खादाडी: कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक

Submitted by मन-कवडा on 27 May, 2009 - 08:10

कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक, वारजे या भागातील खादडायची ठिकाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पौड रोड ला 'हर्ष' सी फूड ..... अप्रतिम Happy
अभिषेक, मेहंदळे गॅरेज जवळ ..... अप्रतिम Happy ..... पण लै वेटिंग Sad

कोथरुडात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहावरून सरळ पुढे आल्यावर परांजपे शाळेजवळचा 'दिवाडकर वडेवाला'. तो क्लेम करतो की तो कर्जत चा आहे पण नक्की माहिती नाही.

अमोल्,हर्ष सी फुड नक्की कुठे आहे रे पौड रोडवर?.. आणि रेट्स ओके आहेत का त्याचे? कारण बर्‍याच ठिकाणी सी फुडचे रेट्स काय वाटेल ते असतात...

मयुरेश, पौड रोडला पी. एन. गाडगीळ शोरुम वरुन सरळं गेलं की, आयडियल कॉलनीचा सिग्नल लागतो, तो क्रॉस करुन सरळ गेलं की जो सिग्नल लागेल त्याच्या थोडसं आधी डाव्या हाताला हर्ष सी फुड आहे.

रेट्स इतर ठिकाण पेक्षा जरा कमी आहेत.
फूड क्वालिटी आणि सर्व्हीस उत्तम. (निदान माझा तरी आजपर्यंतचा तसा अनुभव आहे.)

एस एन डी टी वरुन लॉ कॉलेज रोडला गेल्यावर लागणार्‍या कृष्णा डायनिंग हॉलमध्ये (खाली स्नॅक्स सेक्शनमध्ये) पारशी डेअरीची कुल्फी मिळते फर्मास!

कृष्णा ची थाळीही मस्त असते.

दर रविवारी अनलिमिटेड ब्रंच असतो सकाळी, ९ ते ११ वेळेत. कधी तरी चेंज म्हणून छान आहे!

रेट्स इतर ठिकाण पेक्षा जरा कमी आहेत.
फूड क्वालिटी आणि सर्व्हीस उत्तम.... >>> असं असेल तर एकदा भेट देऊन यायलाच हवं..:)

नानबा, गार्डन कोर्ट माझे अत्यंत फेव्हरीट रेस्टॉरंट! फुड क्वालिटी वगैरे वर मी बोलतच नाही, कारण मला तिथे जाऊन २-३ तास निवांत गप्पा मारत जेवायला प्रचंड आवडतं! पण तरी बंडल असा रिव्ह्यू वाचून वाईट वाटलं Sad
Happy
तसंच सेम अ‍ॅम्ब्रोसिया बद्दल वाटते..
मात्र अ‍ॅम्ब्रोसियाला रात्री व गार्डन कोर्टला सकाळी जाऊ नये अशा मताची आहे मी Happy

कृष्णा डायनिंग हॉल मलाही आवडते.
हर्ष सी फुड नाही माहीत. नळस्टॉपच्या निसर्गचे चांगले (+महाग) असते ना..

मिसळ प्रेमी लोका॑साठी खुशखबर
पु.ल्.देशपा॑डे उद्याना समोर, सि॑हगड रोड वर कोल्हापुर च्या खासबाग मिसळ ची शाखा चालु झाली आहे. मिसळ एकदम मस्त. कोल्हापुरी मिसळप्रेमी लोका॑नी एकदा जरुर भेट द्या.

गार्डन कोर्ट ची फूड क्वालिटी खरच बंडल च आहे... त्याच्याच समोरचे खाना-पीना-जिना पण बंडल...
Up and Above मध्ये Non-Veg चांगले असते असे ऐकले आहे, अनुभव नाही...

गप्पा मारायला कोर्ट, अप अँड अबव, ओअ‍ॅसिस तिनही चांगले...
बादवे, जे.एम रोड ला निवांत गप्पा मारायला चांगले हॉटेल हवे असेल तर राधिका रेस्टॉरंट ट्राय करा, सुरभी च्या लेन मध्ये डेड एंड ला, स्पॅन एक्झिक्यूटिव्ह जवळ... संध्याकाळी ७ नंतर artificial waterfall पण चालू असतो

>>कोल्हापुर च्या खासबाग मिसळ ची शाखा
अरे वा!!! पण माहितीकरता, कोप मध्ये पूर्वीसारखी शान उरली नाही आता खासबाग मिसळ ची...

