गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१ ऑगस्टपासून गुलमोहराच्या लेखन पद्धतीत बदल करत आहोत. गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांचे स्वतंत्र ग्रूप्स तयार करण्यात येतील (उदा: गुलमोहर कथा, गुलमोहर गझल, गुलमोहर प्रकाशचित्र इत्यादी). ज्या प्रकारचे लेखन करायचे आहे त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रूपात सहभागी झाल्याबरोबर "नवीन लेखनाचा धागा" वापरून साहित्य लिहू शकता.

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही.

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

यासंदर्भात काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

प्रकार: 

अ‍ॅडमिन-टीमने सुचवण्या मागितल्या आहेत, की निर्णय दिलेला आहे? Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. प्रत्यक्ष सुरूवात झाली की चटकन समजेल काय आणि कशा पद्धतीने हे काम करत आहे ते.

>> तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे.

याचा अर्थ मला असा दिसतो आहे... आता मायबोलीवरचं साहित्य लोकांना मायबोलीचं सदस्यत्व घेतल्याशिवाय आणि हव्या त्या ग्रुपमधे सामील झाल्याशिवाय वाचताच येणार नाही? (काही सार्वजनिक लेखन वगळता?)

बरोबर आहे का हे अ‍ॅडमिन?

नवीन लेखनामधे हे तीन भाग आधीच आहेत.
माझ्यासाठी नवीन
ग्रुपमध्ये नवीन
मायबोलीवर नवीन

मला वाटतेय कि गुलमोहर जे आधी तिन्ही मधे येत असे ते आता ज्याच्या त्याच्या subscription प्रमाणे येउ लागेल. त्यामूळे नवीन लेखन कोणाला दिसणारच नाही असे नाही. ह्याउलट ज्याचे subscription नसेल त्या group ची लिंक "मायबोलीवर नवीन" मधे दिसली तरी ते वाचायला त्या ग्रुपचे subscription घ्यावे लागेल. स्वागतार्ह बदल. बरोबर ना अ‍ॅडमिन ?

बेफिकीरजी,
खूप तळमळीने लिहिलंय तुम्ही. सर्वच मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.
स्वत:ला तुलनेने नवीन सभासद म्हणवून देखील केवळ वैयक्तिक विचार न करता तितक्याच आत्मीयतेने
’मायबोली’ चा विचार केला आहात, हे पाहून खूप बरं वाटलं.

'सार्वजनिक करण्याची मुभा आहे' हे विधान पुरेसे वाटत नाही. सार्वजनिक करण्याची प्रोव्हिजन प्रदान करणे आणि आधी कुलूप लावणे यातून काय साध्य होईल हे समजले नाही. >>>
माझ्याही मनात अशाच आशयाचा प्रश्न आहे, ज्याचं समर्पक उत्तर सापडलं नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुठलेही लेखन सार्वजनिक असावे >>> मुक्तेश्वर अनुमोदन.
मी देखील हा मुद्दा मांडला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवल,
तुमची सुचवणी विचार करण्यासारखी आहे.
असं केल्यास विशिष्ट लेखन थोडं शोधावं लागेल, कदाचित क्लिक्स वाढतील. वाढणार्‍या क्लिक्समुळे
जर मायबोलीचे Hits वाढत असतील तर ते चांगलंच आहे असं मला वाटतं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"याचा अर्थ मला असा दिसतो आहे... आता मायबोलीवरचं साहित्य लोकांना मायबोलीचं सदस्यत्व घेतल्याशिवाय आणि हव्या त्या ग्रुपमधे सामील झाल्याशिवाय वाचताच येणार नाही? (काही सार्वजनिक लेखन वगळता?)" >>>
चिमणजी, माझ्या मनातली शंका विचारलीत.
असं झाल्याने सभासदांव्यतिरिक्त जर कोणी मायबोलीचे वाचक असतील तर ’मायबोली’ अशा वाचकवर्गाला मुकणार की काय ??

