गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१ ऑगस्टपासून गुलमोहराच्या लेखन पद्धतीत बदल करत आहोत. गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांचे स्वतंत्र ग्रूप्स तयार करण्यात येतील (उदा: गुलमोहर कथा, गुलमोहर गझल, गुलमोहर प्रकाशचित्र इत्यादी). ज्या प्रकारचे लेखन करायचे आहे त्या प्रकारच्या ग्रूपात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रूपात सहभागी झाल्याबरोबर "नवीन लेखनाचा धागा" वापरून साहित्य लिहू शकता.

आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता. ही सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही.

मायबोलीवर आपण लेखनाच्या वर्गिकरणासाठी ग्रूप्सची संकल्पना वापरतो. फक्त गुलमोहरमधील लेखन त्यातून बाहेर होतं, ते जुन्या हितगुजशी काही काळ साधर्म्य ठेवण्यासाठी. हा बदल बरेच दिवसांपासून प्रलंबीत होता. तो आता प्रत्यक्षात आणत आहोत

मायबोलीवर हवा तो लेखनपर्याय वाचण्यासाठी सुरुवातीपासूनच मेनु पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ग्रूप्सची संकल्पनाच त्यासाठी आहे जेणेकरून वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे. गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.

तसेच आपले लेखन सार्वजनीक असावे की नसावे हा सुरुवातीपासून लेखकाचाच निर्णय आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाही.

यासंदर्भात काही प्रश्न असल्यास इथे विचारू शकता.

गुलमोहरातील सर्व लेखन प्रकारांसाठी ग्रूप तयार केले आहेत. साहित्यलेखन करण्यासाठी हे ग्रूप वापरा.

कथा/कादंबरी
कविता
गझल
ललित लेख
विनोदी लेखन
बालसाहित्य
प्रकाशचित्रण

प्रकार: 

सायोसान्, कोंबडं झाकायला जे खुराडं आहे त्याच्या झडपाची चावी कोंबड्याकडेच.
आता कोंबड्याची मर्जी बाहेर येऊन केकाटायचं की आतच राहून.

अशोक पाटील, तुमच्या लिखाणात संपादनात जाउन सार्वजनिक करा वर टिक करा तुमचा लेख सर्वाना दिसेल.

हा बदल होण्याच्या आधी गुलमोहरात जे लिखाण केले आहे, ते लिखाण आपोआप ह्या अंतर्गत ग्रूप्स मधे समाविष्ट होईल की explicitly करावे लागेल? (ह्या प्रश्नावर आधी इथे चर्चा झाली असल्यास क्षमस्व! मी सगळे प्रतिसाद फॉलो केले नाहीयेत.)

थॅन्क्स चक्रम जी....तुमच्यासारखीच अशीच एक चांगली सूचना मला 'आम्ही कोल्हापुरी' बीबीवर मिळाली....त्यानुसार योग्य ती कार्यवाही लागलीच केली आहे.

मार्गदर्शनाबद्दल आभार.

सदर बदलांबद्दल वेबमास्टरांची पोस्ट वाचली. मुद्दे पटले.
४-६ आठवड्यांच्या अनुभवांनंतर माबो-प्रशासन जे काही निर्णय घेईल ते लेखक, वाचक, सभासद आणि सभासद नसलेले वाचक इ. सर्वांच्या दृष्टीकोनातून योग्यच असतील अशी अपेक्षा, आशा, खात्री बाळगतो.

फक्त एकच विनंती आहे :
’मराठी भाषा दिन’, 'गणेशोत्सव', ’दिवाळी अंक’, ’ववि’ इ. मायबोलीतर्फे चालविल्या जाणार्‍या उपक्रमांचे धागे मात्र ’सार्वजनिक’च असावेत. ते सर्वांना दिसत रहावेत, त्यासाठी ग्रुपचे सभासदत्व घेणे अनिवार्य नसावे; ज्यायोगे मायबोलीतर्फे चालविल्या जाणार्‍या उपक्रमांत सभासदांचा सहभाग वाढेल.
(माझ्या अनुभवानुसार ’गणेशोत्सव’ सारख्या ग्रुपचे सभासदत्व घ्यावे लागते.)
यात काही चूक असल्यास क्षमस्व.

