पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक प्रश्न विचारायचा आहे ????
हे शेफ लोक कुठला पण पदार्थ डिप फ्राय करायचा असेल तर आधी हाफ फ्राय करतात लो फ्लेम वर आनि मग पुन्हा हाय फ्लेम वर डीप फ्राय करतात अस का करतात ?????

आधी फ्राय केल्याने पदार्थ आतपर्यंत शिजतो. दुसर्‍यांदा फ्राय करेपर्यंत, आतली वाफ निघून गेलेली असते आणि,
दुसर्‍या खेपेला आवरण, कुरकुरीत बनते शिवाय पदार्थ गरमही होतो.
डॉ. वर्षा जोशी यांच्या स्वयंपाकघरातील विज्ञान, या पुस्तकात अशा प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे आहेत. (सध्या नाही
माझ्याकडे ते. )

दिनेशदा आणि जागु(प्राजु) ताई नमस्कार ,
दिनेश्दा तुमचे उत्तर हो आहे पण जागु ताईचे आजुन काहिच उत्तर नाहि आले.
आपण श्री गणेशा तर करुया मग जागु ताई काहितरि उत्तर देतिलच ना.

जागूताई जागू ताई दार उघड, थांब माझ्या बाळाला तीट लावते... असा प्रकार आहे भाग्यश्री सध्या.
नाहीतर ती काही गप्प बसणार्‍यातली नाही.. सुरवात करुयाच कि. इथे बरेच प्रकार ऑलरेडी आहेतच. त्यांच्या लिंक्स जमा केल्या, तरी काम होईल.
या विषयावर एवढे लेखन आहे मायबोलीवर कि एखाद्या अनुक्रमणिकेची खरोखर गरज आहे.

अल्पना, राईस पेपर थोड्या कोमट पाण्यातून काढायचा, लगेच ओट्यावर्/बोर्डवर टाकून पाणी निप्टायचे. मग त्यात स्प्राऊट्स, पातीचा कांदा असे काहीबाही टाकून रोल करायचे. सॉस नाहीतर पीनट बटर नाहीतर आपली चिंच-गुळ किंवा शेंगदाण्याची चटणी लाऊन गट्ट्म करा Happy

माझ्याकडे जोश्यांकडचं लाह्याचं पीठ आलंय. काय करता येइल त्याचं? हेल्प!

एखाद्या अनुक्रमणिकेची खरोखर गरज आहे.>> अनुक्रमणिका आहे की इथे! शिवाय 'शोधा' ही आहेच.
आहारशास्त्र आणि पाककृती ह्या ग्रूपवर क्लिक करा. विषयवार यादी अशी भक्कम टॅब आहे तिथे. विषयानुसार वर्गवारी आहे, शब्दखुणांप्रमाणे वर्गवारी आहे, अ‍ॅल्फाबेटिकल वर्गवारी आहे. अजून काय हवे आहे? नवीन लोकांना माहित नसेल हे ठीक. पण जुन्यांनी तरी त्यांना तिकडे पाठवले पाहिजे.

हेडरमध्ये स्पष्टपणे लिहीलेलं आहे, की इथे नवीन पाककृती लिहू नयेत. तरी कित्येक पाककृती इथे लिहील्या जातात. 'शोधा' टॅबवर कित्येकदा पाकृ सापडतेच. पण 'शोधा' असं सांगितलं की आवडत नाही! आणि मग वर्गवारी नाही, काही सापडत नाही हे आहेच!

मग दिनेशदा तुम्हि सांगा कशी सुरवात करायचि, नविन लेखन कधिपासुन चालु करायचे.
आणि हो आता सुरवात गोडाने करायचि म्हणजेच बाप्पाच्या आवडत्या खावु पासुन " मोद्क" हो.
गणपती बाप्पा मोरया!

