पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२१ एप्रिल म्हणजे तिसरा शनिवार, जर (नेहेमीप्रमाणेच) काही अन्य (विचित्र आकस्मिक) घडामोडी झाल्या नाहीत तर माझ्याकडून माझे येणे ९९% निश्चित, बाकी १% दैवाधीन.

ठिकाणाबद्दल तुक! मी डबा घेऊन येईन माझ्यापुरता!<<<
माझ्यासाठी पण आणशील का? मी बिचारी दिवसभर घसा फोडून, गुरं वळून, थकून भागून येणारे Happy

अरेच्या इथे डबे आणायची चर्चा चालूये का? अशीही सोय आहे का? मग मीही अतिणम्र विणंती करतेच की आम्हा दोघांनाही आणावा Proud

शेवटी इतके डबे होतील की कोठूनतरी ऑर्डर करू असे ठरवले जाईल आणि तिथल्या तिथे बरे म्हणून ते डबे मल्टिस्पाईसमधूनच घ्यावे लागतील Happy

कायतरी लोकं आहेत. एवढी मेहेनत घेऊन नेहेमीचे उत्साही वीर गटग घडवून आणताहेत आणि इथे सगळ्यांना चहाटळपणे सुचताहेत Proud

चहाटळपणा नाही वरदा. सगळे मल्टीस्पाइसचं धन्यवाद जेवण जेऊन कंटाळलेत. Happy
गेले २ वर्ष व्हेन्यू बदललेला नाही Wink

निदान नावनोंदणी वरुन तर रेकॉर्डतोड भेट होणार असे दिसते आहे...

ठिकाणासाठी वैनींना +१

पण गम्मत अशी आहे की एवढी मोठी जागा जवळपास मिळणे अवघड आहे..

हो हिम्स, हे मात्र खरंय. जागा मस्त ऐसपैस आहे आणि बराच वेळ बसू देतात. अर्थात मी १-२ दाच तिथे गेल्यामुळे तिथल्या जेवणावर नो कमेन्ट..

नी... तुझ्यासाठी खास मिक्स पकोडा प्लेट मागवून ठेवतो... Happy

लिंबू... समीरला भेटणे हे मुख्य काम पण बरोबर बाकीची दुय्यम कामेही तितकीच महत्त्वाची आहेत नाही का...

फारेन्ड Happy Happy

लोक्स, गंमत करत होते. मल्टीस्पायसात भरपूर जागा आहे. समीरला भेटायला येणार्‍या प्रचंड जनसमुदायाला तेच ठिकाण योग्य. डब्याबद्दलही मी गंमत करत होते ते स्मायल्या आणि दिव्यांवरून समजले असेलच.

डब्याबद्दलही मी गंमत करत होते ते स्मायल्या आणि दिव्यांवरून समजले असेलच. >>>>>>> गंमत जाऊ द्या हो. पण सिरियसली विचार करा की डब्यातून आमच्यासाठी काहीतरी खाऊ आणायचा ...... Happy

LOL नीरजा.
तस तर मलाही गेल्यापासून "चघळण्या अन गिळण्याशिवाय" दुसरे काही सुचणारच नाही. समीरला नुस्ता लाम्बुनच बघुन घेईच.
काय मागल्याजल्मी पाप केल होत काय की, पण समोरील बाकीचे बकाबका हादडत अस्ताना आपण मात्र असलेली दाढ अन नसलेल्या दाढेची दुखरी हिरडि यान्चे मधे असलानसला घास जीभेने घोळवत घोळवत चिरडायचा केविलवाणा प्रयत्न करायचा, व हिरडी-दातात आलेली कळ तशीच जिरवुन तोन्डावर मात्र अन्नपदार्थान्च्या सन्तुष्टतेमुळे आलेले कृतकृत्य भाव सन्योजकान्ना दाखवित रहायचे अन कधीतरी घेतला घास पाण्याच्या घोटाबरोबर तसाच जाडाभरडा गिळून टाकायचा. असे दोनचार घास गिळेस्तोवर समोरच्याचे सम्पुर्णपणे हादडून झालेले असते अन तो आईस्क्रिम चघळायला लागलेला अस्तो! (मागल्यावेळेस माझ्या समोर कोण होते बरे? Wink )
अशा परिस्थितीमुळेच, मी सहसा सार्वजनिक ठिकाणी खाणे टाळतो.

यायला आवडले असते. पण जमणे अवघड आहे. Sad (शिवाय फक्त 'पुणेकर' माबोकरांनाच भेटायचे म्हणतायेत समीर. Proud :दिवा:)

>>>> किती बाड बाड कराल ? म्या तर एनार. <<<
मला वाटले की सन्ग्रामभाऊन्नीच लिहीलय हे, अन ते येणार, त्यान्ना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच आनन्द वाटला.
पण कस्चे काय? सगळेच मूसळ केरात! Proud
नीट पाहिले तर हा तर आपला ऋयाम निघाला! Wink

आरारा Uhoh मी तुमचं घोडं कधी मारलंय होऽ?
मी ना भविष्याच्या विरोधी बोललोय ना कधी भारतीय संस्कृतीविरोधी, ना ही कधी स्वगत विरोधी.
तरी का म्हणे मुसळ वगैरे.. ?!

संपादित -
*लंबपोष्टीबद्दलही नाही आणि पोष्ट संपादनविरोधातही नाही.

रच्याक... 'चुकून' आपला लिहिलेत... Light 1

Pages