मी पोहे खाल्ले नाही..

Submitted by रीया on 16 February, 2012 - 01:35

मी पोहे खाल्ले नाही

संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव

मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही

भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

लोल्झ्झ्.....पुट्ट खाल्ल होत का कधी???>>>> एक वेगळच होत कै तरी नारळाचा चव भरलेलं. नाव माहीत नव्हते म्हणुन नै लिवलं. तेच असावं का पुट्ट का काय ते?

एक वेगळच होत कै तरी नारळाचा चव भरलेलं. नाव माहीत नव्हते म्हणुन नै लिवलं. तेच असावं का पुट्ट का काय ते?
>>>> तेच तेच Happy

.

मस्त Happy

एकदा पाहुन याहो.....७-८ दिवस जेवणाचे हाल सोसु शकता >> मस्त कविता ! आवडली ..वाचताक्षणी हास्य फुलले.

मी केरळ ला जाणार आहे,इडली सांबारही खाणार आहे !
सोबत झुणका भाकर मी बांधून नेणार आहे ...
देवांच्या या नगरी जायचे जायचे आहे एकदा ,
स्वप्न हे पूर्ण कराया ..उप्पीटहि खायला हवे ! Happy

अगदि खरे...मागच्याच महिन्यात सासरवाडित़ (केरलाला ) जाऊन आले......अन माहेरात ( चिपळुनात) येऊन एक महिन्याचा उपास सोडल्यासरख सगळ हादडल........अगदि अनुभवलेले अनुभव आहेत हे.... सत्यकविता.....

हा हा प्रिया...तर हा आहे केरळ महिमा...हम्म्म....
बरीच मजा केलीस की तू...मी जिथे आहे तिथे मला आयतं ताटात कुठलंही भारतीय दिलं तरी चालेल्..असो..

तू एकदम विडंबन मास्टर्र झालीस्..आणि सारखं साऱखं खर्^यांना काय धरतेस आता दुसरं कुणी पकड्..आधीच मला कवितेतलं कळत नाही (पण विडंबनात्लं नशिबाने कळतंय...:)
>> नारळ होण्या करिता हि साऊथ ला येणार नाही
हे सर्वोच्च आहे....:D
एंज्~ओय माडी....(माझ्या केरळया कलिगकडून मी एवढंच शिकलेय्...त्याला तुझ्या भावना सांगायला हव्यात...:)

वेका : ते माडी वैगेरे कन्नड आहे Happy मल्याळममध्ये चेयाम असतं Happy
खरे जाम आवडतात ग मला म्हणुन त्यांनाच धरते Wink

अथक,अनु धन्स Happy

मस्त
....... मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता हि साऊथ ला येणार नाही......
............ त्यातल्या त्यात हे जबर दस्त .............

मल्याळम मध्ये उपीटला उपमाव म्ह्णतात

बाकी हे केरळी लोक बर्याच पदार्थात केळ पदार्थात कु स्करून घालतात. ऊदा, पूट्ट आणी ऊपीट

चेची म्हणजे बहीण
चेटे ( चाटन) म्हणजे भाऊ

ख............ प................. लो .....................

Pages