>>गप्पांची पाने वाहती असल्याकारणाने ती सतत अपडेट होत असतात व "नविन लेखन" मध्ये पहील्या पानावर दिसत रहातात. ह्या असल्या टाईमपास धाग्यांमुळे मायबोलीवर लिहले जाणारे दर्जेदार व चांगले लेखन पुष्कळदा दुसर्‍या-तिसर्‍या पानावर फेकले जाते. <<
१००% सहमत
या 'गप्पिष्टां'ना देखील कवी, गझलकार, कादंबरीकार यांच्या प्रमाणे त्यांच्या त्यांच्या कळपात सुखाने नांदू द्यावे. त्यांच्या कलाकृती खर्‍या रसिकांपुढे मांडण्याचे भाग्य त्यांना लाभावे.

>>लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गझलकार, कवी, साहीत्यिक मंडळींनी काही दिवस भूमिगत व्हावे. शिरच्छेदाच्या शिक्षेपर्यंत मामला जाईल असं दिसतंय.<<

तशी ही निरुपद्रवी दरबारी मंडळी ! पहा. प्रशासनाशी किति आदब राखून संवाद साधतात ते.
'गिलोटिन' त्यांच्या वाट्याला येणार नाही.
'गिलोटिन' डिझर्विंग मंडळी केव्हांच नामशेष झाली.

मी भास्कर

केवळ गंमतीने उपहासात्मक पोस्ट टाकली होती. इथले गझलकार / कवी यांची कितीही टर उडवली तरीही त्यांनी आजवर ती ती घटना गंमत म्हणूनच स्विकारलेली आहे. रतीब / दर्जा याबद्दल थेट कवींशी बोलायची सोय आहे. त्यासाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध आहेच आहे. म्हणूनच या सीरीयस बाफवर अशा पोस्ट आल्यामुळे गंमतीने लिहावंसं वाटलं. कुणाला दुखावण्याचा हेतू अर्थातच नाही.

गप्पांचे धागे असावेत कि नसावेत, त्यांचा दर्जा काय याबद्दल कधीच मतप्रदर्शन करावेसे वाटलेले नाही. केलेले नाही. तो माझा अधिकारही नाही आणि इथे तो प्रश्नही नाही. पण गप्पांसाठी जी टॉक, बझ, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड - इन इ. इ. इ. हे सर्व कमी पडतंय असं दिसतंय.

एक भाबडा प्रश्न...
सदस्य न बनलेले असंख्य वाचकही असतील....त्यांचं काय?
नियमित वाचकांपैकी बर्‍याच जणांना आज ना उद्या सदस्य बनावंसं वाटूही शकेल....अशा वाचकांपासून लेखकांना आणि उलट....वंचित ठेवलं जाणार आहे काय....नव्या पद्धतीत?

गप्पांसाठी जी टॉक, बझ, फेसबुक, ट्विटर, लिंक्ड - इन इ. इ. इ. हे सर्व कमी पडतंय असं दिसतंय. >>>

किरण, मला वाटतं की माबोतील सभासद वरील सुविधांचा उपयोग करीत असले तरी
इथल्या गप्पांची सर तिथे येत नाही असा माझा अनुभव आहे. आणखीही अनेकांचा असेल.
त्यामुळे गप्पांची पानेही हवीतच. मायबोलीचं ते एक अविभाज्य अंग आहे.

फक्त गप्पांच्या पानावरील सदस्यांकडून इतर विभागांची;
किमान मायबोलीतर्फे केल्या जाणार्‍या 'गणेशोत्सव' 'दिवाळी अंक' 'ववि' इ.
उपक्रमांची तरी दखल घेतली गेली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत.

गप्पांची पाने हा विषय सियोग्यपणे चर्चिला जात असला तरी मला असे वाटते की तो इथे थोडा अस्थानी आहे.

