खादाडी: कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक

Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10

कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाडळे पॅलेसजवळचे 'स्वामी' हॉटेल (कलिंगा शेजारी) पण ओके आहे. पनीरचे सर्व पदार्थ सुंदर.... त्यांच्याकडे खास मंगलोरी पदार्थपण मिळतात. नीर दोसा, स्ट्यू, लाल खोबरा चटणी, सोलकढी वगैरे. चवीत बदल म्हणून छान वाटले.
शिवाजीपुतळ्याजवळच्या कोपर्‍यावरील वडेवाल्याकडचे बटाटेवडे, खेकडाभजी मस्त!
किमयामध्ये शहाण्याने जाऊ नये! टुक्कार!!
पृथ्वीत दहीवडा अजिबात खाऊ नका. मी दोनदा मागवला आत्तापर्यंत.... दह्याला विचित्र वास होता....
पण तेच त्यांचा दहीभात मात्र सह्ही होता.... हे कसे ते कळाले नाही!

अभिषेक हॉटेलकडून कमिन्सकडे जाताना उजव्या हाताला जायका नावाचं रेस्तराँ सुरू झालं आहे. उत्तम पंजाबी जेवण तिथे मिळतं.
डहाणूकर सर्कलजवळही एक जायका नावाचं अगदी छोटं हॉटेल आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे उत्तम मिळतात.
माशांसाठी करिष्माच्या खाली असलेलं कोकण फिश.

या भारतवारीत मी काटाकिर्र ची मिसळ खाल्ली मस्त होती. ते पाणी सोडुन सगळं (तेल सुध्दा) कोल्हापूरवरुन आणतात म्हणे Uhoh

एस.एन.डी.टी च्या कॅनॉलवरची भेळ आणि पाणीपुरी मस्त असते. तिथेच जवळ समुद्रची टेस्टपण चांगली आहे.
स्विकारची थाळीपण छान असायची.

ज्ञाती, बटाट्याच्या पोत्यांशेजारी बसून खाल्लीत का ? आम्ही दोन अती चळवळी पोरं घेऊन त्या एवढ्याश्या काटा किर्रमधे गेलो होतो Happy

कॅनॉलवरची भेळ आणि पाणीपुरी >>> हीच का ती नाल्यावरची पाणीपुरी ? Proud

बटाट्याच्या पोत्यांशेजारी बसून खाल्लीत का ? >>> चक्क बाक मिळाले होते,
खरंय खूपच छोटंय. पुर्वी श्री उपाहारगृहही एव्हढेच होते. तिथेही कांद्याच्या राशीत बसुन मिसळ खायला लागायची.

किमया वाईट नक्कीच नाहीये. आम्ही कॉलेजमध्ये असताना पडिक असायचो तिथे.

यावरून ते चांगले आहे हे कसे सिद्ध होते? तुम्हाला काय कळते? Proud

ते पाणी सोडुन सगळं (तेल सुध्दा) कोल्हापूरवरुन आणतात म्हणे
>>गिर्‍हाईकं देखील.

किमयाला मी गेल्याच आठवड्यात गेलेले : वेळ साधारण दुपारची साडेचार, पावणेपाच.
वेटर पहिली सात - आठ मिनिटे फिरकलाच नाही. दर वेळेला त्याला बोलवावे लागत होते. पाण्याच्या ग्लासमध्ये काहीतरी तरंगत होते, ग्लासही स्वच्छ नव्हता. इडली - सांबार, सर्वात सेफ डिश, मागविली. पदार्थ चांगला होता, पण पुन्हा क्रोकरीत मार! चहाचा कपदेखील स्वच्छ धुतलेला दिसत नव्हता. एकूणच, सर्व कारभार गदळ वाटला.... एरवी असेल कदाचित ते चांगले.... मी काही वर्षांपूर्वी अनेकदा गेलेली आहे तिथे... तेव्हा सर्व्हिस, स्वच्छता व पदार्थांची गुणवत्ता चांगली होती. परवा गेले तेव्हा तेच किमया जुनाट वाटले! Sad

अरे , ऐश्वर्या मधे काअ‍ॅ खुप च मस्त मिलते .. आणी तिथला वडा पाव पण मस्त अस्तो
आनि दीननाथ मन्गेश्कर होस्पिटल मधे ब्रेड ओम्लेत खुप मस्त मिलता
दुर्गा चि कोल्ड कोफी आनि खाऊवाले पत्वर्धन कडे उकडीचे मोदक !!!

मेहेंदळे गॅरेज प्रत्येक वेलेस चलनेबल आहे... अभिशेक उत्तम
पोतोबा मधे पोलिचे तूकदे आनि फोदनीच भात

शेजारिच कॅड एम आनि कॅड बी एक नम्बेर लागत

सह्याद्रि होस्पिट्ल जवळ एका थिकानि मिसल मस्त मिळ्ते

मान्कर च दोसा कोनलाच आवडत नाहि काय???

