बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या काही मिनिटांत कश्यपने आक्रमकता कमी करत खेळाचा वेग सुंदर रीतीने कमी केला. ज्याचा फायदा सलग नऊ गुण मिळण्यात झाला. शेवटुन दुसर्‍या गुणाला उलटा मागे फिरत मारलेला बॅक हँड रीटर्न तर लाजवाब होता कश्यपचा. डोक शांत ठेवुन खेळला तर तीसरा गेम खिशात घालता येइल.

जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरी
तिथे जागतिक क्रमवारीत पहिला मलेशियाचा ली चाँग वे याच्याशी सामना असू शकतो.

अंतिम सोळामध्ये कश्यप, करुणारत्ने आणि ग्वाटेमालाचा कॉर्डन हेच बिगरमानांकित खेळाडू आहेत.

तौफिक हिदायत आणि लीन डान ची मॅच चालू आहे.. ती दाखवत नाहीयेत पण.. दोघेही जबरी प्लेअर्स आहेत.. दोघेही जागतिक क्रमवारीत पहिल्या नंबरला होते..

कश्यपची पुढची मॅच सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या नंबरवर असलेल्या स्पर्धका बरोबर होण्याची शक्यता आहे.

मयेकर डेंजर बातमी आहे ही.. पण जर खरंच तसं झालं तर निर्णय काय घेतील हेही महत्त्वाचे ठरेल.. त्या टीम्स कुठल्या आहेत ते लिहिलेले नाही पण..

Pages