Submitted by -शाम on 19 June, 2011 - 13:02
मा.बो.वरील तमाम बापांना आणि त्यांच्या बापांना ...फादर्स डे निमित्त समर्पित.....
गावी थोरवी आईची रुपं बापाचं स्मरुणं
अरे झुंजला झीजला रानं जीवाचं करुनं
जातं वढीलं माईनं जगा कौतिकाचं बोल
सुपातल्या धानासाठी सांग राबलं रं कोणं?
खरं लाडिक बोलून घास भरविते आई
तिच्या ओंजळीला बळं भाऊ येतं रं कुठूनं?
सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या किती आठवणी
घाम ढेकळात त्याचा झाली माती रं सुकूनं
आसवात माऊलीच्या कशी ममता कळते?
धरी बाप नरड्यात ओला हुंदका दडूनं
आई अमृताची येल तिची मायेची सावली
उभा आधाराला राही बाप पिचल्या पाठीनं
लेकरांच्या सुखासाठी बाप राबला राबला
लेका पायामधी बूट त्याची फाटकी वहाणं...
मायबाप जीव दोन दोन्ही समान समान
मोल सारखं दोघांच नाही थोर कुणी उणं...
--शाम
गुलमोहर:
शेअर करा
व्वा...! भरुन येता येता शेवट
व्वा...! भरुन येता येता शेवट अगदी व्वा म्हणावं असा..
ग्रेट.. 
सुरेख!!!
सुरेख!!!
छान आहे आवडली
छान आहे

आवडली
आवडली कविता
आवडली कविता
सहज साध्या शब्दात महती
सहज साध्या शब्दात महती सांगीतली आहे बापाची.
“सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या किती आठवणी
घाम ढेकळात त्याचा झाली माती रं सुकूनं”
आणि
“मायबाप जीव दोन दोन्ही समान समान
मोल सारखं दोघांच नाही थोर कुणी उणं...”
अधिक आवडलं.
अतिशय
अतिशय सुंदर.........भावस्पर्शी.
सर्वांगसुंदर !! बहिणाबाईची
सर्वांगसुंदर !! बहिणाबाईची आठवण आली.

शाम, निशब्द! शब्दांत कौतुक
शाम,
निशब्द! शब्दांत कौतुक करता नाही येणार तू मांडलेल्या भावनेचं!
मनस्वी दाद तुला! सुंदर!
खरच भरुन आल..
खरच भरुन आल..
आसवात माऊलीच्या कशी ममता
आसवात माऊलीच्या कशी ममता कळते?
धरी बाप नरड्यात ओला हुंदका दडूनं
आई अमृताची येल तिची मायेची सावली
उभा आधाराला राही बाप पिचल्या पाठीनं
लेकरांच्या सुखासाठी बाप राबला राबला
लेका पायामधी बूट त्याची फाटकी वहाणं...
=====================================
सुप्प्प्प्पर्ब!
डोळे खरचं भरुन आले..
डोळे खरचं भरुन आले..
सारखे काय आभार
सारखे काय आभार मानायचे....असेच प्रेम राहुद्या दोस्तहो!!!
सुंदर
सुंदर
शामभौ .....लय आवडली बघा राव !
शामभौ .....लय आवडली बघा राव !
हं मस्त
हं मस्त
सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या
सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या किती आठवणी
घाम ढेकळात त्याचा झाली माती रं सुकूनं
आई अमृताची येल तिची मायेची सावली
उभा आधाराला राही बाप पिचल्या पाठीनं
मायबाप जीव दोन दोन्ही समान समान
मोल सारखं दोघांच नाही थोर कुणी उणं... >> तश्या सर्वच ओळी छान आहेत. सुंदर रचना!
हॅपि फादर्स डे शाम,
हॅपि फादर्स डे शाम, बिलेटेड
आवडलं हे काव्य.
<<जातं वढीलं माईनं जगा
<<जातं वढीलं माईनं जगा कौतिकाचं बोल
सुपातल्या धानासाठी सांग राबलं रं कोणं?
आसवात माऊलीच्या कशी ममता कळते?
धरी बाप नरड्यात ओला हुंदका दडूनं
लेकरांच्या सुखासाठी बाप राबला राबला
लेका पायामधी बूट त्याची फाटकी वहाणं...<<<
भिडतायत या ओळी! डोळे भरुन आले!
अप्रतिम!!! तुम्हाला आणि
अप्रतिम!!! तुम्हाला आणि तुमच्या बापालाही हॅप्पी फादर्स डे!
सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या
सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या किती आठवणी
घाम ढेकळात त्याचा झाली माती रं सुकूनं
अप्रतिम. खुप आवडले.
तुम्हाला आणि तुमच्या बापालाही
तुम्हाला आणि तुमच्या बापालाही हॅप्पी फादर्स डे! >> खरेच माझ्या तर्फेही.
छान, आवडली. दमलेल्या बाबाची
छान, आवडली. दमलेल्या बाबाची कहाणी आठवली.
सुंदर...भावस्पर्शी कविता !!
सुंदर...भावस्पर्शी कविता !!
अगदी "बा"परे... सुंदर
अगदी "बा"परे... सुंदर जमलीये... सुंदरच. शाम अन गझल.
छंदात, सहज उतरलेत विचार, खूप अवडली.
सुन्दर आवडली मस्त च
सुन्दर
आवडली
मस्त च
बेफिकिर यांचे खरे नाव काय
बेफिकिर यांचे खरे नाव काय आहे??/
शाम पार हृदयात धडक मारली रे
शाम पार हृदयात धडक मारली रे
मस्तच!
मस्तच!
मायबाप जीव दोन दोन्ही समान
मायबाप जीव दोन दोन्ही समान समान
मोल सारखं दोघांच नाही थोर कुणी उणं...>>> प्रचंड आवडली...
सुरेख....
सुरेख....
Pages