निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागुताई रेन शॉवर ट्री झकासच आहे , आमच्याकडे पण फुललाय पण माझा प्रचिग्राहक गेलाय भटकायला Happy

आजचे निरीक्षण
१) बहाव्याची काही फुले गर्द पिवळ्या रंगाची तर काही फिकट पिवळ्या रंगाची झाली आहेत त्यामुळे त्या झाडांना नैसर्गिक आभा प्राप्त झाली आहे.
२) गुलमोहर पुर्ण भरात आला आहे काही ठिकाणी लालेलाल तर काही ठिकाणी भगवा केसरी टोप घालुन मिरवतो आहे.
३) तामणाचा बहर ओसरु लागलाय, जांभळी गुलाबी फुले हळुहळु फिकट होत चालली आहेत.

जागू, मस्तच फुले.

उजू, हे झाड तसे कॉमन आहे पण पावसाळ्याच्या सुरवातीला फुलते, म्हणुन लक्षात येत नसावे.

राणीच्या बागेत, अस्वलाच्या पिंजर्‍याजवळ आहे. कोल्हापूरला महावीर उद्यानात आहे.

http://www.evivek.com/back_issues.html इथे सा.विवेक चे जुनेअंक दिसतात त्या पैकी दिवाळी अंकाच्या खाली ०१, ०२, ०३, ०४, ०५ असे पीडीएफ डाउन्लोड करणारे दुवे दिसतात. त्यापैकी ०२ क्रमांकाच्या दुव्यात (पान ४१ पासून पुढे) गिरीश प्रभुणे यांचा " वृक्षवल्ली आम्हा सोयरी " हा लेख सगळ्या निसर्गप्रेमीना आवडावा असा आहे. (दिवाळी अंका ची एक सरळ लिंक नसल्यान इतक डिट्टेलवार लिहाव लागल.)

शोभा, सेम पिंच ... मागच्या आठवड्यात मी ही फुलं बघितली - भाज्याला, आणि नंतर मुळशी परिसरातही. मस्त वास आहे या फुलांना. कसली फुलं आहेत ही?

जागू, मस्त दिसतोय ग रेनशॉवर ट्री !
शांकली दुर्गभ्रमणमधले काही उतारे तू ईथे टाक ना ! म्हणजे आम्हालाही वाचायला मिळतील.

बाप्रे आठव्या भागाचं नववं पान ... किती मागे आहे मी जगाच्या!+१
किती वाचू आणि किती पाहू....असं होतं ईथे आल्यावर.
परवाच माझा मुलगा(वय ३.५) शाळेतून (शाळेतर्फे) मातृदिना निमीत्त माझ्यासाठी एक छोटसं रोप घेऊन आला. यापेक्षा सुंदर भेट ती काय!!
plant.jpeg

माहिती आणि सुंदर फोटो बद्दल सर्वांना धन्यवाद.
white1.jpgwhite.jpg

गौरी, आत्ताच फ्लॉवर्स ऑफ इंडियावर बघितले; तू दिलेल्या फुलाचे नाव भुरुंडी असे आहे. त्याचे बोटॅनिकल नाव Heliotropium indicum आहे. फारच सुंदर रचना आहे त्या फुलांची.

मस्त भेट गौरी..

जगाच्या बरोबर राहायचा एक प्रयत्न...:)
अवांतर -- सगळीच फुलं/फोटू मस्तच आहेत....:)

शशांक, मला खात्री होती इथे फोटो टाकल्यावर नाव मिळणार म्हणून!
नितिन, परीची छत्री नाव मला फारच आवडलंय! (फक्त ते तुम्ही ऐवजी तू म्हटलेलं पळेल :))
बी, वेका, प्रज्ञा, आभार!
वर लिहिताना मी जरा गोंधळ केलाय. ही भुरुंडी मला कार्ल्याला दिसली. आणि ते मस्त वास होता म्हटलंय ते पांढर्‍या फुलांच्या गुच्छाविषयी. शोभाच्या फोटोत पांढरी फुलं आहेत ना याच पानावर वरती, त्यांना मस्त वास असतो. ती मला मुळशीला आणि भाज्याला दिसली होती.
गुलमोहोराचे रंग काय सुरेख आहेत! sonalisl नी टाकलेली फुलं पण मस्त!
जागुताई, ते रेन शॉवर ट्री कॅशियासारखंच दिसतं का साधारण?

गौरी, ते छत्रीच्या दांड्यासारखं दिसतेय ते (किंवा तसेच ) फूल असलेले झाड, माझ्या आजोळी विंचवाच्या दंशावर वापरतात. लाईक किल्स लाईक, हे तत्व वापरले असणार बहुदा.
आजकालच्या कॅमेरांच्या कृपेने, अगदी लहान फुलांतले सौंदर्य पण नीट दिसते..

बीबीसी (आलो मूळपदावर) च्या इन्व्हीजीबल वर्ल्ड मधे अशा अफलातून प्रतिमा आहेत. रंगांची, प्रकाशाची, आकारांची विस्मयकारक दुनिया आहे ती.

BBC Invisible World III 2010 या नावाने सर्च करा.

दिनेशदा, जास्वंदीच्या परागांचे बारकावे काय सुंदर टिपले आहेत! कॅमेर्‍याची किमया!

विकीपिडियावर म्हटलं आहे की फिलिपाईन्समध्ये हे झाड जखमांवर लावतात ... http://en.wikipedia.org/wiki/Heliotropium_indicum.
देशी रानफुल आहे म्हणजे त्याचा आपल्याकडे काहीतरी उपयोग असणरच ... नास्ति मूलम् अनौषधम् Happy

मी काही दिवसांपूर्वी प्रथमच जलपर्णीची फुलं जवळून बघितली. ही जलपर्णी आहे हे माहित नसतं तर बहुधा मी या फुलांच्या प्रेमातच पडले असते!

jalaparni.jpg

गौरी, दिनेशदा, सोनाली छान प्रची.

