"बाप"
दोन अक्षरांचा शब्द पण मोल त्यास अमाप
पोटासाठी पोरांच्या राबतो माझा बाप
चिंता नाही रे स्वतःची करी रातीचाही दिन
कष्ट आले त्याच्या भाळी, राही अन्नपाण्यावीन
त्याच्या स्वप्नांचा चुराडा पण माझ्यासाठी सेतू
सुखी व्हावे मी जीवनी हाच जीविताचा हेतू
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच अट
भवितव्यासाठी माझ्या त्याची मुठ बळकट
मागितलेले सारे त्याने मला पुरविले
फाटलेल्या शर्टाला मग ठिगळं जोडीले
मनासारखे सासर जेंव्हा मला मिळाले
कष्टाचे त्याच्या चीज त्याच्या डोळ्यात दिसले
धाडताना मला तिथे त्याचे डोळे पाणावले
माझ्या "बा" चे खंबीर मन कसे इथे ढासळले?
प्रेम त्याचे दिसले त्याची कळली हो माया
शब्द सापडेना मला त्याची समजूत घालाया
"बा" रे तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई?
मन वेडे आहे माझे तुझ्यापाशी धाव घेई
सांगते रे भाऊराया माझ्या मनातील बात
मन "बा" चे रे निराळे सोडू नको त्याची साथ
जितका बळकट हात तितके मन रे सैल
कठोरता मनापासून दूर अनेक मैल
जीवनभर आपल्यासाठी तो राब राब राबला
तुला करते मी विनंती आता सांभाळ तू त्याला
दूर सारू नको कधी, करू नकोस हे पाप
ध्यानात ठेव एकेदिनी तू हि होणार आहेस "बाप"
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
नाव नेहमी असेच
नाव नेहमी असेच लिहितेस........
रिअलॅस्टीक लिहिले आहेस....
अभिनंदन
लै भारी
लै भारी
(No subject)
छान रिया; manaala bhidale
छान रिया; manaala bhidale
हो उदय ... नेहमी म्हणजे
हो उदय ... नेहमी म्हणजे जेंव्हा कविता लिहिते तेन्व्हा.....
आणि धन्यवाद
धन्यवाद किश्या रतन मन्दार:)
धन्यवाद किश्या रतन मन्दार:)
कविता छान आहे, तुझी नाव
कविता छान आहे,
तुझी नाव लिहीण्याची शैली अधिक प्रभावी वाटली..
धन्स सारु
धन्स सारु
रीया, आधी बापावर प्रेम दाखवले
रीया, आधी बापावर प्रेम दाखवले कवितेतून मग बापाची काळची म्हणून भावाला बापाची काळजी घे असेही सांगितलेस. हे फार आवडले. सहसा मुलीच बापावर जास्त माया करतात आणि मुले आयांवर.
बी : माझ दोघांवर ही सारखच
बी : माझ दोघांवर ही सारखच प्रेम आहे पण!

अनेक अनेक आभार
छान... आवडेश
छान...
आवडेश
मस्त रीया छान्च लिहल आहेस
मस्त रीया छान्च लिहल आहेस
धन्यु अनु ,विशाल:)
धन्यु अनु ,विशाल:)
खुप छान कविता. आवडली..
खुप छान कविता. आवडली..
छान, नावातल्या नात्यांची
छान, नावातल्या नात्यांची गुंफण नाही कळली.
अभार विकास आणि
अभार विकास आणि उमेश....
माझ्या कवितांसाठी मी आई आणि बाबा दोघांच पण नाव लावते....
कारण मला घडवण्यात दोघांचा ही वाटा सारखाच आहे..(किन्व्हा आई चा थोडासा जास्तच :))
छान
छान
सुंदर, रिया
सुंदर, रिया
नचिकेत : अभार मीम : धन्यु
मीम : धन्यु
वडिलांबद्दलच्या भावना चंगल्या
वडिलांबद्दलच्या भावना चंगल्या व्यक्त झाल्यात.
धन्यवाद उल्हासकाका
धन्यवाद उल्हासकाका
ध्यानात ठेव एकेदिनी तू हि
ध्यानात ठेव एकेदिनी तू हि होणार आहेस "बाप">>>>>> धन्यवाद छान आहे कविता
थ्यॅंक्यु केदार
थ्यॅंक्यु केदार
सुंदर काव्य...!!! माझंही असंच
सुंदर काव्य...!!! माझंही असंच काही....
http://www.maayboli.com/node/26693
धन्यवाद शाम
धन्यवाद शाम
अगं तू आहेस होय ही? अनेकदा
अगं तू आहेस होय ही? अनेकदा ऐकलीय ही कविता तुझ्या तोंडी.
आता नवनवीन कविता कर पटापटा.
शुभेच्छा
-'भूषण कटककर'!
नक्किच भुषण दादा आणि तुझ्या
आणि तुझ्या गझला वाचल्या वाचल्या च कळाल होत मला कि तुच आहेस
खूप छान
खूप छान
आभार अनिल
आभार अनिल
छान आहे
छान आहे
Pages