Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं मत सिंपल हॅमिल्टन बिच
माझं मत सिंपल हॅमिल्टन बिच ला. स्वस्त आणि मस्त. आणि सगळी कामं होतात. स्टँड मिक्सर मै वो बात कहां..
नंदिनी पण मुंबईत आत्या, मावश्या मिळणं फार कठीण आहे गं त्यात त्यांच्या दांड्या आणि आल्या तर बर्याचदा अगदी घाणेरडं काम. म्हणून डिशवॉशर घ्यावासा वाटतोय.
वरदाला १००% अनुमोदन! HBचा
वरदाला १००% अनुमोदन! HBचा फूप्रो घेतल्यापासून भाज्या चिरणे, सगळ्या प्रकारच्या कणिक भिजवायला फूप्रोच वापरतेय. पूरी, पराठा, फुल्के, पोळी, भाकरी - फूप्रो मस्त मदत करतो.
अमी
मी पण कणिक मळण्याच्या
मी पण कणिक मळण्याच्या प्रकाराला कंटाळले होते म्हणून फुप्रो घेणार होते. पण फार पुर्वी तुळशीबागे एक कणिक मळायचं यंत्र मिळालं होतं, ते इतकं सुरेख होतं. दरम्यान बरीच वर्ष ते मिळालं नाही त्यामुळे हाताने कणिक मळायचा कार्यक्रम करत होते. मग परवा "सकाळ"च्या प्रदर्शनात पुन्हा ते यंत्र मिळालं, त्यात मापाची भांडी वगैरे सुद्धा मिळतात. विजेशिवाय चालतं शिवाय धुणंही बिलकूल कटकटीचं नाही. मी तेच वापरते. एका वेळी किमान १५ पोळ्यांची कणिक सहज मळून होते. आणि किंमत फक्त रू. ३००/-
दक्षिणा, तुमच्याकडच्या कणिक
दक्षिणा, तुमच्याकडच्या कणिक मळण्याच्या यंत्राचा फोटो टाकाल का? धन्यावाद!
अमी
एवढ्या चर्चेनंतर एक भाप्र
एवढ्या चर्चेनंतर एक भाप्र विचारते त्यामुळे सॉरीच बरं का.
पण त्या नायजेलादेवी बरेचदा उभट लंबगोलाकृती उघडा मिक्सर वापरतात त्याला काय म्हणतात? केक मिक्सर का? तो कणिक वगैरे भिजवायला मस्त पडेल असं वाटतं.
शाब्बास मामी... अग तोच तो
शाब्बास मामी...
अग तोच तो स्टॅण्ड मिक्सर
रामायणातल्या रामाची सीता कोण
रामायणातल्या रामाची सीता कोण ते कळलं. जीव स्टँड मिक्सर मध्ये पडला. कोणी तो मिक्सर लगेच चालू करू नका म्हणजे झालं.
ओक्के.. मी सुरू केला फुप्रो.
ओक्के.. मी सुरू केला फुप्रो. पण मला एक नाही अनेक प्रश्न आहेत. मदत मदत.
हे मॉडेल आहे माझं
http://www.kenmore.com/shc/s/p_10154_12604_00880002000P?vName=Kitchen&cN...
मी कोबी कापून बघितली. दोनच अटॅचमेंट्स आहेत. एक चॉपर नि एक डिस्क आहे त्यात श्रेडिंग नि स्लाईसिंग आहे. हे सगळं तर माझ्या छोट्या फूड चॉपरने आधीच होतंय. मग फुप्रोचा वेगळा फायदा काय? अजून काही उपयोग आहेत का जे मला माहीत नाहीत?
कणीक भिजवायला वेगळे अटॅचमेंट्स लागतात का? की या दोन पैकीच एक चालेल? प्लीज हसू नका मला. इतकी वर्षं घरात मिक्सर नि फूड चॉपरच वापरलाय त्यामुळे जरा कन्फ्युज्ड आहे.
ते फूप्रो वाले लोक सांगतील
ते फूप्रो वाले लोक सांगतील काय ते.
माझ्या फूप्रोत एक प्लास्टिकचे ब्लेड आहे ते मी पूर्वी वापरायचे कणीक मळायला.
मी फुप्रो पण वापरलाय कणिक
मी फुप्रो पण वापरलाय कणिक भिजवायला व आता लोला च्या कृपेने स्टँड मि. पण. ह्यात स्टँ. मि. जिंकलाय.
फुप्रो. मधे स्वच्छाता कटकटीचे होते व एकंदरच सांड-लवंड जास्त होत होती म्हणुन तो वापरणे केव्हाच बंद केले होते.
मधुरिमा , प्लॅस्टीकच डोव
मधुरिमा , प्लॅस्टीकच डोव ब्लेड नाही का? नसलं तरी काही गरज नाही.
चॉपर अॅटॅचमेंट लाव आणि कणीक मळुन घे. डोव ब्लेड कणीक कमी असेल तर आणि चॉपर ब्लेड जास्त कणीक असेल तर मी वापरते. (मॅन्युअल मध्ये तस लिहिलय.) सो तुला डोव ब्लेड वेगळा घ्यायची गरज नाही.
