बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स ! घेतला पहिला गेम.. कमॉन साईना.. !
गोपीचंद स्वतः कोर्टवर हजर असतो दोघांच्याही मॅचेसना.. भारीये..

धन्यवाद पराग, आधी डी.डी. वर पहात होतो मधेच टेनिस दाखवताहेत म्हणुन लिंक मागितली पण आता स्टार स्पोर्टस वर मिळाली मॅच. मस्त चालु आहे... हा सेट नेक टु नेक चाललाय.

जिंकली.. Proud लय भारी ! आता क्वार्टर फायनल.. !
क्रॉस कोर्ट स्मॅशेस सही मारले एकदम... !

कालची कश्यपची मॅच पाहिली. भारी झाली. तो एकदम शांत डोक्याने खेळतो.

सायना नेहवालची पहायला नाही मिळाली.

सायनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना डेन्मार्कच्या ३३ वर्षीय पाचवी मानांकित Tine Baun या डॅन्सिश खेळाडूशी आहे.(भारतीय वेळ सं. ६:३०) राउंड ऑफ १६ मधली तिची (जपानी?) प्रतिस्पर्धी निवृत्त झालेली दिसतेय. महिलांमध्ये एकच अपसेट झालेला दिसतोय. पुरुषांमध्येही कश्यप एकटाच अनसीडेड खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत आहे. (सामना रात्री ९:३०)

पुरुषांमध्ये कश्यपची मॅच नंबर एक सीडशी आहे... सलग १ ते ७ सीड आहेत क्वॉर्टर फायनलला.. फक्त कश्यप तेव्हढा सीडेड नाहीये..

साइना भारी खेळली... Happy
हार्ड लक कश्यप.. Sad तो मलेशियन नंबर १ ला साजेसा खेळला... योग्यवेळी योग्य बदल ़केले खेळात..
दोघांनीही स्मॅश अफलातून मारले आणी उचलले पण.. ़़कश्यपने स्लो केलेला गेम नंतर फास्ट का केला नाही कि करता आला नाही माहित नाही...
विमेन सेमीजला साईना बरोबर तीन चिंक्या...

साइना मस्तच खेळली.

विमेन सेमीजला साईना बरोबर तीन चिंक्या... >>

पुरुष गटात पण असेच चित्र असेल. ली चोंग वे बरोबर ३ चिंके

कश्यप मस्त खेळला. बोरिस बेकरची आठवण करून दिली. त्याचे जास्त स्मॅशेस अनरिटर्नेबल होते आणि त्याने आणखी स्मॅशेस मारण्याच्या संधी शोधल्या असत्या तर... असे वाटले. श्वास रोखून बघाव्या अश्या अनेक रॅलीज झाल्या.
सायना मस्तच खेळली. ऑलिंपिक आणि ऑल इंग्लंड ओपन यांत ती आतापर्यंत क्वार्टर फायनलच्या पुढे जाऊ शकली नव्हती. ते ओझे उतरले. बायका वयाच्या पस्तिशीत खेळताना आणि टॉपला दिसतात म्हणजे सायनाला आणखी १०-१२ वर्षे तरी खेळताना बघायला मिळावे.
सायनाच्या सामन्याच्या वेळी 'इंडिया इंडिया'च्या घोषाने प्रेक्षागार दणाणले होते. त्यातली थोडी मंडळी कश्यपच्या मॅचच्या वेळी आली असती तर तो जिंकलाही असता!

मला उलट भारतीय प्रेक्षकांचं (चीअरींगसाठी असलं तरीही) ओरडणं आवडत नाही. त्यामुळे खेळाडूच्या एकाग्रतेवर परिणाम होत असेल असं वाटतं.

कश्यपचा सामना बघितला मी काल. दुसर्‍या सेटमधे त्याने पॉईंट शब्दश: बहाल केले त्या मलेशियनाला... पहिल्या सेटमधे जरातरी झुंज दिली त्याने, पण दुसर्‍या सेटमधे कमबॅक करूच शकला नाही कश्यप.
त्याचे ड्रॉप शॉट्स जबरी आहेत.

एक मात्र आहे, की सायना आणि कश्यप दोघेही थंड डोक्याने खेळतात. उगाच आक्रस्ताळेपणा नाही खेळात, प्रेक्षक म्हणून त्यांचा खेळ बघताना एकदम मस्त वाटतं.

त्या चिंक्यांचे काय झाले? त्या मुद्दाम हरल्या असं ऐकलं/ वाचलं कुठेतरी... जरा तपशीलात लिहा प्लिज कोणीतरी.

इथे आहे सविस्तर
http://www.indianexpress.com/news/shuttlecockgate/982700/0
बाद फेरीत विशिष्ट प्रतिस्पर्धी टाळण्यासाठी त्या हरल्या . कोरियन आणि इंडोनेशियन जोड्या तर एकमेकांविरुद्ध हरण्याचा प्रयत्न करीत होत्या!
सामने चालू असताना प्रेक्षकांनी हुर्यो उडविली अणि पदाधिकार्‍यांनी समजही दिली.
हे सगळे राउंड रॉबिन फॉर्मेटमुळे होते इति विजय अमृतराज. सरळ नॉक आउट राउंड हवेत.

गेल्या १-२ ऑलिम्पीक मध्ये, काही खेळांमध्ये एकदा उपान्त्य फेरी गाठलि की पदक निश्चिती होती. आता काय नियम आहेत?
सायना आत उपान्त्य फेरीत पोचली आहे. सध्या तिचा खेळात लागलेला एकंदर सुर बघता सुवर्ण पदक मिळवण्याची शक्यता खूप जास्त वाटते आहे..तसंच होवो.

Pages