Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता:
सध्या तरी मल्टिस्पाईस.
46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052
****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमी प्रमाणेच माझे मेगागटग
नेहमी प्रमाणेच माझे मेगागटग हुकले...
फारेंडा नामांकित व्हिलनच्या
फारेंडा
नामांकित व्हिलनच्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकवण्यात यावा "तुम यहॉ आ तो गये अपनी मर्जी से, लेकिन जाओगे हमारी मर्जी से" >>> मायबोलीवरच्या काही आयड्यांच्या आवाजात हा संवाद मला ऐकू आला
गटग मस्तच झालं. अनेक
गटग मस्तच झालं. अनेक आयड्यांना नव्याने भेटले (तेही मला नव्यानेच भेटले म्हणा..) पण उशीर झाल्याने काही जणांची भेट झाली नाही. लिम्बीने माझ्यासाठी एक तांदुळाचे पॅकेट आवर्जून राखून ठेवले होते - त्याचा भात केल्यावर १-२ दिवसात रिपोर्ट दिला जाईल. लिम्बीला मनापासून धन्यवाद
'अन्नासाठी दाहि दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा' (जगदीश हा माबोकर नव्हे. तो परमेश्वराचा एक ड्युआय आहे) अशी अवस्था येतीये का काय असा विचार हार्वेस्ट क्लबमधे जागा नाही या सुवार्तेनंतर तिथल्या पार्किंगमधल्या हॉटेलशोध चर्चेच्या वेळी माझ्या मनाला चाटून गेला. पण कलिंगाने शेवटी कृपा केली.
तुडुंब जेवण आणि तुडुंब मांचुरियन ही खरोखरच या गटगची दोन महत्वाची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
फारेण्डा, तुझा वॄ सहीच झालाय. त्या हाक्का नूडल्स मला तुझं पान सोडून दिसल्याच नाहीत. आणि सोलकढी कुणी ऑर्डर केलेली रे? बहुतेकांना मिळाली नाही त्याबद्दल निषेध.
रामा, मी कशी असेन अशी तुझी अपेक्षा होती
अॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे आहेत (असं वाटलं). आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते. बच्चेकंपनी अत्यंत गुणी आहे, अजिबात कटकट केली नाही. त्यांच्या आई-बाबा, काका/मामा, मावश्या यांचे आवाज इतके जबरद्स्त होते की त्यांनी ती केली असती तरी ऐकायला आली नसती म्हणा
आशू महान आहे. तिने तेवढ्यातल्या तेवढ्यात किडे करून ती गजांतलक्ष्मी काचेच्या आत आडवी पाडून दाखवली.
मी स्वत:ची खुर्ची सोडून फारशी हिंडाहिंडी न केल्यामुळे माझ्या नजरेच्या टप्प्यातल्या गोष्टी फक्त लिहिल्या. उरलेल्या बाकीच्यांनी लिहाव्यात.
अॅडमिन आणि आशुतोषने चॉकलेट्स आणली होती. ती मात्र मिळाली
तुम यहॉ आ तो गये अपनी मर्जी
तुम यहॉ आ तो गये अपनी मर्जी से, लेकिन जाओगे हमारी मर्जी से >>>
लै हसले...
:गेल्या वर्षीच्या ठाण्यातल्या अॅडमिन-गटगच्या वेळेस अॅडमिननी चाकलेटं आणली होती का या विचारात गर्क झालेली बाहुली:
नव्हती गं लले. यावेळेला
नव्हती गं लले.

यावेळेला उसगावातली आणि दुबईतली दोन्हीकडची चाकलेटं मिळाली. अगदी 'हे विश्वची माझे घर!' वगैरे
पुण्यामुंबईतल्या गटगंना फाटा
पुण्यामुंबईतल्या गटगंना फाटा देऊन,
'सरकार आपल्या दारी' ह्या धर्तीवर अॅडमिन ह्यांनी मोजक्या छोट्या शहरांना भेटी देऊन तिथल्या मायबोलीकरांशी पुढील खेपेस हितगूज करावे अशी विनंती मी समस्त गैरपुमुकर मायबोलीकरांच्या वतीने करीत आहे.