पौर्णिमा,
जून्या मायबोलीवरचे बरेच लेखन सापडत नाही, दिसले तरी फाँट मूळे वाचता येत नाही.
माझीच पंचामृताची रेसिपी मिळत नव्हती. मिळाली ती वाचता येत नाही. नव्या मायबोलीवर कुणी लिहिलेली दिसली नाही. शोधा मधे, तेच तेच पोस्ट परत परत दिसत राहते.
( गार्गी कथा पण मिळाली नाही.)

शोध हा एकच शब्द आहे. मायबोलीवरचे जूने लेखन इथे शोधता येईल, असे वाक्य तिथे हवे आहे.

मी जूना, असे गृहित धरुन उत्तर दिलेय. Happy

अजून एक झटपट होणारा पाहुण्यांचा प्रकार म्हणजे पापड, बिबडे, विविध प्रकारचे साबु. बटाटा, तांदूळ वगैरे पापड रोस्ट करून त्याचा चुरा करायचा अगदी पीठ नाही शंकर्पाळ्याएवढे तुकडे. मग वर कच्चे तेल, तिखट, मिठ, तिळाची चटणी (असेल तर), कच्चा कांदा आणी कोथिंबीर अ‍ॅड करायची. तों. पा.सू. लागतं नुसतं.

मायबोलीवरचे जूने लेखन इथे शोधता येईल, असे वाक्य तिथे हवे आहे. >>> या पानाच्या वर हिरव्या मोठ्या अक्षरात 'हितगुज' हा शब्द लिहिलेला आहे त्यावर क्लिक केल्यावर निळ्या मोठ्या अक्षरात 'जुन्या हितगुजवर' असे लिहिलेले दिसेलच, तिथून जुन्या मायबोलीत सहज जाता येते.
जुन्या मायबोलीतले फॉन्ट्स दिसत नसतील तर तिथले लेखन/ पाककृती नव्या मायबोलीत कॉपी पेस्ट करता येते. अनेकांनी असे केलेले आहे.

मंजूडी,

हि घ्या तुमची दही वड्याची कॄती, तुम्ही विचारत होतात ना तुम्ही कधी ह्या धाग्यावर लिहिली..
http://www.maayboli.com/node/24273?page=51

तुम्ही इतके जुने मेंबर असूनही,अशी पाकॄ इथे लिहिता... आता पूढे कमी दटावाल इथे चूकून कोणी लिहिलेच तर असे समजायचे का? Wink

आभार मंजूडी,,, नव्या सभासदाना, हे समजेल, म्हणजे हितगुजचा अर्थ वगैरे, अशी रास्त अपेक्षा ठेवायची नाही का ? बाकी नुसत्या शोध या आज्ञार्थी शब्दावरुनही, सर्वाना, बोध होतोच... मलाच काय तो होत नव्हता !

झंपुडे, ते दहीवडे नाहीत गं Happy उडीदवडे/मेदुवडे करायसाठीच्या टीपा आहेत, तपशीलवार पाककृती नाही.
आता तू 'टीपा' या शब्दावरूनही शब्दच्छल करशील, पण मी तुला उत्तर देण्यास बांधील नाही. Happy

मागे ज्याला दम भरलात तिने(त्या आयडीने) सुद्धा टीपच लिहिली होती असे दिसले म्हणून तुम्हाला विचारले की तुमच्या मते, तपशीवार पाकृ व टीप ह्यातला फरक काय?
की स्वतः लिहिता ती टीप व दुसरा लिहितो ती पाकृ असे आहे का? आणि असे दटावण्याचा हक्क कोणाला आहे हे माहीत करून घ्यायचे होते म्हणून विचारतेय. Happy

रागवू नका... तुमची पद्ध्त विचारतेय.