प्रमोदरावांनी विचारलेलाच प्रश्न मी माझ्या दुसर्‍या प्रतिसादात विचारला. उल्हासरावांनीही नेमके मुद्दे काढले असे मला वाटते. तसेच, किरण यांचे एकंदर प्रतिसाद हे आम्हा तिघांच्या बाजूने आहेत असे मी समजतो

उकाका

एकमेकांच्या आवडींचा उल्लेख कुणीच करू नये हे सुचवण्याचा हा उद्देश होता. अर्थात हे सुचवण्यासाठी मी योग्य आयडी नसल्याने अस्पष्ट उल्लेख केला.

मलाही बेफिकिर जी आणि उल्हास काका ह्यांची मते पटली. त्यानी विचारलेले प्रश्न मलाही पडले. पण अर्थात असं एकंदरीत दिसतंय की बदल होण्याचे नक्की झालेले आहे आणि ह्या बाफ वर केवळ नोटिफाय केले जात आहे. थोडक्यात जे आहे ते तसे स्वीकारणे भाग आहे. पण उकाका आणि बेफिकीर ह्यांच्या प्रतिसादांवर अ‍ॅडमीन काय उत्तर देतात (ह्या बदला मागची त्यांची भुमिका व त्याचे स्पष्टीकरण) ते जाणून घ्यायला आवडेल.

अ‍ॅडमिनने बदल केला अन शेंडेंनी मोदी पोस्ट इथे टाकली. सार्वजनीक घागा म्हणूण Happy

असामी असे दिसते की त्या ग्रूप मध्ये जाऊनही (लिहिणार्‍याला त्या ग्रूपचे सदस्यत्व आवश्यक) लेखन सार्वजनीक केले की सगळेच वाचतील तसेच प्रतिक्रियाही देतील.
उदाहरणार्थ संयुक्ता मध्ये अखिल पुरूष वर्ग ब्यान आहे पण संयुक्ताने सार्वजनीक केले की सर्व पुरूष वर्ग प्रतिक्रिया देऊ व वाचू शकतो, तेच दिवाळी अंक, इतर अनेक उपक्रम ह्या संदर्भात देखील. थोडक्यात हे टेस्टेड आहे. सगळ्या लेखक-कवींनी अगदीच घाबरून जाण्याचे कारण नाही. Happy फक्त सदस्यत्वाच्या पहिल्याच दिवशी लेखकाला जर ग्रूप संकल्पना माहिती नसेल तर तो (नवीन लेखक) थोडा बावचळून जाण्याची शक्यता मात्र आहे. पण तो रुळल्यावर हे सर्व अंगवळणी पडेल (पडू शकते).

ह्या सर्व प्रकरणात जसे मायबोलीचे सदस्यत्व घेतल्याशिवाय लिहिता येत नाही, तसे आता त्या लेखकुला त्या त्या ग्रूपचे सदस्यत्व घेणे आवश्यक झाले आहे. तरच तो गुलमोहर विभागात लिहू शकतो. इतकेच.

दुसरा एक दृष्टीकोण असा की एखाद्या गझलकार / कवीला आपल्या रचने बद्दल फक्त लेखकू लोकात (हेल्दी) चर्चा व्हावी असे वाटत असेल तर ती रचना त्या ग्रुप पुरतीच प्रकाशीत करण्याची एक सोय ह्या बदलामुळे मिळेल व योग्य ती चर्चा होईल. अन्यथा आता सार्वजनीक असल्यामुळे नळावरील भांडणे सगळ्यांनाच वाचायला मिळतात. ह्या सोयीमुळे त्याची गरज भासणार नाही.

>>>>त्या लेखकुला त्या त्या ग्रूपचे सदस्यत्व घेणे आवश्यक झाले आहे. इतकेच.
केदार,हे केवळ लेखकाच्या बाबतीत असेल तर ठीक...पण वाचकाला प्रत्येक ठिकाणी सभासद व्हावे लागणे(प्रतिक्रिया द्यायची नसली तरी).... असल्यास... जाचक वाटतंय.

