Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशू, ताजा ब्रेड न वापरता एक
आशू, ताजा ब्रेड न वापरता एक दिवसाचा शिळा ब्रेड वापरुन पहा. मंद गॅसवर सपाट तव्यावर थोडावेळ ठेवला तर कुरकुरीत होतो.
ओव्हन मधे गरम केला तर
ओव्हन मधे गरम केला तर कुरकुरीत होइल.
पुणेरी गोल भजी कशी करतात हे
पुणेरी गोल भजी कशी करतात हे कुणी सांग़ू शकेल का?
धन्स दिनेशदा आणि लाजो, करून
धन्स दिनेशदा आणि लाजो, करून बघेन
मी पहिल्यांदा साबु-बटाटा च्या
मी पहिल्यांदा साबु-बटाटा च्या चकल्या करणार आहे...कस करायच माहीत आहे...पण तरीही आपल्या माबो करांच्या टीप्स हव्या आहेत..कुठे चुकु शकत आनि अजुन काही केल्यावर छान ,,कुरकुरीत होतील हे प्लीज सांगा ना...
बटाटे जास्त चिकट असणे आणि
बटाटे जास्त चिकट असणे आणि साबुदाण्यात पाणी राहणे, टाळायचे.
बटाटे मीठ घातलेल्या पाण्यात उकडले आणि साबुदाणा नेहमीच्या सवयीचा
वापरला तर चांगले. थोड्या साबुदाण्याचे, किंचीत भाजून पिठ करुन ठेवायचे.
आयत्यावेळी पिठ सैल झाले तर वापरता येते.
गोल चकल्या टाकताना, तूकडे पडत असतील, तर तसे तूकडेच वाळवायचे.
मला उपवास भाजणीची रेसीपी हवी
मला उपवास भाजणीची रेसीपी हवी आहे.
वर्षा त्याची गोळा भाजी करता
वर्षा त्याची गोळा भाजी करता येइल.. तुर भिजवुन ठेवाय्ची... नंतर पानी काढुन भरड वाटुन घ्यावी.. पाणी अजीबात नको. यातच थोड्या हिरव्या मिरच्या, लसुन आल कोथिबीर मिठ वाटुन घालावे,नंतर छोटे गोळे ( घ्ट्ट) बनवुन.. वाफ्वाय्चे... साधारण १० मिनीट. मग
राजुल, उपवासाची भाजणी-२ वाटी
राजुल,
उपवासाची भाजणी-२ वाटी भगर्/मोरधन्,वरई.१ वाटी साबुदाणा,१ वाटी शिंगाड्याचे पिठ,१ वाटी राजगीरा पिठ,१ वाटी / १/२ वाटी दाण्याचे कुट्.भगर्,साबुदाणा कढईत वेगवेगळे भाजुनघ्यावे. कोंबट असताना मिक्सर वर बारीक पिठ करुन घ्यावे त्यात शिंगाड्याचे पिठ व दाण्याचे कुट मिसळावे..थालिपिठ करताना उकडलेला वा कच्चा बटाटा किसुन तिखट्,मीठ,जिरे,मिरची-कोथिंबीर घालुन थालिपिठ करावे.दाण्याचे कुट पित्तकारक असते. त्यामुळे अगदी थोडेसे घातले अथवा अजिबात नाही घातले तरी चालते..
कोणाला राजगिर्याची खीर कशी
कोणाला राजगिर्याची खीर कशी करायची माहित आहे का?
अंजली, तुम्हाला राजगिरा
अंजली, तुम्हाला राजगिरा रोळायला जमतो का ?
राजगिरा रोळून स्वच्छ करुन घ्यावा किंवा कुठे मिळाल्यास स्वच्छ राजगिरा आणून १-२ वेळा धुवून घ्यावा. राजगिर्याच्या पेरभर वर येइल इतके पाणी घालून कुकरला शिजवून घ्यावा. जरासे तूप गरम करुन त्यात नारळ खमंग वास सुटेपर्यंत परतावे-अगदी मंद आचेवर. त्यात शिजवलेला राजगिरा, भाजलेल्या दाण्यांचा भरड कूट, गूळ घालून घोटून घ्यावे. जायफळ किसून घालावे. मग दूध घालून हवे असल्यास केशर/काजु/इ घालून उकळी काढावी.
अंडी कशी उकडावीत?
अंडी कशी उकडावीत?
अंडी कशी उकडावीत?>> यावर
अंडी कशी उकडावीत?>> यावर दिनेशदांनी बरीच माहिती दिली आहे कुठे तरी. शोधावी लागेल.
जामोप्या : हे
जामोप्या : हे बघा
http://www.maayboli.com/node/24273?page=24
इन्स्ट्टं ढोक्ळ्या त एका
इन्स्ट्टं ढोक्ळ्या त एका वाटीला इनोच प्रमाण किती ठेवायचे..
