Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे
हल्लीच मी मनोहर मन्गल
हल्लीच मी मनोहर मन्गल कार्यालयाच्या खालच्या होटेलात cofee प्यायली..... अप्रतिम......
१) कर्वे रोड वर गरवारे कोलेज
१) कर्वे रोड वर गरवारे कोलेज समोर एक टपरी आहे. तिथे फराली खिचडि आणि खमंग काकडी मस्त.
२) बादशाही ची थाळी. अप्रतिम.
३) स प कोलेज जवल एक दाबेली वाला आहे. छान असते.
४) सिंहगडावर गरम कांदा भजी आणि भरीत / भाकरी. झक्कास.
५) सात्विक थाली. स प कोलेज जवल.
डीपी रोड वर यशवंतराव चव्हाण
डीपी रोड वर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून आलो की परांजपे शाळेआधी एक रस्ता डावीकडे जातो (ऋतुरंग सोसायटी, महापालिकेचे वॉर्ड ऑफिस ई). तेथून पुढे गेल्यावर पुन्हा डावीकडे वळून आणखी पुढे गेलो की डावीकडे एक गणपतीचे देऊळ आहे व उजवीकडे बाग. तेथेच डावीकडे देवळाच्या आधी एक स्नॅक सेंटर आहे. ओक म्हणून एक फॅमिली ते चालवते. आणखी एक जवळची खूण म्हणजे नटराज गॅसचे दुकान.
एवढी माहिती देण्याचे कारण की एवढ्यात खालेल्या वडापावांपैकी सर्वोत्कृष्ठ वडा-पाव तेथे मिळतो. आम्ही बर्याच वेळा आणला आहे आणि नेहमी आवडला. जरूर जा. फक्त पुणेरी नियमाप्रमाणे तो संध्याकाळी साडेसहा-सात नंतर संपतो
ते फोन नं देतात आणि ठेवून देतात फोन केला की, नंतर जाणार असलो तरी 
जय भवानी नगर च्या बसस्टॉपजवळ
जय भवानी नगर च्या बसस्टॉपजवळ , राजा शिवराय प्रतिश्ठानच्या कमानी जवळ कॉर्नरवर एक गाडी असते तिथे वडापाव चांगला मिलतो.
शिवतीर्थनगरमध्ये गणेश भेळ आहे, तिथे 'पानीपुरी' मस्त मिळते.(ईतर प्रकार ठिक आहेत)
.
.
पौड रोड वर ideal chambers
पौड रोड वर ideal chambers मध्ये "zest कॅफे" अप्रतिम कॉफी, sandwiches आणि hangout ची जागा
फारएण्ड, तुमची वरची पोस्ट
फारएण्ड, तुमची वरची पोस्ट वाचून जीव तीळ तीळ तुटतोय
हज्जारदा तरी त्या गल्लीबोळातून जाणं व्हायचं.पण लक्ष गेलं नाही माझं.आता खूप वाट पाहावी लागणार.जून नंतर झालं की काय हे स्नॅक सेंटर? 'झकास' नावाचं स्नॅक सेंटर बघितल्याचं आठवतंय.ते हे नव्हे ना?
पुर्वी डहाणुकर सर्कलला ओक
पुर्वी डहाणुकर सर्कलला ओक वडापाव मिळायचा तोच का हा, फारेंड?
zest>>> काय आठवण काढली!!
zest>>> काय आठवण काढली!! इंजिनिअरिंगच्या दिवसातले आवडते ठिकाण!!
हो नात्या तोच. मी इतरांशी
हो नात्या तोच. मी इतरांशी बोललो तेव्हाही जाणवले की तो डहाणूकर वाला वडा बर्याच जणांचा आवडता होता.
जून नंतर झालं की काय हे स्नॅक सेंटर?>>> असेल. मलाही कल्पना नाही
पुर्वी डहाणुकर सर्कलला ओक
पुर्वी डहाणुकर सर्कलला ओक वडापाव मिळायचा तोच का हा>>>अरे सही परत सुरु झालं का हे? मी शाळेत असताना डहाणूकर सर्कल जवळ मिळत असे.नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा चालवत असत.
फारएण्ड तो मी स्वतःलाच
फारएण्ड
तो मी स्वतःलाच दु:खाच्या भरात केलेला सवाल होता खरंतर,पण इथंसुद्धा लिहिला गेला दु:खावेगात 
डहाणुकर सर्कलचा म्हणजे
डहाणुकर सर्कलचा म्हणजे अन्नपुर्णा वडापाव ना? तोच का हा? तो बंद झाल्यपासून चांगला वडापाव नाही मिळाला कोथ्रुडात....
अन्नपूर्णा बहुधा वेगळे दुकान
अन्नपूर्णा बहुधा वेगळे दुकान आहे. तिथला एवढा नाही आवडला मला. ते अजूनही चालू आहे.
अन्नपूर्णा बहुधा वेगळे दुकान
अन्नपूर्णा बहुधा वेगळे दुकान आहे.>> माहिती नाही पण ते बंद होऊन बरेच दिवस झाले... उसाच्या गु-हाळा शेजारी होते ते.
