गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१ ऑगस्टपासून गुलमोहराच्या लेखन पद्धतीत बदल करत आहोत. गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांचे स्वतंत्र ग्रूप्स तयार करण्यात येतील (उदा: गुलमोहर कथा, गुलमोहर गझल, गुलमोहर प्रकाशचित्र इत्यादी). ज्या प्रकारचे लेखन करायचे आहे त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रूपात सहभागी झाल्याबरोबर "नवीन लेखनाचा धागा" वापरून साहित्य लिहू शकता.

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही.

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

यासंदर्भात काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

प्रकार: 

अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे. नेमके तेथे काय कारायचे हे माहित नाही. आणि फोटो कसे टाकावेत हे ही बर्याच जणांना माहीत नाहीये. तर या बाबतीत खुलासा झाला तर बरे होइल.

अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे. नेमके तेथे काय कारायचे हे माहित नाही. आणि फोटो कसे टाकावेत हे ही बर्याच जणांना माहीत नाहीये. तर या बाबतीत खुलासा झाला तर बरे होइल.

>>>अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे<<<

प्रतिसाद लिहून झाला की सेव्ह हे बटन दाबा. म्हणजे तो त्या धाग्याखालचा एक प्रतिसाद म्हणून सर्वांना दिसू लागेल.

स्वान्त सुखाय प्रतिसाद द्यायचे असले तर सेव्ह बटन नाही दाबले तरी चालते. नुसते प्रतिसाद लिहून ते आपणच वाचून पेज रिफ्रेश केले की मग इतरांना ते दिसत नाहीत. आपले आपण हवे ते लिहून वाचून नष्ट करू शकतो.

अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे. नेमके तेथे काय कारायचे हे माहित नाही. आणि फोटो कसे टाकावेत हे ही बर्याच जणांना माहीत नाहीये. तर या बाबतीत खुलासा झाला तर बरे होइल.

सुभाषिणी | 8 November, 2014 - 11:13

सुभाषिणी | 8 November, 2014 - 11:18

सुभाषिणी | 8 November, 2014 - 11:19<<<

अहो आत्तापर्यंत तीनदा असे झाले आहे की तुम्ही येथे प्रतिसाद टाकला आहेत आणि तीनहीवेळा दिसलेला आहे.

सुभाषिणी , तुम्ही वहात्या धाग्यांवर प्रतिसाद देत असाल.
तिथे काही ठराविक नंबर झाल्यावर प्रतिसाद निघून जातात.

सिनी, तुझ्या फोटोच्या नावात स्पेस आहे का? असल्यास फोटो रिनेम कर आणि स्पेस काढुन टाक आणि पुन्हा ट्राय कर

नमस्कार, मी मायबोलीची नवीन सभासद आहे. मला कथा,बालसाहित्य यात लिहावयाचे आहे ते लिहिण्यासाठी गृप मध्ये कसे सहभागी व्हायचे ते सांगितले तर बरं होईल.

धन्यवाद . प्रथमच मायबोलिवर लिहित आहे,
हा अतिशय सुन्दर उपक्रम आहे.
सध्या इतकेच,

पुनश्च धन्यवाद .

कोणी सान्गाल का कि एखाद्या ग्रुप् चे सभासद कसे व्हायचे कारण बर्याच लिन्क ओप्न होत नाहित
आणि smiley कसे टाकाय्चे

मी मायबोलीची नवीन सभासद आहे. मला प्रथमच ललित लेखन मध्ये लिहायचे आहे . ललित लेख ग्रुप मध्ये सामील झाले आहे. पण नवीन लेखन ला गेले कि लिखाणाची खिडकी दिसत नाही, कृपया मदत करा

तुमच्या 'माझे सदस्यत्व' या पानामध्ये, खाली ग्रूप मध्ये 'गुलमोहर ललित लेखन' वर क्लिक करा.
'हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन' हे पान उघडेल. तिथे उजवीकडे लेखनाचे विविध ऑप्शन्स दिसतील.
त्यातिल 'नविन लेखनाचा धागा' वर क्लिक करा.

नवीन लिखाण करता येत नाही.
नवीन लिखाण करा वर टिचकी मारली तर "नवीन लेखन करा" चे पान उघडते .
कृपया मार्गदर्शन करावे.

नमस्कार, मी मायबोलीवर तसा नवीन आहे (फार अ‍ॅक्टीव्ह नसल्यामुळे म्हणा). मला नवीन लेखन करायचे आहे. मी 'नवीन लेखन करा' वर गेलो तर तेथे वेगवेगळ्या विभागांची माहिती करून घ्या असे लिहिले आहे. त्यात मी 'हितगुज - विषयाप्रमाणे' वर गेलो तर तिथे भरमसाठ विषय आहेत. त्यात 'माहिती हवी आहे' वर गेलो, तर तिथे लिहिले आहे की 'कसली माहिती हवी आहे का? मग इथे विचारा'. पण मला त्यात पाहिजे तो विषय कसा शोधावा कळत नाही. आणि एखाद्या विषयावर कमेंट लिहिण्यापेक्षा मला नवीन लेखन करायचे आहे, तर तशी सोय नाही. एखाद्या ग्रुपचे सभासदत्व हवे असेल तर ते कसे मिळवावे ही माहिती देखिल नाही. मी पूर्वी १-२ ग्रूपचे सभासदत्व घेतले आहे, पण ते कसे ते आता सापडत नाही. त्या ग्रुप वर देखिल मला नवीन लेखन करण्याची सुविधा सापडत नाही. एकंदर स्ट्रक्चर इतके क्लिष्ट झाले आहे की माझ्यासारख्या नवीन सदस्याला नवीन लेखन करताच येऊ नये ही मायबोलीसाठी नामुष्की आहे!

Pages