छान.. अंडे उकडणे जमले. पाणी
छान.. अंडे उकडणे जमले. पाणी उकळले. मग त्यात अंडे आणि चमचाभर मीठ टाकले. पाच मिनिटे उकळले. मग इंडक्शन बंद करुन पाच मिनिटे ठेवले. मग थंड पाणी ( नॉर्मल टॅप वॉटर) घेऊन त्यात पाच मिनिटे ठेवले.... अगदी छान मऊ झाले होते.. पांढरे पिवळे दोन्ही उकडले गेले.. सल्फाइड होऊन काळे वगैरे काही झाले नाही.. वासही येत नव्हता. तसेच खाल्ले.. काही मीठ वगैरे घातले नव्हते.
(No subject)
पानेरा ब्रेड मध्ये मिळते तशा
पानेरा ब्रेड मध्ये मिळते तशा क्रीमी टोमॅटो सूपची कृती असल्यास द्या कृपया.
ग्रिल्ड चिकनची कृती आहे का इथे ? असं दिसणारं चिकन अशा प्रकारच्या ग्रिलवर करता येइल अशी कृती द्या कृपया.
सिंडे, इथे
सिंडे, इथे बघ.
http://www.ketv.com/r/15377554/detail.html
धन्यवाद
धन्यवाद
बोनलेस , स्किनलेस ब्रेस्ट
बोनलेस , स्किनलेस ब्रेस्ट पीसेस - हळद , तिखट /मालवणी मसाला / शानचा तंदुरी मसाला , थोडे दही, मीठ, थोडे तेल, आले लसणाची पेस्ट लावून मॅरिनेट करायचे.
मग चांगल्या तापलेल्या ग्रिलवर ग्रिल करायचे. एकदा तुकडा ठेवला की २-३ मिनिटे हलवू नये . त्याने मस्त ग्रिल मार्क्स येतील. मग परतून दुसर्या बाजूने तीनेक मिनीटे ग्रिल करावे. त्यानंतर परत दोन्ही बा़जू १-२ मिनिटे ग्रिल करायच्या.
ओक्के. रेसिपी फॉर्वर्ड
ओक्के. रेसिपी फॉर्वर्ड करण्यात आली आहे
कोणाला बेक करून कोथिंबीर वडी
कोणाला बेक करून कोथिंबीर वडी कशी करायची माहिती आहे ?/ कोणी करून पहिली आहे ? जरा जास्त प्रमाणात वड्या करायच्या आहेत - वाफवून करायला खूप वेळ जाईल - म्हणून सोपा मार्ग शोधते आहे.
Thanks in advance.
अमेरिकेत मिळणार्या
अमेरिकेत मिळणार्या साबुदाण्याची खिचडी मोकळी होण्यासाठी काही टीप आहे का? माझी अर्धीअधीक खिचडी पातेल्यालाच चिकटते...(मी शक्यतो ८/१० स्टील वापरते....)
साबुदाणा भिजवताना पाण्याचं
साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण हेच कारण असावं चिकट होण्याचं. जर दोन वाट्या साबुदाणा असेल तर दिड, पावणेदोन वाट्या पाणी किंवा पातेल्यात ज्या लेवलला साबुदाणा असेल तेवढंच पाणी किंवा त्याच्या अगदी किंचित वर पाणी घाला. अमेरिकेत लक्ष्मी ब्रँडच्या साबुदाण्याचा अनुभव चांगला आहे. स्टीलपेक्षा नॉनस्टीक भांडं वापरा.
धन्यवाद सायो..साबुदाणा
धन्यवाद सायो..साबुदाणा रात्रभर भिजवल्यानेही फ़रक पडेल का? आणि नॉनस्टिक भांड्याचे अनेक (रासायनिक) तोटे असल्यामुळे ती वापरत नाहीये...कदाचित अजिबात नॉनस्टिक न वापरणे हे थोडं अतिरेक वाटू शकतं..पण मी जेव्हा एका सेमिनारमध्ये ते सगळे तोटे पाहिले होते तेव्हा सगळीच नॉनस्टीक हद्दपार झालीत...दुसर्या कुठल्या धाग्यावर खरं तर जाणकारांनी या विषयावर प्रकाश टाकल्यास (किंवा आधीच टाकला
असल्यास) तो वाचायला नक्की आवडेल...
लक्ष्मी ब्रॅंड वापरून पाहीन..सध्याचा कुठला आहे आठवत नाही..आभार...
अॅटलिस्ट ५,६ तास तरी
अॅटलिस्ट ५,६ तास तरी भिजवायलाच हवा. रात्रभर भिजवलात तर उत्तमच.
वेगळा बीबी काढून नॉनस्टिक भांड्यांबद्दल लिहिणार का?
साबूदाणा भिजवायच्या आधी कढईत
साबूदाणा भिजवायच्या आधी कढईत कोरडा मूठशेका भाजून गार झालाकी वर लिहिल्याप्रमाणे भिजवा, खिचडी अजिबात चिकट होणार नाही.
इन्स्ट्टं ढोक्ळ्या त एका
इन्स्ट्टं ढोक्ळ्या त एका वाटीला इनोच प्रमाण किती ठेवायचे..... मला कोणी उत्त्तर च नाही दिल....
एक वाटी बेसन कि भिजवलेले पिठ
एक वाटी बेसन कि भिजवलेले पिठ ? बेसन असेल तर एक टिस्पून (सपाट) पुरेल.
आता छोटे सॅशे मिळतात त्यापैकी एक सॅशे.
Pages