शशांक ह्यांनी गुगलल्याप्रमाणे मी दिलेल्या फुलाचे नाव थोडे वेगळे आहे. आत्ता मी फ्लॉवर्स ऑफ इंडीयावर पाहीले. धन्स शशांक.
Common name: Coral Shower Tree, Pink shower tree, Horse cassia, stinking-toe
Botanical name: Cassia grandis Family: Caesalpiniaceae (Gulmohar family)

म्हणजे त्याचे नाव पिंक शॉवर ट्री असे आहे. हे मला आयुष रेसॉर्ट मध्ये सापडले.

वाव् किती माहिती..

जागु त्या शॉवर ट्रीबद्दल धन्यवाद. माझ्या कॉलेजम्ध्ये हे झाड होते आणि जूनमध्ये अगदी बहराला असायचे. मला तेव्हा नाव माहित नव्हते आणि नंतर मी त्याला कॅशिया समजायला लागले. पण कॅशिया कसा घोसांनी लोंबतो तसे हे नसते तर याची पुर्ण फांदीच फुलांनी भरलेली असते.

माझी एक मैत्रिण मला या झाडाबद्दल असे सांगायची की तिच्या भावाच्या कॉलेजात हे होते आणि कॉलेजच्या सुरवातीला मुले याच्या फुलांनी डवरलेल्या फांद्या तोडुन एकमेकांना पुष्पगुच्छ म्हणुन देत. अर्थात माझ्या कॉलेजमधले झाड दोन मजली उंच असल्याने फांद्या तोडता येणे अशक्य.\

दिनेश, मला नाव माहित नाही.

आत्ता सकाळी ऑफीसला येताना एका तारेवर एक पक्षी बघितला. डोके, पोट पांढरे, बाकदार चोच, कबर्‍या/राखाडी रंगाचे पंख, शरीराच्या ठेवणीवरुन शिकारी पक्षी असावा. दुर्दैवाने कंपनीच्या गाडीतुन येत असल्यामुळे जवळ कॅमेरा असुन सुद्धा त्याला कॅमेरात कैद करु शकलो नाही.

पिंक शॉवर ट्री, भुरुंडी, गुलमोहर मस्तच. भुरुंडी लहानपणी खूप बघितलय पण त्याचे सौंदर्य ह्या फोटोनेच जाणवले. त्याच्या पानामुळे जराशी खाज येते म्हणून खेळताना ते उपटूनच टाकले जायचे. गौरी, फुलाच्या प्रेमात पडायला त्याचे नाव का आड यावे? तूच लिहिलं आहेस ना - नास्ति मूलम् अनौषधम्. त्यामुळे सुंदरच आहे जलपर्णी. जमल्यास त्याच्या केसराचा कोजअप घेऊन इथे देशील का? खूप दुंदर दिसताहेत ते.

दिनेश, खूपच सुंदर फोटो आलाय जास्वंदीचा.

वा.. सगळेच प्रचि मस्त..

गौरीच्या परीची छत्री पहिल्यांदा पाहिली तेव्हा एखाद्या अळीने डोक्यात फुलं घातल्यासारखं वाटत होतं Uhoh

माधव, जलपर्णी आपल्याकडे शोभिवंत झाड म्हणून आली. पण ही अतिशय आक्रमक वनस्पती आहे ... आणि आता तिने कितीतरी नद्या, नाले, तलाव व्यापून तिथली मूळ इकोसिस्टीम धोक्यात आणली आहे, ना, म्हणून तिच्या प्रेमात पडणं धोक्याचं वाटतं मला.

माझ्याजवळ या फुलांचा अजून चांगला फोटो नाही. (हा सुद्धा काढता आला कारण आमची पेडलबोट रस्ता चुकून जलपर्णीमध्ये घुसली. Happy पण जालावर इथे एक मस्त फोटो सापडला: http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/7/77/Pond_Water_Hyacinth_F...

जागूतै, त्या कोरल शॉवर ट्री सारखी दिसणारी फुलं मला पुण्यात पाषाणला डी आर डी ओ च्या हद्दीत बघितल्यासारखी वाटताहेत.

गौरी परीची छत्री आणि जलपर्णी मस्तच.
दिनेशदा, सोनाली, शोभा छान प्रचि. दिनेशदा आम्ही लहानपणी भातुकली खेळताना दाण्याच्या कूटात गुळ घालून वाटीत ते चांगल मिक्स करून ठेवत असू, नंतर जरा वेळाने ते एका ताटलीत वाटी उपडि करून काढत असू.त्याला केक बनवून अगदी झोकात कट करून खायचो पण. त्या आमच्या केकवर डेकोरेशनचे काम ह्या बिचार्या जास्वंदिच्या परांगांनी किती वेळा बिनबोभाट केले आहे त्याची गणतीच नाही.तुम्ही टाकलेला फोटो बघून आमच्या लहानपणीचा ऊद्योग आठवला.
जागु, पिंक रेन शॉवर ट्री बघायला आयुष रिसॉट्ला भेट द्यायला पाहिजे.

आणि आता तिने कितीतरी नद्या, नाले, तलाव व्यापून तिथली मूळ इकोसिस्टीम धोक्यात आणली आहे, >> ही खूप फैलावणारी वनस्पती आहे खरी. मानवाच्या अतिक्रमणापुढे टिकायला इतर सजिवांनी अवलंबलेला हा मार्ग तर नाही? आकाशात कबुतरे आणि पाण्यात जलपर्णी.

Pages