पण वाचकाला प्रत्येक ठिकाणी सभासद व्हावे लागणे(प्रतिक्रिया द्यायची नसली तरी).... असल्यास... जाचक वाटतंय. >>

नाही देव काका. अजिबात नाही. सार्वजनिक लेखनावर कोणीही (सदस्य असलेला) प्रतिक्रिया देऊ शकेल. उदा त्यामुळेच दिले. (संयुक्ता, दिवाळी अंक, उपक्रम इ इ)

बेफ़िकीर व उल्हास भिडे,

मी मूळ लेखात आणि प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे कुठलेही लेखन सार्वजनीक वाचनासाठी खुले असावे (सदस्य नसलेल्या वाचकांनाही) की नाही हा सर्वस्वी लेखकाचा अधिकार आहे. कुठल्याही ग्रुपातले सार्वजनिक लेखन ’नवीन लेखन’ या दुव्यावर दिसते आणि दिसत राहील.

त्याच दुव्यावर गेल्यावर ’माझ्यासाठी नवीन’ आणि ’ग्रूपमध्ये नवीन’ हे दुवे दिसतील. ही वाचकांसाठी जास्तीची सोय आहे. ज्यात त्यांना रस आहे त्याच ग्रुपातले लेखन दिसते.

थोडक्यात गुलमोहराचे विविध ग्रूप केल्याने वाचकांना आपण त्यांना काय वाचायचे आहे, ती सुविधा देत आहोत.

ग्रूप ही संकल्पना आपण मायबोलीवर सुरू केली ती लेखनाचे वर्गीकरण करण्यासाठी. आतापर्यंत अनेक ग्रुपात विविध विषयांवरचे लेखन झाले आहे आणि ते लेखकांच्या इच्छेनुसार सर्व वाचकांना वाचता येतात (काही ठरावीक ग्रूप आणि उपक्रम संयोजन ग्रूप सोडल्यास). तेव्हा साहित्यलेखन आता कुलुपबंद होत आहे असा गैरसमज असेल तर तो दूर व्हावा.

सध्याही लेखक गुलमोहरात लेखनप्रकार निवडून वर्गीकरण करत होते, ते आता ग्रुपात करतील. लेखन करण्यासाठी त्यांना फक्त योग्य त्या ग्रूपाचे सदस्यत्व घ्यावे लागेल. लेखन सार्वजनीक असल्याने वाचकांना प्रतिसाद देण्यासाठी सदस्यत्व घेण्याची आवश्यकता नाही. ग्रूप सदस्यांसाठी एक वाढीव सुविधा ही आहे की कुठल्याही मुद्द्यांवर फक्त ग्रूप सदस्यांनी चर्चा करावी असे वाटल्यास ती चर्चा आता ग्रूपपुरती मर्यादीत ठेवता येउ शकेल.

(४) ’नवीन लेखन’ मध्ये पुढील पाने पाहण्यासाठी ’१,२,३...शेवट’ असे पृष्ठ-क्रमांक देण्याऐवजी Vertical Scroll-bar ची सोय उपलब्ध केल्यास ’नवीन लेखन’ मधील अधिकाधिक तपशील सुलभतेने पाहता येतील.

>>>> भिडे +१. अतिशय सोईची सुचना.

खरंतर अ‍ॅडमिनने विचारल्या नाहीयेत तरी सगळेच सुचना करतायत Proud म्हणून मी ही करते :

* नविन लेखनाऐवजी, 'आजचे लेखन' असावे. असे एकत्र लेखन एका दिवसापुरतेच दिसेल, त्यानंतर ते त्या त्या ग्रूपमध्ये जाऊन वाचावे लागेल. यात हवे तर गद्य आणि पद्य असे दोन विभाग करता येतील.

* सर्व वाहती पाने (मग ती कोणत्याही गृपमधील असोत) बघण्याकरता एक वेगळी सोय हवी.

अ‍ॅडमीन महोदय, धन्यवाद प्रतिसादासाठी

मला जे समजले ते हे, की आपण लिहिले की ते सगळ्यांना दिसावे की नाही याचा निर्णय आपण घेऊ शकतो.