नव्या सभासदाना, हे समजेल, म्हणजे हितगुजचा अर्थ वगैरे, अशी रास्त अपेक्षा ठेवायची नाही का ?>>>

दिनेशदा, नव्या सभासदांकडून अपेक्षा ठेवायची विचारताय की अपेक्षा ठेवायची नाही विचारताय?
नव्या सभासदांना जुन्या मायबोलीची माहिती असण्याची शक्यता कमीच असते, त्यातूनही उत्साही आणि जिज्ञासू मायबोलीकर सगळ्या लिंका तपासत त्या ठिकाणी जाऊन पोचतात. बाकिच्यांना जुन्यांनीच मार्गदर्शन करायला हवे. आणि एकदा मार्ग दाखवला की बहुतेकांची पुढची वाट सोपी होते असा अनुभव आहे. कोणी पाककृती विचारली की लिंक दिली जातेच, मायबोलीचं नॅव्हिगेशन करण्यासाठीच्या टिपा इथे वेळोवेळी ठिकठिकाणी लिहिल्या जातातच. बाकी अधिक सुधारणा हव्या असल्यास 'नवीन मायबोली अशी सुधारावी' इथे येणार्‍या अडचणीचे उदाहरण देऊन आपल्या अपेक्षा अधिक तपशीलात लिहिता येतील.

हे घ्या उदाहरण !

हा पंचामृतचा गुगल सर्च

Search Results
1. पंचामृत | आयुर्वेद,पर्यायी व पूरक औषध पद्धती --Indian ...
indianalternativemedicine.blogspot.com/2007/.../blog-post_8019.htm...
पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेऊ नये. दोहोंपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे. (साखर १ चमचा मध १ चमचा ताजे दहि १ चमचा साजुक तूप २ चमचे कोमट दुध ४-५ चमचे (वरील ...
2. पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात - आपले ज्ञान ...
balsanskar.com/marathi/lekh/964.html
गुरुशिष्यांच्या गोष्टी ! संतांच्या गोष्टी ! राजांच्या गोष्टी ! राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी ! उत्सवांच्या गोष्टी ! अन्य गोष्टी ! आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह • मुखपृष्ठ » लेख ». पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात. मूल्यांकन ...
3. पंचामृत - Panchamrut Recipe | चकली
chakali.blogspot.com/2007/09/panchamrut.html
by Vaidehi Bhave - in 52 Google+ circles - More by Vaidehi Bhave
28 सप्टें 2007 – "पंचामृत" पाहुन आणि वाचुन तोंडाला पाणी सुटले. पण हा पदार्थ आता विस्म्रूतीत जात चालला आहे. लग्नात ... धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी..अगदी खरं आहे, आजकाल पंचामृत लग्नात फारसे पाहायला नाहीच मिळत. rajashri // October 2, 2007 5:43 AM ...
4. पंचामृत…. « "पालवी ”
palavee.wordpress.com/2011/03/23/पंचामृत/
23 मार्च 2011 – पंचामृत साहित्य : खवलेला नारळ, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, काजू, बेदाणे, खारकांचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे, तेल मोहरी, मेथी, हिंग, हळद, तीळ, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला. कृती : शेंगदाणे, काजू, खोबऱ्याचे तुकडे, ...
5. पंचामृत | Mimarathi
www.mimarathi.net/index.php?q=node/2914
पेश करतोय गौरीच्या नैवेद्यातील माझा सर्वात आवडणारा पदार्थ पंचामृत. कच्चा मालः. १. एक-दीड ईंच लांबीचे खोबर्याचे पातळ काप (१५-२०) २. भाजलेले शेंगादाणे (१५-२०) ३. हिरव्या मिरचीचे तुकडे (१५-२०) ४. कोथिंबीर ५. कडीपत्ता ६. भाजलेल्या तिळाचे कूट ...
6. पंचामृत - विकिपीडिया
mr.wikipedia.org/wiki/पंचामृत
panchamrut is made of 5 elements. It is very healthy item. It is used to show naivaidya to god normally. panch is 5 and amrut is a drink which is sais to give youthfulness. Elements of panchamrut - dahi - kela - dudh - madh - gaiche tup पनचामरुत हे पाच पदार्थानपासून बनते. ते खूप आरोग्यदायी असते.
7. पंचामृत | Maayboli
www.maayboli.com/taxonomy/term/3619
5 डिसें 2010 – जाड्या बुटक्या ताज्या हिरव्या मिरच्या ३०, तेल २ टेबलस्पून, गोडा मसाला दिड टेबलस्पून, जिरे १ टेबलस्पून, पांढरे तीळ ३ टेबलस्पून, हिंग १ टिस्पून, हळद १ टिस्पून, सूक्या खोबर्याचा किस ४ टेबलस्पून, टॅमरिंड पल्प २ टेबलस्पून (किंवा ...
8. पंचामृत | Panchamrut | Recipes
www.marathimati.net/panchamrut-recipes/
पंचामृत,Panchamrut,Recipes. ... ८ सप्टेंबर, २०१२ स्वगृह जीवनशैली पाककृती मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ पंचामृत. पंचामृत. प्रकाशक: प्रशासक दिनांक: २५ फेब्रुवारी २०११ विभाग: मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ | ० प्रतिक्रिया. साहित्य : १०० ग्रॅम ...
9. पंचामृत स्नान - Page 6
www.echavdi.com/index.php/bappamorya/ganeshpuja.html?...5
गणेशपुजा (प्राणप्रतिष्ठापना ते उत्तरपुजा) - पंचामृत स्नान. | Print | | ... २०) पंचामृत स्नान : पंचामृतस्नान म्हणजे दुध, दही, तुपस मध व साखरेने स्नान घालणे. जर पंचामृते एकत्र असल्यास. खालील मंत्र म्हणून फुलाने गणेश चरणावर पंचामृत वाहणे. पयो दधि ...
10. संस्कृती | mr.upakram.org
mr.upakram.org/node/404
पंचामृत, पंचधातू, पंचमहाभूते आणि अभ्यासाची ५ अंगे. पंचामृत : याने देवाला अभिषेक करतात. १. गाईचे दूध २. दही ३. ..... ॠषीपंचमीला जेवणात जो पंचामृत नावाचा पदार्थ असे, त्याची चव बघता त्याला पंचामृत का म्हणायचे हे मला अजून कळाले नाही. प्रकाश ...

