खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?
राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने
Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुंगा मोड ऑन तू काय फक्त
भुंगा मोड ऑन
तू काय फक्त गाळून गाळून प्रतिसाद वाचतोस का? वर आगाऊने सांगितलीये ना माझी रास, ते नाही वाचलंस?
भुंगा मोड ऑफ
उशीतून कापूस बाहेर आला की तो परत आत टाकत नाहीत ते आठवलं >>> का?
>>उशीतून कापूस बाहेर आला की
>>उशीतून कापूस बाहेर आला की तो परत आत टाकत नाहीत ते आठवलं >>> का?
अग परत तोच "कम्फर्ट" मिळत नाही ना, उशीतून

अग परत तोच "कम्फर्ट" मिळत
अग परत तोच "कम्फर्ट" मिळत नाही ना, उशीतून>>> सही जवाब!
आमच्या बद्द्लही सांगा मी
आमच्या बद्द्लही सांगा मी वृश्चिक तर नवरा कर्क.....
लिंबूकाका, माझी सौर रास मीन
लिंबूकाका, माझी सौर रास मीन आहे. आता चांद्ररास ओळखा बघू!
आ.न.,
-गा.पै.
बरेच विंचू बाहेर आले कि ! पण
बरेच विंचू बाहेर आले कि !
पण सहज माफ करणे वगैरे वयानुसार जमत जाते. वयानुसार स्वभाव टोकदार तरी होत जातो नाहीतर मवाळ तरी. त्यामूळे वृश्चिकेचे माझे अनुभव मिश्र आहेत.
मेषेशी माझी मैत्री, गेली ३५ वर्षे अबधित आहे ! पण मग मैत्रीखातर दुर्गुण खुपत तरी नाहीत किंवा सहन करण्याची शक्ती वाढत जाते. हे दोन्ही बाजूंनी होते.
जे आपल्या कडे नसते आणि तेच
जे आपल्या कडे नसते आणि तेच नेमके दुसर्याकडे असते तेव्हा त्या 'दुसर्याचा' राग राग होतो .. असे माझे बर्याच वेळा 'मेषेच्या' लोक्स बाबतीत घडते . . .
बरेच विंचू बाहेर आले कि
बरेच विंचू बाहेर आले कि !
सहमत!
निंबे, तुझे राशीचक्र गरागरा
निंबे,

तुझे राशीचक्र गरागरा फिरतेय की
" माझी काही स्वभाव
" माझी काही स्वभाव वैशिष्ठ्ये सांगते, वृषभाला सुट होतात का सांगा...
१) आत्मविश्वास, कितीही अवघड गोष्ट असेल, तरीही नेऊ आपण निभाऊन असाच अॅटिट्यूड
२) संपुर्ण झोकून देण्याची वृत्ती (त्याबाबत मी कन्विन्स्ड असायला हवे फक्त) नात्यातली कमिट्मेंट असो वा प्रोफेशनल जबाबदार्यांतील
३) मनातून उतरलेल्या व्यक्तीला पुन्हा स्थान देणे, महत्त्व देणे- अशक्यच.
४) निवांत वेळेच्या शोधात, तो मिळाला की एकट्याने घालवायला जास्त आवडतो
५) अॅग्रेसिव्ह, प्रोटेक्टिव्ह, केअरिंग "
@बागेश्री
मीही वृषभ चा आहे . वरील काही बाबी तंतोतंत जुळतात माझ्याशी . झोकून देण्याची वृत्ती माझ्यात्पण आहे पण ती गोष्ट माझ्या आवडीची असली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी मी तहान भूक विसरून जातो .अगदी कुठलीही . सहसा व्यक्ती मनातून उतरत नाहीत . निवांत एकांत वास कायम शोधात असतो . बोलणे कधी कधी जास्त तर कधी खुपच कमी असते . कधीतरी अग्ग्रेसिवे होतो कायम नाही . स्थैर्य आणि शांतता शोधात असतो . टोकाची भूमिका घेतो . अभ्यासू आहे पण इतकाही नाही कि पीयचडी करीन . अधीमधी राहणे पसंत नसते एकतर तळ्यात किव्वा मळ्यात . एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही तर depression येते . कमालीचा आळशीपणा अंगात असतो . कलाप्रेमी आहे . ढीगभर छंद आहेत .सतत एकाच गोष्टीचा कंटाळा येतो .सतत काहीतरी नवीन शोधात असतो . कुटुंबाबरोबर मिळून मिसळून राहायला आवडते .