हा बदल होण्याच्या आधी गुलमोहरात जे लिखाण केले आहे, ते लिखाण आपोआप ह्या अंतर्गत ग्रूप्स मधे समाविष्ट होईल की explicitly करावे लागेल? (ह्या प्रश्नावर आधी इथे चर्चा झाली असल्यास क्षमस्व! मी सगळे प्रतिसाद फॉलो केले नाहीयेत.)>> मुख्य पोस्टमधे हे म्हटलेले आहे
"सध्या गुलमोहराअंतर्गत असेलेले सर्व लेखन आहे तसेच राहील. त्यावर तुम्ही प्रतिसादही देऊ शकाल. कालांतराने सर्व जुने लेखन योग्य त्या ग्रूपात हलवण्यात येईल. त्या स्थलांतराची कालमर्यादा अजून निश्चीत नाही." ह्याचा अध्यार्हुत अर्थ ते by default सार्वजनिक असेल असा मी धरतोय.

नाही आवडला हा बदल.
गुलमोहर - विविध कला (चित्र/प्रकाशचित्र्/हस्तकला)>>>>>हे सगळं एकाच धाग्यात. Sad
आधीच्या गुलमोहर विभागाप्रमाणे चित्रकला, डिजिटल आर्ट,प्रकाशचित्र असे विविध विभाग नाही का करता येणार. जसे माझे दूर्गभ्रमण आणि प्रवासाचे वर्णन आहेत तसेच.

गुलमोहर आतापर्यंत यातून बाहेर होता, ते ही लेखन आता ग्रूपात आणत आहोत.>>>>>"गुलमोहर" टॅब आहे तसाच ठेवून त्यात हे वर्गीकरण करता येणार नाही का? हितगुज मध्ये इतकी मोठी लिस्ट आहे कि सगळं स्क्रोल करत शोधायला खुपच वेळ जातोय (निदान सध्यातरी ). Sad

>>>>गप्पांची पाने वाहती असल्याकारणाने ती सतत अपडेट होत असतात व "नविन लेखन" मध्ये पहील्या पानावर दिसत रहातात. ह्या असल्या टाईमपास धाग्यांमुळे मायबोलीवर लिहले जाणारे दर्जेदार व चांगले लेखन पुष्कळदा दुसर्‍या-तिसर्‍या पानावर फेकले जाते.
टी.पी. करण्यासाठी आंतरजालवर अनेक दुसर्‍या सुविधा उपलब्ध आहेतच.

इथेच थांबू नये तर ह्या दोन्ही ठिकाणी फक्त 'निमंत्रणानेच' प्रवेश मिळावा, सर्वांचाच फायदा होईल.

<<
सहमत

>>सायो यांची पोस्ट वाचून त्यांना एकंदरच काही आकलन न झाल्याचे समजत आहे. असल्या शंकांना, अनुमोदनांना, स्मायलींना आणि पोष्टींना कोणी गंभीरपणे घेणार नाही.
>>

तुम्हांला सांगितलंय कुणी गंभीरपणे घ्यायला? तुमच्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षाही नाही. माझा बदलांबद्दलचा समज वेगळा होता आणि तसा तो दिसत नाहीये अशा अर्थाचं वरचं पोस्ट होतं. मला काय आकलन झालंय आणि नाही ह्यात तुम्ही न पडलात तर उत्तम.

अवांतराबद्दल क्षमस्व.

तुम्हांला सांगितलंय कुणी गंभीरपणे घ्यायला? तुमच्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षाही नाही. माझा बदलांबद्दलचा समज वेगळा होता आणि तसा तो दिसत नाहीये अशा अर्थाचं वरचं पोस्ट होतं. मला काय आकलन झालंय आणि नाही ह्यात तुम्ही न पडलात तर उत्तम.

अवांतराबद्दल क्षमस्व.<<<< लगेच तुम्ही लोक लहान मुलीसारखे रडून टँप्लीज टँप्लीज असे का म्हणायला लागता सायो? कॅन यू नॉट ग्रो अप?

हितगुज मधे स्क्रॉल करताना वेळ लागतो >>>> +१

हितगुज प्रमाणेच गुलमोहर असा टॅब ठेवून हे नवे ग्रुप्स त्यामधे उपलब्ध करून देता येतील का याचा विचार व्हावा ही विनंती. >>>> अनुमोदन.

यातल्या तांत्रिक बाबी माहीत नसल्याने या सूचना त्या अनुषंगाने योग्य असतील तर संबंधितांनी त्याचा विचार करावा.

"गुलमोहर" टॅब आहे तसाच ठेवून त्यात हे वर्गीकरण करता येणार नाही का? >> हो ते बदल करणारच आहे.

आधीच्या गुलमोहर विभागाप्रमाणे चित्रकला, डिजिटल आर्ट,प्रकाशचित्र असे विविध विभाग नाही का करता येणार.>> बदल केला आहे. सध्याचा ग्रूप प्रकाशचित्रणाचा केला आहे. बाकी ग्रूप्स आज करण्यात येतील.