यात माझी मायबोलीवरची मिरच्यांची रेसिपी दिसतेय.

हा मायबोलीवरचा सर्च !

About 210 results (0.14 seconds)

पंचामृत | Maayboli
5 डिसें 2010 ... जाड्या बुटक्या ताज्या हिरव्या मिरच्या ३०, तेल २ टेबलस्पून, गोडा मसाला दिड टेबलस्पून, जिरे १ टेबलस्पून, पांढरे तीळ ३ टेबलस्पून, हिंग १ टिस्पून, हळद १ टिस्पून, सूक्या खोबर्याचा किस ४ टेबलस्पून, टॅमरिंड पल्प २ टेबलस्पून (किंवा ...
www.maayboli.com/taxonomy/term/3619
पंचामृत
pMcaamaRt mhNajao dhIÊ dUQaÊ maQaÊ saaKr va tUp yaaMcao imaEaNa. p` saadalaa rvaaÊ dUQaÊ koLoÊ tUpÊ saaKr sagaLo savvaa maapat Gyaayacao Asato. yaaiXavaaya lagnaat vaaZayalaa ek vaogaLo TIka} pMcaamaRt kolao jaato. %yaacaI ÌtI AXaI. ek vaaTI icaMcaocaa daT kÜLÊ ek vaaTI ...
www.maayboli.com/hitguj/messages/103383/46708.html?...
पंचामृत
puvaI- pMcaamaRt ilaihlao hÜtoÊ pNa jasao to Aata lagnaacyaa pMgatItuna gaayaba Jaalaoya tsaoca šqaunahI Jaalaoya. puvaI- ijalaobaI ma{aÊ tÜMDlyaacaa masaalao BaatÊ saaQaa BaatÊ varNaÊ ALucao ÔdÔdoÊ cavaLI baTaTa vaaMgaI BaajaIÊ baTaT\yaacaI BaajaI. kaMda baTaTa vaaMgaI ...
www.maayboli.com/hitguj/messages/103383/90855.html?...
पंचामृत - विषयवार यादी | Maayboli
पंचामृत. लेखक • शिर्षक • प्रतिसाद • शेवटचा प्रतिसाद sort icon. दिनेशदा, पंचामृती मिरच्या (फोटोसहित), 30, 2010-12-12 07:20, पंचामृत. आहारशास्त्र आणि पाककृती. You must register or login in order to post into this group. चोखंदळ ग्राहक • महाराष्ट्र धर्म वाढवावा ...
www.maayboli.com/node/2548/by_subject/14/3619
उजळ कांती हवी | Maayboli
3 जून 2008 ... मीही पंचामृत फेशियलसाठी केळी आणलीत, एक केळं मुद्दाम बाजुला ठेवलंय, पुर्ण पिकण्यासाठी. प्रतिक्रिया देण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सभासद व्हा. मीन्वा | 15 February, 2010 - 03:42. कोरफड जेल आणते. घरी कोरफड नाहीये.
www.maayboli.com/node/2217?page=5
Panchamrut
आयुर्वेदातली पंचामृताची definition पूजेसाठी जे पंचामृत वापरतात त्यापेक्षा वेगळी आहे का? पूजेसाठी असतं त्यात साखरच असते ना? ... पंचामृत, कधीही करुन खाल्ले तर चालते का.. मी फ़क्त सत्यनारायणाच्या दिवशीच पंचाकृत खाल्लेले ...
www.maayboli.com/hitguj/messages/103387/121427.html?...