आणखी कोण वृषभ चा आहे का कोण इथे ? . कळवा तुमचा स्वभाव . बघुया किती आणि काय जुळते ते ....
>>> " माझी काही स्वभाव
>>> " माझी काही स्वभाव वैशिष्ठ्ये सांगते, वृषभाला सुट होतात का सांगा...
वृषभ पुरूष स्त्रियांविषयी इतर राशींपेक्षा जास्त रसिक असतात. खूप जास्त रसिकता असेल तर आंबटशौकीनपणा, फ्लर्टिंग, विबासं इ. असते.
लोला, आधी स्वःतचे भविष्य
लोला, आधी स्वःतचे भविष्य सांगा म्हणली, घाबरु नका..
आता भविष्य सांगितल्यावर घाबरली की काय?
कोणी कन्या राशी आणि कुंभ
कोणी कन्या राशी आणि कुंभ राशीच्या कॉम्बो बद्द्ल सांगा प्लीज .. मग ठरवेन म्हण्ते होकार् का नकार ते
चने असा होकार - नकार ह्या
चने
असा होकार - नकार ह्या ढोबळ गोष्टींवरून ठरवू नकोस... 
भुंग्या अरे अजिबात नाही ..
भुंग्या अरे अजिबात नाही .. मज्जा म्हणुन लिहीले .. एक मत म्हणुन विचारलं .. नंतर कोणी मधे आलं तर पुरावा माबोचा देइन म्हणते
माझ पण सान्गा ना - चन्द्र रास
माझ पण सान्गा ना - चन्द्र रास धनु आणी लग्न रास कन्या.
मुंबईकर, ती मला सिंहेची
मुंबईकर, ती मला सिंहेची लक्षणं वाटताहेत. (वृषभ इतका विचार करत नाहीत.)
कर्क - या राशीची माणसे प्रेमळ
कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात हो मी कर्क राशि आहे
:
मुंबईकर, माझी आईही वृषभ.
मुंबईकर, माझी आईही वृषभ.
तुमची खालची वैशिष्टं तंतोतंत जुळतात.
तिची अजून काही वैशिष्टं. वृषभ ला जुळतात का कुणाला बगा 
१) ती अतिशय हळवी आहे. २) नाना कलांची आवड अन हौस आहे - त्यासाठी महेनत घेण्याची तयारी असते. ३)नीटनेटकेपणा खूप ४) पेशन्स खूप आहे इ.इ.
"देण्याची वृत्ती माझ्यात्पण आहे पण ती गोष्ट माझ्या आवडीची असली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी मी तहान भूक विसरून जातो .अगदी कुठलीही . सहसा व्यक्ती मनातून उतरत नाहीत . निवांत एकांत वास कायम शोधात असतो . बोलणे कधी कधी जास्त तर कधी खुपच कमी असते . कधीतरी अग्ग्रेसिवे होतो कायम नाही . स्थैर्य आणि शांतता शोधात असतो . टोकाची भूमिका घेतो . अभ्यासू आहे पण इतकाही नाही कि पीयचडी करीन . अधीमधी राहणे पसंत नसते एकतर तळ्यात किव्वा मळ्यात"
कर्क राशीची माणसे
कर्क राशीची माणसे स्वयंपाकघरात रमणारी असतात>>>>>> माझ्या नवर्याने आज पर्यंत किचनमध्ये पाऊलही टाकलं नाही अगदीच प्रॉबल्म असेल तर बाहेरुन मागवेल पण करणार मात्र नाही

वुश्चिकची लक्षण सांगितल्या प्रमाणे नांग्या नाही हो मारत बसत मी. राग येतो पण याचा की मला साध्या वाटतात त्या गोष्टी इतरांना का जमत नाहीत?