पण असा निर्णय घेता यावा, घेतला जावा अश्या प्रोव्हिजन्स देण्याचे कारण आपण असे म्हणत आहात (माझ्या समजुतीप्रमाणे) की मायबोलीचे लेखन ग्रूप स्वरुपात, कॅटेगरी स्वरुपात केले जाते.

एक बालीश शंका विचारत आहे. कृपया मोठ्या मनाने माफ करावे, जर या शंकेत काही विशेष नसले तर.

आत्ताच्या परिस्थितीत असे कोणतेही ऑप्शन लेखकाला / कवीला / गुलमोहरकराला ऑप्ट करावे लागत नाही. ते आता तो करू शकेल हे खरे, पण मुळात ते आत्ता करावेच लागत नाही. आता सगळ्यांनीच जर 'सार्वजनिक' असे ऑप्शन स्वीकारले, तर नेमका फरक काय पडला रचनेसंदर्भात?

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

अवल : गुलमोहर इथे तुम्हाला हवा तो व्ह्यू आहे.
असामी म्हणाला तसे :
माझ्यासाठी नवीन ग्रुपमध्ये नवीन आणि मायबोलीवर नवीन

हे पर्याय उपलब्ध आहेतच.

यातील पहिल्या दोन प्रकारच्या पानावर दिसणारे धागे , या बदलामुळे बदलतील.

बर्‍याचदा वाचक कविता, गझल वाचतो पण प्रतिसाद देत नाही
वाचावे तर वाटते पण प्रतिसाद नाही याला कारणही कंपुबाजी असते किंवा अजुन काही
तर यावर मला वाटते की एकदा तुम्ही लिखानावर क्लिक केले की ते तुम्ही वाचले आहे किवां वाचता आहात या अनुषंगाने (स्वतः नाही) जेवढ्यांनी क्लिक केले तेवढा आकडा दिसायला हवा, म्हणजे लिहीणार्‍यालाही आपले लिखान किती जण वाचतात हे कळेल (यात वाहते धागे गप्पाचे सोडुन). बाकी प्रतिसादाची सोय पुर्वीप्रमाणेच उत्तम आहे.
यातुन कुठल्याही लेखनाला नावे ठेवण्याची संधी राहणार नाही.

लेखन सार्वजनीक असल्याने वाचकांना प्रतिसाद देण्यासाठी सदस्यत्व घेण्याची आवश्यकता नाही. <<<

लेखन सार्वजनिक कुठे असणार आहे? (म्हणजे सार्वजनिक केल्याशिवाय?)

आणि 'प्रतिसाद देण्यासाठी सदस्यत्वाची गरज नाही' हेसुद्धा लेखन सार्वजनिक केले तरच नाही का बहुतेक!

अ‍ॅडमीन, आपली कारणमीमांसा तुटपुंजी आहे असे माझे मत आहे. जे आत्ता केले जात आहे ते प्रलंबीत होण्याचे काही फारसे कारणच नसावे असेही मला 'वाटत' आहे. हे आधी केव्हाही होऊ शकले असते असे वाटत आहे.

विमलाबाई गरवारेचा विद्यार्थी आहे. मग तो कितव्या यत्तेतला आणि अ तुकडीतला की फ तुकडीतला हे स्वतः अगदी विनासायास सांगू शकेल. फक्त आधी तो कोणत्या यत्तेतला आणि तुकडीतला होता हे विचारायची गरज भासत नव्हती.

(अ‍ॅडमीन 'टीम' चा धागा असून खुद्द अ‍ॅडमीन स्पष्टीकरणे देत आहेत, असे का हे समजले नाही, हे अवांतर)

मायबोलीचेच सदस्यत्व न घेणार्‍या वाचकांची अभिरुची काय आहे हे कसे पडताळण्यात आले असावे या कुतुहलात शमणारा बाहुला

-'बेफिकीर'!

