"बाप"
दोन अक्षरांचा शब्द पण मोल त्यास अमाप
पोटासाठी पोरांच्या राबतो माझा बाप
चिंता नाही रे स्वतःची करी रातीचाही दिन
कष्ट आले त्याच्या भाळी, राही अन्नपाण्यावीन
त्याच्या स्वप्नांचा चुराडा पण माझ्यासाठी सेतू
सुखी व्हावे मी जीवनी हाच जीविताचा हेतू
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच अट
भवितव्यासाठी माझ्या त्याची मुठ बळकट
मागितलेले सारे त्याने मला पुरविले
फाटलेल्या शर्टाला मग ठिगळं जोडीले
मनासारखे सासर जेंव्हा मला मिळाले
कष्टाचे त्याच्या चीज त्याच्या डोळ्यात दिसले
धाडताना मला तिथे त्याचे डोळे पाणावले
माझ्या "बा" चे खंबीर मन कसे इथे ढासळले?
प्रेम त्याचे दिसले त्याची कळली हो माया
शब्द सापडेना मला त्याची समजूत घालाया
"बा" रे तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई?
मन वेडे आहे माझे तुझ्यापाशी धाव घेई
सांगते रे भाऊराया माझ्या मनातील बात
मन "बा" चे रे निराळे सोडू नको त्याची साथ
जितका बळकट हात तितके मन रे सैल
कठोरता मनापासून दूर अनेक मैल
जीवनभर आपल्यासाठी तो राब राब राबला
तुला करते मी विनंती आता सांभाळ तू त्याला
दूर सारू नको कधी, करू नकोस हे पाप
ध्यानात ठेव एकेदिनी तू हि होणार आहेस "बाप"
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
धन्यु अविनाश
धन्यु अविनाश
सुरेख मांडल्यात भावना, रिया !
सुरेख मांडल्यात भावना, रिया ! खुपच छान.
धन्यवाद अविनाशजी
धन्यवाद अविनाशजी
आभार
आभार
छानच लिहिलं आहे.
छानच लिहिलं आहे.
क्रांती : ....आभार
क्रांती : :)....आभार
छान.........
छान.........
छान.कविता आवडली.
छान.कविता आवडली.
आवडेश
आवडेश
धन्स
धन्स
नाव लिहीण्याची शैली अधिक
नाव लिहीण्याची शैली अधिक प्रभावी वाटली..>>>>>>>>>
असाच प्रतिसाद मी मागे एकदा दिला होता !!
पुन्हा तोच देतोय !!
छान!
छान!
वैवकु : धन्स कृष्णा : धन्स
वैवकु : धन्स
कृष्णा : धन्स
छान आहे.
छान आहे.
कृष्णा : धन्स >>. अगं दोन गोड
कृष्णा : धन्स >>.
अगं दोन गोड पोरींचा बाप आहे मी पोरीची माया समजते अगदी!
(No subject)
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच
नाही कोणतीच आशा नाही कोणतीच अट
भवितव्यासाठी माझ्या त्याची मुठ बळकट
हे आवडले पण भावानेच का बापाकडे पाहायचे ते कळले नाही.
पटलेही नाही.
निनाद : ही कविता मी सगळ्या
निनाद :
ही कविता मी सगळ्या मुलींचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणुन लिहिलिये
आपल्याकडे शहरात मुलींनी आई-वडीलांना सांभाळणं सहज शक्य आहे पण गावाकडे मुलीनी भाऊ असताना माहेरी लक्ष दिलेलं सासरच्यांना चालेल का?
मला नाही वाटतं चालतं असेल
म्हणुन मी ते तसं लिहिलयं
आवडल छानच आहे
आवडल छानच आहे
धन्स
धन्स
निनाद : ही कविता मी सगळ्या
निनाद :
ही कविता मी सगळ्या मुलींचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणुन लिहिलिये
आपल्याकडे शहरात मुलींनी आई-वडीलांना सांभाळणं सहज शक्य आहे पण गावाकडे मुलीनी भाऊ असताना माहेरी लक्ष दिलेलं सासरच्यांना चालेल का?
मला नाही वाटतं चालतं असेल
म्हणुन मी ते तसं लिहिलयं>>>>>>
अगं तू कविता लिहून मोकळी हो ना?
आपलीच कविता पटवून देण्यापेक्षा महान साहित्यीक गुन्हा कोणता?
ह्म्म्म्म पटलं
ह्म्म्म्म पटलं
तू स्पष्टीकरण द्यावे अशी
तू स्पष्टीकरण द्यावे अशी अपेक्षा नव्हती.
पण कवितेवर विचार करावा लागला नि त्यातून प्रतिक्रिया आले
हे कवितेचे यशच आहे.
(कविता आवडली हे वर दिलेच आहे. )
स्वान्तसुखाय लिहायचे, तरी तसे होत नाही. साहित्य पटवण्याचा प्रयत्न कुठे तरी नकळतपणे होतच रहात असावा असे मला वाटते.
असो, प्रत्येकाची लेखन रीत निराळी, नाही का?
<<आपलीच कविता पटवून
<<आपलीच कविता पटवून देण्यापेक्षा महान साहित्यीक गुन्हा कोणता?>>
!! बेफिंशी सहमत.....
कविता खूप छान आहे...

कस्ली सेंटी लिहिली
कस्ली सेंटी लिहिली आहे!
आवडली.
धन्यवाद
धन्यवाद
क्या बात है... बापावरची इतकी
क्या बात है... बापावरची इतकी अप्रतिम कविता... रिया, सुरेख
दाद तुमच्या प्रतिसादाची
दाद
तुमच्या प्रतिसादाची नेहमीच प्रतिक्षा असते. कविता भरून पावली.
अनेक अनेक आभार
मी कशी नाही वाचली हि कविता खु
मी कशी नाही वाचली हि कविता
खु छान
मनातलं लिहिलंस , छान.
मनातलं लिहिलंस , छान.
Pages