बॅडमिंटन

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 03:14

- ९ दिवस, १७२ खेळाडू, ५ सुवर्ण पदके

- ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटनचा समावेश १९९२ साली झालेल्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये प्रथम केला गेला.

- ऑलिम्पिक मध्ये वापरले जाणारे फुल बनविण्यासाठी लागणारी पिसे गूज पक्ष्याच्या डाव्या पंखाची असतात.

- १३.४ मीटर लांबीच्या मैदानात मध्यभागी जाळी लावलेली असते.

- दुहेरीच्या सामान्यांना पूर्ण मैदान वापरले जाते तर एकेरीच्या वेळेस आतील बाजूस असलेली रेष वापरली जाते.

- वापरण्यात येणार्‍या फुलास १६ पाकळ्या असतात आणि ते प्रचंड वेगात जाऊ शकते. ४०० किमी प्रति तास इतकाही वेग हे फुल गाठू शकते.

- मुख्य उद्देश जाळीच्या पलीकडे फुल मारून प्रतिस्पर्धी ते परत आपल्याकडे मारू शकणार नाही हे साध्य करण्याचा असतो.

- प्रतिस्पर्धी फुल परतवू न शकल्यास १ गुण मिळतो.

- मारलेले फुल जाळीत आडकल्यास किंवा मैदानाच्या बाहेर गेल्यास गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो.

- प्रत्येक गुण सर्व्हिस करून सुरु होतो. सर्व्हिस करणार्‍या खेळाडूने गुण गमावल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू पुढच्या गुणाची सुरुवात करतो.

- प्रत्येक सामना तीन गेम्सचा असतो. २१ गुण आधी मिळवणारा खेळाडू तो गेम जिंकतो. २ कमीतकमी गुणांच्या फरकाने गेम जिंकणे आवश्यक आहे. २९ - २९ अशी बरोबरी झाल्यास पुढचा गुण मिळवणारा खेळाडू गेम जिंकतो.

- पदकांसाठी एकूण पाच स्पर्धा आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी.

- एकेरी आणि दुहेरी साठी स्पर्धकांचे गट केले जातात. प्रत्येक खेळाडू गटातील सर्व खेळाडूविरुद्ध एक सामना खेळतो.

- १६ गटांतील विजेती बाद फेरीत जातात.दुहेरीत ८ सर्वोत्तम जोड्या बाद फेरीत जातात.

- बाद फेरीत सामना हरल्यास स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.

- बाद फेरीतील पहिले चार स्पर्धक आणि चार जोड्या उपांत्य फेरीत खेळतात. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत खेळतात तर पराभूत स्पर्धक कांस्य पदकासाठी सामना खेळतात.

स्पर्धक -

चीनचे वर्चस्व ह्या खेळात आहे. पण त्यांना इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरियामधील स्पर्धकांचे तगडे आव्हान आहे. तसे भारतातील खेळाडूंचेही आव्हान आहे.

लीन डान हा चीनचा पुरुष खेळाडू संभाव्य विजेता आहे. भारतात तर्फे सायना नेहवाल, पी.कश्यप हे एकेरीत तर अश्विनी पोनाप्पा - ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू - ज्वाला गुट्टा ह्या जोड्या दुहेरीत आहेत. एखाद्या पदकाची अपेक्षा नक्कीच भारताला ठेवता येईल.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/50...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे... थोडक्यात रडीचा डाव खेळल्या चिंक्या. नॉक आऊट सिस्टीमच पाहिजे अश्या मोठ्या स्पर्धांसाठी.

काही ठराविक स्पर्धांत अजूनही सेमीला पोहोचल्यावर कांस्य पदक नक्की होते.. पण बॅडमिंटन, टेबलटेनिस, टेनिस ह्या स्पर्धांत तसे नाही.. कांस्य पदकासाठी मॅच खेळावीच लागते... बॉक्सिंग मध्ये सेमीला पोहोचल्यावर कांस्य नक्कीच मिळतं...

