मी पोहे खाल्ले नाही
संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव
मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही
भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही
भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
अरे धागा नाही, रियाला केरळात
अरे धागा नाही, रियाला केरळात हलवायला हरकत नाही (नवा जोडीदार केरळातला मिळो)
मुकु गिरीदादा
मुकु
गिरीदादा
बेंगलोरमधे अनेकवेळा व्हेज
बेंगलोरमधे अनेकवेळा व्हेज अमुक तमुक (कोल्हापुरी, जयपुरी, हैद्राबादी, इ.) मधे गाजर आणि बिन्स मुक्तहस्ताने घालतात आणि इतर गोष्टी बहुतेक हिंगासारख्या चिमूटभर घालतात. अस्सा राग येतो ना.
वेज दोसा असा प्रकार घेऊन पाहिला तर त्यामधे पण दोशावर गाजर आणि बिन्सच भुरभुरवले होते.

हाईट म्हणजे जपानमधेही तेच, अनेक देशी रेस्तराँमधे मिक्सवेजच्या नावाखाली गाजर आणि बिन्सचा भडिमार असतो.
आणि विशेष म्हणजे या बाबतीत, पंजाबी, नेपाळी, केरळी, सर्व प्रकारच्या रेस्तराँचे अलिखित एकमत आहे.
बेंगलोरमधे एवढे भरमसाठ मराठी लोक आहेत पण एकही मराठी पदार्थ मिळतील असे रेस्तराँ नाही.
नाही म्हणायला एक ते राजवर्धन आहे, पण सॉरी कॅटेगरीतले आहे.
एवढ्या वर्षात कोणीच कसा विचार केला नाही याचे फार आश्चर्य वाटत आहे.
रियाच्या कवितेवरून अतीदक्षिणेकडील परिस्थिती अतीदक्षता विभागासारखी वाटत आहे.
नारळाच्या तेलातल्या उप्पीटात
नारळाच्या तेलातल्या उप्पीटात केळं??
बाकी हे काव्य.. रिया..
रियाच्या कवितेवरून
रियाच्या कवितेवरून अतीदक्षिणेकडील परिस्थिती अतीदक्षता विभागासारखी वाटत आहे


>>>
अगदी अगदी
अंजली
भारी आहे की.
भारी आहे की.
Pages