ज्यांना महाराष्ट्रीयन, ब्राह्मणी थाटाचे जेवण आवडते त्यांनी डेक्कन जिमखान्याच्या गरवारे ब्रिजसमोरील (इंटरनॅशनल बुक डेपोच्या शेजारी ) जनसेवा थाळी रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्यावीच! एक जिना चढून जायला लागते. पण पदार्थांची चव चांगली असते. थाळी रेस्टॉरंट असल्यामुळे तसेच वातावरण असते. त्याची तयारी हवी.

कोणी कोथरुडात झालेले मथुरा ट्राय केले आहे काय? जे एम रोडवरच्या मथुरासारखेच आहे की कसे?

पौड रोड ला क्रुश्णा होस्पिटल़ जवळ "।होटेल राज्याभिशेक " म्हणून चान्गल होटेल आहे..
पनीर डिशेस मस्त मिळतात.. आणि वनाज कम्पनीच्या पूढे " खान्देश " म्हणून छोट होटेल आहे..तिथे लसूणी मेथी खूप भारी मिळते...

इंटरनॅशनलशेजारी 'जनसेवा' आहे..तिथे कधी जनता दिसलं नाही..

पुरेपूर कोल्हापूरची एक शाखा आता डहाणूकर सर्कलला सुरू झाली आहे..

चांदणी चौक :
गार्डन कोर्ट : बकवास फूड क्वालिटी
ओअ‍ॅसिस : सही आहे
खाना पीना जीना : नाही आवडले
अप & अबव्ह आणि बंजारा हिल्स : ओके ओके
दौलत धाबा आणि अँब्रोसिया : टेस्ट चांगली आहे आणि अ‍ॅम्बियंस सुद्धा!
बावधन चौपाटी : बकवास चायनीज

पौड रोड :
किनारा : एकदम मस्त, टेस्टी आहे
पालवी : टेस्टी पावभाजी
समर्थ : थाळी बंद झाली? अरेरे!
दुर्गा : कोल्ड कॉफी आणि भुर्जी दोन्ही बेस्ट
चैतन्य पराठा : पनीर अमृतसरी एक नंबर Happy

एरंडवणा :
मनोहर : ओव्हर हाइप्ड आणि भलते महाग
ऐश्वर्या : थालीपीठ छान असते
अभिषेक : गोडमिट्ट!.. पण पालक सूप ट्राय करा... छान असते.
पुरेपुर कोल्हापुर : नॉन व्हेज नाही खाल्लेले पण अंड्याचे पदार्थ काही खास नसतात!
समुद्र, स्वीकार : ओके ओके
कलिंगा : चांगले आहे
वुडलँड : झकास.... सिझलर्स आवडले... आणि पंजाबी पण छान आहे
मानकर: डोसा आणि उत्तापा एक नंबर (चटणीवर तर आपण फुल्ल फिदा)
गणेश भेळ : व्हरायटी मस्त असते याच्याकडे
मनाली आणि नंदिनी : अजुन ट्राय करायचेत!

कोथरुड :
मिर्च मसाला : दि बेस्ट फॉर पंजाबी
किमया आणि आनंद : सही पावभाजी
शीतल : टेस्टी वन!

(मनाली आणि नंदिनी कुणी ट्राय केले असेल तर रिपोर्ट द्या.... नाहीतर मी टाकतोच थोडे दिवसात Wink )

>>जनता थाळी रेस्टॉरंटला
जनसेवा... खरच झक्कास आहे ते

पालवी आणि पृथ्वी - कधीही जा, निराशा होणार नाही क्वालिटीबाबत [रहावत नाही, पण जे एम च सुभद्रा पण असेच कधीही जाण्यासारखे]

>मनोहर : ओव्हर हाइप्ड आणि भलते महाग
अगदी अगदी...

>>मिर्च मसाला
अजून १ ओव्हर हाइप्ड - बकवास अँबियन्स, आणि उगाच तिखट जेवण, टेस्ट नसलेले - हे व्हेज बाबत, बाकी मला वाटते पिणार्‍याना हे आवडते

चिनूक्स, सॉरी, मनात जनसेवा होतं, लिहिताना चुकून जनता लिहिलं गेलं.... चूक दुरुस्त केली आहे! Happy

कर्वे पुतळ्याजवळच्या एशियन मेलान्ज (तोच उच्चार आहे ना? Melange) ला गेलंय का कोणी? तिकडचे थाई फूड व सिझलर्स चांगले असतात असे नुकतेच कानावर आले.