मयेकर... राउंड रॉबिन योग्य पध्दतीत अ‍ॅरेंज केल्यास असे होत नाही... फूटबॉलच्या सगळ्या स्पर्धा राऊंड रॉबिनच असतात पण त्यात राऊंड रॉबिनच्या एका गटातल्या शेवटच्या मॅचेस एकाच दिवशी एकाच वेळेस असतात.. त्यामुळे मुद्दाम वाईट खेळून हारायचे वगैरे प्रकार कधी घडत नाहीत.. आणि हे बॅडमिंटन मध्ये पण सहज करणे शक्य आहे..

ज्या जोड्यांची हकालपट्टी झाली हे, ते गेल्यानंतर उरलेल्यांचा काय स्टेटस आहे? थोडक्यात, आपल्या ज्वाला-अश्विनीला काही चान्स आहे का आता? परत मॅचेस घेणारेत का?

साईनाची मॅच फारच भारी झाली. मस्त डिफेन्ड केलं तिने.

ज्वाला-अश्विनीला नाही चान्स. त्यांनी केलेलं अपिल फेटाळलं गेलं. ज्वाला-अश्विनीचा आणि हकालपट्टी झालेल्या जोड्यांचा काही संबंध नव्हता. Happy

ज्या ग्रुप्समधल्या जोड्या बाद झाल्या त्या ग्रुप्समधल्या दुसर्‍या संघाला चान्स मिळाला . ज्वालाचे जपान्यांबद्दलचे अपील मान्य न झाल्याने त्यांना चान्स नाही.

ओह बर.

दुपारी भेटू इथेच साईनाबरोबर, साईनासाठी Happy
चिन्यांनी २ पदकं तर निश्चित केलीच :प टेटे मध्येही दोघे चिनीच होते! Uhoh

डायव्हिंन, टेटे आणि बॅडमिंटन ही चिन्यांची मक्तेदारी असलेल्या स्पर्धा आहेत.. तिथे त्यांना धक्का देणे कोणालाच सहज शक्य होत नाही.. अर्थात पुरुष बॅडमिंटन मध्ये पीटर गेड, तौफिक हिदायत, कालचा कश्यप विरुद्धचा ली असे काही आहेतच...

कश्यपची पहिल्या गेम मधली लढत जबरी होती.. ती गेम त्याने जिंकली असती तर कदाचित अजून टफ मॅच बघायला मिळाली असती... नंबर १ च्या विरुद्ध १९ पर्यंत गुण मिळवणे ही सुद्धा कौतुकाचीच गोष्ट आहे.. कारण समोरचा खेळाडू जबरीच फॉर्ममध्ये होता.. दुसर्‍या गेम मध्ये त्यानी बरोबर फॉर्म दाखवून दिला.. अर्थात त्यातही कश्यपला १० पेक्षा जास्त गुण मिळाले...

दुसरीकडे मिश्र दुहेरीत पण दोन्ही चीनी जोड्याच फायलन मध्ये आहेत पण दोन्ही जोड्यांना उपांत्य फेरीत चांगलेच कष्ट घ्यावे लागलेत...

महिला एकेरी मध्ये इंडोनेशियाच्या १८ वर्षीय मुलीने चीनच्या नंबर २ खेळाडूला दिलेली लढत पण जबरी होती.. दुसर्‍या गेम मध्ये तिचा अनुभव कमी पडला आणि मॅच हातातून निसटली..

भान, इथे लाईव स्कोअरची लिंक देईन मॅच चालू झाली की, प्रत्यक्ष खेळ बघायला नाहीच मिळणार आम्हालाही, पण निदान लाईव स्कोर बघितल्याचं तरी समाधान. Happy

.

६-१२ ने मागे.. Sad
रॅल्या खूप मोठ्या होत आहेत बहूतेक.. स्कोर अपडेट व्हायला बराच वेळा लागतोय कारण

Pages