दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावपुर्वक श्रध्दांजली.
Sad
Jomsom Airport जगातील खतरनाक airfields पैकी एक.

Sad तरूणी सचदेव..
काल सकाळ मधे वाचलं.. कि तीच्या आईने "तरूणी" नाव कसं ठेवलं असेल ना?

माझा अतिशय जिवलग मित्र , इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोनिक विषयातील मास्टर असलेला आमचा परम-मित्र समीर गांधी याचा नुकताच अकाली हार्ट -एटेक ने मृत्यू झाला, वयाच्या ४२ व्या वर्षी ,३ लहान मुले आणि पत्नी यांना वाऱ्यावर सोडून तो निघून गेला,
खरोखर विश्वासच बसत नाही, मी इंजिनियरिंग केलेले असले तरी प्रात्यक्षिक आणि इंडस्ट्री- बेस्ड नॉलेज त्याच्या मुळेच मिळाले ,शिपिंग इलेक्ट्रिकल मधील त्याचा अनुभव आणि अधिकार फार मोठं होतां ,भारती शिपयार्ड मध्ये तो सिनियर सुपरवायझर होता,,
तरुण वयात ड्रिंक आणि स्मोक च्या अतिरेकापायी एक उमलता संसार उद्ध्वस्त झाला,,खरच त्याच्या घरी सांत्वना साठी जायचा ही धीर होत नाहीये

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, साने गुरुजींचे सहकारी प्रकाश मोहाडीकर यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. वृद्धावस्थेतही ते कार्यरत होते. आकाशवाणी मुंबईच्या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमात ते यावर्षीच स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी सांगायला आल्याचे आठवते.
पुणे विद्यापीठाने पी एच डी करण्यासाठी वयाची अट शिथील केल्यावर वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी पीएचडी करिता आपले नाव नोंदविले होते.

मंदार तुमच्या मित्राच्या अत्म्यास शांती लाभो. तुम्ही जाऊन मित्राच्या घरातल्यांना धीर दया.

प्रकाश मोहडीककर ह्यांना श्रद्धांजली.

मंदार तुमच्या मित्राला श्रद्धांजली. Sad
प्रकाश मोहडीककर ह्यांना श्रद्धांजली. Sad

मंदार
तुझ्या मित्राबद्दल वाचून वाईट वाटलं. माझी श्रद्धांजली.

प्रकाश मोहाडीकर आणि वामनराव पै यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! Sad

ईश्वर त्यान्च्या आत्म्याला शान्ती देवो......... त्यान्ची विश्व प्रार्थना खरोखर मार्गदर्शक आहे..... मी अनुभवले आहे......

हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आंनंदात, ऎश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

सदगुरू वामनराव पै यांना विनम्र अभिवादन !!

Sad

सध्याच्या चमत्कारी बापु-बाबा-बुवांपेक्षा वेगळं व्यक्तीमत्व !वामनराव पै गेल्याचे वाचुन वाईट वाटले. Sad

आदरांजली 'वामनराव पै' यांना

Sad

त्यांचे सर्वत्र लिहिले गेलेले विचार फार वंदनीय होते

२ दिवसांपूर्वी येरवडा येथील तब्बल २७ जण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात ठार झाले. यात ५-६ कुटुंबातील प्रत्येकी ४-५ जणांचा समावेश आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांचा समावेश आहे. टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने पंक्चर झालेले चाक बदलण्यासाठी गाडी व्यवस्थित कडेच्या सर्व्हिस लेनमध्ये लावली होती. परंतु एका अत्यंत भरधाव ट्रकने धडक देऊन २७ जणांचा जागेवरच बळी घेतला. ही बातमी वाचून अत्यंत वाईट वाटले. सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Angry

भारतात सर्वसामान्यांच्या जीवाला किंमत येणार तरी कधी?

सदगुरू वामनराव पै यांना भावपुर्ण आदरांजली !
>>सध्याच्या चमत्कारी बापु-बाबा-बुवांपेक्षा वेगळं व्यक्तीमत्व
अनुमोदन

Pages