गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१ ऑगस्टपासून गुलमोहराच्या लेखन पद्धतीत बदल करत आहोत. गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांचे स्वतंत्र ग्रूप्स तयार करण्यात येतील (उदा: गुलमोहर कथा, गुलमोहर गझल, गुलमोहर प्रकाशचित्र इत्यादी). ज्या प्रकारचे लेखन करायचे आहे त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रूपात सहभागी झाल्याबरोबर "नवीन लेखनाचा धागा" वापरून साहित्य लिहू शकता.

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही.

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

यासंदर्भात काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

प्रकार: 

अपूर्ण लिखाण कसे ठेवायचे?
मी आताच चुकून अर्धवट स्थितीत असलेले लिखाण सेव्ह केले तर ते प्रकाशित झाले. फारसे लेखन केलेले नाही त्यामुळे काय चुकले ते समजत नाहीये. कृपया कोणी मदत कराल काय?
या ठिकाणी ते अर्धवट लिखाण आहे. मी वेळ मिळेल तसे लिहून हे पूर्ण करेनच पण आता तरी प्रकाशित नकोय.
http://www.maayboli.com/node/36995

'नवीन लेखन करा' पान उघडल्यावर ग्रूपही ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करता आला तर हे सोपं होईल ना?
<<< अनुमोदन....
नविन लेखन करा वर क्लिक केल्यावरही ग्रुप मध्ये कस सहभागी व्हायच ते नाही समजल..... क्रुपया कोणी सांगू शकेल का?

"प्रकाशचित्रण" विभागाचे नाव "इतर कला" किंवा असंच काहीतरी ठेवता येईल का? कारण त्यात फक्त प्रकाशचित्रंच असतील असं नाही.....त्यात चित्रकला, पॉटरी, भरतकाम, विणकाम, इतर क्राफ्ट इ. पण समाविष्ट होतील ना?

http://www.maayboli.com/gulmohar_new/235 >>> या लिंकवर गेल्या ७२ तासातील लेखन दिसणं अपेक्षीत आहे, मग नुकतच प्रकाशित साहित्य यात दिसणार नाही का?

http://www.maayboli.com/node/37029 >>> ही गझल, गुलमोहोर, गझलविभागात आजच प्रकाशित झालेली आहे, मग ती इथे का दिसत नाही?

टॅगगींग व्यवस्थीत केलं तरच त्या त्या ग्रूपमधे लिखाण दिसणार/सापडणार का? Uhoh

कविता , गझल वगैरे सारख्या काव्य प्रकारामधे मी सदस्यत्व नाही घेतले तरी सुध्दा माझ्या होमपेज वर त्याचे धागे दिसत आहेत........... ही सुविधा अजुन निर्माण व्हायची आहे का ?

सुविधा निर्माण झालेली असावी. कविता, गझल वगैरेसारखे काव्यप्रकार रचणारे आपापले साहित्य सार्वजनिक करत असल्यामुळे ते सर्वांना दिसत असावे. (मधेच तोंड खुपसल्याबद्दल क्षमस्व)

सहभागी कस व्हायच ते समजत नाहीय. सहभागी व्हा ही लिन्क मला कुठेही दिसत नाही. कृपा करून कुणी सांगाल का?

मला एक शंका आहे,विविध कला व हस्तकला हे सदर का दिसत नाहीत? जर आपल्याला काही कलाकृतीचे फोटो टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे? कृपया मदत करा.

नमस्कार सुरेखा कुलकर्णी,
सहभागी होण्यासाठी त्या ग्रुपच्या पानावर गेलात तर तिथे उजव्या बाजूला सामील व्हा असा पर्याय दिसेल. तो पर्याय वापरून सहभागी होउ शकता. मायबोलीवरच्या सर्व ग्रुपांची यादी येथे आहे.

अर्चना पुराणिक नमस्कार,

>>विविध कला व हस्तकला हे सदर का दिसत नाहीत?
त्यासाठी गुलमोहर - इतर कला हा ग्रुप निर्माण केलेला आहे.

>> जर आपल्याला काही कलाकृतीचे फोटो टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे?
मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? आणि लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? हे मदतपुस्तिकेतले दोन्ही दुवे एकदा वाचून बघा. तुमचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. अजून काही प्रश्न असतील तर त्या पानांवर विचारू शकता.

- मदत_समिती.

नमस्कार भानुमती Happy
प्रथम मायबोलीवर स्वागत!
तुम्ही तुमच्या स्वत: रचलेल्या कविता खालील लिंकवर त्या ग्रुपचे सदस्य होऊन लिहू शकता.

हितगुज ग्रूप: गुलमोहर - कविता

धन्यवाद..

नमस्कार , माझे नाव अमित असून , मायबोली वर मी नव्याने सदस्य झालो आहे .
मला तुमचे हे संकेतस्थळ खूप आवडले , अतिशय विचारपूर्वक तुम्ही हे सर्व उभे केले आहे . इथल्या कादंबऱ्या , कथा , कविता एकूणच मांडणी यामाग् चा , विचार जाणवतो .
Micro-Fictions अथवा क्षण - कथा हा प्रकार इथे सुरु केल्यास मायबोलीला अगदी " चार चांद " लागतील असे वाटते . पुन्हा एकदा म्हणीन " लय भारी राव " ...

कथा कविता पोस्ट करायची असेल तर
कशी?
कुठे?

नवे
लेखन केले नाहीय्त्याला बराच काळ गेला. ती सुविधा बद्द आहे का माझ्या खात्याकरता?

मैत्री
tuzya mazya maitrichi sunder gumfan
tyala premacha soneri kondam
asach jap aapala aapalepan...

mugdha

admin,

मला नवीन चित्र कला विभागात टाकायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल. Can you please tell me steps to upload photos in Kala section? Do I need to be member of it first?

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल. अ‍ॅडमिन, कधी होइल ही सुविधा सुरु?

नविन लेखन लिहीण्यापूर्वी "त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे." असे लिहीले आहे. पण ते कसे करावे अथवा ती सोय कुठे आहे ते सांगीतलेले नाही. मला तरी शोधून "ललित लेख" या ग्रूपमध्ये कसे सहभागी व्हायला जमले नाही. थोडे मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.

मी बालसाहित्य आणि कविता या विभागांचा सभासद झालो आहे. पण मला माझे साहित्य मायबोलीवर कसे टाकावे ते लक्षात आलेले नाही. तरी कॄपया मार्गदर्शन करावे.

Pages