गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१ ऑगस्टपासून गुलमोहराच्या लेखन पद्धतीत बदल करत आहोत. गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांचे स्वतंत्र ग्रूप्स तयार करण्यात येतील (उदा: गुलमोहर कथा, गुलमोहर गझल, गुलमोहर प्रकाशचित्र इत्यादी). ज्या प्रकारचे लेखन करायचे आहे त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रूपात सहभागी झाल्याबरोबर "नवीन लेखनाचा धागा" वापरून साहित्य लिहू शकता.

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही.

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

यासंदर्भात काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

प्रकार: 

लेखन सार्वजनीक असल्यास ग्रूपात असण्याची आवश्यकता नाही. पण ग्रूपात सहभागी असण्याचे काही फायदे आहेत. नवीन लेखनातील "माझ्यासाठी नवीन" दुव्यावर तुम्ही सहभागी असलेल्या ग्रूपातील लेखन तत्काळ दिसेल.

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम, Happy
आता कवितांचा त्रास होणा-यांच्या कमेंटस ऐकाव्या लागणार नाहीत बहुतेक Proud

आता कवितांचा त्रास होणा-यांच्या कमेंटस ऐकाव्या लागणार नाहीत बहुतेक
<<

मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. रतीब लागलेला असतो दरदिवशी अगदि.

(रोमातला मायबोलीकर) -रॉबीनहूड

मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. रतीब लागलेला असतो दरदिवशी अगदि. >>> +१

त्या पेक्षा एलदुगो परवडलं..

बेफ़िकीर,

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत.

चांगलं केलतं अ‍ॅडमीन , खरतरं खुप दिवसांपासुन ही मागणी होती.
मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. >>> + ००१

धन्यवाद अ‍ॅडमिन Happy

मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. रतीब लागलेला असतो दरदिवशी अगदि <<< ++ १०००

कविता आणि गझल चा रतीब असेल तर इतर काही संस्थळांप्रमाणे हवा तो प्रकार उघडण्याचा मेनूबार असणे गरजेचे वाटते. ज्याला जे आवडत नाही ते खूप खटकतं हा नियम आहे. मायबोली वर अनेक जण साहीत्यासाठी येतात. मी पण त्यातलाच एक. काही साहीत्यिक आवडते आहेतच. ललित, कथा काही वेळा कादंब-याही वाचलेल्या आहेत. थोडंसं लिहीलंही आहे. रोमातूनही वाचलेलें आहे पूर्वी. आजही अनेक जण वाचत असतील. हे साहीत्य सार्वजनिक करू नये असा निर्णय होत असल्यास त्याचं स्वागत झालंच पाहीजे.

मात्र त्यानंतर शिल्लक उरणा-या टीव्ही मालिकांवरच्या चर्चा आणि गप्पाटप्पा यासाठी सदस्यत्व ठेवण्यात विशेष रस असेल असं वाटत नाही.

Kiran..

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

>>"कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये.<<
+ इन्फिनिटी
कविता व गझलांच्या महापुरात 'मायबोली ' अगदी गटांगळ्या खात होती. कादंबर्‍या पाडणार्‍यांचा (सॉरी, लिहिणार्‍यांचा)देखील वेगळा ग्रूप करावा. त्यांनाही सार्वजनिक करण्याची मुभा देऊ नये. तेही सर्वजण आपापल्या कळपात सुखाने नांदोत.
त्यामुळे कवि, गझलकार व कादंबरीकार यांच्यावरही ' अरसिकेषु कवित्व ' निवेदन करण्याची वेळ येणार नाही. तेही खुष व्हावेत ही अपेक्षा.

मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. >>> ++१

अ‍ॅडमीन महोदय, नमस्कार

आपण माहिती दिलीत ती समजली, पटली व त्यासाठी धन्यवाद

मी खाली एक मुद्दा नमूद करत आहे. तो अस्थानी वाटू शकेल किंवा असेलही. पण तुमच्या विपूत यासाठी लिहीत नाही आहे की वर्कलोडमुळे आपण प्रत्येक शंकेचे निरसन करू शकत नसाल याची खात्री आहे. हा धागा अश्याच शंकांसाठी आहे असे गृहीत धरून येथेच (माझ्या कदाचित बाळबोध वाटणार्‍या - मी तुलनेने बराच नवीन असल्याने) शंका विचारण्याचे मनात येत आहे.

मायबोली हे स्थळ त्यावर प्रकाशित होत असणार्‍या (येथे दर्जा वा वारंवारता हे निकष मला अभिप्रेत नाहीत) साहित्यकृतींना संकेतस्थळावरील इतर धाग्यांच्या तुलनेत काय स्थान देते? काही सदस्य असेही असू शकतील ज्यांना वाहत्या पानांचे धागे वर येत असलेले आवडत नसतील. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक वाहत्या पानाचा ग्रूप नसावा).

मायबोली हे स्थळ जर जगभरच्या मराठी पाऊलखुणांसाठी आहे तर अशा पाऊलखुणांना वाहती पाने आणि सामाजीक धाग्यांपेक्षा साहित्यकृती (व त्यावरील चांगले अथवा मजेशीर / वादग्रस्त प्रतिसाद हेसुद्धा) अधिक जवळ आणतील असे मला वाटते. रोमातलेही वाचक ग्रूपमधील लेखन (सार्वजनिक न केल्यास) कसे वाचू शकतील?

हा प्रतिसाद वादाचा ट्रिगर भासत असल्यास हतबल आहे, पण मला (आपल्याशी नव्हे, एकंदरच सदस्यांशी) एक चांगला वाद (इन फॅक्ट संवाद) व्हावा असे मनापासून वाटत आहे.

गुलमोहरातील धागे (सार्वजनिक न केल्यास) नवीन लेखनात दिसणार नाहीत, तर मग दिसणार काय? गप्पांची पानेच दिसणार. इतर सर्व संकेतस्थळे त्यांच्या मुखपृष्ठावर व नवीन लेखनावर साहित्याला (दर्जा व वारंवारता निरपेक्ष) सर्वाधिक महत्वाचे स्थान देताना दिसतात. (खरे तर वाहती गप्पांची पाने मी इतर स्थळांवर पाहिलेली नाहीत, पण म्हणून मी त्यांचा विरोध करतो आहे असे मुळीच नाही). पण फोकस कशावर येणार? तर वाहती पाने आणि हितगुजमधील धागे यावर.

'हे प्रलंबीत झालेले होते व आता कार्यान्वीत होत आहे' हे कबूल. पण आज त्याची गरज का भासत आहे हे लक्षात येत नाही. (आपल्याला संबोधून आपल्या निर्णयप्रक्रियेबाबत असे काही विचारणे हा उद्धटपणा ठरेल याची जाणीव आहे, त्यासाठी क्षमस्व, पण मला ते विचारावेसेच वाटत आहे).

वर काही सदस्यांनी म्हंटल्याप्रमाणे आता गझल ग्रूप जॉईन केल्याशिवाय गझल दिसणार नाही हे त्यांच्यासाठी सुखद आहे. प्रत्येकाची अभिरुची सन्माननीय आहेच. पण साहित्यकृतीला विशिष्ट रसिकवर्गाची मर्यादा घालण्याचे प्रशासनाला का आवश्यक वाटले हे विचारू शकतो का? ज्याला रतीब असे संबोधण्यात आलेले आहे तो रतीब मायबोलीच्या तितक्याच जेन्युईन व पात्र सदस्यांकडून घातला जातो. हा 'रतीब' आहे असे समीतीने तर 'अ‍ॅकनॉलेज' केलेले नाही ना?

'सार्वजनिक करण्याची मुभा आहे' हे विधान पुरेसे वाटत नाही. सार्वजनिक करण्याची प्रोव्हिजन प्रदान करणे आणि आधी कुलूप लावणे यातून काय साध्य होईल हे समजले नाही. (यात काही तांत्रिक बाब असली, जसे लोड कमी होणे इत्यादी, तर माहीत नाही).

