निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्र..

जागु ने अगदी मध्यरात्री काढलेलं दिसतय नवीन पान (झाडांची पानं-फुलं रात्रीची काढता येत नाहीत म्हणुन की काय?) Wink

शशांक, जो मस्त प्रचि..

जिप्सी, ते दुसर्‍या चित्रावर माझी प्रतिक्षिप्त क्रिया अशी होती, पानावर तो डोळा असल्यासारखं वाटतय.. पण फिरुन निट पाहिल्यावर कळलं की तो डोळाच आहे.. सापच आहे ना तो? Sad वाघोबा मस्तय Happy

सुप्रभात.
आज संकष्टी म्हणून बाप्पाचे आवडते फुल.

शशांक, जो-एस छान प्रची.

योगेश मस्त कोलाज आहे. तुझ एक कोलाज अजुन मी बाकी ठेवल आहे पुढच्या महिन्यासाठी कारण ते तेंव्हा अगदी सुट होईल.

माधव सब्जा एकदम गगनाला भिडलाय.

अगा वृक्षासी पाताळी | जळ सापडे मुळी | ते शाखांचिये बाहाळी | बाहेरी दिसे ||१८०||
का भूमीचे मार्दव | सांगे कोंभाची लवलव | नाना आचारगौरव | सुकुलीनांचे ||१८१|| ज्ञानेश्वरी अ. १३. श्लो. ५, ६

एखाद्या वृक्षाला खोल जमिनीखालील पाणी मिळाले आहे हे कसे समजते तर त्याच्या हिरव्यागार बहरलेल्या फांद्यांवरुन.
तसेच एखादी भूमी किती उत्तम प्रतीची आहे हे तिथे उगवलेले कसदार धान्य (कोवळे लुसलुशीत गवत, वगैरे) यावरुन समजते - तसेच सुकुलीन कोण हे त्याच्या वागण्या-बोलण्यावरुन (आचारावरुन) समजते.

शशांकजी सुंदर उतारा.

मी त्या दिवशी घरी जाऊन ज्ञानेश्वरी काढली पण माझ्याकडील ज्ञानेश्वरीत मराठी भाषांतर नाही. त्यामुळे ती श्लोकांप्रमाणे वाचावी लागते. मराठी भाषांतराची ज्ञानेश्वरी मिळेल का ?

मराठी भाषांतराची ज्ञानेश्वरी मिळेल का ?

मिळते की.. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आणि तुकारामगाथा दोन्ही आहेत Happy अजुन वाचले मात्र काहीही नाही.

साधने इथे कॅमेर्‍याला कोणाकडे काम असते ?

ओके मग मी पहिला लायब्ररीत बघते मिळते का नाहीतर काकांना दादरच्या आयडीयल मधुन आणायला सांगते.

जिप्सी वाघ कुठे भेटला?>>>>साधने, विसरलीस का महाराष्ट्र नेचर पार्क गटग? Wink

अरे यार.. तेरे फोटू की जादू.. मै तो इस्को खराच समझी.....

अगं पंकजच्या धाकट्या भावाच्या कॉलेजात दोन्ही वेळेला काहीतरी फाल्तु कार्यक्रम होते, एकदा डोम्बलाचा टाय डे आणि यावेळी सेंडॉफ. हा उगीचच पोरींवर शायनिंग मारायला कॅमेरा घेऊन जातो आणि काढत बसतो फोटो...

आजचे 'ओळखा पाहू':

ही फुले अगदी नखाएवढी होती. मुद्दाम लावलेले झुडुप नसावे पण फुलांचा रंग आणि नक्षी बघितल्यावर फोटो न काढणे अशक्य होते.

जागू - साखरेमहाराजांची, पूजनीय सोनोपंत दांडेकरांची तसेच श्री. जोशी यांची सुबोध ज्ञानेश्वरी अशा अनेक उपलब्ध आहेत - त्यातील जी रुचेल, भावेल ती घेणे - पण मूळ ज्ञानेश्वरीची गोडी काही औरच. काही शब्द खूपच जुने असल्याने त्यांचा अर्थ आजच्या काळात कळणे कठीण, पण ते अर्थ कळले तर मूळ ज्ञानेश्वरी फार म्हणजे फारच गोड आहे. न कळता वाचत गेलो तरीही माऊलींच्या कृपेनेच हळूहळू अर्थ समजायला लागेल..... अनेक विद्वानांनी त्यातील सौंदर्यस्थळे, उपमा, दृष्टांत यावर लिहिले आहे - ते वाचूनही थोडेफार समजू शकेल..... प्रयत्न करीत रहाणे, खूप ओढ/तळमळ लागली तर माऊली काही ना काही सोय करेलच करेल.....

मस्तच फुले आहेत.. बाकी कॅमे-याने काहीही करता येते. नखाएवढी वस्तुही मोठ्ठी करता येते..

ह्या फुलांची जातकुळी ओळखीची वाटतेय. मॉर्निग ग्लोरीची फुले लागायची पद्धतही अशीच असते. कोणीतरी सांगा ह्याचे नाव..

फर्गेट मी नॉट मधील कुठलेतरी असावे - Cynoglossum या जीनसमधील.....
पान, पूर्ण झाड/ झुडुप्/वेल, लांबून कशी दिसतात - असे जरा फोटोसेशन केल्यास ओळखता येईल असे वाटते - नुसते फुल / फळ / पान पाहून ओळखणे हे बहुतेक दिनेशदा / शांकली / अन्य जाणकारांनाच शक्य होईल - ये अपने बस की बात नही है.......

सुस्वागतम् बंडोपंत - अंगण आहे, त्यात कंदफुले आहेत, ती तुम्ही पाहून आनंदित होताय या कितीतरी एकापेक्षा एक चांगल्या, सुखावणार्‍या गोष्टी आहेत......... (कॅमेरा नसला तर कुठे बिघडले.... वैयक्तिक मत..)

माधव फुलांची पाने पोपटी रंगाची आहेत का ?

शशांक तुम्ही अस लिहील्याने मला आता मुळ ज्ञानेश्वरीच वाचाविशी वाटते. तुमच्यावर फार प्रभाव पडलेला दिसतोय ज्ञानेश्वरीचा हे तुमच्या लिखाणातूनच कळत.

शशांक अगदी खर. कॅमेरा नाही तेच चांगल कारण फोटो चांगल्या काढण्याच्या फंदात आपण नैसर्गिक नैत्रसुख कमी घेतो अस मलाही वाटू लागल आहे. पण फोटो नाही काढले तर आपण ह्या गोष्टी शेयरही नाही करू शकत. म्हणून हल्ली मी आधी भरभरून नेत्र सुख घेते मग फोटो काढते वेळ असेल तेंव्हा.

सर्वांचे फोटो सुंदरच!.
शशांक अगदी खर. कॅमेरा नाही तेच चांगल कारण फोटो चांगल्या काढण्याच्या फंदात आपण नैसर्गिक नैत्रसुख कमी घेतो अस मलाही वाटू लागल आहे.>>>>>>>>जागू, १००% सहमत. माझही असच होतं. मग लक्षात येत, अरेरे ते नीट पहाताच आल नाही. Uhoh
पण फोटो नाही काढले तर आपण ह्या गोष्टी शेयरही नाही करू शकत.>>>>>>>>>१०० मोदक. Happy

Pages