तेल ,मीठ पीठ घालून एकदा फिरव. मग हळू हळू पाणी घालत कणीक मळून घे. एकदा अंदाज आला पाण्याचा कि काही प्रॉब्लेम नाही.
स्टँड मिक्सर जर घरी असेल तर कंपेअर करण्यात पॉइंट आहे. फुप्रो अलरेडी आहे तर त्याचा उपयोग करायचा आहे .
वरती मी लिहिलय तस , पराठे वगैरे करायला फुप्रो च वापर.
फूप्रो आहे म्हणून त्यात कणीक
फूप्रो आहे म्हणून त्यात कणीक मळली पाहिजे असे काही नाही.
त्याचे उपयोग दुसरेच आहेत. त्याचे मुख्य काम हे नव्हे. ज्याला जे काम चांगले येते त्याने ते करावे म्हणजे चांगले होते. 
फूप्रो मध्ये इडली-डोश्याचे तांदूळ-डाळ वाटता येईल. आणि भाज्या जास्त प्रमाणात असतील तेव्हा चॉपरऐवजी वापरता येईल.
गो स्टँड मिक्सर!
अॅमझॉनवर किचन एड चा ६०० वॉट
अॅमझॉनवर किचन एड चा ६०० वॉट , ६ कप मिक्सर डेली डील वर आहे आज . इच्छुकांनी त्वरा करा
लोला, स्टँ.मि. च्या जामच
लोला, स्टँ.मि. च्या जामच प्रेमात पडलेली दिसतेयस
मी ते उपकरण तू दिलेल्या फोटोतच पाहिलंय. इकडे मिळतं का?
केश्विनी मागे मी रिलायंस
केश्विनी मागे मी रिलायंस किंवा क्रोमा दोन्हीपैकी एकाठिकाणी बघितला होता स्टँ.मि. कंपनीचं नाव आठवत नाहीये. किचनमध्ये ठेवायला बिलकूलच जागा नसल्याने मी चक्क दुर्लक्ष करून पुढे गेले होते.
कणीक भिजवण्यासाठी हात वापरा.
कणीक भिजवण्यासाठी हात वापरा. एकदम छान, सोपी विनाकटकट कणीक भिजवून होते.
अल्पना, स्वैपाकघर लहान
अल्पना, स्वैपाकघर लहान असल्यामुळेच मीही वस्तू वाढवत नाहिये
मंजू, थोडीशी असेल तर हाताने आणि जास्त असेल तर फुप्रोमध्ये भिजवते. सद्ध्या संगिता जिंदाबाद
माझा फुप्रो कणीक मळण्याबरोबरच
माझा फुप्रो कणीक मळण्याबरोबरच पोळ्याही करून देतो.
मला र्थमास घ्यायचा आहे ईथे
मला र्थमास घ्यायचा आहे ईथे युएस मधे, कुणी चांगला सुचवु शकेल काय?
मी target, Walmart, Kmart मधुन आणुन ट्राय केले पण कशातच पाणी\चहा गरम नाही राहीला. मला कमीत कमी ३-४ तास तरी चहा गरम राहील असा हवा आहे.
रचु, असं का झाले कोणास ठाऊक?
रचु, असं का झाले कोणास ठाऊक?
मी आयकिआ मधून आणलाय. हा. चांगले ६-७ तास तरी गरम राहते कॉफी/चहा वगैरे.
अगं मी पण हाच आणला होता Kmart
अगं मी पण हाच आणला होता Kmart मधुन,सेम प्राईजला, चहा फक्त १ तासच गरम राहीला
माझ्याकडे हा आहे. सकाळी ७
माझ्याकडे हा आहे. सकाळी ७ वाजता भरलेलं सूप दुपारी १ वाजता पण गरम गरम रहातं.
रचु, चहा त्यात ओतायच्या आधी १०-१५ मिन. गर्रम पाणी घालून ठेव. मग पाणी ओतुन देऊन लगेच चहा त्यात भरुन झाकण लावुन टाक.
रचु ,सिंडी सांगते आहे तस करुन
रचु ,सिंडी सांगते आहे तस करुन बघं. एकदम गरम पाणी घालून ते ओतुन लगेच चहा ओतायचा. चहा जर पुर्ण थर्मास भरुन भरला , तर , तर चार पाच तास गरम रहायलाच पाहिजे. कमी भरला तर थोडा कमी वेळ राहिल.
माझ्याकडे हा ३/४ कप्स साठीचा हा http://reviews.walmart.com/1336/8467198/thermos-24-oz-briefcase-bottle-r... आहे. आणि स्टारबक्स चा आपला नेहमीचा individual आहे.
