स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोड्या दिवसांपूर्वीच माझ्या देसी मिक्सरने राम म्हटलाय. अजून तरी पुन्हा देसी मिक्सरच घ्यावा की कॉस्टको मधून व्हिटामिक्स घ्यावा ह्यावरच काथ्याकूट सुरू आहे. माझ्याकडे ब्रॉनचा हँड ब्लेंडर आहे त्यावर सध्या भागवणं सुरू आहे. आणी मधल्या काळात क्विसीन आर्टचा एक कॉफी ग्राईंडर घेऊन आलेय. (http://www.cuisinart.com/products/coffee_bar/dcg-12bc.html). पण तो नावाला जागून ड्राय ग्राईंडिंगच करतो. पटकन थोडीशी ओली चटणी वाटावी वगैरे सोय नाही.कुणाला असा एखादा कॉफी ग्राईंडर सजेस्ट करता येईल का ज्यात माफक प्रमाणात वेट ग्राईंडिंग पण करता येईल.मॅजिक बुलेट मधे ओल्या वाटणासाठी फारच पाणी घालावं लागतं असा रिव्ह्यू ऐकला त्यामुळे मॅ बु होल्डवर आहे सध्यातरी. कुणाचा काही वेगळा अनुभव असल्यास वाचायला आवडेल.

प्रॅडी, माझा मॅ बु चा अनुभव बरा आहे. माझा मिक्सर इथला आहे आणि त्यात भरपुर पाणी घातल्या शिवाय काही वाटल जात नाही. मॅजिक बुलेट मध्ये पाणी न घालता आणी थोडस पाणी घालुन किंवा लिंबु पिळुन अश्या टाईपच्या चटण्या सुध्दा होतात.
फक्त मी दोन वर्ष वापरल्यावर आतल्या रिंग खराब झाल्या आहेत आणि त्या सुट्या अजुन तरी मिळाल्या नाहियेत. अर्थात त्या मुळे पाणी घालुन/न घालता होणारी त्यावरची काम थांबत नाहियेत.

मामी, रुबी ट्युसडेला येतेस ना? तिथेच मॉलमधे तळमजल्यावर एक स्वयंपाकघर अ‍ॅक्सेसरींचं दुकान आहे, तिथे अश्या ढवळण्या मी बघितल्या आहेत.

धनश्री, मागं जाऊन शोधायचा कंटाळा येतो, पुन्हा टाकायचे प्रश्न Wink

कोणत्याही फूड प्रोसेसरमध्ये भाजी चिरता येते. तुम्हाला वापरता आला नाही म्हणजे नक्की काय झाले?
खोबरे किसता, खोवता येणार नाही. हे पाहिजे - http://anjalikitchenware.net/CO00.html

लोला, धन्यवाद. Happy आता परत प्रश्न टाकत जाइन. मी भाजी चिरतान भाज्या इतक्या बारीक व्हायच्या त्यात कि अगदी लगदाच.:( खोबरे खोवण्याचा प्रयत्न करताना त्याचं ब्लेड बदलण्याच्या प्रयत्नात ती डिस्कच तुट्ली. फुप्रो मुळे पटकन भाज्या चिरुन होतील आणि हव्या तशा असं वाट्लं होतं मला. पण भ्रमनिरास झाला. "user friendly" असं पाहिजे ना फुप्रो Happy

गोदरेज चा फ्रीज आहे ७-८ वर्ष झाली त्याला हल्ली सारखा मध्येच बंद पडतोय. मुंबई मध्ये कुठे एक्स्जेंच ऑफर आहे का? शिवाय कोणत्या कंपनीचा चांगला आहे.

हसरी, होम अप्लायन्सेसच्या कोणत्याही दुकानात जुन्या फ्रीजच्या बदल्यात नव्या फ्रीजच्या किमतीत थोडी सवलत मिळते. एल.जी.चे फ्रीज चांगले आहेत.

