पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केक पॉप्स असा गूगल सर्च करा. वरील प्रमाणे केक बॉल्स बनवून रॉयल आयसिन्ग किन्वा मेल्टेड डार्क चॉकोलेट मध्ये बुडवले आणि त्यात लॉलिपॉपची काडी लावली तर मस्त स्नॅक होतो.

जून्या मायबोलीवरचे बरेच लेखन सापडत नाही, दिसले तरी फाँट मूळे वाचता येत नाही.>>> ईंटरनेट एक्सप्लोरर वर जुन्या मायबोलीवरचे सगळे लेखन दिसते.

अगं तिखट खाऊन मग त्रास होतो बाकीच्यांना. म्हणजे हल्ली आमटी-भाजीतपण चिमूटभर तिखट-गोडा मसाला असतो. त्यापेक्षा गोड पटकन संपेल. पनीरपासून मिठाई/ कलाकंद करतात हे ऐकीव माहिती... म्हणून करून बघायचंय.

अननसाचा शिरा करतांना पाण्याऐवजी दूध वापरले तर चालेल का?? अननस टीनमधला वापरणार आहे.

साधं पोळ्यांचं गव्हाचं पीठ दोशासारखं पातळ भिजवलं, त्यात मीठ, साखर, जीरा पाउडर एवढंच फक्त घातलं. याचे छोटे छोटे क्रिस्प दोसे वर साजुक तुप सोडुन <<

यात मीठ्/साखर्/इ. काहीच न घालता केलं तर त्याला 'साधं धिरडं' म्हणतात आमच्या कडे. हे दुधात कुस्करून खायचं. वरून साखर घालून.

***

जुन्या माबोवर जे काय इंग्रजीतून लिहिल्यासारखं पण विचित्र मराठी दिसतं त्यासाठी सुशा नामक फाँट लागतो. susha.ttf असे गूगल करून हा फाँट आपल्या कॉम्प्युटरात घेण्याचे करावे.

प्र९, पराठ्याचं सारण तिखट करणं, न करणं आपल्या हातात असतं. लाल तिखटाऐवजी चवीकरता आमचूर, धणे जिरे पावडर, थोडी कसूरी मेथी, गरम मसाला असं घालू शकतेस.

मी पनीर ऐवजी चुकून फ्रेंच चीज आणलं वर ते न वाचता त्याची पनीर बुर्जी करायला घेतली तेव्हा ते नेहमीसारखं न होता पातळ पिठल्यासारखं व्हायला लागलं तर माझॉ ट्युब पेट्ली. उरल्या पनीरच्या दगडाचं काय करू? नुस्तं खायला छान लागत नाहीये.

प्रज्ञा९, मी परवाच फाटलेल्या दूधाचं पनीर वेगळं करून कलाकंद केलं होतं (पहिल्यांदाच). पण मस्त जमलं होतं. अगदी कॉलर ताठ करण्याइतकं Happy साधारण रेसिपी अशी: http://www.manjulaskitchen.com/2009/09/24/kalakand/
टेट्रापॅक सोडून दुसरं दूध आणलं की फाटतंच ते आमच्याकडे. वेळेवर तापवायचं राहून जातं बहुतेक.

अवल,मंजूडी,अश्विनीमामी,रिमा थँक्स ! मी रम बॉल्स आणि अगो चा ब्लॅक फॉरेस्ट पुडिंग केक दोन्हि बनवले,फक्त १० मिनीटात ,सगळे संपले.

वेका, त्याचा चीज सॉस (व्हाईट सॉस + किसलेले चीज) करून तो पास्ता, बेकडिशमध्ये वापरू शकतेस का बघ. किंवा चीजी सॉसमध्ये मिक्स हर्ब्ज, मिरपूड इ. घालून तो डिप म्हणून ब्रेड स्टिक्स बरोबर / कापलेल्या भाज्यांबरोबर खायला वापरू शकतेस.

प्रज्ञा९, पनीर मधे मिल्कमेड, थोडी मिल्क पावडर टाकुन कलाकंद मायक्रोवेव्ह मधे करता येतो. मी अंदाजे घेते त्यामुळे नक्कि प्रमाण सांगता येत नाही.
कलाकंद म्हणजेच मलई बर्फी का? मलई बर्फी क्विन सायो ,यावर काही प्रकाश टाकशील का?
अंजू, अननसाचा शिरा करताना दुध फाटण्याची शक्यता असते म्हणुन पाणी वापरायचे. शिरा होत आल्यावर थोडे दुध नंतर टाकलेस तर चालेल.

मी खूप पूर्वी कलाकंद गिट्स वगैरे जी रेडी मिक्स असायची त्याचा केला आहे. मला नक्की टेक्श्चर लक्षात नाही पण मऊच असतो. बर्फीशी चव बहुतेक मॅच होत नाही / नसावं.

झाला कलाकंद!!!!!!!!!!!!!!!अफाट सुरेख झालाय! Happy
वरचीच नताशाने दिलेली रेस्पी.
१ लि. दुध नासलं तर मी अर्धा लि. दूध पाव लि. करून वरच्या पद्धतीने केलं, पण आटवलेलं दूध थोडं जास्ती चालेल असं वाटतंय. नेक्ष्ट टायमाला करीन. साखर अर्थातच आवडीप्रमाणे.

अर्धा किलो खवा असेल तर त्यात 3 टेबल चमचे मैदा घालून नीट मळावे॰ त्या मिश्रणाचे गोळे कारवे॰ त्याला भेगा पडता कामा नये॰ तळून नेहमी प्रमाणे पाक करून त्यात सोडावे॰
चुकल्यास जेठ्श साधास्यांनी सांभाळून घ्यावे॰

पनीर बटर मसाला करायला अमुलचे क्रीम आणले होते. ३/४ पाकीट शिल्लक आहे. काय करता येइइल? आजच संपवावे लागेल. घरात सहसा असणारे जिन्नस वापरुन करता आले तर छानच Happy

वर्षा_म, फ्रुट सॅलॅड मध्ये वापरुन बघ. केळी, अ‍ॅपल, चिकु, स्ट्रॉबेरी, डाळिंब अन ड्राय्-फ्रुट्स नी वरनं अमुल क्रीम. मला अतिशय आवडतं. Happy साखर घालायची गरज नाही. क्रीमची ब्लँड चव चांगली लागते.

जुन्या मायबोलीत मला मूग हलव्याची रेसिपी मिळाली पण त्यात प्रमाण दिले नाहि, कोणाला माहीत असेल तर प्लीज शेअर करा.

समप्रमाणात घ्यायच. एक वाटी मूग्डाळ, एक वाटी तूप, एक वाटी दूध, एक वाटी साखर, अन अर्धा वाटी खवा.

धन्यवाद मंजू लगेच उत्तर दिल्याबद्दल, पण मला कमीत कमी तूप वापरुन करायचा आहे हलवा.

ह्या हलवा कमी तुपात करण्यापेक्षा योग्य प्रमाणात तूप घालूनच करावा नाहीतर ती चव्/मजा नाही! एक वाटी ऐवजी अर्धा वाटीच खावा.

Pages