पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करडई किंवा मेथीची परतून भाजी करतो तशीच बिटाच्या पानांची करता येइल. मिनोतीने इथे एक कृती लिहिली आहे. सॅलडचं सांगता येणार नाही. एक कच्च पान खाऊन बघा Wink

Happy

वेका बीटाची पाने अज्जीबात फेकु नकोस. नेहेमीसारखी पाने बारीक चिरुन ती तेलात( मोहरी, हिंग, हळद ) फोडणी करुन त्यात परतुन बेसन घालुन भाजी कर. एकदम चविष्ट होते. कळत पण नाही की ती बीटाच्या पानांची आहे ते. ( किंचीत गोडसर लागते, त्यामुळे साखर अजीबात घालु नकोस. )

आले, लिंबु, ओवा, काळे मिठ यांचे जे पाचक करतात त्याची कृती माहित आहे का?

रस काढल्यावर गरम करायचा असतो का?

लिंबाचा रस, त्यात आल्याचा पाणी न घालता काढलेला रस ( बारिक किसून, स्वच्छ कपड्यात किंवा गाळण्यावर पिळून ) काढायचा. त्यात चवीप्रमाणे काळे मिठ आणि साखर घालायची. पण गरम करायचा नाही. हा बाहेरही २/३ दिवस टिकतो. फ्रिजमधे आठवडाभर राहतो. पण काचेच्या भांड्यातच ठेवायचा. याचा रंग दूध घातलेल्या चहासारखा दिसतो.

माझी आई आल्याचा रस काढत नाही. आलं किसून त्यावर लिंबाचा रस, पादेलोण घालून मिक्स करून ठेवते. Happy बाहेरही चांगले राहते.

माझी आई आल्याचा रस काढत नाही. आलं किसून त्यावर लिंबाचा रस, पादेलोण घालून मिक्स करून ठेवते. बाहेरही चांगले राहते. >> प्राची + १.
आमच्याकडे यात एकच जास्तीची गोष्ट म्हणजे साखरही घातली जाते. फार यम्मी लागतं हे.

खोबर, शेंगदाणे, तिळाचकूट घालून जे पंचामृत करतात ते कसे करतात ? पाक कृती हवी आहे.

प्राची आणी दिनेशजींनी बरोबर लिहीले आहे. माझी आई या दोन्ही प्रकारात करते. मात्र ओवा घातला तर उपासाला चालत नाही. मनीमाऊ हो साखर घातले की निदान घशाखाली चटकन उतरते ते.:फिदी: आणी आले ओव्याचा तिखटपणा साखरेमुळे चटकदार बनतो. काचेच्या बाटलीत घालुन फ्रिझमध्ये ठेवावे.

दुसरे पाचक म्हणजे आवळा किसायचा त्यातच २ तुकडे आले पण किसायचे आणी काळे मीठ घालुन बाटलीत भरायचे. आम्लपित्तावर उत्तम

माझी आई लिंबाच्या रसात आल्याचा रस, शेंदेलोण्/पादेलोण आणि ओवा घालुन पाचक करायची आणि मला तेच आवडते Happy पण ते रस गरम करायचे का नाही ते मला आठवत नव्हते.

माझ्या साबा आल्याच्या किसात लिंबाचा रस आणि शेंदेलोण्/पादेलोण घालुन पाचक करतात.

वेका, मी परवाच केली होती बीटच्या पानांची भाजी.त्यात बटाटा पण बारीक चिरून घातला होता.

we got cake from one desi store from new jersy. lekala far avadala ahe. sadha ahe pan tyat truti-fruti takaleli ahe khup. mi ghari cake karayacha try kela hota barech vela. pound cake che pakit anun tyat truti fruti takun pan mazya cake madhali nehami talashi jaun basate. ase ka bare hote ? any tricks to avoid that . experts please write.

लाजो माझी आई ते गरम करायची त्यामुळे साखर विरघळुन पाकासारखी घट्ट नाही पण दाटसर बनते. तरीही आईला फोन करुन विचारावे लागेल. माझ्या साबा आले किसुन त्यात लिंबु पिळतात आणी काळे मीठ घालतात. त्यांना गोड आवडत नाही. आणी ते पाचक माझ्या पचनी पडत नाही.:फिदी:

अरी, केकचे मिश्रण जर फेटून खुप हलके केलेले असेल, तर सगळे ड्रायफ्रुटस तळाशी जातात कारण त्या मिश्रणापेक्षा ते जड असतात. रिचफ्रुट केकचे मिश्रण, घट्टसर असते आणि त्यात ते अधांतरी राहू शकतात.
तूम्ही म्हणता तो केकही फारसा हलका म्हणजे स्पाँजी नसणार.. लाजो नीट सांगू शकेल.

अरि, http://www.maayboli.com/node/19456 इथे बनाना ब्रेडची कृती आहे. मी बरेचदा त्यात टुटी-फ्रुटी किंवा वॉलनटस् घालते. खरं तर ही ब्रेडची कृती आहे पण हमखास यशस्वी होणारा प्रकार असल्याने लिंक दिली. गव्हाचे पीठ आणि अगदी मॉडरेट साखर असल्याने लहान मुलांसाठी अगदी पर्फेक्ट स्नॅक आहे.

इथे सहज विचारावेसे वाटले. पुर्वी तयार पदार्थ घरी आणायची प्रथा नव्हती आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ( आणि तसे ते त्याकाळी येतच. फोनच नसल्यामूळे आधी फोन करुन यायचाही प्रश्न नसायचा.) आई लोकांना
आयत्यावेळी काहीतरी करावे लागे.

