बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच समजावून सांगितलत, खूप धन्यवाद! आता जेव्हां लेकी सोबत तिच्या बॅडमिंटन प्रॅक्टिससाठी जाऊन बसेन तेंव्हा बरच समजेल. ( इतके दिवस मी नुसता अंदाज बांधत होते आता नक्की काय ते समजले :स्मित:)

वॉव.. ही पण मस्त माहिती.. गूज च्या डाव्या पंखापासून शटलकॉक बनवतात.. इंटरेस्टिंग !!
रुणू.. Lol

मस्त माहिती.
स्वतः खेळलेल्या मोजक्या खेळांतला एक. पूर्वी प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिसवर पॉइंट मिळत नसे. आधी त्याचे सर्व्हिस ब्रेक करावी लागे , मग स्वतःच्या सर्व्हिसवर पॉइंट मिळवता येई. आता कुणाच्याही सर्व्हिसवर पॉइंट मिळत असल्याने खेळ वेगवान झाला आहे.

पोलंड-जपान मिश्र दुहेरी मॅच दाखवत होते. शेजारच्याच कोर्टवर ज्वाला-दिजू इंडोनिशियाच्या विरुध्द खेळत होते. माझं तिकडेच जास्त लक्ष होतं. स्कोअर कळला नाही, पण आपली टीम हरली.

पोलंड-जपानमधे पोलंड जिंकलं.

पोलंड, जपान, इंडोनेशिया तीनही देशाच्या स्त्री-पुरूष खेळाडूंचे वेष एकसारखे होते (टीम-युनिफॉर्म) पण ज्वाला आणि दिजू यांनी पूर्णपणे निराळे कपडे घातले होते. हे मला जरा विचित्रच वाटलं. आणि खटकलंही.

ज्वाला- दिजू मोठ्या फरकाने हरलेत. ग्रुपमधले उरलेले दोन्ही सामने जिंकून ते पुढल्या फेरीत पोहोचू शकतात.
पी कश्यप ग्रुप स्टेजचा पहिला सामना जिंकलेला दिसतोय.
आज महिला दुहेरीत ज्वाला-अश्विनी यांचा सामना आहे.

ज्वाला-डिजूचा सामना बघितला मी काल. पहिल्यापासूनच दोघांनाही सूर गवसला नव्हताच. त्यातल्या त्यात दुसर्‍या सेटमधे बर्‍यापैकी प्रतिकार केला दोघांनी. पण ज्वालाची पंचांबरोबर काहीतरी बाचाबाची झाली. डिजू खेळतोय आणि ही कोर्टवर मधेच उभी राहून पंचांशी बोलतेय असं काहीतरी विचित्र दृश्य बघायला मिळालं काल Uhoh

लले, दोघांनीही ग्रे रंगाचा टिशर्ट आणि काळी शॉर्टस् घातली होती की.. २१-१२, २१-१६ असे हरले.

हो.

साईनानं दुसरी मॅचपण सहज जिंकली. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा १-१ बरोबरीत आहेत. त्यांना ही मॅच जिंकलीच पाहिजे. ती ज्वाला केवढा अ‍ॅटिट्यूड दाखवती. खेळापेक्षा नखरेच जास्त..

काल ज्वाला आणि अश्विनी जिंकल्या... पुढची अजून एक मॅच जिंकली तर पुढच्या फेरीत जायची शक्यता आहे..

कमॉन कश्यप...

पहिले २ गुण तर जिंकले आहेत..

जिंकला.. Proud !! लय भारी.. !

कश्यपने स्मॅश कमी मारले त्यामानाने.. पण मारले ते एकदम हुकमी ! रॅलीज मस्त झाल्या एकदम.

विनार्च, saina nehawal olympics 2012 असं काही गूगलवर शोधा, कदाचित यूट्युबवर लिंक मिळतील.

Pages