प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार

मंडळी, करा सुरूवात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

CP.jpg

एक मोठा आणि मग बाकीचे वेगवेगळ्या वयाचे - चिल्लरपार्टी ! Proud

अलास्कातील हिमनग.

मस्त कल्पक विषय आहे हा संयोजक! फोटो शोधायला मजा येतेय. पण जास्ती नाही मिळणार .... Happy

मॉरीशसमधली जगातल्या सर्वांत मोठ्या पानांच्या वॉटरलिलीची पाने :

डाव्या कोपर्‍यातले वयाने सगळ्यात मोठे. त्यामुळे ते विरून चालले आहे. बाकीचे काही तर अजून उमलत असलेली :

themb.jpg

lilis.jpg

Pages