अरे, परवाच रिपोर्ट कळला की शिवदीप (कर्वेनगर) ची मिसळही छान असते म्हणून.... आता ट्राय करायला हवी Happy

आणि रमाम्बिका देवळासमोर देवेशच्या शेजारच्या दुकानात कॉर्न पॅटिसपण ताजे व छान मिळतात.
जोशी स्वीट्स कडची मटार करंजी, मटार सामोसे, उकडीचे मोदक, साटोर्‍या, अळूवडी, सोलकढी, कोथिंबीर वडी वगैरे छानच!
गणंजयजवळच्या बधाई स्वीटसमध्येही ढोकळा, सामोसे ताजे व छान मिळतात.
देसाई बंधूंकडे गोडाचे बरेचसे पदार्थ छान मिळतात.
सागर स्वीटस (कर्वे रोड) मध्ये मिळणारा उंधियो मी काही महिन्यांपूर्वी खाल्ला होता. पण मला तरी तो थोडा तेलकट व तिखट वाटला.

जोशी स्वीट्सची मटार करंजी अन उकडीचे मोदक!! अहाहाह.. कुंदा सुद्धा सही असतो तिथे..

हूड..! (हे माझे उद्गार नसून नाम आहे :)).. मी पुण्याची आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट मला सगळ्यातलं बरंच कळतं! Proud

ह्या भागातली माझी आवडती खादाडीची ठिकाणं :

१. मानकर डोसा आणि त्याच्या शेजारीच मिळणारे 'मसाला थम्स-अप'
२. अभिषेक नॉन-व्हेज - शोले कबाब मस्त आहे इथला
३. मनोहर (मेहेंदळे गॅरेज) - भाकरी, खिचडी
४. सोलकढी - मलावणी व्हेज आणि नॉन-व्हेज प्रतिज्ञा मंगल कार्यालयाचा रस्ता संपतो तिथे आहे.
५. शिवदीप वडापाव पुर्वी आवडायचा - आजकाल मजा नाही येत. त्यापेक्षा कर्वे रोड वर एस. एन डी टी चा जो पूल आहे तिथे गाडीवरचा वडापाव जास्त चांगला वाटला.
६. करिश्माचे कॅड-बी किंवा कॅड-एम
७. पुरेपूर कोल्हापूर - अभिषेकच्या बाजूला
८. पुरेपूर कोल्हापूर मिसळ - समुद्र च्या बाजूला... एकदाच ट्राय केली.. ठीकठाक आहे
९. ह्या मिसळ जॉइंट समोरचा पानवाला... मला 'शौकीन' पेक्षा हा जास्त आवडतो.
ह्याशिवाय करिश्माच्या समोर सिटी प्राईड शूज च्या वर 'ऑफ-बीट' आहे. Mexican वगैरे मिळते. For a change म्हणून ठीक.

अज्यूबा आता मोठे झाले आहे. त्यामुळे तिथे जायची इच्छा होत नाही आजकाल. बाकी समूद्र, वुडलँड वगैरे पाव भाजी, छोले आणि स्नॅकस साठी आहेतच. आणि वैभव आणि मिल्या भेटणार असतील तर चोवीस गाजरं (24 carats) Happy

फडके हौद चौक पासुन जवळ आसलेल "वैद्य उपहार ग्रुह" खुप मस्त. इथली मिसळ एकदम ब्राम्हणी पध्द्तीची आहे. ना तर्री, ना तिखट एकदा खाउनतर बघा.

पौड रोड चे पालवी कसे विसरले सर्वजन ,,,, आता समर्थ ही छान झाले आहे ... नुकतेच रिनॉवेशन केलेले कामत - डहानुकर जवळ- ते ही छान आहे..... कोथरुड डेपो जवळ गणेश भेळ मस्तच ... आनि आता नचरल ही सुरु झाले आहे कोथरुड मधे ,,,,

समर्थ ची महाराष्ट्रीयन थाळी >> बंद झाली.. कालच गेलेले.. त्याजागी बंडल पंजाबी थाळी विकतात - जीव हळहळला.. खरच मस्त होती त्यांची महाराष्ट्रीयन थाळी!
आणि मसाला डोसाही भयानक होता - पश्चाताप झाला - त्यापेक्षा किमयातल्या उत्ताप्याची चव तरी चांगली होती..

चांदणी चौक :
(हे सगळं मागच्या वेळेस खाल्लं तेव्हाचं मत आहे.. पुढे किती वर्षापूर्वी ते पण लिहिते:
१. गार्डन कोर्ट: भयावह (२.५ वर्षं)
२. अप & अबाव : ओकि-डोकी (२.५ वर्ष)
३. बंजारा हिल माहित नाही
थोडं पुढे बावधन कडे सरकलात की:
४. पंजाबी ढाबा: माहित नाही
५. टेस्टी बाईट्स : चांगलं (२.५ वर्ष)
६. त्रिकाया : चांगल (१० दिवस) - हे महेश भट्टच आहे असं ऐकलय
७. त्रिकायाच्याच पलिकडे - वरदायनी : बंडल!
८ नेब्युला: रिपोर्ट चांगला आहे
९. टेस्टी बाईट्स समोरची गणेश भेळ : बंडल
१०. भर चांदणी चौकात अप & अबाव च्या समोर एक कॉफी मिळते - ती प्रसिद्ध आहे असं ऐकलं.

Pages