- 'कणखर'
अॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे
अॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे आहेत (असं वाटलं). आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते>>>>
वरदा.. ह्यातच अॅडमिनचे महानत्त्व दडलेले आहे.. इथेही ते तेच करतात म्हणून तर माबो इतक्या व्यवस्थित चालते आहे..
खर सान्गू का बेफिकीरभौ,
खर सान्गू का बेफिकीरभौ, तुम्ही थोडे उशिरा आलात ना, तर आमची आधीच चर्चा झाली होती, की ती तान्दुळाची प्याकेट्स होती ना, तर ती लिम्बीकडून लुटली ती स्रीयान्च्या हळदीकुन्कवानिमित्ते अन पुरुषान्च्या गन्धाक्षतानिमित्ते होती!
तिला आयतीच लुटालुटीकरता माणसे मिळाली गटगच्या निमित्ताने!
नशिब समजा तुमच, लिम्बीने तुळशीबागेतुन प्लॅस्टिक/कचकड्याची गाळणी/चमचे/घासण्या वगैरे गोष्टी यन्दा लुटायला आणल्या नव्हत्या, अन ज्या प्लॅस्टिकच्या टोपल्या आणल्या होत्या त्या सम्पल्या म्हणून तान्दूळ, बर्का.
नीरजा, या वर्षी तान्दुळ नाही. थोडा होता तो मी गुब्बी अन फदीला देऊन टाकला. आता पुढल्या वर्षी बघू!
फक्त तो मजकुर मी माझ्याकडे लिहून घेतला नाही हे चूकले.
गजान्तलक्ष्मीचा चॉईस मस्त
तसा मी पोचलो तेव्हा मोजकीच मण्डळी उपस्थित होती.
नन्तर एकेक जण येऊ (टपकू) लागले. दस्तुरखुद्द अॅडमिन देखिल आले. दरम्यान सन्योजकान्नी फिन्गरचिप्स, भजी चहा असे मागवले. मी मिरचीचे भजे बटाट्याच्या भजासोबत यशस्वीपणे खाल्ले. चहा मस्त होता. अॅडमिनही छान दिसत होते. त्यान्च्याशी बोलायच होत, पण काय बोलणार हा प्रश्नच पडला, हो ना, आता तेच ते नेहेमीच काय बोलायच?
नै, म्हणजे रामभौनी तयारी दाखविली अस्ती तर माझी (चहा घेऊन) बसायची देखिल तयारी होती.
) फोटो घेतले. आता ते कोणत्या धाग्यावर प्रसिद्ध होतात ते बघायचे.
तर त्यान्ना देखिल सान्गितल की ते कागदाचे यन्त्र श्री यन्त्रासारखे दिसते, छान आहे, सबब देवघरातच ठेवले आहे एकीबाजुला
मधेच लिम्बीचे डायरेक्शन नुसार, नविन आलेल्या आयड्यान्ना तान्दुळाची प्याकेट्स देण्याचे कामही करत होतो. रुमा, पूनम, केदार, आशुतोष, अरुण, श्यामली इत्यादिन्ना प्याकेट्स नेऊन दिली.
