प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार

मंडळी, करा सुरूवात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही एकाच हाऊसिंग सोसायटीतल्या तीन वेगवेगळ्या कुटुंबातली लेकुरे - पळी कुटुंब, कालथे कुटुंब आणि लाटणे कुटुंब. कशी खेळीमेळीनं एकत्र राहतायत पहा. त्यांच्याशी फटकून काचेच्या अलिशान घरात राहणारे बाटली कुटुंबही आहे. शिवाय बाजूच्या साध्या वस्तीत राहणारे कोयते कुटुंबही आहे. :

आज सवडीने तीनही झब्बू आणि सगळी प्रचि पाहिली. एकापेक्षा एक सुंदर आहेत! मुळात ही आयडियाची कल्पनाच खूप झक्कास आहे. Happy

IMG_1696_RS.jpg

माधव,

>> गापै, कसला फोटो आहे तो?

याला फ्रॅक्टल्स (fractals) असं म्हणतात. छोटे-मोठे यांची असंख्य उदाहरणे सापडतात. हा विषय पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार फ्रॅक्टल्सचाच आला! Happy प्रमाणबद्धपणे विस्तारणारा (वा अकुंचणारा) सरूप आकार असं त्यांचं वर्णन करता येऊ शकतं.

अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Fractals

Happy

आ.न.,
-गा.पै.

IMG_2101_RS.jpg

Picture 030.jpg

महाबळेश्वरच्या आठवड्याच्या बाजारातील व्यापारी :

गंमत म्हणजे मी फोटो काढण्याकरता त्यांची परवानगी मागितली तर आनंदानं दिली आणि वर 'आमचे फोटो नेटवर टाका बरं का!' अशी प्रेमळ ताकीदही दिली. Happy

जिप्सी, मलाही माहित नव्हतं इतके फोटो निघतील असं. आज सकाळी झब्बु द्यायला सुरवात केली तेव्हा पाचेक झब्बुंनंतर रिटायर्ड होणार असं वाटलेलं. शोधले तर बरेच मिळाले की! Happy

pillu.jpg

Pages