इथली चर्चा वाचून २-३ महिन्यापूर्वी कास्ट आयर्न स्किलेट आणला.त्यावर प्रि-सिझन्ड असे लिहिले होते तरी परत एकदा मी सिझन करुन वापरायला सुरुवात केली.सध्या मात्र त्यात पदार्थे केल्यावर जरा काळपट वाटतो.असं का होत असेल? इंटरनेटवर बर्‍याच ठिकाणी साबण न वापरता फक्त गरम पाण्याने धुवा असे लिहिले आहे.पण त्यामुळे ओशटपणा जात नाही म्हणून मी थोडासा डिश वॉशिंग सोप वापरते आणि थोडे स्क्रब करते, नंतर पुसून थोडे तेल लावून ठेवून देते.सोप आणि स्क्रबिंगमुळे कोटिंग जाते का?त्यामुळे पदार्थ काळपट होत असेल का?तुम्ही कसा स्वच्छ करता स्किलेट?

पुण्यात प्रीथी किन्वा सुमीत चा (अमेरिकेत वापरता येइल असा मिक्सर कुठे मिळेल?
त्यात एकच मॉडेल असते की आणखी असतात. असल्यास त्यातले कोणते चान्गले?

आणखी एक प्रश्न म्हणजे इथे (अमेरिकेत) वॉटर्‍ प्युरीफ़ायर कोणता घ्यावा/वापरावा?
सिन्कच्या खाली डायरेक्ट पाइपला बसवता येणारे प्रकार कोणी बसवला आहे का? त्या प्रकारात फ़िल्टर किती काळाने बदलावे लागतात?
आतापर्यन्त गेलनभर पाणी गाळून येइल असे फ़िल्टर वापरत होते पण त्यात सारखे पाणी भरायला वैताग येतो.

पुण्यात प्रीथी किन्वा सुमीत चा (अमेरिकेत वापरता येइल असा मिक्सर कुठे मिळेल? >> मी तुलसी मधुन घेतला तुळशीबागेतुन.

पूर्वा, मला अनुभव नाही आणि मी एक्स्पर्ट तर अजिबात नाही .. पण कास्ट आयर्न चा तवे/भांडी ह्याला साबण लावायचं नाही म्हणे .. किचन नॅपकिन (?) ने पुसणे आणि कडकडीत तापवून डिसैन्फेक्ट(?)/ स्वच्छ करायचा तो ..

बहुतेक उशीर झाला .. Happy

ज्ञाती लक्ष्मी रोड वर सप्रे कडे सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देतात ते. प्रितीचा बेसिक ३ भांडी असलेला मिक्सर घेतला. दोन वर्ष झाली आणि तो उत्तम चालतोय.

थँक्यू सशल.सगळीकडे तेच म्हणतात कि साबण वापरु नये.पण त्याशिवाय स्वच्छ नाही वाटत.
ज्ञाती,तुझ्या फ्रिजला असेल ना फिल्टर?
मी प्युअरचा वापरते.तो सिंकखाली नसतो नळाला वर असतो.किंमत साधारण $३०.२-३ महिन्यात एकदा आतली कॅट्रिएज(??) बदलावी लागते.ती साधारण $१४-$१५ ला पडते.

मीही प्युअरचाच फिल्टर वापरायचे. ज्ञाती, स्वस्तातले, सोयीचे सोल्युशन आहे. शिवाय खात्रीशीर. मी रिकामटेकडी असताना नळाचे हार्ड वॉटर व फिल्टरचे पाणी काचेच्या ग्लासमध्ये दोन दिवस ठेऊन खात्री केलीय. ( tch tch.. i did not have a microscope!) Proud

धन्यवाद मिनी, नी, पुर्वा, बस्के!
कुणी इथे भारतातून फ़ूड प्रोसेसर आणलाय का? (बिल्वा?? ) मी मिक्सर आणावा की फ़ूड प्रोसेसर अशा सम्भ्रमात आहे. प्लीज मदत करा.

ज्ञाती, मी भारतातून सुमीतचा मिक्सर आणला आहे (इथे कन्व्हर्टर घेतला). इथला किचन एडचा फूड प्रोसेसर होता माझ्याकडे, तरीही आणला. दोन्हीचा उपयोग होतो मला.