तेवढ्यात कुणीतरी अनाउन्स केल की लिम्ब्याच्या हस्ते अॅडमिनना गजान्तलक्ष्मी सप्रेम भेट द्यायची. कैतरी ज्येष्ठ वयोवृद्ध बिद्ध की विद्ध असा शब्दप्रयोगही पुसटसा ऐकला मी. पण लगेच आज्ञा प्रमाण मानुन गजान्तलक्ष्मीची वैशिष्ट्ये सान्गणारा कागद वाचून दाखवुन मग अॅडमिनचे हातात ती सुन्दर गजान्तलक्ष्मिची भेट सुपुर्त केली. खास लोकाग्रहास्तव मी अन अॅडमिनने फोटोकरता पोझेस देखिल दिल्या. तेव्हा कुणीसं म्हणल देखिल की कोण कुणाला देतय हे कस कळणार. (मी आपला "यातल कोण अॅडमिन ते कुणाला कसं कळणार" असा सोईस्कर अर्थ काढून मनातल्या मनात खुदखुदुन घेतल)
आमच्या बाजुच्याच टेबल वर बर्याच साळकायाम्हाळकायान्चा गृप भारीच कलकलाट करित होता. पण आज मुडमधे नसल्याने त्यान्चेकडे केवळ एखाददोन तु.क. टाकुन त्यान्चे कलकलाट बन्द करण्याचे सामर्थ्य म्हणा वा त्राण म्हणा माझ्यात नव्हते.
मधेमधेच लिम्बीला मी जेवढ्या आयड्या लक्षात येतिल तितक्यान्ची "ओळख" सान्गत होतो. अन तेवढ्यात कुणीतरी विचारलेच की तुम्ही लिम्बीला सगळ सगळ सान्गता का? मी ठणकावुन हो म्हणले. सान्गतो म्हणजे काय? सान्गतोच.
बेफिकीर लौकरच निघुन गेले म्हणून, नैतर त्यान्ना जानव्याचे अपरिहार्यत्व व ते त्यागण्याचे तोटे यावर एक लेक्चर देण्याचा मानस होता.
त्यातुन रामभौ सापडले, पण ते जर्रा पलिकडे म्हणजे अॅडमिनच्या पलिकडे बसलेले असल्याने (तावडीत) गावत नव्हते. नैतर त्यान्नाही "राष्ट्रवादी" या शब्दामागिल समस्त इतिहास/ घटनाक्रम/ अर्थ/ महत्व अन त्या शब्दाशी केवळ विळ्याभोपळ्याचेच सख्य असू शकेल अशा अन्य बाबी वगैरे समदं उलगडुन सान्गायचा मानस होता
मधेच ते बुकमार्क्स्ची पाकिटे बघितली, पण लुजमधे विकायला आहेत की कसे ते कळलेच नाही. तेवढ्यात लिम्बीला मात्र ती कल्पना काय आहे ते समजावुन सान्गितले.
एकदोघान्चे टीशर्ट बघुन लिम्बीने "मायबोलीचे" टीशर्ट छान आहेत असे विधान "पास" केले.
मधेच अॅडमिननी उपस्थित आयड्यान्चे निरनिराळ्या कोनातुन (म्हणजे समोरुन, कडेने वगैरे
मास्तुरे आयडी म्हणजे कोणतरी माझ्या आधीच्याच माहितीतील आयडी असेल असे वाटायचे, अन तशी नसेल तर मात्र मास्तुरे म्हणजे पूर्वीच्या काळच्या छडी लागे छमछम काळातील मास्तर असतील असे काहीसे कल्पनाचित्र नजरेसमोर होते. प्रत्यक्षातील मास्तुरे खेळकर पण अभ्यासु / कष्टाळू वगैरे
वाटले.
शैलजाला मी बराचवेळ, तिने शैलजा अशी ओळख करुन देऊनही मायबोलीवर ती कोण तेच आठवू शकत नव्हतो, भाण्डण/वादावादी झालेल्या/केलेल्या सगळ्या आयड्या आठवल्या तरी त्यात शैलजा हे नाव काही सापडेना. जेव्हा तिने सान्गितले की तिच आयटी गर्ल्स, मग माझी ट्युबलाईट पेटली.
नीरजा बहुतेक कुठेतरी मुन्ज/लग्न/सापु वगैरे उरकुन आली होती काय की!
वरदाच्या टिळक स्मारक मधील (की कुठे?) भाषणाची छापुन आलेली बातमी मात्र पूर्णपणे वाचता आली नाही.
