"बाप"
दोन अक्षरांचा शब्द पण मोल त्यास अमाप
पोटासाठी पोरांच्या राबतो माझा बाप
चिंता नाही रे स्वतःची करी रातीचाही दिन
कष्ट आले त्याच्या भाळी, राही अन्नपाण्यावीन
त्याच्या स्वप्नांचा चुराडा पण माझ्यासाठी सेतू
सुखी व्हावे मी जीवनी हाच जीविताचा हेतू
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच अट
भवितव्यासाठी माझ्या त्याची मुठ बळकट
मागितलेले सारे त्याने मला पुरविले
फाटलेल्या शर्टाला मग ठिगळं जोडीले
मनासारखे सासर जेंव्हा मला मिळाले
कष्टाचे त्याच्या चीज त्याच्या डोळ्यात दिसले
धाडताना मला तिथे त्याचे डोळे पाणावले
माझ्या "बा" चे खंबीर मन कसे इथे ढासळले?
प्रेम त्याचे दिसले त्याची कळली हो माया
शब्द सापडेना मला त्याची समजूत घालाया
"बा" रे तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई?
मन वेडे आहे माझे तुझ्यापाशी धाव घेई
सांगते रे भाऊराया माझ्या मनातील बात
मन "बा" चे रे निराळे सोडू नको त्याची साथ
जितका बळकट हात तितके मन रे सैल
कठोरता मनापासून दूर अनेक मैल
जीवनभर आपल्यासाठी तो राब राब राबला
तुला करते मी विनंती आता सांभाळ तू त्याला
दूर सारू नको कधी, करू नकोस हे पाप
ध्यानात ठेव एकेदिनी तू हि होणार आहेस "बाप"
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
स्मितुतै, जोत्सनातै : आभार्स
स्मितुतै, जोत्सनातै : आभार्स
खूप छान कविता!!!
खूप छान कविता!!!
रियाला वैभव जोशी यांच्या
रियाला वैभव जोशी यांच्या गझलांची नितांत आवश्यकता आहे. गझलदात्यांनी कृपया या वॉर्डात गझला द्याव्यात. नोंदणी चुकीच्या वॉर्डात झालेली असल्याने तिथे गझलदान करू नये. तिथे फक्त बी पॉझिटीव्ह रक्ताचा साठा करण्यात येतो.
कळावे
गझलपेढी सेवा केंद्र
मस्तच ग रियु आवडली
मस्तच ग रियु
आवडली
रीया खालचा प्रतिसाद वाचला.
रीया
खालचा प्रतिसाद वाचला. एका नवख्या गझलकाराच्या बाफवर एका निष्णात गझलकाराच्या गझला मागवण्यापेक्षा योग्य त्या ठिकाणी त्या असलेल्या ब-या म्हणून तुझ्या बाप या कवितेचा बाफवर काढला आहे. तुलाही सोयीचं होईल ते. माफी कसली मागतेस ?
आपण विपुत बोलुयात का? चालेल
आपण विपुत बोलुयात का?
चालेल मला!
प्री sssssss काय छान
प्री sssssss काय छान लिहिलयेस. एक जादू की झप्पी तुला...
साहित्यात आईच्या तुलनेने
साहित्यात आईच्या तुलनेने दुर्लक्षित असलेला बाप. कविता आवडली.
आणि
कविता वाचली आणि आज पुन्हा बाप आठवला. बाप्पच आठवला.
संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी माझ्या वयाच्या १५ व्या वर्षी माझ्या इवल्याशा खांद्यावर टाकून निघून जाणं.........
आयुष्याचे ते क्षण, ती ससेहोलपट.. बरंच काही आठवलं.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
Pages