अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

ही माझ्या लेकीची कला. नुकतेच महाबळेश्वरला गेलो असताना, मॉनेटरी पॉलिसी आणि बजेट च्या दिवशी आम्ही सकाळी टिव्ही बघत रूमवरच थांबलो होतो. त्यावेळी काय करायचं म्हणून तिनं बरोबर आणलेल्या प्ले-डो चं केलेलं गुलाबाचं फूल. (हा प्ले-डो अनेक रंगांची मिसळ असल्याने ब्राऊन झाला होता.)

शिवाय आर्ट अ‍टॅकमध्ये बिग पिक्चर असतं ते करण्याचा प्रयत्न. हा समुद्रतळाचा देखावा. शर्टस, टीशर्ट्स, ट्रॅकपँट, बाटल्यांची झाकणं, दगडं आणि तिच्या स्वत:च्या अ‍ॅक्सेसरीज घेऊन तिने हा देखावा केला आहे. तिच्यामते ही माशीण पार्टीला चालली आहे आणि म्हणून जास्तच नटली आहे.

मस्तच आहे हा धागा !! प्ले-डोचे फूल आणि माशीण,देखावा हे तर केवळ !! खरंच एकदम कल्पक!!

मामी , काय मस्त केलय लेकीने सगळे. विशेषतः तो फिश तर फार क्युट केलाय तिने. स्वतः पण एवढीच नटते का? Happy
९ वर्षाच्या मानाने हातात खुप सफाई आहे.

सध्या मी 'पिंटरेस्ट' या सायटीवर असते नियमित. तिथे खूप वेगवेगळ्या कलाकृती बघायला मिळतात. फक्त जपून.. साइट जाम अ‍ॅडिक्टिव्ह आहे Happy

'पिंटरेस्ट' भारी साईट आहे... मला पण आवडतं टीपी करायला इथे Happy

मामी, त्यात्या पीनेवर जाऊन त्याच्या त्याच्या सायटीवर जाता येत जिथे ते करायची कृती असते Happy

मामी भारीच आहे लेकीची कला. सगळ्यात कौतुक वाटले ते गुलाबाचे काटे बघून. सगळे कलाकार फुलाचा आकार, त्याचा रंग यातच गुंतून पडतात. तेच गुलाबाचे सौंदर्य आहे म्हणा पण तेवढेच अनिवार्य आहेत त्याचे काटे. हे निरिक्षण या वयात म्हणजे ग्रेटच.

काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा Happy

नीरजा, मस्त साईट आहे. एका दुव्याबद्दल अनेक दुवे Happy

लेकीच्या प्री-स्कुल मधे एक टेबल बघितला, खुप छान वाटला, लगेच परवानगी घेवुन २-३ फोटो घेतले, माझी माबोकर मैत्रिण पद्मजा हिच्यासाठी विशेषत: ... टेबल नाही देवु शकत निदान फोटो तरी भेट देईन Wink Happy
DSC03346.JPG
हा जवळुन

DSC03347.JPG

आणि हा हात मला विशेष आवडला Happy
DSC03349.JPG

माधव, मंजू .... धन्यवाद.

>>>>> सगळ्यात कौतुक वाटले ते गुलाबाचे काटे बघून. सगळे कलाकार फुलाचा आकार, त्याचा रंग यातच गुंतून पडतात. तेच गुलाबाचे सौंदर्य आहे म्हणा पण तेवढेच अनिवार्य आहेत त्याचे काटे. हे निरिक्षण या वयात म्हणजे ग्रेटच. >>>>> खरंच की! हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. Happy

भाजी घेत असताना माझ्या लेकाला सापडलेले नाकवाले Happy

लांबनाक्या
lambnakya.jpg

मिर्चीचे नाक .. म्हणे माझ्या पुस्तकातल्या चांदोबासारखी आहे.
nakwali mirchi.jpg

टोमॅटो की बदकाची चोच ?
lamnakya tomato.jpg

डॅफोडिल्स, तुला अशा नाकवाल्या भाज्या कशा काय मिळाल्या? Biggrin

मिर्ची त्या ड्रीमवर्क्सच्या चंद्रासारखी दिसतेय. Happy आणि हा टंबाटू तर मभादिच्या गोष्टीत चमकला होता ना?

मामी मला नाही माझ्या लेकाला !
मी भाजी घेई पर्यंत.. तो असे बरेच काय काय शोधत असतो... कधी बटाटांची बंदुक तर कधी काय ... Happy

हा एक शुगर कँदि विकणारा दिसला होता लालबाग मध्ये..
सायकल, बाईक, मोर, हत्ती, पक्षी, फुलं.. असं बरंच काही करून देत होता छोट्या पिल्लांना Happy

candyman (2).jpg

Pages