घरसजावटीतले
घरसजावटीतले राशीरंग
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=211504:...
इथे माझ्या चंद्रराशीसाठी जे वर्णन दिले आहे, त्यातला प्रत्येक मुद्दा बरोबर आहे
मी वृश्चिक. वरचे सगळे आडाखे
मी वृश्चिक. वरचे सगळे आडाखे थोडेफार जुळताहेत.
पत्रिका वगैरे बघण्याचा योग
पत्रिका वगैरे बघण्याचा योग आला नाही. एकदा लिंबूदाना माहिती कळविली पण त्यानी माझी रास सांगितली नाही. नंतर एका मित्र ब्राह्मणाकडून माहिती घेतली. तर श्री. वृषभ सौ. सिंह हे कॉम्बिनेशन कसे असते?
<< मुंबईकर, माझी आईही वृषभ.
<< मुंबईकर, माझी आईही वृषभ. तुमची खालची वैशिष्टं तंतोतंत जुळतात. तिची अजून काही वैशिष्टं. वृषभ ला जुळतात का कुणाला बगा
१) ती अतिशय हळवी आहे. २) नाना कलांची आवड अन हौस आहे - त्यासाठी महेनत घेण्याची तयारी असते. ३)नीटनेटकेपणा खूप ४) पेशन्स खूप आहे इ.इ. >>
@अनघा-मीरा :
सर्वच आया हळव्या असतात . मी हळवा आहे कि नाही माहिती नाही पण बाकी सर्व जुळते . सहनशक्ती खूप आहे तुझ्या भाषेत पेशन्स . घरातल्या वस्तू जगाच्या जागी हव्यात नाहीतर डोके फिरते .दर वर्षाला एक एक नवीन हौस , छंद तयार होतो .
@दिनेश्दा
मी एवढा विचार करत नाही . जुळते का ते बघण्यासाठी लिहिले . जे जे डोक्यात येईल ते लिहिले विचार केलाच नाही तुम्ही सिंह म्हणताय पण ज्योतीश्नेच सांगितले तुझी रास वृषभ म्हणून ..........
व्यक्तिमत्वानुसार
व्यक्तिमत्वानुसार कंपॅटिबिलीटी राशी सांगितल्या की बर्याच जणांच्या प्रश्णांना उत्तरं मिळतील. आणि अर्थातच छत्तीसच्या आकड्याच्या राशी. :-). वाचायला आवडेल.
>>> अर्थातच छत्तीसच्या
>>> अर्थातच छत्तीसच्या आकड्याच्या राशी. . वाचायला आवडेल.
मीन व कन्या राशीचे एकमेकांशी अजिबात जुळत नाही. तसेच सिंह व मकर पण एकमेकांशी जुळवून घेत नाहीत. मकरेचे सिंहप्रमाणे वृश्चिक व मेषेशी फारसे जुळत नाही.
जन्म राशी कुंभ आणि लग्न राशी
जन्म राशी कुंभ आणि लग्न राशी कर्क या बद्दल पण सांगा
नवरा बायको दोघांच्या राशी
नवरा बायको दोघांच्या राशी सारख्या असतील तर ....
३६ गुण जुळतात असे असते का?
आमच्या दोघांची रास मकर आहे.
>>>मीन व कन्या राशीचे
>>>मीन व कन्या राशीचे एकमेकांशी अजिबात जुळत ना>>><<
माझ्या अनुभवाप्रमाणे उलट आहे.
या बाफची रास कुठली?? यावर शनी
या बाफची रास कुठली?? यावर शनी वक्री झाला का? की लग्नराशीत मंगळ शिरला???
३ दिवस धबाधबा वहणारा बाफ काल पासुन मात्र सुप्तावस्थेत आहे
Pages