अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण फ्रान्समध्ये Saint Paul de Vence नावाचं एक गाव आहे. त्यात एक मध्ययुगीन शहर तसंच जतन करून ठेवलंय. एका छोट्याश्या टेकडीवर वसलेल्या त्या पूर्ण शहराभोवती तटबंदीही आहे. हे अप्रतिम सुंदर शहर, त्यातल्या अगदी छोट्याश्या गल्ल्या, छोटीछोटी घरं सगळंच प्रचंड देखणं.

पण त्याहीपेक्षा सुंदर अशी एक कल्पना तिथे राबवली आहे. वरच्या घरांच्यात बरेचसे आर्टिस्ट्स राहतात आणि खाली त्यांची बुटिक्स आहेत. सर्व प्रकारच्या कला - पेंटिंग्ज, सिरॅमिक्स, माळा, इतर हस्तकला, सुरेख कपडे अशी देखणी दुकानं खाली. ती कल्पनाच इतकी भावली ना!

तर आत प्रवेश करायच्या रस्त्यावर हे सुरेख चित्र बनवलं होतं. हे त्या शहराचंच चित्रं आहे. The Walled City - तटबंदी आणि तिच्या आतलं ते शहर.

लेकीच्या शाळेतल्या एक्झिबिशनमधली आणखी एक कलाकृती. ही पूर्णपणे कॅनव्हासवर क्रेयॉन्स चिकटवून बनवली आहे. त्यातला मोर माझ्या लेकीनं केलाय.

f20_0.jpg

मस्त आहे धाग्याची संकल्पना.
'मला भेटलेली कला आणि कॉपीराइट' Happy
मामे भारीच विनोदी.

दिवाळी अंकासाठी मुखपॄष्ट शोधत होते तेव्हा सचिन खामकर या कलाकाराचे आंतरजालावर सापडलेलं आणि मला प्रचंड आवडलेलं चित्र.
MAHARASTRIAN_01.jpg
चित्रावर क्लिक केल्यास मोठ्या आकारात बघायला मिळेल.
गळ्यात अस्पष्ट मुहूर्तमणी दिसतोय, पायात जोडवी तेव्हा विवाहीता असावी. हातातल्या पाटल्या बांगड्या, गळ्यातली बोरमाळ, नाकातली नथ यावरून एका घरंदाज, खानदानी घराण्यातली सून वाटते आहे. मला 'सून'च वाटली. माहेरपणाला आलेली 'लेक' नाही. स्वतःच्याच विचारात गढून गेलेली. चेहर्‍यावरून गंभीर वाटते आहे पण 'बिचारी' नाही. किंचीतसा करारीपणापण जाणवतोय. लवंडली आहे पण पदर, साडी किंचीतशीपण इकडे तिकडे झालेली नाही. अगदी सावरून लवंडली आहे. चित्रात साडीचा (लुगड्याचा) पोत, खणाची चोळी स्पष्ट जाणवतेय. एकंदरीत वेषभूषेवरून ब्राम्हण स्त्री असावी असं वाटतंय. लोड, दिवाण, दिवाणावर टाकलेले आवरण (बेडशीट) या गोष्टीपण घराण्याचा अंदाज देत आहेत. रंगसंगती अप्रतिम. टिपीकल मराठी रंग.

चित्राबद्दल अजून थोडसं: रंग आणि प्रकाशाचा वापर करून 'इंप्रेशनिस्ट' शैलीतलं चित्रं आहे. पाटल्या बांगड्या, अवयव, वस्रांचे काठ - कशासाठीच ठळक रेषा वापरलेल्या नाहीत. पण आकार, रंग, प्रकाशावरून त्या त्या गोष्टींचा अंदाज येतो. एका नजरेत ज्या गोष्टी दिसतात, तशाच काढल्या आहेत. ही शैली साधारणपणे 'इंप्रेशनिस्ट' मानली जाते.

रस्त्यावर हे सुरेख चित्र बनवलं होतं. हे त्या शहराचंच चित्रं आहे.
तसाच एक फोटो मेक्सिको / मेहिको सिटी मधला.. Happy

अंजली, थँक्स ! अतिशय सुंदर पेंटिंग आहे. नुसतं बघुन आवडलं असतं पण तु लिहिलेल्या माहितीमुळे फार डिटेल्समधे समजलं ते. अर्थात त्यामुळे अजुनच छानच वाटलं बघायला.

आता शोधाशोध करुन खामकरांची अजुन काही पेंटिंग पहायला मिळाल्याशिवाय चैन पडणार नाही.

सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे. इग्लू फारच आवडलं.