(अवांतर - बाकी गुलमोहरातील रतीबावर अनेक गप्पाटप्पा तग धरून असतात हेही खरेच, पण हे निव्वळ अवांतर आहे).

माझ्यापुरते:

ग्रूपमध्ये समाविष्ट होऊन मग लेखन सार्वजनिक करणे यात मला स्वारस्य नाही. (खरे तर मी इतकेच विधान करून गप्प बसणे योग्य होते, पण वाटले ते लिहिले. बदल स्वीकारत नाही असे नाही.)

अधिक उणे बोलले गेले असल्यास मनापासून माफी मागतो

-'बेफिकीर'!

मूळात कुठलेही लेखन सार्वजनिक असावे
कोणीही कुठल्याही क्षणी जसा वेळ मिळेल तसे तो वाचतो
मग ती गझल असो कविता असो कि आणखी कोणते लेखन. येथे तर त्या धाग्यवर क्लिक केल्यावर्च ओपन होते ना मग एवढे कोणते कष्ट पडुन राहीलेत लोकांना

मुळात "कविता" आणि "गझल" या ग्रुपमधील लेखनाला "सार्वजनिक करा" हा पर्याय ठेवूच नये, ज्यांना वाचायच्या असतील ते त्या ग्रुपचे सभासद होतील. >>> इथेच थांबू नये तर ह्या दोन्ही ठिकाणी फक्त 'निमंत्रणानेच' प्रवेश मिळावा, सर्वांचाच फायदा होईल.

लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गझलकार, कवी, साहीत्यिक मंडळींनी काही दिवस भूमिगत व्हावे. शिरच्छेदाच्या शिक्षेपर्यंत मामला जाईल असं दिसतंय.

गुलमोहरातील धागे (सार्वजनिक न केल्यास) नवीन लेखनात दिसणार नाहीत, तर मग दिसणार काय? गप्पांची पानेच दिसणार. इतर सर्व संकेतस्थळे त्यांच्या मुखपृष्ठावर व नवीन लेखनावर साहित्याला (दर्जा व वारंवारता निरपेक्ष) सर्वाधिक महत्वाचे स्थान देताना दिसतात.
<<

गप्पांची पाने वाहती असल्याकारणाने ती सतत अपडेट होत असतात व "नविन लेखन" मध्ये पहील्या पानावर दिसत रहातात. ह्या असल्या टाईमपास धाग्यांमुळे मायबोलीवर लिहले जाणारे दर्जेदार व चांगले लेखन पुष्कळदा दुसर्‍या-तिसर्‍या पानावर फेकले जाते.
टी.पी. करण्यासाठी आंतरजालवर अनेक दुसर्‍या सुविधा उपलब्ध आहेतच.

इथेच थांबू नये तर ह्या दोन्ही ठिकाणी फक्त 'निमंत्रणानेच' प्रवेश मिळावा, सर्वांचाच फायदा होईल.
<<

Proud

वरील काही पोस्ट्सवरून ’कविता’ आणि ’गझल’ या विभागांबद्दल नावड असल्याचे जाणवते. आवड/नावड या वैयक्तिक गोष्टी असल्या तरी एखाद्या विभागातले लेखन ’नवीन लेखन’ मध्ये दिसूच नये हे पटत नाही.
कारण एखाद्या विभागाची आवड नसणे (तसंच, काही कारणांस्तव नावड निर्माण होणे) हे समजण्यासारखं असलं तरी विशिष्ट विभागाला सार्वजनिकरीत्या ’बहिष्कृत’ दर्जाची वागणूक असावी अशी इच्छा बाळगणं संयुक्तिक वाटत नाही. मायबोली प्रशासन तसं कधीच करणार नाही याबद्दल खात्री आहे.

