पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी कशी करतात माहिती आहे का?
इथे आज कोवळी पाने मिळाली आहेत. कोणाला माहिती असेल तर लवकर सांगा प्लिज.

लांब लांब पट्ट्या करून सालाद मध्ये. पास्ता सालाद तर मस्तच लागेल. एक व्हेरिएशन सांगू का?

मलबार पराठे फ्रोझन मिळतात ते घ्यायचे. डिफ्रॉस्ट करून मग तव्यावर थोडेसेच तेल लावून खरपूस
भाजून घ्यायचे. मग त्यावर हे चीज तुकडे, कमी तेलात परतलेला कांदा व कॅप्सीकम आणि इटालिअन सीझनिंग घालायचे व टॉ. सॉस. फोल्ड करून स्वाहा.

<<<जुन्या मायबोलीत मला मूग हलव्याची रेसिपी मिळाली पण त्यात प्रमाण दिले नाहि, कोणाला माहीत असेल तर प्लीज शेअर करा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/125997.html?1165555759 मी ह्या रेसिपी बद्द्ल विचारतेय>

कोणालाच माहित नाही का??????

पाणी पुरीची पुरी करायची परफेक्ट रेसिपी आहे का? म्हणजे पुरी फुगली पाहिजे...
मी जनरली नेटवर शोधलं तर इतकं बेसिक लिहिलंय की रवा मीठ पाणी मळा आणि वीसेक मिनिटे झाकून ठेवा..लाटा तळा...इतकं सोप्पं नाहीये....
एका विकांताला सहज करुन पाहिली तर ते घट्ट मळा म्हणजे कसं याचा उलगडा न झाल्याने पीठ लाटता लाटत नव्हतं मग पुर्^या फुगणं तर दूरच. मग ते थोडं आणखी मळून लुज करून पाहिलं तरी..आणि फसल्यापेक्षा फसलेल्या पुर्ञांना शेवपुरी वाल्या पुरीची चव पण नव्हती..म्हणजे मी बहुतेक काहीतरी मोठं चुकवून ठेवलंय..

कुणी घरी ही (किंवा शेवपुरीची) पुरी करून पाहतं का? मी पुन्हा करेन का माहित नाही पण क्रमवार कृती असल्यास निदान एकदा करून पाहायला आवडेल.. इथे किंवा सरळ वेगळी पाककृती दिलीत तरी चालेल.. आभार Happy

तो व्हिडिओ तर ़जबरी आहे अंजू. आभार्स

सोनाली धन्सं .. हा धागा पण मस्त आहे..सर्चसाठी पाणीपुरी पण घालायला हवं शब्दखुणांमध्ये Happy

प्राजक्ताच्या फुलाचे देठ सुकवून खायचा रंग तयार करतात असे कुठे तरी वाचल्याचे आठवते. कसा करायचा कोणाला माहित आहे का ? किंवा प्राजक्त फुलाचे देठ खाण्यायोग्य असतात का ?

पाणीपुरीच्या पुऱ्या - मी अश्या करते
१ छोटी वाटी रवा (मी नेहमीचा वापरला, पण बारीक मिळाला तर उत्तम), १ चमचा उडीद पीठ (डांगर कालवण्यासाठी पुण्याहून आणलं होतं), १ चिमूट सोडा आणि चवीसाठी मीठ हे सगळं साध्या पाण्यात भिजवून २० मिनिट झाकून ठेवलं.
मग मोठी पोळी लाटून छोटया झाकणाने पुऱ्या पाडून माध्यम आचेवर तळल्या.

टिपा:
उडीद पीठ नसेल तरी चालेल.
जर सोडा वॉटर मिळालं तर त्यातच रवा भिजवायचा, मग सोडा घालायची गरज नाही. सोडा वॉटर थंडगार हवं.
पुऱ्या जास्त पातळ किंवा जाड लाटायच्या नाहीत. पातळ झाल्या तर फुगत नाहीत. जाड झाल्या तर कुरकुरीत होत नाहीत.
बाहेरच्या पुऱ्या जरा मोठ्या असतात, खाताना खुप मोठा आ करावा लागतो, घरच्या पुऱ्या आपण हव्या त्या आकाराच्या करू शकतो.
558162_202676936508291_1237859626_n.jpg

पाणीपुरी साठी हे प्रॉडक्ट बघा. भारी आहे. "मयुरी पौष्टिक क्रंच, पाणीपुरी" पुण्याचे प्रॉडक्ट आहे. फोन ९८९००६०८७५. पापडासारख्या वाळवलेल्या आहेत. आपण घरी तळायच्या फक्त. मस्त टम्म होतात रादर जरा जास्तच, बॉलसारख्या. तेलही अजिबात पित नाहीत. २ दिवसात फोटो टाकते.

वा! मस्तच दिसतात पुर्‍या. शेव पुरीच्या पुर्‍यांना हेच पिठ वापरुन, पुरी पातळ लाटायची का? मोहन (तेल) अजिबात घालायचे नाही का? पाणी पुरीच्या पुर्‍या किती दिवस तशा कडक राहतात?

लहानपणी माझ्या मैत्रिणीच्या घरी नेहेमी पाणीपुरीच्या पुर्‍या बनवायचो आम्ही. त्या पिठात अरारूट असायचं, सोडा नसायचा. बाकी डिटेल्स आठवत नाहीत. अरारूट वापरून (आणि सोडा न घालता) पाणीपुरीच्या पुर्‍या कश्या करतात?

मला कुणी मागील दिवाळी फराळाच्या लिंक्स कुठे मिळतील ते सांगाल का कृपया

फ्रोझन कैरीचे पन्हे कोणी करुन बघितले आहे का?

मला इथल्या इंग्रो मधे फ्रोझन फोडी मिळाल्यात ... त्याचे अजुन काही करता येइल का?

विद्याक सुजाताला सुचवल्याप्रमाणे मीही दिवाळीचा फराळ शोध मध्ये घालून पाहिले,पण काही येत नाही.तरी ही लिन्क कशी शोधायची ह्याचे मार्गदर्शन कराल का?

स्ट्रॉबेरी सरबत बनवण्यासाठीचे सिरप घरात असेच पडले आहे. त्यात पाणी घालून बनवलेले सरबत काही विशेष चवीचे होत नाही. Sad मॉकटेल ट्राय करता येईल का? कुणाला कृती माहित असल्यास किंवा इथे वा इतरत्र जालावरचा दुवा देणार का?

तव्यावरचं पिठलं हा प्रकार कुणी करत असेल तर रेसिपी शेअर करा प्लिज. खान्देशात याला कोंबडी पिठलं म्हणतात(कोंबडीचा काहीही संबंध नसतांना) Proud

माझ्याकडे मुगडाळीचे रेडीमेड पिठ आहे.. त्याचा हलवा/शिरा बनवता येईल का?? की मुगाची डाळच घ्यावी लागेल??

Pages