Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कूकरचे डबे किंवा ज्याला नीधप
कूकरचे डबे किंवा ज्याला नीधप लंगड्या म्हणतेय त्यांना तांत्रिक भाषेत सेपरेटर्स
म्हणतात. म्हणजे ज्यावेळी कूकरमधे एकापेक्षा जास्त पदार्थ शिजवायचे असतात, त्या(च) वेळी ते वापरायचे.
एरवी थेट कूकरमधे जेवण शिजवण्यात काहीच गैर नाही. कूकरसोबत मिळणार्या
पुस्तिकेत (ते मिळणे हा तूमचा हक्क आहे. नसेल तर आग्रहाने मागा.) असे वेगवेगळे
पदार्थ दिलेले असतात. साधारणपणे थेट कूकरमधे शिजवल्यास वेळ कमी लागतो.
तसेच कूकरमधे शिजवायचे काही पदार्थ (उदा. मॅक्रोनी, माखी दाल) डब्यांमधे शिजवून चालत नाही.
कूकर बनवणारी कंपनी, काही ठराविक आकारमानापेक्षा जास्त क्षमतेच्या कूकरसाठीच
डबे बनवते. त्यापेक्षा लहान साईझच्या कूकरमधे थेटच शिजवावे, अशी अपेक्षा असते.
कधी कधी दुकानदार इतर उत्पादकांनी बनवलेले छोटे डबे घ्यायचा आग्रह करतो.
पण ते नेहमीच सुरक्षित असते असे नाही.
अगं नी, तू विचारत नव्हतीस
अगं नी, तू विचारत नव्हतीस अॅल्युमिनियमबद्दल.... मी माझ्या माहितीसाठी विचारले आणि मी माझ्या त्याबद्दलच्या अज्ञानाबद्दल बोलतेय
दिनेशदांना अनुमोदन. माझ्या
दिनेशदांना अनुमोदन. माझ्या प्रेस्टिजच्या हा अॅ कुकरसोबत मिळालेल्या पुस्तिकेतल्या सगळ्या रेसिपी डायरेक्ट कुकरात शिजवूनच करायच्या आहेत. या कुकरला सेपरेटर्स नव्हती, आम्ही जुन्या मार्लेक्स कुकरची वापरतो. बहुतेक आपण मराठी लोकच फक्त कुकरमध्ये लंगड्या/सेपरेटर्स ठेवून वापरतो. बाकीच्या प्रांतातले लोक डायरेक्ट कुकरात शिजवतात.
आमच्याकडचा हाअॅ कुकरने पाच वर्षाच्या वापरानंतरही रंग बदललेला नाही. अर्थात आम्ही तो प्रत्येक वापरानंतर घासत नाही म्हणा.
माझ्याकडे एक अगदी छोटा
माझ्याकडे एक अगदी छोटा हॉकिन्स आहे..आई त्याला भाजीचा कुकर म्हणते....म्हणजे त्यात कुठलीच भांडी तशी जाऊ शकणार नाहीत पण मी इतके दिवस मुलाच्या खाण्याच्या वाट्या छोट्या झाकण्या लावून शिजवत असे...आता जास्तीत जास्त छोटंसं मुगाचं वरण करायचं असेल तर त्याचा उपयोग आहे पण मग डायरेक्ट भाजी करू नये का त्यात???
>>त. मायक्रोवेवमधे अन्न
>>त. मायक्रोवेवमधे अन्न शिजवण्यासाठी काचेच्या भांड्यांचाच वापर करावा, बाकी इतर प्लास्टीक, फायबर इत्यादी भांड्यांचा वापर अन्न गरम करण्यापुरताच मर्यादित ठेवावा.>> हल्ली तेवढ्यापुरताही प्लॅस्टिकचा उपयोग करु नये. ते ही वाईट असं म्हणतात. माझ्याकडच्या प्लॅस्टिक डब्यांचा वापर फक्त उरलेली भाजी वगैरे काढून ठेवण्यापुरताच. गरम करताना सिरॅमिक, काचेच्या भांड्यात काढून घेऊन मगच मावेत टाकते.
मोठ्या जारमध्ये सरबत वगैरे
मोठ्या जारमध्ये सरबत वगैरे बनवल्यावर स्टर करायला लांब, छानपैकी स्टरर्स कुठे मिळतील?