मयुरेश, साजिरा, अरभाट, चिनुक्स इत्यादिन्शी हाय हॅलो झाले. आशूडीला बर्याच वर्षानी म्हणजे झक्कीन्चे भेटीचे नन्तर आत्ताच पाहिल्याने ती लक्षात होती, पण नेमकी आयडी आठवत नव्हती. तिच्याशीही हायहॅलो झाले. पराग समोरच बसला होता. केदार देखिल भेटला बोलला. आशुतोष सहकुटुम्ब आले होते. अन मागे बालगन्धर्वला मला ते कागदाचे सुन्दर यन्त्र करुन देणारे कोण? आयडी विसरतो बुवा मी
श्यामलीला मी आधी ओळखले नव्हते, पण आयडी सान्गितल्यावर चट्टदिशी आठवले, तिलाही बकलाव्याची आठवण करुन दिली. संघमित्राला बहुतेक पहिल्यान्दाच बघत होतो.
बाहेर पावसाळी हवा होती. मला लौकर परत निघणे भाग होते. दोन्ही डोळ्यान्चे मोतीबिन्दुची ऑपरेशन झालेली लिम्बीची आई सध्या घरी असल्याने तिलाही लौकर परतणे भाग होते. सबब जड अन्तःकरणाने, पण तरीही खुशीखुशित जमेल तितक्यान्चा निरोप घेऊन आम्ही निघालो, तेव्हा लोक तिथुन दुसरीकडे जायच्या बेतात होती.
यासगळ्यामधे अॅडमिनशी गप्पा मारण्याचे राहूनच गेले. नेमकी त्यान्ना चिल्लर आणायला सान्गितली होती की नाही ते आठवले नाही, अन कान्द्याने तर टान्गच मारली होती. सबब यावेळेसही चिल्लरीचे जमले नाही. असो.
गजान्तलक्ष्मी देताना बरेच काही बोलण्याचे मनात होते, पण हल्ली काये ना की मनातले बोलायला हाताच्या बोटान्नाच सवय झालीये, जीभेनी बोलायचे विसरुनच गेलोय. त्यामुळे छापलेला मजकुर वाचतानाच, अशा गजान्तलक्ष्मीच्या प्रभावाने व ठाम पण निश्चयी गजगतीने मायबोलीची वाटचाल चालूदे असे सान्गायचे तेवढे राहुन गेले.
फारेंडा.. दोन्ही वृत्तांत
फारेंडा.. दोन्ही वृत्तांत मस्तच रे.. तु गटगला ज्यास्ती बोलत नाहीस पण वृत्तांत मात्र एकदम झकास असतात..:)
अशा गजान्तलक्ष्मीच्या प्रभावाने व ठाम पण निश्चयी गजगतीने मायबोलीची वाटचाल चालूदे असे सान्गायचे तेवढे राहुन गेले.>>>> मस्त रे लिंब्या.. एकदम छान पोस्ट..:)
आता यापुढे घड्याळ घालायला सांगीतले होते ते विसरु नकोस हां..;)
>गजान्तलक्ष्मीच्या प्रभावाने
>गजान्तलक्ष्मीच्या प्रभावाने व ठाम पण निश्चयी गजगतीने मायबोलीची वाटचाल चालूदे > + अगणित वेळ.
मस्त लिहिले लिंबूभौ.
>>> आता यापुढे घड्याळ घालायला
>>> आता यापुढे घड्याळ घालायला सांगीतले होते ते विसरु नकोस हां.. <<<<
अन बन्द पडतय अस वाटल की कान पिरगळल्याप्रमाणे चावीही मारतो घड्याळ्याला! क्काय?
नै रे विसरत, पण मी काय तुमच्यासारखे घड्याळ "खिशात घालुन" फिरत नै! खूप पूर्वीपासूनच हातात मनगटावरच बान्धतो बर्का!