कुठल्याही पूर्वतयारीशिवाय आणि हाताशी असलेले जिन्नस वापरुन करायचे पदार्थ असत ते. पण माझ्या
आठवणीत, शिरा, सांजा ( पिवळा, मराठी पद्धतीचा ), कांदेपोहे आणि भजी याशिवाय आणखी पदार्थ नाहीत.
पाहुण्यांचा उपास असेल तर साबुदाण्याच्या फेण्या किंवा बटाट्याचा चिवडा तळून दिला जात असे. पाहुणे
येताना सहसा ग्लुकोजचा किंवा मोनॅकोचा पुडा आणत, अगदी शेवटचा उपाय म्हणजे तिच बिस्किटे चहाबरोबर देत.

नारळाच्या वड्या, रव्याचे लाडू हे पदार्थ आमच्याकडे ओला नारळ संपवायला करत असत. पण तेही फार टिकत नसत. (फ्रीज नव्हता ) त्यामूळे ते असले तर. किंवा गावाहून कुणी आलेले असेल तर मालवणी खाजा वगैरे.
अर्थातच हे आयत्यावेळचे पदार्थ नाहीत. गव्हाच्या पिठाचे गोड आयते आई करत असे, पण ते पाहुण्यांसाठी,
क्वचितच.

अगदी जेवायच्या वेळी कुणी आले तर जेवायचा आग्रह असे पण सहसा असे पाहुणे, जेवायला थांबत नसत.

तर तूमच्या आठवणीत, अगदी आयत्यावेळी करता येतील, (बाहेरून काही न आणता ) असे काही पदार्थ आहेत का ?

तर तूमच्या आठवणीत, अगदी आयत्यावेळी करता येतील, (बाहेरून काही न आणता ) असे काही पदार्थ आहेत का ?
>>>
मला स्वतःला वरीचे तांदूळ हा अगदी आयत्या वेळी करून खाण्याचा प्रकार म्हणून खूप आवडतो. हा उपासाचा पदार्थ असल्याने बर्‍याच जणांकडे भलत्या वेळी भूक लागली तर सहसा करत नाहीत. मला मात्र कधीही खायला आवडतात असे तांदूळ. वरीचे तांदूळ धुवून घ्यायचे, तेला/तूपावर जिरं, हिरवी मिरची ह्यांची फोडणी + त्यात बटाट्याच्या काचर्‍या परतायच्या. भरपूर पाणी घालून व त्यात मीठ घालून उकळ काढायाची. काचर्‍या शिजल्या की वरीचे तांदूळ + दाण्याचे कूट + वरतून बारीक चिरून कोशिंबीर. तांदूळ शिजून लापशीसारखे सरबरीत झाले की गॅस बंद करायचा. अगदी यम यम लागतो हा प्रकार. स्टीलच्या कुंड्यात (बोल/ वाडगा) घेऊन + वरतून साजुक तूपाची धार + चवीला लिंबाचे गोड लोणचे म्हणजे स्वर्गीय सुख माझ्यासाठी! एकदम पोटभरीचा प्रकार. माझ्या साबा साखरही घालतात थोडी. पण मला साखर नाही आवडत.

आमच्याकडे व्हायचा हा प्रकार, पण त्यावेळी वरीचे तांदुळ फक्त एकादशीच्या सुमारासच आणले जात. एरवी
संग्रहात नसतच.

आमच्या घरी नव्हे तर आम्ही कुणाच्याही घरी गेलो कि हेच चार पदार्थ असायचे. शिरा करु कि पोहे, असेच त्या काळी, बायका विचारायच्या Happy

आमच्याकडे व्हायचा हा प्रकार, पण त्यावेळी वरीचे तांदुळ फक्त एकादशीच्या सुमारासच आणले जात. एरवी
संग्रहात नसतच.

>>>
माझ्या कडे कायमच स्टॉक मधे ठेवते मी. मूड आला की पटकन होतो हा पदार्थ. पातळ पातळ लापशीसारखा केला की भुरकायला जाम मजा येते. पण ह्याच तांदळाची भगर मात्र मला मूळीच आवडत नाही. एक तर त्याला काहीच चव नसते. सोबत दाण्याची चटणी करावीच लागते. आणि खूप घट्ट असतो तो प्रकार,. कितीही आमटी घातली तर आळतच जाते भगर! Sad

दिनेशदा
१. ज्या घरात भाज्या आहेत त्या घालुन बाँबीनो किंवा घरच्या शेवयाचा अथवा बारीक दलियाच उपमा. ह्यात कांदा, टोमॅटो, गाजर, फ्रोजन कॉर्न, मटार, गाजर टाकता येते.
२. भरपुर लसुण घालुन ज्वारीची उकडपेण्डी
३.कांदा घालुन केलेली तांदुळाची उकडपेंडी
४.किन्वाची खिचडी अथवा उपमा
५.इंस्टंट ढोकळा आणि सोबत चटणी
६.सुशिला
७.शेवयांचा/वळवटांचा गोड शिरा
८.भाज्या घालुन धिरडी, चटणी

सध्या एवढच आठवतयं, अजुन लिहिन Happy

वा प्रिती, आवडले हे प्रकार !

आमच्याकडे गावाहून आलेल्या, हातशेवया असतात. त्यांचा पण शिरा चांगला होतो. पण त्या पटकन शिजत नाहीत.

सुनिता, विपू मधे पंचामृताची कृती लिहिलीय.
माझी जूनी कृती जून्या मायबोलीवर आहे ती आता अर्वाच्य आहे Happy

प्रीति +१

थालिपीठ (भाजणी, उपासाची भाजणी, मिश्र पिठे, इ.)
भडंग
उकड
विविध प्रकारची धिरडी
पुरी-भाजी

Pages