टेनीस

Submitted by admin on 14 May, 2008 - 23:49
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश भूपती -लिएंडर पेस यांनी मियामी ओपन -दुहेरीत अजिंक्यपद पटकावलंय.
आता लीहेश टीम रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी येतील.

राफाने फेडीला २ सेट्स मध्ये गुंडाळले?
आता सामना जोकोव्हिचशी. जोकोने २०११ मध्ये एकही सामना गमावलेला नाही.

आज दुपारी मॅच थोडावेळ पाहिली जोको आणि राफाची.. जोको एकदम जोरदार खेळत होता.. भारी क्रॉसकोर्ट मारले..
जोको २०११ मध्ये एकही मॅच हरलेला नाहिये आत्तापर्यंत.. आणि आता राफाबरोबर चुरस पण आहे नंबर १ साठी..

पराग होरे.. मी पाहीली आजची सगळी मॅच.. जाको मस्तच खेळला पण तरीही रोलँड गॅरसवर राफाला हरवणे सोपे जाणार नाही कोणालाच..

भरत.. परवा राफाने फेडररचा उडवलेला धुव्वा बघताना खुप यातना होत होत्या रे.. मी २-३ वर्षापुर्वी याच बीबीवर लिहीले होते की जोपर्यंत फेडरर असा सब्लाइम फॉर्ममधे खेळत आहे तोपर्यंत जस्ट सिट बॅक... अँड एंजॉय द राइड... लूक्स लाइक दॅट राइड इज अबाउट टु गेट ओव्हर..:(

होपफुली त्याच्यातल्या आणी राफातल्या अजुन काही रोमहर्षक लढती या वर्षी आपल्याला फ्रेंच ओपन व विंबल्डनमधे बघायला मिळतील... आय अ‍ॅम गोइंग टु मिस हिम अ‍ॅंड हिज डिव्हाइन गेम ऑफ टेनिस टेरीबली..:(

क्ले कोर्टचा मोसम सुरू झालाय. काल माद्रिद ओपनची सेमि फायनल राफाने फेडरर विरुद्ध ५-७,६-१,६-३ अशी जिंकली. सामना चुरशीचा झाला. दोघांचेही बहुतेक सगळे गेम ड्युसपर्यंत, बरेच ब्रेक पॉइंटपर्यंत गेले. पहिल्या सेटमध्ये फेडररने ०-२,२-४ अशी पिछाडी घेत विजय मिळवला. पण त्याचे डाउन द लाइन पासिंग शॉट्स चुकत होते. राफाचा फायनलमधे सामना जोकोविचशी

हे मागवा आणि वाचा.. ऑगस्टात येणारे ! मी मागवणार !>>फोटोमुळे मी hardcover काहीतरि वेगळेच वाचले. Lol ... मजा येईल वाचायला.

तुझं वाचून झालं की मला पाठव Happy

रच्याकने, यु एस ओपन गटगचं काय झालं मंडळी ? तिकिट्स बूक केलीत का कुणी ?

सिंडी.. हो नक्की Happy

युएस ओपन गटग ला मला नाही जमणार ह्या वर्षी.. तुम्ही करून घ्या.. आम्ही आत्ताच जाऊन आलो न्यू यॉर्कला त्यामुळे सप्टेंबरात परत नाही येणार..

अर्रर्र.... फेडेक्स वर काय ही वेळ आलीये... मरेही त्याच्या पुढे... हे म्हणजे वॉझ्नियाकी कशी काही न करता पहिल्या नंबरवर होती तसच काहीसं होणार आहे..

वर्ल्ड टूर फायनल्स पहाताय का कोणी?
फेडररने गटातले तीनही सामने जिंकलेत. राफाला एका सेटमध्ये ६-० असे लोळवलेय. कॅलेंडरची डझनापेक्षा जास्त पाने मागे गेल्यासारखा खेळतोय फेडरर. त्सोंगानेही राफाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
दुसर्‍या गटात फरेरने जोको आणि मरेला धूळ चारलीय.

बरेच दिवसांनी लाडक्या राफाच्या कौतुकाची संधी मिळालीय.
(आधी मरे आणि मग फेडरर कडून सपाटून मार खाल्ला त्याने.)
गेल्या रविवारी डेव्हिस कपच्या फायनल्समधला(स्पेन वि अर्जेंटिना) राफा वि डेल पोट्रो हा सामना बघितला. पहिल्या सेटमध्ये १-६ अशी माती खाल्ल्यावर राफा, तेरा जादू चला गया की काय असे वाटायला लागले. पण जिंकला, ४सेट्स मध्ये. प्रत्येक सेट अटीतटीचा. सर्व्हिस ब्रेक लरूनही लीड न टिकवणे मग पुन्हा हातघाईची लढाई. चौथा सेट टायब्रेक ७-० राफा.
सामने स्पेनमध्ये चालले होते तरी अर्जेंटिनात आहोत की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती प्रेक्षागारात होती. पेट्रोला प्रेक्षकांना वारंवार शांतता राखा असे तर राफाला ओरडा जरा, गप काय बसलात असे आवाहन करावे लागत होते.
सामना जिंकल्यावर आपल्या टीममेट्सनी मारलेल्या मिठ्यांची साखळी तोडून राफाने अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडू व सपोर्ट टीमला आलिंगन देऊन त्यांचे सांत्वन केले. गुणाचा आमचा पोर Happy

राफाने सलग आठवे माँटे कार्लो मास्टर्स विजेतेपद जिंकताना, जोकोविरुद्धच्या सलग सात पराजयांची मालिका खंडित केली. हुश्श!

असू द्या हो .. त्याआधी आमच्याने तुमच्याला कानडी (म्हणजे कॅनडी) बेकल (आपलं बेकन) दिलं .. फिट्टंफाट ..

(आमचा घोडा तसाही फारच फिका पडायला लागलाय एकूण .. उसासा!)

त्याआधी आमच्याने तुमच्याला कानडी (म्हणजे कॅनडी) बेकल (आपलं बेकन) दिलं .. >> घड्याळाचे काय झाले ? लोलाने उचलले का ? Lol

नाही हो, आम्ही भारतीय संस्कृती ला उच्च मानून शेवटपर्यंत साथ देऊ .. (भले मनातल्या मनात दुसरा नविन आपलासा करू, पण अशी उघड उघड प्रतारणा? कभी नही! :फिदी:)

Pages