पूर्वा, मीपण साबणाने धूते आणि तेल लावून ठेवते. मला काळपट नाही वाटले पदार्थ. तुला शंका असेल तर एकदा बार कीपर्स फ्रेन्ड पावडरने आणि तारेच्या घासणीने चांगला घासून काढ आणि पुन्हा सीझन करून मग आता वापरतेस तसाच वापरायला लाग. माझ्या माहितीनुसार कास्ट आयर्नला कोटिंगचा प्रश्न नसतो. सीझन केलं की त्याची छिद्रं तेलाने भरतात आणि मग त्याचा नॉनस्टिकसारखा उपयोग होतो.

ज्ञाती, मी भारतातून येताना ११० व्होल्ट्स चा प्रिती (हेच पूर्वीचे सुमीत बहुतेक) चा मिक्सर आणलाय. अतिशय उत्तम आहे. हा खास भारताबाहेर असणार्‍यांसाठी बनवत असल्यामुळे त्यात बरेचसे स्पेअर पार्ट्स येतात, शिवाय एक मोठी डीटेल मॅन्युअल टाईप पुस्तिका पण येते, ज्यात चित्रांसहीत सर्व माहीती आहे पार्ट्स कसे बदलायचे त्याची. माझ्याकडे इथे दुसरा कुठलाही फूड प्रोसेसर नाही, तरीही फारसा प्रॉब्लेम येत नाहीये. जवळपास रोजच हा मिक्सर वापरला जातोय. इडली-डोश्याची वाटणं, चटण्या सर्व गोष्टी अतिशय छान होतात. दोन डबे पण येतात त्याच्याबरोबर, तेही उपयोगी आहेत. मी बंगळूरुमधून घेतलाय. त्यामुळे पुण्यातलं माहीत नाही, पण घेतलास तर हे सगळं येईल असाच घे. खूपच उपयोग होतो रोज.
मला ही सगळी माहीती इथे मायबोलीवरच बिल्वा, प्रॅडी, आणि १-२ जणींनी दिली होती, त्यांना धन्यवाद. इंटरनेट वर पण बरीच माहीती आहे.

स्वाती, मवा धन्यवाद!
बिल्वानेही माहिती दिली आहे. फ़ूड प्रोसेसर मागवावा असं वाटतंय. कुठे मिळेल कल्पना नाहीये, मिळाला की इथे लिहीनच.

ज्ञाती,
मागच्या वर्षी माझ्या बहिणीने पुण्यातून मला Ronald चा फुड प्रोसेसर घेऊन सासू बाईं बरोबर पाठवला होता.
US मधल्या वोल्टेज साठी वेगळे बनवतात ते फुड प्रॉसेसर्स.
मायबोली वरच्या अनु३ कडून मला त्या फुड प्रोसेसर बद्दल कळलं होतं.

तू इथे माहिती बघू शकतेस..
http://www.ronaldmixers.net/
माझा गेल्या वर्ष भरात अनुभव चांगला आहे त्याचा.

साधारण त्याच दरम्यान नानबा ने पण सेम फुड प्रोसेसर घेतला.. पण I think तिला त्याचा अनुभव चांगला नाही आला .तिने मला सांगितला होतं पण विसरले मी.. तिला विचारून सांगेन परत .

अन्न गरम ठेवणारा चांगला टिफीन कोणता कोणी सांगेल का? >>
आम्ही झोजीरुशीचे हे डबे मुलांसाठी वापरतोय गेली तीन वर्षे . सकाळी ७ वाजता भरलेला डबा ११:३० -१२ :०० पर्यंत मस्त वॉर्म राहतो.

http://www.amazon.com/Zojirushi-SL-NCE09-Bento-Stainless-Steel-Vacuum/dp...

सिलिकॉनपासुन बनवलेले उचटणे/चमचा नक्की वापरुन बघा लोकहो! पदार्थ पातेल्याला अजिबात चिकटुन रहात नाही आणि त्या उचटण्यालाही! यावेळी मोदकाचे सारण करताना वापरला. तसेच मिक्सरमधुन चटणी/मुगाच्या डाळीचे भजांचे पीठ काढतांना वापरला! हाताने निपटुन काढण्याचे समाधान हात खराब न करता मिळाले! इतकी छोटीशी वस्तु पण खुप उपयोगी आहे!

लाजोने आज टाकलेल्या स्पड थाय रेसिपीतल्या एका फोटोत दिसतोय तो चमचा बहुदा सिलिकॉनचा आहे.

Pages