पंचामृती मिरच्या (फोटोसहित) | Maayboli
5 डिसें 2010 ... पुर्वी आपल्याकडे मराठी लोकांत लग्नाच्या जेवणावळीत पंचामृत आवर्जून असे. त्या जेवणात (जिलेबी मठ्ठा, पुर्या, वांगी बटाटा भाजी, भजी, तोंडले भात, अळूचे फदफदे ईत्यादी.. ) हा प्रकार मस्तच लागत असे. ह्या मिरच्या त्याच्याच ...
www.maayboli.com/node/21675
उजळ कांती हवी | Maayboli
3 जून 2008 ... अजुन एक घरच्या घरी फेशिअल करायचे असेल तर पंचामृत फेशिअल पण करता येत. मध्ये भारतात बरेच लोक करायचे. यामध्ये ... मला वाटले पंचामृत तयार करायचे आणि ते तोंडाला लावुन मसाज करायचा - माझं अज्ञान. बर झाले तू स्टॅप बाय स्टेप लिहीलस ...
www.maayboli.com/node/2217?page=4
लेखक - विषयवार यादी | Maayboli
... गुलमोहर • लेखमालिका • रंगीबेरंगी • मायबोली विशेष • मदतपुस्तिका • मुख्यपृष्ठ:शब्दखुणा:पंचामृत. विषयवार यादी. पंचामृत. लेखक • शिर्षक • प्रतिसाद • शेवटचा प्रतिसाद sort icon. दिनेशदा, पंचामृती मिरच्या (फोटोसहित), 30, 2010-12-12 07:20, पंचामृत ...
www.maayboli.com/node/all/by_subject/14/3619
बखर | Maayboli
पुर्वी आपल्याकडे मराठी लोकांत लग्नाच्या जेवणावळीत पंचामृत आवर्जून असे. त्या जेवणात (जिलेबी मठ्ठा, पुर्या, वांगी बटाटा भाजी, भजी, तोंडले भात, अळूचे फदफदे ईत्यादी.. ) हा प्रकार मस्तच लागत असे. ह्या मिरच्या त्याच्याच प्रकार आहे पण, ...
www.maayboli.com/archive/all?page=1212&destination...

यात माझीच मिरच्यांची आणि मूळ पंचामृताची रेसिपी दिसतेय.