धन्सं सगळ्याना रचु ,सिंडी
धन्सं सगळ्याना

रचु ,सिंडी सांगते आहे तस करुन बघं. एकदम गरम पाणी घालून ते ओतुन लगेच चहा ओतायचा. चहा जर पुर्ण थर्मास भरुन भरला , तर , तर चार पाच तास गरम रहायलाच पाहिजे. कमी भरला तर थोडा कमी वेळ राहिल.>>>> करुन बघते असं
कोणी Misto चा ऑइल स्प्रे
कोणी Misto चा ऑइल स्प्रे वापरतं का इथे? मी मागच्याच आठवड्यात आणला. नविन पिस धुवुन घ्यायचा म्हणुन धुतला आणि पाणी घालुनच एक ट्रायल घेतली. जेव्हा स्प्रे करायच्या आधी आपण तो पंप करतो, तेव्हा त्याच्या झाकणात पण ऑइल येतं का? कि माझा पिस फॉल्टी आहे? मी स्प्रे केल्यावर व्यवस्थित होतो आहे, पण झाकणातुनही पाणी गळलं. याचा अर्थ ऑइल ही असं लिक होणार.
४ माणसांच्या कुटुंबासाठी डबल
४ माणसांच्या कुटुंबासाठी डबल डोअर फ्रीज घ्यायचा आहे(पुण्यात). कुठला चांगला? नॅनो टायटॅनियम, झिरो मॉइश्चर टेक्नॉलॉजी म्हणजे काय ? कुणी माहिती द्या ना प्लीज !
प्रेस्टि़जचा हायब्रीड कुक टॉप
प्रेस्टि़जचा हायब्रीड कुक टॉप आला आहे. गॅस आणि इंडक्शन दोन्हीची सोय आहे.
२ माणसांसाठी नेमकी कोणती आणि
२ माणसांसाठी नेमकी कोणती आणि किती भांडी लागतील (अगदी काटे, चमचे, वाट्यांपासुन सगळं) ह्याची लिस्ट देता येईल का कुणाला?? कमीत कमी भांडी असली तर छान. जास्त संसार नकोय.
योडे माणसं दोन असतील तरी येणं
योडे माणसं दोन असतील तरी येणं जाणं किती असणार आहे? त्याप्रमाणे भांड्यांचा विचार करता येईल. तरी पण खालिल लिस्ट उपयुक्त ठरावी.
एक मोठं पातेलं
दोन मिडियम पातेली
२ छोटे कुंडे
२ कढई (मिडियम)
कॅसरोल (मिडियम)
१ लि. ताकाचा सट (बरणी)
ताट, वाटी, फुलपात्रं, काटे (प्रत्येकी ६) चमचे मात्रं असतील तितके कमीच पडतात.
१ किलोच्या पहिल्यांदा ६ बरण्या लागतील तशा वाढवाव्या. यात पोहे, गुळ, साबुदाणे असे पदार्थ भरता येतात
२ किलोच्या ६ बरण्या, यात शेंगदाणे, साखर यासारखे थोडे साठवणीचे पदार्थ.
१/२ किलोच्या ६ बरण्या यात कडधान्य, बेसन, रवा हे भरता येतं.
एकदम छोट्या ८/१२ बरण्या यात तिखट, हळद, मेतकूट मोहरी असे बारिक पदार्थ भरता येतात. शिवाय फोडणीच्या डब्यातले संपले तर पटकन भरता येतात.
परात, पोळपाट, लाटणं, तवा, भाकरीचा तवा, पॅन सगळं एकेक
तेलाची बरणी, तुपाची बरणी, मीठ आणि लोणचं यासाठी सट.
चिरलेली भाजी रोळायला जाळी
सुर्या (एक छोटी एक मोठी)
कात्री, साल काढणं, रवी
६ बोल
६ क्वार्टर प्लेट्स
६ कप
४-५ कप चहा होईल इतकं चहाचं भांडं, गाळणी.
चिमटा
पापड्/फुलका भाजायचा चिमटा (ऑप्शनल)
प्रेशर कुकर ५-६ लिटर बास झाला
एक मिनि कुकर हवाच (मला ही घ्यायचा आहे.)
फ्रिज मध्ये ठेवायला पाण्याच्या २ बाटल्या
फळं ठेवायला प्लॅस्टीक चा ट्रे
शिवाय उरलेलं अन्न काढायला आणि फ्रिजात टाकायला ३-४ वेगवेगळ्या आकाराचे प्लॅस्टिक डबे. माझ्याकडे आहेत. सकाळी यात अन्न काढून मी ते डबे फ्रिजात टाकते, संध्याकाळी आले की फ्रिजातून मावेत. झाकणासकट असल्याने फार बरं पडतं. शिवाय चिरलेली भाजी, कणिक सुद्धा यात साठवता येते.
अजून आठवलं की अजून सुचविन.
झाडू, सुपली, बादली, सोपकेस, घासण्या, वायपर.. हे सुद्धा. लागतच कितीही छोटा संसार असला तरी... बरं का..
तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ
तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ ठेवायला मोठे डबे, सुके खाद्यपदार्थ (स्नॅक्स) ठेवायला डबे
डाव, झारा, कालथा .
तांब्या, गडू तांब्या, लहान ताटल्या (क्वार्टर प्लेट्स)
Pages