"ज्याला जे वाचायचंय ते तो शोधून वाचतच असतो. मग लिखाण ’नवीन लेखन’ मधे पहिल्या पानावर असो अथवा नसो." अशा प्रकारचं घासून गुळगुळीत झालेलं आणि बर्‍याच प्रमाणात अव्यावहारिक असलेलं विधान मी करणार नाही. त्या ऐवजी खालीलप्रमाणे काही बदल सुचवू इच्छितो :

(१) मायबोलीत केलं जाणारं कुठलंही लिखाण मुळात ’सार्वजनिक’ असावं, ते ’नवीन लेखन’ मधे दिसायलाच हवं परंतु जर विशिष्ट ग्रुपपुरतं ते मर्यादित ठेवण्याची लेखनकर्त्याची इच्छा असल्यास त्याला तसा पर्याय निवडू द्यावा. (लेखकाने हा पर्याय का निवडलाय हे जाणून घेणं माबो प्रशासनाला गरजेचं वाटल्यास, संबंधित लेखकाने त्याचं स्पष्टीकरण प्रशासनाला देणं बंधनकारक असावं.)

(२) ’नवीन लेखन’ या पानावरील एखाद्या लेखनाचे शीर्षक लांबलचक असल्यास ते सामावून घेण्यासाठी एकापेक्षा अधिक ओळी (Rows) खर्च होतात, आणि त्यामुळे ’नवीन लेखन’ मधील काही तपशील पुढच्या पानावर सरकतात. एका ठराविक लांबीपलिकडचे शीर्षक Truncate करून दर्शविले (display केले) जावे. यामुळे प्रत्येक पानात अधिक ओळी आणि त्यायोगे अधिक items राहू शकतील.
(column-width कमी जास्त करून truncated शीर्षक वाचण्याची सोय असावी.)

(३) ’नवीन लेखन’ या पानावरील ’शेवटचा प्रतिसाद’ या रकान्याचा (Column) फॉन्ट-साइज छोटा केल्यास प्रतिसादाची वेळ दर्शविण्यासाठी दुसरी ओळ खर्ची घालायची गरज पडणार नाही.

(४) ’नवीन लेखन’ मध्ये पुढील पाने पाहण्यासाठी ’१,२,३...शेवट’ असे पृष्ठ-क्रमांक देण्याऐवजी Vertical Scroll-bar ची सोय उपलब्ध केल्यास ’नवीन लेखन’ मधील अधिकाधिक तपशील सुलभतेने पाहता येतील.

(५) ’नवीन लेखन’ पानात मर्यादित स्वरूपात इच्छेनुरूप बदल (customize) करण्याची सोय उपलब्ध करून दिल्यास सभासदाला हवे असलेले विभाग स्वत:च्या ’नवीन लेखन’ मध्ये ठेवता येतील किंवा नको असलेले वगळता येतील. असे Customized ’नवीन लेखन’ पान सेव्ह करणे, संपादित करणे, त्यातील column-width कमी जास्त करणे इ. गोष्टी ओघाने आल्याच.

पहिल्या पानावर फक्त सर्व विभागांचीच नावे अन नवीन किती यांची फक्त संख्या आली तर? उदा कथा -२, कविता -१७, गप्पांची पाने -५, पाककला -४, लेख -२, प्रकाशचित्रे -६,.... असे काही? म्हणजे आपल्याला आवडणारा विभागच प्रत्येक जण उघडेल. मग त्या दुस-या पानावर त्या विभागाचे सर्व तपशील असतील, जसे आता पहिल्या पानावर आहेत.
यातून ज्याला जो विभाग आवडतो केवळ तोच विभाग पहावा लागेल Happy अन नवीन काय काय आले आहे हेही सर्वांना दिसत राहिल.
अर्थातच हे केवळ सुचवणे, अॅडमिन जे करतील ते सोईचेच असेल हा विश्वास आहेच Happy

पहिल्या पानावर फक्त सर्व विभागांचीच नावे अन नवीन किती यांची फक्त संख्या आली तर?<<<

उत्तम सुचवणी, आवडली

Pages