामधे सर्रास असतो. अर्थात त्याचा तितका उपयोग होणार असेल तरच Happy

>> वेट ग्राईंडर का घेत नाहीस?
चिमुकले स्वयंपाकघर आहे. (मी पाहिलेला वेट ग्राइंडर साधारण दीड फूट व्यासाचा नि तेव्हढाच उंच असा होता.) शिवाय इथे इंग्लंडात मिळेल असे उपकरण हवे. Happy

इंग्लंडामधे नक्की मिळेल पण चिमुकल्या किचनसाठी उपयोगाचा नाही. चांगला दणदणीत असतोय ते ग्राईंडर..

मी तरी साध्या मिक्सरमधेच इडली-दोशाचे पीठ वाटते.

तेच ना. साध्या मिक्सरला काय म्हणायचे इंग्लिशमधे Wink ते समजत नाहीये. मी दिलाय तो अ‍ॅमझॉनचा दुवा बघ जमल्यास. तुझ्याकडे आहे तसला मिक्सर तिथे दिसतोय का ते सांग. किंवा मला नाव सांग कंपनीचे आणि मॉडेल नंबर..

मृदुला इथे एक आहे
इबे वर पण आहेत.

लंडन, बर्मिंगहम, लेस्टर ला गेलिस तर तिथे मिळतील आरामात.
आदिती ने लंडन मधलं एक शॉप सांगितलं होतं मागच्या वेळी.

>>लंडन, बर्मिंगहम, लेस्टर ला गेलिस तर
गेले तर ना! घरबसल्या हवे सगळे! Wink

हा तू वापरून बघितलायस का? किंवा असला? माझ्या केंब्रिजातल्या शेजारणीने एक मागवला होता, त्यात एकदम भरड पीठ व्हायचे. तिने शेवटी भारतातून वेट ग्राइंडर आणला.

धन्यवाद भरत. पहिला फक्त अमेरिकेतच मिळतो/ अमेरिकन व्होल्टेजला चालतोय असे दिसतेय. दुसर्‍या दुव्यावरचे तिन्ही एकदम बरोबर वाटत आहेत. तो दुवा साठवून ठेवला आहे आता. धन्यवाद.

त्यातल्या त्यात मिळाला तर साधा मिक्सर घ्यावा असा विचार आहे. कमी जागा व्यापेल आणि चटण्या, दाण्याचे कूट वगैरेही करता येईल.

मी पण भारतातुन आणला आहे Proud
पण इथल्या काही मैत्रिणी वापरतात इथेच घेतलाय त्यांनी. मी मॉडेल, कंपनी विचारुन सांगेन तुला.

मी लंडन ला गेले तर घेउन तुला पाठवु शकते ? अर्थात तुला किती अर्जंटली हवा आहे त्यावर अवलंबुन आहे.

सुमीतचा मिक्सर बघूनच छान वाटले. Happy
>>550 Watts, 110 V
हे स्पेक अमेरिकन वाटतेय ना? पण साइट को.यूके आहे. त्यांना इमेल करून विचारेन.

शोधताना काय शब्द वापरून शोधतेस तेही सांग.

कुणी indian mixer(Preethi etc...) इथे अमेरिकेत(110 v) वापरत आहे का? कसा त्याचा अनुभव आहे? मला ओल्या व कोरड्या चटन्या , वाटण ,पीठ इ करण्यासाठी हवा आहे.

काय योगायोग आहे बघा मी कालच प्रीती चा मिक्सर अ‍ॅमेझॉन वरून मागवलाय. त्याला एक मोठे आणि एक लहान चट्णीसाठी अशी दोन भांडी आहेत. वापरून सांगतेच कसा आहे. Happy

मी वापरतेय सध्या प्रीथीचा मिक्सर.माझ्याकडे त्यांचं "ब्लू लीफ" मॉडेल आहे. सटरफटर बर्‍याच अटॅचमेंट्स आहेत.ज्युसर वगैरे.पण कामापुरती दोनच भांडी. चटणी वाटायचं छोटं आणी दुसरं मोठं जे ईडली डोशाचं पीठ वाटायला. पण चटणीचं भांडं मला जरा गैरसोईचं वाटलं ओली वाटणं करताना कमीतकमी ऐवज घालावा लागतो भांड्यात. नाहीतर वाटण बाहेर येतं झाकणातून. त्यामुळे बरेचदा ओल्या चटण्यांसाठी पण मोठंच भांडं वापरावं लागतं.

shmt, मी kenstar mixer वापरलेला अमेरीकेत. ज्युसच भांड, चटणी अ‍ॅटॅचमेंट आणि एक रोज वापरातलं भांड होतं. छान चाललं/चालतयं. Wet grinder मी ultra lite चा वापरत होते. तो पण एकदम छान चालला. दोन्ही उपकरणं मी भारतातून step down (११०v ला) करून नेली होती.

shmt, प्रितीचा छान आहे मिक्सर. ट्विन जार असं नाव आहे. चटणी, डोसा पिठ चांगलं वाटलं गेलंय.

Pages