माझी सर्वांना एक विनंती आहे.
कृपया हे बदल ४-६ आठवडे कसे वाटताहेत ते पहा, तेवढी कळ काढा. मला असे वाटते आहे की आपण काय परिणाम होतील यावर कल्पना करतो आहोत. आणि आपल्या सगळ्यांना मायबोली आपली वाटत असल्याने या बदलांबद्दल सांगावेसे वाटणारच.
कदाचित तुम्हाला वाटत असेल तितके वाईट परिणाम होणार नाहीत. कदाचित होतील. पाहुया !

(मला पहिल्यांदा आपण जुन्या मायबोलीवरून नवीन मायबोलीवर आलो तेंव्हाची चर्चा आठवते आहे. मायबोली आता मायबोली राहणार नाही याबद्दल तेंव्हाही भरपूर मते आली होती. किंवा मायबोलीवरच्या प्रत्येक मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर असे संवाद होतच असतात.)

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. आजपासून साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

नमस्कार अ‍ॅडमिन...

आज १ ऑगस्ट पासून 'गुलमोहर' विभागाचे रचना बदलली असल्याने तिथे लेख लिहिणे वा वाचणे काहीसे अडचणीचे झाले आहे असे वाटते. मी गुलमोहर विभागात 'गुरुदत्त' मालिकेतील दुसरा भाग आज प्रकाशित केला....'निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त' या शीर्षकाने. पण काही ओळखीच्या प्रतिसादकांनी मला लिहिले आहे की काहीना हा लेख दिसतो तर काहीना नाही. अर्थात ज्यानी लेख सापडत नाही असे कळविले त्याना 'लिंक' दिली आहेच.

काहीतरी तांत्रिक अडचण असावी का ?

अशोक पाटील

उल्हासजी भिडे,बेफिकीरजी यांच्याशी सहमत.मुक्त व्यासपीठावर कुणीच कुणाचा त्रास वाटून घ्यायचा नसतो. कप्प्याकप्प्यांचा त्रास त्याहून मोठा आहे.अनपेक्षित अन न ठरवता वाचनात येणारे काही वाचनानंद किती वाढवते हे आपण सर्वच जाणतो.

नवीन बदल लक्षात आला. गुलमोहर कविता, गुलमोहर ललितलेखन असे गृप्स पाडण्यात आले आहेत. एक लक्षात आलं नाही की गुलमोहर कविता, गझल वगैरे गृप्स जॉईन न करताही नवीन लेखनात दिसत आहेतच आणि गृप्स जॉईन न करताही त्यावर प्रतिसाद देता येतोय. हा बदल जर असाच अपेक्षित आहे/होता तर मग वरची बरीच जणं का कळवळतायत? नुसतं वर्गीकरण करण्याने काय नुकसान झालं?

अ‍ॅडमिन अमूक ग्रुपात "सामिल व्हा" हि लिंक पानाच्या वरच्या मायबोलीच्या लोगोखालील
" नवीन लेखन
हितगुज
गुलमोहर
लेखमालिका
रंगीबेरंगी
मायबोली विशेष
मदतपुस्तिका
" ह्या ओळीतील गुलमोहर (http://www.maayboli.com/gulmohar) ह्या लिंकवर क्लिक केल्यावर येणार्‍या पानामधिल दुव्यांमधे देता आले तर नॅव्हिगेशन सोपे होइल. आता तिथे वेगळे वर्गीकरण दिसत आहे.

सायो यांची पोस्ट वाचून त्यांना एकंदरच काही आकलन न झाल्याचे समजत आहे. असल्या शंकांना, अनुमोदनांना, स्मायलींना आणि पोष्टींना कोणी गंभीरपणे घेणार नाही.

(आणि स्वाती आंबोळे जे 'काही झालंच नाही' असे परवापासून म्हणत आहेत, तिथवर या सायोंचा प्रवास आज झाला याबद्दल त्यांचे अभिनंदनही)

Pages