मी पोहे खाल्ले नाही..

Submitted by रीया on 16 February, 2012 - 01:35

मी पोहे खाल्ले नाही

संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव

मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही

भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे
नानकटाईत खाल्ले दाणे नि भवती 'चेची-चेटे'
भाषेमध्येही कुठला ओळखीचा शब्द नाही
मल्याळम ऐकुन थकले पण शिकले अजून ही नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झाले नसते
मी असते जर का भाजी बटाटा झाले नसते
गाजर व ढोबळी होऊन मी भेळेत जाणार नाही
नारळ होण्या करिता ही साऊथ ला येणार नाही

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

चिंचेच्या पाण्याऐवजी सांबार नाही कधी खाल्ले / ऐकले बंगळुरात.. पण पापु किंवा भेळेत किसलेले गाजर्/कांदा खाल्ला (गिळला) आहे हापिसात.

Lol

मनिमाऊ यांस अनुमोदन, शिर्षक पाहता मला ही लोकमान्यांची आठवण झाली, मी शेंगदाणे खाल्ले नाही, मी टरफळे उचलणार नाही.

मी पोहे खाल्ले नाही, म्हणुन मी भांडी घासणार नाही
विम बार असो वा लिक्वीवड वॉश असो मी भांडी घासणार नाही Proud Wink

रीया, लई भारी! Lol ते केरळमध्ये नारळाचे तेल वापरून केलेली केळ्याची भजी खाऊन माझा जीव अगदी अस्साच काहीसा झाला होता गं... सगळीकडे नारळाच्या तेलाचा वास... जीव गुदमरला होता माझा अगदी!
काय गं पण तुला त्यांनी पोळी नाही विचारली, हे ठिके पण मल्लू पराठा? तोही नाही विचारला? ये कुछ अच्छी बात नही हुई Happy

काय गं पण तुला त्यांनी पोळी नाही विचारली, हे ठिके पण मल्लू पराठा? तोही नाही विचारला? ये कुछ अच्छी बात नही हुई
>>>>> मल्लु परोठा नाही आपम विचारल Happy

>>>>> मल्लु परोठा नाही आपम विचारल>>> ह्म्म्म्म्म्म आपम पोळीला नाही रिप्लेस करु शकत... पण मल्लू परोठा.... यम्मी!!!! टेस्टी रिप्लेसमेन्ट Happy

ह्म्म्म्म्म्म आपम पोळीला नाही रिप्लेस करु शकत... पण मल्लू परोठा.... यम्मी!!!! टेस्टी रिप्लेसमेन्ट
>>>>>> तो पण कोची मध्ये तेलात तळुन देत होते (म्हणजे इतक तेल ओघळत असायच त्यातुन )

आरसा आहे ना घरात?>>> आहे म्हणुन तर विचारल Happy

खासच !

Rofl
पण सगळ्या आठवणी जाग्या झाल्या नी मळमळुन आलं.
वन्ली कॉफी, उपिट, ईडली-डोसा, सांबार, रसम. नारळ तेलाच्या फोडण्या, आप्पम, उकडलेल्या भाज्या, बटाटा भाजी, केळीची भाजी, नारळाची चटणी आणि सर्वत्र - आसमंतात भरुन राहिलेला सांबार- रसम- डोसा- ईडलीच्या पिठाचा आंबट वास. अगाई गSSSSSSSS

पण सगळ्या आठवणी जाग्या झाल्या नी मळमळुन आलं.
वन्ली कॉफी, उपिट, ईडली-डोसा, सांबार, रसम. नारळ तेलाच्या फोडण्या, आप्पम, उकडलेल्या भाज्या, बटाटा भाजी, केळीची भाजी, नारळाची चटणी आणि सर्वत्र - आसमंतात भरुन राहिलेला सांबार- रसम- डोसा- ईडलीच्या पिठाचा आंबट वास. अगाई गSSSSSSSS
>>>>>>>> लोल्झ्झ्.....पुट्ट खाल्ल होत का कधी???

Pages