हो कोथरुडमध्ये खरंच छान
हो कोथरुडमध्ये खरंच छान वडापाव मिळाला नाही. फिरून फिरून 'दिवाडकर' हाच पर्याय असायचा.ते 'आई गं ' बंद झाल्यापासून पाणीपुरीचा पण असाच प्रॉब्लेम होता
'आई गं' म्हणजे कोणते? दिवाडकर
'आई गं' म्हणजे कोणते?
दिवाडकर म्हणजे परांजपे शाळेजवळचे कर्जत वडापाव का? ते ही बंद झाले आता.
हो हो तेच कर्जत वडापाव.ते पण
हो हो तेच कर्जत वडापाव.ते पण बंद कठीण आहे आता
'आई गं' MIT च्या जवळ(towards chandani chowk एमआयटी लेफ्ट टर्न तर हे राईट टर्न समोरासमोर असे) रामबाग कॉलनीत होते.तिथं दुसरं काहितरी food joint सुरु झालंय.
आत्ताच आधीचं पान वाचलं या बीबीचं ते लालूच्या पोस्ट्मधे आहे तेच 'आई गं'
कोथरुडला रोल्स कुठे चांगले
कोथरुडला रोल्स कुठे चांगले मिळतात...BOM ka anandnagar corner का अजुन कुठे?
डहाणूकर सर्कलचा वडापाव भारीच
डहाणूकर सर्कलचा वडापाव भारीच असायचा.. तो परत मिळायला लागला असेल तर लगेच जाऊन आणतो..
धन्यवाद फारेंडा..
डहाणूकर सर्कलचा वडापाव भारीच
डहाणूकर सर्कलचा वडापाव भारीच असायचा >> कुठे नेमका.. ?
शिवाजी पुतळ्याजवळ सुपेकरच्या
शिवाजी पुतळ्याजवळ सुपेकरच्या शेजारी सुरु झालेल्या लिटिल चायनामध्ये चायनिज चांगले मिळते. तसेच नॉनव्हेज खाणार्यांसाठी पौड रोडवरील येना बंगल्याजवळ पी के बिर्याणी आणि आबाचा ढाबा हे चांगले पर्याय आहेत.
कर्वे रोडकडुन कमिन्सकडे
कर्वे रोडकडुन कमिन्सकडे जाताना सर्कल आले की डाव्या बाजुला त्या ओकबाई वडापाव विकत. मला वाटते तेव्हा (९६-९७ साली) घरी बनवून तिथे आणून विकत. दुकान नव्हते. चांगला असायचा. त्याशेजारी एक सामोसे/कचोरीचे दुकान होते. ते पण चांगले होते.
मागच्या ट्रीपमध्ये 'एशियन मेलाँज'? नामक एका हॉटेलात जेवलो. अॅपेटायझर्स आणी जेवण दोन्ही मस्त होते. कोथरुड गावाचा फाटा सोडुन कर्वे रोड वारज्याकडे वळतो तिथे आहे (अर्थात बर्याच लोकांना माहीत असेलच).
'एशियन मेलाँज' >> कोथरुड
'एशियन मेलाँज' >> कोथरुड स्टँड च्या बाजूलाच आहे.
महेश विद्यालयाच्यासमोर २/३
महेश विद्यालयाच्यासमोर २/३ फूड जॉईंट आहेत.त्यातल्या एका ठिकाणी(नाव आठवत नाही) चिली चीज ग्रील्ड सँडविच छान असायचे.
एक दुरूस्ती लोकहो. अन्नपूर्णा
एक दुरूस्ती लोकहो.
अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर म्हणजे तेच ते. ओक यांचे, पूर्वीचा अन्नपूर्णा वडापाव. तेच आता या नवीन ठिकाणी चालू आहे.
मी जे दुसरे दुकान म्हणत होतो ते आनंद वडेवाले. ते वेगळे.
लोकहो तेथे गेलात तर माबोचा
लोकहो तेथे गेलात तर माबोचा उल्लेख करा. मी त्यांना म्हंटले होते की "एका वेबसाईटवर" टाकतो वगैरे. (तेव्हाच डिस्काउंट वगैरे काहीतरी बोलून घ्यायला हवे होते
)
पौड फाटा रोड्वर अभिनंदन
पौड फाटा रोड्वर अभिनंदन स्वीट्स म्हणून एक दुकान आहे. अप्रतिम मिठाया आहेत त्यांच्या.स्लर्प!
egg biryani .......... आवी स
egg biryani ..........
आवी स (Avee's) कर्वे रोड .. रान्का च्या चौकत
****
स्विकार ची क्वालिटी गंडली
स्विकार ची क्वालिटी गंडली आहे...इतक्यात च थाळी खाल्ली आम्ही....फारच बंडल होती.
कर्वेनगरात, पेगॅसिस च्या अलिकडे (अग्रज दुकानाच्या डायगोनली अपो.) परशुराम नावाचे एक छोटे हॉटेल आहे, त्यांच्या कडचा बटाटेवडा चांगला असतो, थोडा कमी तिखट...
चितळे बंधुंचे रिटेल आउटलेट असलेल्या देवेश शेजारी असलेले सर्वम पण टिपिकल ब्राह्मणी फुड साठी बेस्ट एकदम
Pages