मला फारेण्ड म्हणजे कोण तो चेहराच काही केल्या लक्षात येत नाहीये
मामी आणि बागेश्रीला अनुमोदन
मामी आणि बागेश्रीला अनुमोदन देउन मुम्बै का ठाणे जे काय असेल त्याचे घोडे पुढे दामटवुन, अॅडमिन यांना विनंती की त्यांनी एक दिवस वेळ काढावा...
बाकी सर्वांचे व्रुतांत जबरी..
माणसाने एकदा पुणे पाहिल्यावर
माणसाने एकदा पुणे पाहिल्यावर मुंबईत माणूस जाईल कशाला हेही आहेच म्हणा
धन्यवाद
धन्यवाद लोकहो.
गजान्तलक्ष्मीच्या प्रभावाने व ठाम पण निश्चयी गजगतीने मायबोलीची वाटचाल चालूदे >> लिम्बू, एकदम सुंदर. तुझी बहुधा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारी पुपुवरची पोस्ट सेव्ह करून ठेवायला हवी होती इतकी सुंदर होती. मी आलो तेव्हा तू होतास बहुधा आणि नवीन ओळखी करून घेत होतो तोपर्यंत गेला होतास. लक्षात असेल तर आपण त्या बालगंधर्वच्या तेथे तिकीटे देण्यासाठी तुम्ही दोघे आला होतात तेव्हा भेटलो होतो.
रामभाउ, एकदा आपल्याबरोबर चर्चा करायची आहे. ती घड्याळापासून ते रेल्वे इंजिनापर्यंत आणि ब्रिगेड पासून ते बी-ग्रेड मूव्हीज पर्यंत कशावरही चालेल
फोटो काढलेत आहेत की नाही
फोटो काढलेत आहेत की नाही ???????
सगळ्यांचे वृत्तांत मस्त आहेत
सगळ्यांचे वृत्तांत मस्त आहेत
आता बराच काळ तुमच्या मनात तो दिवस रेंगाळत राहिल.
समीर, मुंबई / ठाणे कधी?
सातार्याला गेल्यामुळे मी
सातार्याला गेल्यामुळे मी मिसल गटग ह्यावेळेसही घराच्या मागेच असुनही.
गटग रात्री ११ पर्यंत चालू होत कळल्यावर तो गोंधळ मल्टीस्पाईस मधल्या गटगचाच होता ह्याची खात्री झाली.
आल्यावर चित्रविचित्र गोंधळ ऐकुयेत होता रात्री. पण चिनुक्स च्या म्हणण्याप्रमाणे ९ पर्यंतच गटग होईल असे कळलेहोते त्यामुळे दुर्लक्ष केले
सुट्टीच्या दिवशी गटग न ठेवल्याबद्द्ल अॅडमिनांकडे तक्रार करणारे नेक्श्ट टाईम
एव्हडे सगळे वृत्तांत वाचून
एव्हडे सगळे वृत्तांत वाचून मलाही वृत्तांत लिहायची हौस आली...
इथे आल्यापासून काही ना काही सुरू असल्याने कोणाशीच भेट झाली नव्हती त्यामुळे अॅडमीन गटगला जायचच असं ठरवून टाकलं होतं. त्यात आधीच्या आठवड्यात बंगलोर वारी ठरली पण मी लोकांच्या मागे लागून लागून शनिवार सकाळचं परतीच फ्लाईट बूक करून घेतलं जेणेकरून गटग चुकणार नाही.
पण शेवटी त्या "पारतंत्र्याच्या बेड्या" आहेत ह्या चिनुक्सच्या उत्तरावर बहूमत झालं....
)
तिच्या ग्लासात नेमकं पाणी नव्हतं.. "कोणी पाणी देईल का??" असं ती स्वतःशी "पुटपुटली".. दोन सेकंदात वेटर किचन मधून पाणी घेऊन आला.. मी आणि चिनुक्स मागे शोनू गटगला घडलेला असाच प्रसंग आठवून खूप हसलो..

