मी पोहे खाल्ले नाही..

Submitted by रीया on 16 February, 2012 - 01:35

मी पोहे खाल्ले नाही

संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव

मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही

भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

लईच भन्नाट आहे. हसून हसून ढेर ! Proud

किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही>> :नशीबाचे भोग: ओन्ली कॉफी इर्क! Sad very bad!

एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही >>> :सहानुभूती:

गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही>> साऊथ मध्ये भेळेत हे घालतात. धन्य आहे. :कोपरापासून नमस्कार:

धन्यु सेनपती,पजो,निंबु

गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही>> साऊथ मध्ये भेळेत हे घालतात. धन्य आहे. :कोपरापासून नमस्कार:
>>> पुर्ण साऊथ च माहीत नाही पण केरळ मध्ये तरी घालतात्...अस ऐकलय की बँगलोर मध्ये चिंचेच्या पाण्याऐवजी सांबार घालतात Sad

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे आणि भोवताली 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही >>>>

Proud

Rofl

फालकोर्,जामोप्या,गंधर्व,अविनाश्,बागेश्री,मीत : धन्यु धन्यु धन्यु Happy

रीया..
तुझी कविता वाचून
आता केरळ मधे सुट्टीसाठी जाणार नाही!!!

>>>>

एकदा पाहुन याहो.....७-८ दिवस जेवणाचे हाल सोसु शकता Happy

प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

असे नाव लिहिता तुम्ही? केरळी लोक आश्चर्यात पडले असतील.. त्यांच्या स्टाइलने म्हणजे टी. प्रियांका .

वर्षा, ओजस : धन्यवाद Happy

असे नाव लिहिता तुम्ही? केरळी लोक आश्चर्यात पडले असतील.. त्यांच्या स्टाइलने म्हणजे टी. प्रियांका .
>>> टी प्रियांका नाहि ..प्रियांका पी....
आणि मी फक्त कवितेसाठी अस नाव लिहिते.नाही तर प्रियांका फडणीस च लिहिते

मी हे या चालीत वाचलं होतं - 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलपटं उचलणार नाही.' म्हटलं काहीतरी बाणेदार कविता दिसते आहे. पण इथे तर बिचारी झाली आहे रिया.

त्या 'लग्नाच्या घोळा'मुळे मला जिथे तिथे पोहे दिसले कि चहा आणि मुलगी बघणं हाच सिक्वेन्स आठवतो आहे. मला वाटलं त्याच सिरिजमधे भर असेल ही कविता, तर ते पण नाही.

रिया, मजेदार आहे कविता. Happy

गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता हि साऊथ ला येणार नाही.....!

सही......................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

Pages