कर्वे पुतळ्याजवळच्या एशियन मेलान्ज (तोच उच्चार आहे ना? Melange) ला गेलंय का कोणी? तिकडचे थाई फूड व सिझलर्स चांगले असतात असे नुकतेच कानावर आले. >>>>>
हो अरुधंती छान आहे तिथले फूड.

पालवी आणि पृथ्वी - कधीही जा, निराशा होणार नाही क्वालिटीबाबत >> कर्वे पुतळ्याजवळचे शीतल पण याच कॅटेगरीतले..

एशियन मिलांज चांगले आहे. अँबियन्स मस्त आहे. आम्ही घेतलेली थाइ डिश चांगली होती. त्यांचा टेरेसवर बार्बेक्यूपण आहे.

मनाली आणि नंदिनी कुणी ट्राय केले असेल तर रिपोर्ट द्या >> मी दोन्ही ठिकाणी जाउन आलोय. मनाली ठीकठाक आहे. दुपारी गर्दी नसताना जाउनही सर्व्हीस अतिशय हळू होती. नंदिनी मध्ये परत कधी जाणार नाही. सर्व्हीस आणि क्वालिटी दोन्ही बकवास.

एशियन मेलाँजच आम्हाला खूप वाईट अनुभव आला. नवर्‍यानं घेतलेलं चिकन नीट साफ केलेलं नव्हतं. ब्लड तसंच होतं. Sad Sad Sad त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर बदलून आणून दिलं तरी परत तेच! शेवटी न खाताच आम्ही परत आलो.

~साक्षी.

मजा आलि वाचताना. माफ करा, पहिल्यन्दा टाइप करतोय. खादाडीचे नवे ठीकाण फक्त माण्साहारी,

भारती विद्यापीठ कोपर्या वरिल टपरीचा उल्लेख होता आधी तो बरोबर आहे. खरच " झ का स " आहे नावाप्रमाणे.
फक्त सन्ध्या ७.३० च्या आत जा नाहीतर कधीच मिळ्णार नाही. (ड्बा न्ह्या मालक स्वागात करेल)
कोकण एक्प्रेस ५०:५०. मजा नाही आता तिथे.
नळस्तोप जवळ होट्ल कवि समोर "होट्ल खान्देश" तिखट जिभेला लई भारी.
आणिक खुप बातम्या आहेत पण बोटाना जरा आराम देतो.

घरगुती चान्गले बनवीत असलेले कोणी माहीत असल्यास माहीती टाका. होटेल मधे रान्गेत उभे राहायचा कन्टाळा
आला आहे.

एशियन मेलाँजच आमचा अनुभव खुपच छान होता, अर्थात आम्ही टेरेसवरच्या बार्बेक्यूत गेलो होतो. खुपच छान होतं अन त्यामानाने ( बार्बेक्यू नेशन्सच्या तुलनेत ) रेट्सही बरे होते.
अन मिर्च मसालाचे व्हेज चांगले नसते, पण नॉनव्हेज मस्त असते. कालीमिरी चिकन, चिकन तंदूर मस्तच !

एशियन मेलाँज चांगले आहे. या भारत खेपेत आम्ही शनिवारी संध्याकाळी ७ वाजता गेलो होतो. ७ ते ९ खुपच शांत आरामात बसता आले. पुढे गर्दी झाली. पण बाकी ठिकाणी होतो इतका गर्दीचा त्रास झाला नाही. एकुण जेवण, कॉकटेल्स/मॉकटेल्स, अ‍ॅपेटाईझर्स मस्त होती.

जेवणानंतर आईस क्रीम खायचे असेल तर नॅचरल्स एकदम जवळ आहे तेथून.

पुण्यात पौडरोडवर पीएनजी आणि जुनी रुपी बँक या मधल्या बोळात 'आई ग!' अस एक दुकान आहे एका कुटुंबान चालवलेले. तिथेही वरील प्रकारेच पाणीपुरी मिळते.

-शुभांगी कुलकर्णी
(भे फॅ क्ल वरुन साभार)

Pages