मी मल्टीस्पाईसमध्ये पोचलो तेव्हा दहा बारा जणांचा कंपू एका बाजूला बसला होता.. मयुरेशने आणि चिन्मयने लांबूनच हात केला आणि पहिली दहा मिनीटे माझं वाढलेलं वजन ह्यावरच सगळे बोलत होते.. तू पळापळी, टेनीस वगैरे काही करत नाहीस नुसत्या थापा मारतोस वगैरे सारखं घालून पाडूनही बोलले. :| मग मी जरा स्थानापन्न झाल्यावर एल्टी आणि लिंबीताईंशी जरा गप्पा मारल्या... तितक्यात समिरने "ह्यांना ओळखलस का? हे मास्तुरे..." असं म्हणून एका गृहस्थांशी ओळख करून दिली..मी नुसतं "ओह. हो का?" एव्हडच म्हंटलं.. तर सगळे जोरदार हसले.. मास्तुरे तर आमचेच गाववाले आणि कंपनीवाले त्यामुळे त्यांच्यांशी खूप गप्पा झाल्या.. एल्टी माझ्यासमोर बसला होता तरी मी सोडून सगळ्यांना तांदूळ देऊन आला.. ! मग लिंबीताईंनी त्यांना आठवण केल्यावर मलाही एक पुडी दिली.. तितक्यात श्यामली आली आणि टेबलाच्या दुसर्या कोपर्यात जाऊन बसली.. एकदा प्रत्यक्ष भेट आणि फेसबूकवर असूनही तिने "सांग बरं मी कोण???" असा फार अवघड प्रश्न मला विचारला... (मध्ये मयुरेश असल्याने) मला ह्याबाजूने तिच्याशी बोलणं अवघड पडायला लागलं.. आणि मी पलिकडे गेलो.. त्या गडबडीत तांदूळाची पुडी तिथेच विसरलो.. नंतर ती कोणीतरी ढापली.. (वरदा म्हणत्ये तिच्या साठी कोणीतरी राखून ठेवली.. बहूतेक तिच असणार!) श्यामलीने तिने लिहिलेल्या गाण्यांची सिडी दिली.. तिच्या पलिकडे संघमित्रा बसली होती आणि समोर अरूण.. अरूण एकदम म्हणाला "आम्ही तुला गेल्यावेळी पाहिलं तेव्हा तू कण होतास.. आता पराग झालास !" ह्या फाको मुळे मी परागकण आहे असं संघमित्राला वाटलं.. तिला मी पहिल्यांदाच भेटत होतो.. गप्पांच्या मधे मी तिला " ए संघमित्रा, तू पुढची कथा लिहिणार?" असं विचारल्यावर परत सगळे हसले.. म्हंटलं आता काय झालं.. तर म्हणे तिला सगळे 'सन्मी' असं म्हणतात.. संघमित्रा म्हणणं जरा कॉमेडी वाटतं..
तितक्यात नीरजाने एंट्री मारली.. तिच्या गळ्यातल्या नेकलेस पाहून "ते नक्की काय आहे??" ह्या विषयावर उपस्थितांची कुजबूज झाली.. आशुडी म्हणे तो मोबाईल आहे..
नंतर अॅडमिनांना गिफ्ट द्यायच्या कार्यक्रम झाला.. हत्ती पाहून मी मायावतींच्या पक्षाची निशाणी कशी काय आणली ? असं चिनुक्सला विचारलं तर तो मला रामच्या तावडीत द्यायला निघाला होता. मी तेव्हड्यात एल्टी आणि मास्तुरे कुठे आहेत हे पाहून घेतलं.. पण मग गजांतलक्ष्मी बद्दल कळल्यानंतर मी माझा प्रश्न मागे घेतला... मग श्यामलीच्या सिडीचं उद्घाटन अॅडमिनांच्या हस्ते झालं..