मी इथलं वाचून परवा एक कस्ट
मी इथलं वाचून परवा एक कस्ट आयर्न चं स्किलेट आणलं. मजा येते आहे वापरायला. पोळ्या करायला पण नॉनस्टिक ऐवजी लोखंडी तवा वापरला, न चिकटता नीट पोळ्या होत आहेत
नी, माझं मत स्टेनलेस स्टील च्या छोट्या कुकर किंवा प्रेशर पॅन ला !
मामी, चर्चगेटला एशियाटीक मधे
मामी, चर्चगेटला एशियाटीक मधे खुप वर्षांपूर्वी बघितले होते.
आता परळच्या बिग बझार किंवा तिथेच जे मोठे दुकान आहे
त्यांच्याकडे असतील.
शूम्पी.. हो २ लिटरचा छोटा
शूम्पी.. हो २ लिटरचा छोटा कुकर मस्त मिळाला. स्टीलचाच घेतला. इंडक्शन कुकप्लेटसाठी पण चालतो तो.
मामी, अगं आपण जिथून त्या स्ट्रॉ घेतल्या होत्या ना क्रॉ मा मधून तिथे स्टरर्स पण होते.
धन्स दिनेशदा. नी, मग पुन्हा
धन्स दिनेशदा.
नी, मग पुन्हा क्रॉमावर चढाई करायची का?
पण मला ग्लासेस करता नकोयेत. अजून लांब असलेले हवेत. तसा मी गुडअर्थ मधे बघितला. पण त्या पातळ स्टीलच्या काडीकरता रू ४५० मोजायची हिंमत झाली नाही.
मामी, ते गुडअर्थ प्रचंड महाग
मामी, ते गुडअर्थ प्रचंड महाग आणि तितकंच सुंदर प्रकरण आहे ना.
मी स्लो कुकर घ्यायच्या
मी स्लो कुकर घ्यायच्या विचारात आहे..ज्यांच्याकडे आधीच आहेत त्यांच्याकडून काही टीपा, सुचना, इ.इ. असल्यास आभार्स....
मला असं वाटतंय की साध्या कुकरमध्ये मांस शिजवण्यापेक्षा यात चांगलं शिजवता येईल आणि असंच मागे एका धाग्यावर हा स्लो कुकरचा विषय आला होता म्हणून डोक्यात घोळतंय...की हे आण़खी एक डोइजड उपकरण होणार नाही नं स्वयंपाकघरात???
पण त्या पातळ स्टीलच्या
पण त्या पातळ स्टीलच्या काडीकरता रू ४५० मोजायची हिंमत झाली नाही. <<<

बाबो.. तुला तुळशीबागेतून उंचाडे चमचे देते आणून डझनभर. ढवळ हवं तितकं
बीपीए फ्री प्लॅ स्टीक पण
बीपीए फ्री प्लॅ स्टीक पण वाईटच का मायक्रोवेव्ह मधे वापरायला?
मवा, नेत्रसुखाकरता मधून मधून
मवा, नेत्रसुखाकरता मधून मधून जाते मी.
हे हे हे .... नी. भरपूर आण, टोपलीत घालून गुडअर्थच्या बाहेर विकायला बसेन.
टोपलीत घालून गुडअर्थच्या
टोपलीत घालून गुडअर्थच्या बाहेर विकायला बसेन. >>>
भाज्या चिरण्यासाठी फुप्रो,
भाज्या चिरण्यासाठी फुप्रो, चॉपर यापैकी कशाचा चांगला उपयोग होतो. माझ्याकडे केनस्टार चा फुप्रो होता मला अजिबात वापरता आला नाही.
सध्या नवरा चिर्उन देतो भाज्या.
(कामाचे वर्गीकरण)पण कमी वेळात चिरता येतील असं एखादं उपकरण कोणी सांगु शकेल का? कोणता फुप्रो "easy to use - user friendly" आहे?
आणखी एक प्रश्न. फुप्रो मधे
आणखी एक प्रश्न. फुप्रो मधे खोबरे किसले जाते का चांगले? तसेच ओले खोबरे खोवता येते क? की त्यासाठी काही वेगळे उपकरण घ्यावे लागेल?
वेका, चिकन वगैरे छान होतं
वेका,
चिकन वगैरे छान होतं स्लो कुकर मधे..मी खात नाही पण नवर्यासाठी करते..बाकी पण सूप्स, सगळ्या उसळी वगैरे छान होतात. मी भरली वांगी पण करते.
स्नेहा आभार्स ग्..तू वापरतेस
स्नेहा आभार्स ग्..तू वापरतेस म्हणून विचारते मग तू आपल्या पद्धतीच्या जेवणाचं एका नेहमीच्या भांड्यात फोडणी करून नंतर सरळ त्या कुकरमध्ये ठेऊन अलार्म सेट करतेस का? आणि चिकनला साधारण वेळ किती लागतो...(विथ बोन)
वरदा, प्लॅस्टिक टाळच.
