बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रात्री ज्वाला व अश्विनी च्या जोडीची चायनीज तायपेइच्या जोडीची मॅच जबरदस्त झाली. एक रॅली तर तब्बल ४५ शॉट्स पर्यंत चालली. http://timesofindia.indiatimes.com/sports/london-olympics-2012/news/Jwal... तायपेयीची जोडी जागतीक क्रमवारीत १०वी आहे व ज्वाला-अश्विनी बर्‍याच मागे २० व्या नं. वर असून ही त्यांनी हा विजय मिळवला. सामन्याच धावतं समालोचन करणाराने सांगीतल की अश्विनी व ज्वाला ही जगात सर्वात जोरदार स्मॅश मारणारी महिला जोडी आहे. अश्विनी २४५ किमी/तास व ज्वाला २४४ किमी/तास वेगाने स्मॅश मारतात.सामना बघतांना हे प्रकर्षान जाणवत ही होत.

जाता जाता : अ‍ॅटिट्यूड दाखवण हे तस म्हटलतर चूकच पण विजीगीषू वृत्ती ने (मराठीत किलर इन्स्टिंक्ट ने Happy ) खेळत ज्वाला सारखे भारतीय खेळाडू अ‍ॅटिट्यूड दाखवतात हे बघून मला आनंद होतो. Happy मेडल तेवढ जिंकून आणा!!

आजची मिश्र दुहेरी पराभूत मनाने खेळतायत अस वाटतय का?
काही काही शक्य असलेले फटके हुकवतायत...बाहेर मारतायत.

saina nehawal olympics 2012 असं काही गूगलवर शोधा, कदाचित यूट्युबवर लिंक मिळतील.>>>>> काल रात्री पर्यंत तरी गुगलवर मिळाली नाही कोणतीच लिंक म्हणुनच इथे विचारल.

मस्त माहिती Happy
आमचं बॅडमिंटन खेळणं म्हणजे जास्तीतजास्त वेळ फूल हवेत ठेऊन खेळ रंगवणं Lol पण हे खरे बॅडमिंटन नव्हे ह्याची जाणीव आहे आणि मॅच अटीतटीचीच बघायला मजा येते Happy

मिश्र दुहेरीत पुढच्या फेरीत जाण्याची शक्यता शून्य आहे त्यामुळे असेल कदाचित...

पण महिला एकेरी, पुरुष एकेरी नक्की पुढची फेरी आणि महिला दुहेरीत जिंकल्यास पुढची फेरी...

अ‍ॅटिट्यूड दाखवण हे तस म्हटलतर चूकच पण विजीगीषू वृत्ती ने (मराठीत किलर इन्स्टिंक्ट ने ) खेळत ज्वाला सारखे भारतीय खेळाडू अ‍ॅटिट्यूड दाखवतात हे बघून मला आनंद होतो. >> किलर इन्स्टिंक्टवाला अ‍ॅटिट्यूड असेल तर मला पण आनंदच होतो. पण तिचा नखरेल अ‍ॅटिट्यूड वाटतो (माझं मत) Happy

मेडल तेवढ जिंकून आणा!!>> हे महत्त्वाचं >> अगदी...
ही भारतातर्फे ऑलिंपिकला पात्र ठरलेली आजपर्यंतची पहिली महिला जोडी आहे. हेही नसे थोडके...

आज दोघींनी खूप मस्त खेळ केला आणि सिंगापूरच्या जोडीला सहज हरवलं आणि पुढची फेरी गाठली.

आज दोघींनी खूप मस्त खेळ केला आणि सिंगापूरच्या जोडीला सहज हरवलं आणि पुढची फेरी गाठली....>>> मनीष,पुढची फेरी नाही गाठली रे.. त्यांना दुसर्‍या गेममध्ये ११ च्या गुणफरकाने विजय मिळाला असता तर त्या क्वार्टरमध्ये पोहोचल्या असत्या पण त्या दुसरा गेम २१-१५ ने जिंकल्या आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलय.

ज्वालाकडे अ‍ॅटिट्युड आहे आणि तो ती लपवून ठेवत नाही. बास. गांगुली, पेससुद्धा हेच करतात. मला नाही खटकले. सध्या तिचा फॉर्म तितका चांगला नसावा. दोन वर्षांपूर्वी गाडी भरधाव होती.
आज सायनाचा राउंड ऑफ १६ मधला सामना नेदरलंड्सच्या खेळाडूशी (याओ जी वय ३५) आहे. कश्यपचा सामना श्रीलंकन खेळाडूशी आहे.
टेटे आणि बॅडमिंटनमध्ये चीनी वंशाचे अनेक खेळाडू निरनिराळ्या देशांकडून खेळताना दिसतात.

आज दोघींनी खूप मस्त खेळ केला आणि सिंगापूरच्या जोडीला सहज हरवलं आणि पुढची फेरी गाठली....>>>

१३ गुणान्चा फरक हवा होता, तो ११ चाच झाला Sad

१-०

२-१

कश्यप एक्साइट झाला आणि श्रीलंकन खेळाडू जोशात आला. शेवटी चांगली फाइट दिली पण. पहिल्या गेमच्या सुरुवातीलाही कश्यप १-५ ने मागे होता.

Pages