मग केदार आणि फारेंड आले.. फारेंडाला मी गेल्यावेळी भेटलो होतो पण तो फारच वेगळा दिसत होता.. !! मग अचानक जोरदार घोषणा दिल्यासारखा आवाज आला.. अंदाज खरा ठरला.. ती पूनम आणि मिल्याची गाडी होती.. ! नचिकेत आल्या आल्या मला हॅलो करून छान गप्पा मारून गेला.. अगदी गुणी मुलगा आहे.. पण पूनम त्याला बिचार्याला सारखी हे करू नको ते करू नको छाप ओरडत होती.. त्याला चॉकलेट खाऊ देतच नव्हती पण बाकीच्या मुलांनाही खाऊ देत नव्हती.. मिहीका आता बहूतेक पूनमला जाचक मावशी म्हणणार आहे..
मग एक इयत्ता दहावीत वगैरे शोभेल अशी मुलगी आली.. एकडून तिकडून कळलं की ती वरदा आहे !! तिच्या कडे बघून ती उत्खनन बित्खनन करत असेल असं अजिबात वाटतं नाही..!! (आयडी आणि प्रतिमा बाफची आठवण झाली.. :P)
नंतर ऋयाम आला.. तो मायबोलीवर इतका बोलत असतो पण प्रत्यक्षात खूप शांत वाटला..
मग तो ह्या हॉटेलातून त्या हॉटेलात जायचा कार्यक्रम झाला.. कलिंगात गेल्यावर फवार्यांसमोर बसायचं का पाठ करून ह्यावरून चर्चा झाली.. आमच्या बाजूचे सगळे स्थानापन्न झाले.. पण समोर अजूनही एकडे सरका तिकडे सरका चालू होतं.. सगळे सरकलेले लोकं एका बाजूला आले होते.. !
आमच्या नॉनव्हेज बाजूचं जेवण एकदम मस्त होतं.. व्हेजवाल्यांनी "मांचुरियन मोहोत्सव" साजरा केला ! जेवताना परत श्यामली आणि मी शेजारी आलो.. मग आम्ही आमच्या रिस्पेक्टीव्ह संपादक मंडळातल्या गंमती जमती एकमेकांना सांगितल्या.. ( मी फक्त गंमतीच सांगितल्या.. तिच्याकडे "जमती" ही होत्या..
केदार हळूच ऐकत होता.. आणि मधेच "शुद्बलेखन" आणि "अभ्यास" हे दोन शब्द एकत्र असलेलं वाक्य बोलला.. पूनमने ते "केदारचा 'शुद्धलेखन' ह्या विषयात अभ्यास आहे" असं ऐकलं आणि तिला ऑलमोस्ट भोवळच आली..
मग मध्येच वेबमास्टरचं देवनागरी करण्याबद्दल चर्चा झाली.. मास्तुर्यांचं एकंदर व्यक्तीमत्त्व बघता "वेबमास्टर" चं "वेबमास्तुरे" करावं असा प्रस्ताव आला.. मग "अॅडमिन" आयडीचा "अॅडलिंबू" करावं असाही प्रस्ताव आला.. दोन्ही प्रस्ताव निर्णयासाठी स्थगित आहेत..
नंतर मग आईस्क्रीम खाताना गोल, चेंज वगैरे वगैरे वगैरे गोष्टींवर चर्चा झाली.. त्या बाफ सारखेच त्या चर्चेचं सार नक्की काय होतं ह्याचा विचार चालू आहे.. मग टण्याचीही आठवण निघाली.. पण त्यातला तपशील इथे देण्यासारखा नाही..
मिनू, टण्या, श्र वगैरेंची पुढच्या गटगला भेट होईल अशी आशा आहे..
- वृत्तांतातल्या नेहमीचा तळटीपा इथेही..
बापरे, बरेच काय काय झाले की
बापरे, बरेच काय काय झाले की नंतर
पग्या क्रम चुकला...
पग्या क्रम चुकला... गजांतलक्ष्मी आणि मिल्या कुटुंबाच्या यंट्रीनंतर मी पोचले.