"गुलमोहर" टॅब आहे तसाच ठेवून त्यात हे वर्गीकरण करता येणार नाही का? >> हो ते बदल करणारच आहे.

आधीच्या गुलमोहर विभागाप्रमाणे चित्रकला, डिजिटल आर्ट,प्रकाशचित्र असे विविध विभाग नाही का करता येणार.>> बदल केला आहे. सध्याचा ग्रूप प्रकाशचित्रणाचा केला आहे. बाकी ग्रूप्स आज करण्यात येतील.
>>>>>>>धन्यवाद अ‍ॅडमिन!!!! Happy

धन्यवाद अ‍ॅडमिन.

फायदे हळूहळू लक्षात येऊ लागलेत :). विनोदी लेखन वर क्लिक केले असता फक्त विनोदी लेख पहायला मिळतात. वाचकासाठी सोपं आहे हे. गुलमोहर टॅब मधून शोधणं आणखीच सोपं झालंय. पण लिखाण करण्यासाठी गुलमोहर टॅब वरून ग्रुप्स निवडता येत नाहीत. त्यासाठी हितगुज स्क्रॉल करणे आवश्यक आहे.

तसंच गुलमोहर ललित असा ग्रुप जॉईन केल्यावर नवीन गप्पांचे पान, नवीन प्रश्न आणी पाककृती हे पर्याय उजव्या मेनूमधे येतात. कथा आणि कादंबरी मधे पण हेच मेनू येत असावेत का ? साहीत्यामधे गप्पांचे पान आणि पाककृती यांचा उपयोग कसा करण्यात येईल ?

लोला

तिथून क्लिक करायचं मग हितगुज मधे जायचं. हितगुज मधे गुलमोहर ललित शोधायचं असं सध्या करावं लागतंय. करून पहा.

>> पण लिखाण करण्यासाठी गुलमोहर टॅब वरून ग्रुप्स निवडता येत नाहीत. त्यासाठी हितगुज स्क्रॉल करणे आवश्यक आहे.

मी याबद्दल लिहिलंय. वरच्या लिंक्वर क्लिक करुन पहा. आणि पाककृती काय पार्ल्यातही टाकता येतात. अजून कोणी टाकल्या नाहीत एवढंच. Wink

याआधी नवीन लेखन करा मधे गुलमोहर हा ऑप्शन घेतला कि मर्यादीत मेनू होता. ते खूपच सोपं होतं. फक्त बदल/अडचण सांगितली. आणि ग्रुप शोधायला गुलमोहर वर क्लिक केल्यावर तो मर्यादीत स्वरुपात उपलब्ध व्हावा ही अपेक्षा ! Happy

प्रतिक्रियेबद्दल आभार.

वाचकांना ज्या विषयात रस आहे त्या ग्रूपाचे सदस्य घेऊन ते वाचता यावे.>>>>> म्हणजे नुसते मायबोली चे सभासदत्व असून चालणार नाही तर प्रत्येक ग्रुपचे घ्यावे लागेल काय ???

अ‍ॅडमिन अजुन एक सुचना Happy (ते काय आहे ना आम्हाला आधी मायबोलीची आणि आता गुलमोहराची इतकी सवय लागली आहे कि आमच्या ह्या मागण्या वाढतच आहे. :फिदी:)

जर शक्य असेल तर प्रत्येक गृपमध्ये ज्याने पोस्ट केली आहे त्याचे नाव डिस्प्ले व्हावे (आधीच्या गुलमोहरप्रमाणे).

उदा.
गुलमोहर - प्रकाशचित्रण
हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर) जिप्सी

>>>आता लेखनाच्या धाग्यालादेखील अपूर्ण स्थितीत ठेवता येईल. त्यामुळे नेहेमीप्रमाणे लेखन पूर्ण झाल्यावर लेखन प्रकाशीत करू शकता.<<< मला "ललित लेख "यात "अपूर्ण" हा पर्याय दिसत नाहीये Uhoh
तसेच ललित लेख यात वैचारिक लेख कसा काय टाकायचा?:अओ:
धन्यवाद .

जुन्या गुलमोहराप्रमाणे लेखन अप्रकाशीत ठेवण्याची सुविधा तात्पुरती तांत्रीक कारणासाठी बंद केली आहे. सुरू होताच कळवण्यात येईल.

मी कविता ग्रुपात सामिल होऊन एक परवा एक कविता टाकली होती. सार्वजनिक केली होती तरी गुलमोहरात दिसत नाहीये. काय करावं लागेल?

Pages