एंप्रेसगार्डनमधल्या कलाकृती देखण्या होत्या. पण मला तिथल्या फूड स्टॉल्समधल्या गरम गरम हुर्ड्यावर बारिक कतरा मिर्ची-टोमॅटो आणि कसल्याशा मसाल्याची रांगोळी घालून नटवलेल्या बाउलमधलं सौंदर्य आणि कल्पकता फारंच भावली.

सगळ्याच कलाकृती भारी Happy

खामकरांचे पेंटिंग अप्रतिम!

मामी, तो मोर मस्तच आहे, क्रेयॉन्सचा म्हणजे क्रेयॉन्स चिकटवुन केलाय का?

हा फोटो आहे इथल्या रिसायकलिंग डेपो मधे घेतलेला.

IMG_0930 - Copy.JPG

इथला रिसायकलिंग डेपो बघायला गेले होते. इथे आपण रिसायकलिंग बीन मधे टाकलेल्या प्लॅस्टिक, कागद्/पुठ्ठा, काचेच्या वस्तु, बाटल्या, कॅन्स इ इ वेगळे केले जातात आणि अन्यत्र रिसायकल करायला पाठवल्या जातात. इथल्या ऑफिस मधे या रिसायकल्ड मटेरियल्स पासुन बनवलेल्या वस्तु मांडल्या होत्या. यात ज्युस कार्टन्स वापरुन बनवलेली बॅग, ड्रिंक/स्प्रे कॅन्स वापरुन बनवलेल्या गाड्या आणि पेपर वापरुन बनवलेला बोल आहे.

मामी, तो मोर मस्तच आहे, क्रेयॉन्सचा म्हणजे क्रेयॉन्स चिकटवुन केलाय का?
>>>> हो लाजो. क्रेयॉन्स डायरेक्ट चिकटवून केलाय.

लोला, क्रेयॉन्स फुकट घालवले असं त्यावेळी माझ्याही मनात आलं पण हे एक वेगळं माध्यम म्हणून वापरलय बहुधा. शाळेत असंख्य लहानमोठे क्रेयॉन्स जमा होतात, त्यातून हे बनवलंय. शिवाय इफेक्ट इतका सुंदर दिसत होता की बाकीचे विचार दूरच गेले. ही कलाकृती आता लॉबीमध्ये लावली आहे.

लक्ष्मीविलास पॅलेस, बडोदा ईथल्या एका बाहेरच्या भिंतीवरील चित्र.
दरबारात चित्र असतातच पण राजवाड्याच्या भिंतीवर बाहेरच्या बाजुला काडलेले चित्र पहिल्यांदाच पाहण्यात आले.

IMG_1354_skw.JPG

वॉव वॉव.. काय काय छान छान पाहायला मिळतंय..
लाजो चं रीसायकलिंग डेपो.. क्या बात है..
मामी,रोहन्,अंजली,आशु... खूप सुंदर फोटोज..
मामी..किती ग्वाड खुर्च्या...

मीरा, मस्त धागा आहे हा Happy सगळ्या कलाकृतीही छानच आणि वैविध्याने नटलेल्या.

खामकरांचं पेंटिंग अप्रतिमच. ती नथ ब्राह्मणी वाटत नाहिये. ब्राह्मणी नथ आडवी असते.

धन्स ममा Happy
माझ्या ते लक्षातच आले नव्हते !
आशु, लक्ष्मीविलास पॅलेस म्हणजे आतुन बाहेरून कल्पकतेचा विलक्षण नमुनाच आहे. आतील भिंतींवरची सगळी चित्रे 'राजा रविवर्म्याची' आहेत ना इथे?

अश्विनी, ब्राम्हणी नथीचा फोटो असेल तर टाकतेस का? माझ्या आजीची आणि मोठ्या आत्याची बघितली आहे ती अशीच सरळ होती. नाकाच्या खाली किंचित कळत नकळत वळलेली होती.
मला वाटतंय ती चंद्रकोर आणि नथ यावरून ब्राह्मण स्त्री असावी. चंद्रकोर ब्राह्मण स्त्रिया लावायच्या ना? ब्राह्मणेतर स्त्रिया आडवी चिरी नाहीतर टिळा / मळवट असं लावायच्या ना? असो.

लाजो, रीसायकल डेपो मधला फोटो मस्त. मामी, त्या मोराच्या चित्रातले रंग मस्त आहेत. सगळे 'प्रायमरी' आणि 'सेकंडरी' रंग आहेत. World of Art by Henry Sayer च्या पुस्तकात प्राथमिक रंग वापरून साधल्या जाणार्‍या परीणामांविषयी छान विवेचन आहे.

आशुतोष,
लक्ष्मीविलास पॅलेस, बडोदा इथलं चित्र रवि वर्मांचं आहे का?

Pages