बाकी श्यामलीने तुला विचारलेला प्रश्न तू मला विचारून मला बंद पाडलेस ते विसरलास का
काही म्हणा, पण मराठी भाषेचं
काही म्हणा, पण मराठी भाषेचं पारडं जर जड असायला हवं असेल तर संस्थापक आणि प्रशासक अशी बिरुदे घ्यायला फारसा वेळ लागू नये असे वाटते. किंवा इतर काही नावे, जसे 'सदस्य एक' आणि व्यवस्थापक इत्यादी
वेबमास्टरांनी मराठी भाषेला जे प्राधान्य दिले जायला हवे असे सांगितले आणि वर पराग यांनी जो प्रतिसाद दिला त्यानंतर हे मला मनापासून म्हणावेसे वाटले. त्यात काही 'लीगल' 'इश्यूज' असतील तर माहीत नाही
-'बेफिकीर'!
पग्या तू एवढा जाड झालायेस?
पग्या तू एवढा जाड झालायेस?
(पग्याला कौटुंबिक फोटो पाठवावे तर तो निस्पृह (आणि निडर)पणे 'किती जाड झालीस' वगैरे कमेंटस करतो.)
मी फक्त गंमतीच सांगितल्या.. तिच्याकडे "जमती" ही होत्या..>>
ललिता,अनु, हिम्या- हा पा काय म्हणतोय.
नीरजाचे ते फ्येमस २० पदरी फॅशनमंसु का नी?
होय होय रैनातै. फॅशनमंसु ते
होय होय रैनातै. फॅशनमंसु ते फ्युच्युरिस्टीक मोबाइल असं काय काय चिकटवलं गेलंय त्या एका माळेला
तिच्याकडे जमतीही होत्या>>>
तिच्याकडे जमतीही होत्या>>>
पराग ऐसा बोलनेका नै रयताय बाबा
खरोखर धमाल आली,
रामचे हाल बघवत नव्हते
साजिरा त्याला फारच दमदाटी करतो असं जाणवल 


जेवण महान होतं, तुडूंब जेवलो. मंचुरियनसाठी जागा उरली नव्हती
नीर दोसा, अप्पम मधला फरक न कळून ब-याच मंडळींनी समोर येईल त्याला सोईस्कर नाव देऊन खाल्ल
मी फक्त गंमतीच सांगितल्या..
मी फक्त गंमतीच सांगितल्या.. तिच्याकडे "जमती" ही होत्या. >>>
(स्वगत - अच्छा! 'त्या' सगळ्या जमती होत्या होऽऽऽय ... :सल्लागार संपादक बाहुली:
श्यामली :दिवा:)
कण आणि पराग पण भारी !!
लय भारी वृत्तांत चाललेत आता
आता म्याबी लिवणार!
>नचिकेत आल्या आल्या मला हॅलो करून छान गप्पा मारून गेला.. अगदी गुणी मुलगा आहे.. पण पूनम त्याला बिचार्याला सारखी हे करू नको ते करू नको छाप ओरडत होती.. >
आता काही खरं नाही! वैनी!!!
> "पारतंत्र्याच्या बेड्या"
काहीही चाल्लेलं.
> मोबाईल
सगळ्यांचे छान आहेत वृतांत !
सगळ्यांचे छान आहेत वृतांत !
पग्या, तू जाडा झाला आहेस?
पग्या, तू जाडा झाला आहेस? तुझ्या आवाजावरून तर तसं काही जाणवलं नाही.
पग्या जाड्या! काय माझी बदनामी
पग्या जाड्या! काय माझी बदनामी करतोस???????
ऋयामाला गटगला कोणी बोलूच दिलं नाही. त्याचं उट्टं काढणार तो आता इथे!

पग्या जाडा झालायस? यंदाच्या
पग्या जाडा झालायस? यंदाच्या मौसमात आंबे खाऊ नकोस. खोटं खोटं न पळता खरं खरं पळ.
सगळ्यांचे व्रुतांत भारीयेत.
Pages