वरदा, प्लॅस्टिक टाळच.
हो, मी फोडणी घालून मग कुकर
हो, मी फोडणी घालून मग कुकर मधे घालते. माझ्या कुकर ला अलार्म नाही.
आणि किति वेळ लागेल ते असे सांगता येणार नाही कारण कुकर चा साइझ काय, किति चिकन ह्याच्यावर ते अवलंबून असते, पण ४ तासात चिकन शिजायला हरकत नाही..
कविन, मायक्रोव्हेव्ह
कविन, मायक्रोव्हेव्ह कुकिंगबद्दलच्या मला जी काही माहिती आहे त्यावरून मी कधीच मावे मध्ये अन्न शिजवत नाही फक्त गरम करते...
अगदी फारच वेळ नसेल तेव्हा बटाटा उकडला असेन पण शक्यतो टाळते आणि खरं सांगायचं तर मंद आचेवर आपलं भारतीय जेवण इतकं छान शिजतं की मावेमध्ये शिजवायचं डोक्यात आलं नाही.
अर्थात क्विक कुकिंग ओट्स किंवा फ्रोजन गोष्टी मावेमध्ये झटपट होतात म्हणून केल्या जातात पण भात/भाजी इ. मी टाळते....
मावे सुरू असताना त्यासमोर उभं राहायचं नाही असं इकडच्या एका मैत्रीणीची आई नेहमी सांगायची..तिला जाऊन आज दोन्-तीन वर्ष झाली तरी टक्क आठवतंय्...असेल काही तरी आणि वीसेक वर्षांनी कळेल आपल्याला...:)
पण ४ तासात चिकन शिजायला हरकत
पण ४ तासात चिकन शिजायला हरकत नाही..>>>>>४ तास? मग जेवायचे कधी?
कुकर मधे चिकन घालायचे,
कुकर मधे चिकन घालायचे, घराबाहेर पडायचे,भटकायचे, शॉपिंग ला जायचे, मग घरी येऊन खायचे..
मग त्यात बिर्यानि चान्गली
मग त्यात बिर्यानि चान्गली होईल का?
मी नेहमीच्या गॅसवर, कितीही मन्द आचेवर शिजवली तरी ती खाली लागतेच.
सोनाली थोडं विषयांतर करून
सोनाली थोडं विषयांतर करून सांगते बिर्यानी सरळ आचेवर ठेवू नकोस...
खाली लोखंडी तवा ठेवुन त्यावर ठेव्..आणि वरून पूर्ण बंद म्हणजे ज्याला दमवर पकव असं म्हणतात नं ते....पिठाच्या गोळ्याने बंद करतात नं ती पद्धत्...लागणार नाही...भांड्याला तू आतून तूप लावलं असेल असं गृहित धरलंय मी....इतकं केलसं तर बिर्यानीचा प्रश्न सुटेल..
पण तुझं लॉजिक बरोबर आहे..मी दुकानात किंवा कुठे manual पाहून मग ठरवेन्..कारण चार तास इज रियली स्लो फॉर मी...सकाळी उठल्या उठल्या त्या कुकरमध्ये चिकन घालावी लागेल...:)
धन्यवाद वेका. ते वेळखाऊ
धन्यवाद वेका.
ते वेळखाऊ प्रकरण असल्यामुळे, स्लो कुकर घ्यायचा कि नाही हे ठरत नाही अजुन.
चार तास मुळॅ बहुतेक मी ना च
चार तास मुळॅ बहुतेक मी ना च म्हण्ते सध्या..मुलं आमच्यात जेवायला लागली की बघु....
स्लो कुकर फास्ट कसा असेल?
स्लो कुकर फास्ट कसा असेल?

मोठा फायदा आहे की एकतर सारखं गॅससमोर उभं राहायला नको, आणि आपण घरी नसतानाही अन्न छान शिजत राहतं. घरी आल्यावर स्वैपाकातली एखादी डिश तयार असली तर छान वाटतंच ना?
शिवाय छोले, राजमा वगैरे तर भिजवून ठेवायची पण गरज नाही. नुसते धुवायचे आणि वापरायचे
पार्टीच्या वेळी पण फायदा होतो..बाकीचा स्वैपाक होत असतानाच एखादी डिश तयार होते की बाजूला..
Pages