त्या शिवाजी फाँटमधली रेसिपी अशी दिसतेय !

puvaI- pMcaamaRt ilaihlao hÜtoÊ pNa jasao to Aata lagnaacyaa pMgatItuna gaayaba Jaalaoya tsaoca šqaunahI Jaalaoya. puvaI- ijalaobaI ma{aÊ tÜMDlyaacaa masaalao BaatÊ saaQaa BaatÊ varNaÊ ALucao ÔdÔdoÊ cavaLI baTaTa vaaMgaI BaajaIÊ baTaT\yaacaI BaajaI. kaMda baTaTa vaaMgaI BajaIÊ naarLacaI caTNaI Asaa lagnaacaa baot Asaayacaa. pMcaamaRt Asaayacaoca.

pa}Na vaaTI icaMca kÜmaT paNyaat iBajat Gaalauna kÜL kaZavaa. AQaI- vaaTI tIL Baajauna jaaDsar kuT kravao. ek vaaTI XaoMgadaNao Baajauna saÜlauna Gyaavaot. AQaI- vaaTI sau@yaa KÜbaáyaacyaa patL kacaáyaa kravyaat. AQaI- vaaTI ihrvyaa imarcyaaMcao tukDo kravaot va AQaI- vaaTI baodaNao Gyaavaot. yaalaa dÜna maÜzo camacao gaÜDa masaalaa Ainavaaya- Aaho.
tolaacaI ihMga hLd Gaalauna KmaMga ÔÜDNaI kravaI. %yaavar imarcyaaMcao tukDo Gaalauna prtavaot. %yaavar KÜbaáyaacyaa kacaáyaa prtuna Gyaavyaat. maga %yaavar gaÜDa masaalaa Gaalauna prtavao. kÜL Gaalauna dÜna kp paNaI Gaalaavao. }kLI ÔuTtaca daNao va baodaNao Gaalaavaot. qaÜDavaoL }kLu Vavao maga gauL Gaalaavaa. gauL ivarGaLuna daTpNaa Aalaa ik tILacao kuT Gaalaavao. }kLuna daTsar hÜvau Vavao. ho iTka} Aaho pNa iTkayalaa }rt naahI.

काय करायचे तिचे ?

निव्वळ जिथे, शोध हा शब्द मायबोलीच्या पानावर दिसतोय, तिथे कंसात, मायबोलीवरचे जूने लेखन, इथे एखादा महत्वाचा शब्द लिहून शोधता येईल, अशी सूचना, असती तरी काम भागले असते !

इंटरनेट एक्स्प्लोररमधे पंचामृताची पाककृती व्यवस्थित दिसते आहे.

panchamrut.jpg

नोंद करून ठेवाव्यात अश्या काही लिंका -

१. नवीन मायबोली: असे सुधारता येईल

२. मायबोलीवरील आहार व पाककृती विभागात पाककृती कशा शोधाव्यात.

सुचरीता, मंजु लयी थँक्स. गोड आवडत नाही विशेष, त्यामुळे तिखट पदार्थच शोधत होत्ये.
दिनेशदा, मलाही IE वर तुमच्या रेसिपीज व्यवस्थित दिसतात. रोज काहीही स्वयंपाक करतांना तुमच्या रेसिपीजचा आधार लागतोच Happy

एडिटेड

अनारसे : तयार पीठ आणलं आहे.
तळण्याऐवजी बेक करता येतील का ? कसे ?
कोणी प्रयोग केला आहे का ?
मला ता सुचलेली हि कल्पना मायबोलीकरांना यापूर्वीच सुचली असेल, खात्री आहे.

दोन दिवसां पूर्वी मी घरीच डार्क चॉकलेट केक केला होता,धाकट्या सुपुत्रा ने मजा म्हणुन त्याचा चुरा बनवला आहे .खूप जास्त असल्या मुळे टाकून ही देता येत नाही ,आणि कोणा ला खायला ही देता येत नाही ,त्या पासुन काय काय बनवता येईल???

Pages