मी पोहे खाल्ले नाही
संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव
मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही
भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही
भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
अग अग रिया.... तुझ्याशिवाय
अग अग रिया.... तुझ्याशिवाय अश्या झक्कास विडंबन कविता कोण लिहीणार..... तु विडंबन क्विन शोभतेस...... बाकी ते केरळचे १०१% खरे लिहीलेस बघ..... आम्ही केरळला १० दिवसांसाठी गेलो होतो.... चांगल्या हॉटेलमध्ये सोय होती तरी तिथे नाश्ट्याचे दोनच पर्याय.... एक साउथ इंडियन व दुसरी कॉन्टिनेंटल ,रोज सकाळ संध्याकाळ फक्त इडली,डोसा,अप्पम, ब्रेड्,जॅम,बटर , इतका कंटाळा आला होता कधी घरी येउन आपल्या इथला चटपटीत नाश्ता करते असे झाले होते
(No subject)
ताई, सगळ्या प्रतिसादकांचे
ताई,
सगळ्या प्रतिसादकांचे आभार!

कविता तेंव्हा खुप मागे गेलेली तेंव्हा स्वतःहुन वर नको काढायला म्हणून प्रतिसाद दिले नव्हते
आज भारतीताईमुळे कविता वर आलीच आहे तर तेवढ्यात आभार मानुन घेते
हा हा हा सहि आहे.. केरळ
हा हा हा सहि आहे..
केरळ बद्दल सहमत आणि वर काढणार्याचेही धन्यवाद..
मज जन्म फळाचा मिळता मी केळे
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही
मस्तच ...!!
अगागागागा! सौदिंडियन लोकांनी
अगागागागा! सौदिंडियन लोकांनी घेरल्या गेलेल्या बिचारीचं मनोगत आवडलं!
आज मी पण किती दिवसांनी पुन्हा
आज मी पण किती दिवसांनी पुन्हा वाचली. तेंव्हा एवढा त्रागा केलेला मी?
आता नेव्हर थॉट बट आय मिस थोज डेज
रिया .. आता मी याच फेज मधे
रिया .. आता मी याच फेज मधे आहे ..
न्यु जर्सी नाही तर टिपीकल साउथ इंडियात राहतेय असं वाटतयं .. तेलगु/ तामिळ्/मल्याळम .. सगळी भेळ!
आधी हसून घेतो मग रिप्लाय
आधी हसून घेतो मग रिप्लाय देतो
१००
१००
सही
सही
मस्त!
मस्त!
उदय थँक्स ऑल चनस, तुझ्या
उदय


थँक्स ऑल
चनस, तुझ्या भावना पुर्णपणे समजू शकते
ज्योति, तुम्हाला स्पेशल थँक्स
रिया..मस्तच..हसुन हसुन पोट
रिया..मस्तच..हसुन हसुन पोट दुखायला लागलेय.
मज जन्म फळाचा मिळता मी केळे
मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही >>> हे भारी जमलंय
एका पोळीसाठी देखील कुणी मला
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही
कस्लं भारी आहे हे! मी मिस
कस्लं भारी आहे हे! मी मिस केले होते बहुतेक..
मस्त चालीत बसतायत सगळ्या ओळी.
उपीट केळे काय प्रकार आहे? उपीटात तर केळेनसते ना? :|
आता मी जमेल तितकं इग्नोर
आता मी जमेल तितकं इग्नोर करतेय ..
मजेशीर
मजेशीर
बस्कु, अगं तिकडे लोकं उपिटात
बस्कु, अगं तिकडे लोकं उपिटात केळं मिक्स करुन खातात

मिक्स करुन म्हणजे अक्षरशः कालवुन
थँक्स ऑल
माबोवर पोस्ट केलेली ही पहिली कविता. आत्ता प्रत्येक प्रतिसादावरचे माझे प्रतिसाद वाचुन हसायला येतय
रिया, मस्त. हसून हसून दमले.
रिया, मस्त. हसून हसून दमले.
अरे देवा...
अरे देवा...
हा हा हा पण मला आवडत आपल
हा हा हा
पण मला आवडत आपल दाक्षिणात्य पद्धतीच जेवण 
बी, दाक्षिणात्य जेवण बऱ्याच
बी, दाक्षिणात्य जेवण बऱ्याच जणांना आवडतं पण अधे मधेना, तिला तिथे रोज तेच तेच बघायला लागलं असणार आणि उप्पीट-केळ मिक्स हे जरा अतीचना.
उप्पीट केळ मी आवडीने खाल्ल
उप्पीट केळ मी आवडीने खाल्ल असत. आपण प्रसादाच्या शीर्यामधे केळ घालतोच की.. ते छान लागतच की
पण तू म्हणत आहेस ते खरे आहे.
पण तू म्हणत आहेस ते खरे आहे. रोज रोज दाक्षिणात्य खाऊन खाऊन मराठी जेवण नक्कीच नजरेसमोर भिरभिर दिसत असेल.
ओके बी. प्रसादाचा शिरा गोड
ओके बी. प्रसादाचा शिरा गोड असतोना त्यात केळ सुंदर लागतं पण उप्पीट तिखट असेलना त्यात मला नाही आवडणार. ठीक आहे रे, मी सहज तू लिहिल्यावर लिहिले. आवडू शकतं ना तुला. त्यात काय पसंद अपनी अपनी.
मस्तच ! संदीप खरे च्या
मस्तच ! संदीप खरे च्या कवितेपेक्षा पण भारी
बी, एकदा खाऊन बघ उपिट
बी, एकदा खाऊन बघ

उपिट नारळाच्या तेलातच बनवलेल असलं पाहिजे ही कंडिशन
अन्विता, अगं!
आता हा धागा "आहारशास्त्र आणी
आता हा धागा "आहारशास्त्र आणी पाककृती" विभागात हलवायला हरकत नाही.
Pages